पाथरी विधानसभाचे आ.मोहन फड यांच्या प्रयत्नास यश
[] मानवत येथे रमजानच्या काळात महिनाभर लोडसेटीग बंद []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१९: पाथरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार मोहन फड यांनी रमजान महिण्याच्या काळात लोडसेटीग बंद करण्याची मागणी म.रा.वि.म. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती त्यांच्या या प्रयत्नास यश आले असुन मुस्लीम बाधवाच्या पविञ रमजान महिण्यात महिनाभर लोडसेटीग न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ने घेतला आहे यामुळे मानवत येथील मुस्लीम समाज आमदार मोहन फड यांचे आभार व्यक्त करित आहे.
दि.१७ मे पासुन मुस्लीम धर्मियाचा पविञ असा रमजान महिना सुरु झाला आसुन सध्या उन्हाचा कडक तडाखा बसत असताना उपवासाचा महिणा सुरु आसल्याने यामुळे मुस्लीम बांधवाना लोडसेटीग मुळे ञास होऊ नये यासाठी पाथरी,मानवत,सोनपेठ व परभणी तालुक्यातील लोडसेटीग रमजान च्या काळात महिनाभर म.रा.वि.मंडळ च्या वतीने होणारी लोडसेटीग बंद करण्यात यावी व व्यवस्थित विजपुरवठा करावा या मागणीचे विशेष बाब म्हणुन १६ मे रोजी परभणीचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांना आ.मोहन फड यांनी निवेदन देऊन लोडसेटीग बंद करण्याची मागणी करण्यात आली होती याची दखल
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने घेतली असुन रमजान काळात मानवत येथील लोडसेटीग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आमदार मोहन फड यांच्या या कार्याबद्दल मानवत येथील मुस्लीम बांधव कृतता व्यक्त करित आहे.
Saturday, May 19, 2018
आ.मोहन फड यांच्या प्रयत्नामुळे मानवत येथे रमजानच्या महिण्यात लोडसेटीग बंद!
Thursday, April 26, 2018
राजकिय विरोधकांनी सुडबुध्दीने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला - डॉ.अंकुश लाड.
विरोधकांनी सुडबुध्दीने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला - डॉ.अंकुश लाड.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२६: मानवत येथील कॉंग्रेसच्या माजी जिल्हाअध्यक्षाला शिवीगाळ केल्याप्रकरणी मानवत येथिल भाजपा युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्यावर मानवत पोलिस ठाण्यात दिनांक २४ एप्रिल मंगळवारी रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे राजकिय वातावरण तापले असुन डॉ.अंकुश लाड यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना म्हणाले की,हा माझ्यावर गुन्हा खोटा दाखल करण्यात आला असुन राजकिय सुडबुध्दीने हे प्रकरण दाखल करण्यात आले असुन आमच्या विकास कामानी विरोधक धास्तावले असुन त्यांचे राजकिय कारर्किर्द धोख्यात आले असल्यामुळे अशा प्रकारचे खोटे गुन्हे विरोधक दाखल करत असुन आम्ही अशा प्रकरणाला घाबरणार नसुन आ.मोहन फड यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्न करत राहणार असे ते म्हणाले.
सविस्तर वृत्त असे की कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांना दिनांक २४ एप्रिल मंगळवारी रोजी यांच्या राहत्या घरी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या कार्यालयात बसले असताना डॉ. अंकुश लाड हे मद्यधुंद अवस्थेत तेथे आले व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करित आम्ही नगर अध्यक्षाचे जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयातुन घेऊन आलो आहोत. तुमच्याने आमचे काहीही वाकडे झालेले नाही. तुमचे बघून घेऊ. तुम्ही सतत आमच्या विरोधातील तक्रारदाराला मदत करीत होतात आता यापुढे आम्ही तुमचे व्यक्तिगत पातळीवर बघून घेऊ असे धमकी देत आसल्याची तक्रार बालकिशन चांडक यांनी मानवत पोलीस स्टेशन येथे दिली होती माञ डॉ.अंकुश लाड यांनी आपल्या वरील सर्व आरोप फेटाळुन लावले असुन चाडक यांचे राजकिय कारकिर्द संपल्यामुळे ते नैराश्येतुन असे आरोप करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
Tuesday, April 24, 2018
मानवत येथील के.के.एम.कॉलेजचे प्राध्यापक पवन पाटील बारहाते यांना पीएच.डी प्रदान.
प्रा.पवन पाटील बारहाते यांना पीएच.डी प्रदान.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२४: मानवत येथील के.के.एम महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा.पवन प्रकाशराव पाटील बारहाते यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांच्या उच्च व निम्न सामाजिक-आर्थिक दर्जा असलेल्या आंतरविद्यापीठीय खो- खो खेळाडूंची चिंता,ताण व मानसिक स्वास्थाचा एक अभ्यास या संशोधन कार्यास पीएच डी पदवी प्रदान केली आहे. त्यांना डॉ. एस. एस.शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
प्रा. पाटील यांच्या यशाबदल पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रूवार,उपाध्यक्ष द्वारकादास लड्डा,कोषाध्यक्ष रामचंद्र कत्रूवार ,सहसचिव अनिल नखाते,विजयकुमार दलाल,दिलीप हिबारे,बालकिशन चाडक व संस्थचे इतर कार्यकारिणी सदस्य, माजी प्राचार्य डॉ.अशोक चिंदुरवार,प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे,उपप्राचार्य डॉ. टी. व्ही. मुंडे व सर्व सहकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आसुन शहरातुन सर्वच स्तरावरुन त्यांना शुभेच्छा मिळत आहे.
Sunday, April 22, 2018
मानवत येथे शिवसेनेच्या वतीने पाथरी येथील आक्रोश मोर्चासाठी मानवत येथे मोटर सायकल रँलीचे आयोजन.
पाथरी येथे शिवसेनेचा शेतकरी आक्रोश मोर्चा .
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
पाथरी येथे दि .२३ एप्रिल रोजी सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले असुन या मोर्चासाठी मानवत शहरातून भव्य मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
हि मोटर सायकल रॅली सरकारी दवाखान्या समोर वेळ ठीक ९-३० वाजता निघणार आहे . तरी मानवत तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी या रँलीत मोठ्याप्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन मानवत तालूका शाखा व शहर शाखा सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिकाच्या वतीने करण्यात आले आहे.
मानवत शिवसेनेच्या वतीने पाथरी येथील आक्रोश मोर्चासाठी मानवत येथे मोटर सायकल रॅली चे आयोजन.
चपाथरी येथे शिवसेनेचा शेतकरी आक्रोश मोर्चा .
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
पाथरी येथे दि .२३ एप्रिल रोजी सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले असुन या मोर्चासाठी मानवत शहरातून भव्य मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
हि मोटर सायकल रॅली सरकारी दवाखान्या समोर वेळ ठीक ९-३० वाजता निघणार आहे . तरी मानवत तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी या रँलीत मोठ्याप्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन मानवत तालूका शाखा व शहर शाखा सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिकाच्या वतीने करण्यात आले आहे.
Friday, April 13, 2018
सोनपेठ येथे भाजपाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आभिवादन.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना सोनपेठ भाजपाच्या वतीने विनम्र अभिवादन.
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
सोनपेठ येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने बालाप्रसादजी मुदंडा यांच्या भगिरथी निवासस्थानी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्टनेते रमाकांतराव जाहागिरदार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष बालाप्रसादजी मुदंडा, जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे,युवा मोर्चाचे मा. प्रदेश सदस्य रंगनाथराव सोळंके, तालुका अध्यक्ष महादेव गिरे पाटील, तालुका सरचिटणीस मल्लिकार्जुन सौंदळे, शहराध्यक्ष धनंजय देशमुख, संतोष दलाल, मंगेश मुळी, पत्रकार सुदर्शन डाके आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Saturday, April 7, 2018
मानवत येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्यां जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
मानवत येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्यां जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.७ : मानवत येथे क्रांतिसुर्य महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने १० एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान विविध प्रबोधनात्मक व संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन संत सावता माळी चौक येथे करण्यात आले आहे.
१० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मराठा सेवा संघाच्या राज्य प्रवक्ता ॲड वैशाली डोळस यांचे महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे.
११ एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त रोजी सकाळी दहा वाजता मोटारसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले असुन या दुचाकी फेरीचे उदघाटन माजी नगराध्यक्ष अमृतराव भदर्गे यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी सहा वाजता भारत भाग्य विधाता या महा नाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन विजय वाकोडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सचिन कोक्कर, शाम चव्हाण, सत्यशिल धबडगे, रहिम बागवान, संजय बांगड, बाबूराव नागेश्वर, वैजनाथ महिपाल, दत्ताअ चौधरी, गोविंद घाडगे, उपस्थित राहाणार आहेत.
१२ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही जलसा कार्यक्रम होणार आहे. उदघाटन डॉ अंकुश लाड यांच्या हस्ते होणार आहे. गणेश कुमावत, विनोद राहाटे, गिरीश कत्रूवार, राजेश कडतन, बाबूराव हलनोर, मोहन लाड, केशव शिंदे आदी उपस्थित राहाणार आहेत. सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे अध्यक्ष राजु खरात राहाणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात उपस्थीत राहावे असे आव्हान नगरसेवक राजुभैय्या खरात, नगरसेवक अनंता भदर्गे ,दिपक ठेंगे, चंद्राकांत मगर. नितीन गवळी, रवि पंडित, जनार्धन किर्तने यांनी केले आहे.
Thursday, April 5, 2018
संभाजी ब्रिगेडच्या मानवत तालुकाध्यक्षपदी गजानन बारहाते यांची निवड!
संभाजी ब्रिगेडच्या मानवत तालुकाध्यक्षपदी गजानन बारहाते यांची निवड.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०५: मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या मानवत तालुकाध्यक्षपदी श्री. गजानन बारहाते यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच संघटनेच्या औरंगाबाद येथे झालेल्या मराठवाडा विभागीय अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या हस्ते श्री.बारहाते यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे मराठवाडा विभागाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, शांताराम कुंजीर आदी उपस्थित होते.अधिवेशनात गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.गजानन बारहाते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात.आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून युवकांचे संघटन मानवत तालुक्यात उभे केले आहे.त्याच्या कार्याची दखल घेत त्याची निवड करण्यात आली आहे.या निवडिबद्दल त्यांना सर्वच स्तरावरुन शुभेच्छा मिळत आहे.
Tuesday, March 20, 2018
पञकारांवरील खोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा पञकार संघ मानवतच्या वतीने आंदोलन - सत्यशिल धबडगे
पञकारावरील खोटे गुन्हे मागे घ्या;मानवत पञकार संघाची मागणी.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२०: परभणी येथील पञकारावर खोटे गुन्हे दाखल करुन चौथ्या स्तंभावर आघात करण्याचा प्रयत्न होत असल्या प्रकरणी मानवत पञकार संघाच्या वतीने काळ्याफिती लावुन आज दि.२० मार्चरोजी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पञकारावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
इयत्ता दहावीच्या विज्ञान तञज्ञान विषयाची प्रश्नपञीका व्हाईरल झाली व अनेक मोबाईलवर प्रश्नपञीका फिरल्या प्रकरणाची संबंधीत पेपर सुटल्या नंतर पेपर परताळून पाहिले आसता तंतोतंत निघाली या सदर्भात माध्यमिक शिक्षणधिकारी यांच्याशी संवाद साधला त्यानंतर त्यांची रितसर प्रतिक्रियासह दि.१४ मार्च रोजी दैनिक लोकमत व दैनिक पुण्यनगरी या वृत्तमानपञात बातमी प्रसिद्धी झाली.
तथापि या बाबतीत शहानिशा करून जिल्हा शिक्षणधिकारी यांना माहिती देवून ही जिल्हा शिक्षण विभाग परभणी यांनी नवामोढा पोलिस स्टेशन परभणी येथे दैनिक लोकमत जिल्हाप्रतिनिधी व दैनिक पुण्यनगरी जिल्हाप्रतिनिधी यांच्या विरूध्द कलम ५ (१) , ५ (२) म वि गैर कायदा १९८२ व कलम ७२ नुसार शहानिशा न केल्या बातमी छापल्या बदल गुन्हा दाखल केला . हा प्रकार म्हणजे चाललेला गैरप्रकार माध्यमाने उघडकीस आनुनये म्हणून हे कारस्थान रचल्याचे दिसत आहे. वास्तविक पहाता संबंधित दैनिकांच्या जिल्हाप्रतिनिधीनी रितसर शहानिशा करूनच पेपर व्हाईरल चे वृत्त प्रसिध्द केले असताना चक्क बातमी का छापली म्हणून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करणे म्हणजे लोकशाही च्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्या सारखे आहे परभणी जिल्हात दहावी व बारावी परीक्षेत कॉपी चा सुळसुळाट आहे तर अनेक परिक्षा केंद्रावर गैरप्रकार होत आहेत प्रश्नपञीका मोबाईल व्हाईरल होत आहेत. कालपरावा वर्धा येथे पेपरफुटी प्रकरणी संशियत आरोपी म्हणून परभणी येथिल आरोपी वर गुन्हा दाखल झाला आहे हे सर्व होत आसताना प्रसारमाध्यमानी डोळाझाक काम करावे आमचे गैर कृत्य उघडकीस आनुनये म्हणुन शिक्षण विभागाच्या अधिकाराना वाटत आहे वरील प्रकरणी दैनिक लोकमत दैनिक पुण्यनगरी यांच्या पञकारांवर गुन्हे दाखल केले आहेत हे गुन्हे मागे घेण्यात यावेत व तसेच कॉपी प्रकरणी डोळाझाक करणाऱ्या शिक्षणधिऱ्या विरूद्ध कारवाई करण्यात यावी असे निवेदन मानवत तहसिलदार नखुल वाघुंडे यांना मानवत तालुका पञकार संघाच्या वतिने देण्यात आले .यावेळी मानवत तालुका पञकार संघाचे तालुका अध्यक्ष सत्यशिल धबडगे , मा.ता.पञकार माजी.अध्यक्ष कचरूलाला बारहाते , पञकार संघाचे सचिव प्रा.गोविंद गोलाईत ,पञकार संघाचे उपध्यक्ष मुस्तकिम बेलदार, भैय्यासाहेब गायकवाड , विलास बारहाते ,डॉ.सचिन चिद्रवार ,शामभाऊ झाडगावकर , हफिस बागवान , अलिम खान ,ईरफान बागवान ,राजु पठाडे उपस्थीत होते.
Friday, March 9, 2018
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी राजुभैय्या खरात यांची निवड.
मानवत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनीक जयंतीची कार्यकारीनी जाहीर.
[]अध्यक्षपदी राजकुमार खरात तर कार्यअध्यक्ष म्हणुन दिपक ठेंगे यांची निवड []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०८: मानवत शहरात प्रती वर्षा प्रमाने या ही वर्षी महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या संयुक्त जयंतीचे आयोजन मानवत शहरात करण्यात येनार आहे त्यासाठी त्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्ष म्हणुन लोकप्रिय नगरसेवक राजकुमार खरात तर कार्यध्यक्षपदी दिपक ठेंगे तर स्वागतध्यक्ष पदी सोमदत्त भदर्गे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मानवत येथील शासकीय विश्रामगृहात दि. ८ मार्च २०१८ रोजी सांयकाळी ७ वाजता माजी नगर सेवक बन्सीदादा भदर्गे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत महात्मा फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या सार्वजनिक जयंती च्या अध्यक्ष पदी लोकप्रिय नगर सेवक राजकुमार खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सार्वजनिक जयंती ची कार्यकारणी खालीलप्रमाणे घोषित करण्यात आली स्वागतअध्यक्षपदी सोमदत्त भदर्गे , सचिव पदी नितीन गवळी , कार्यध्यक्ष पदी दिपक ठेंगे , कोषाध्यक्षपदी जनार्धन किर्तने ,सहसचिवपदी रवि पंडीत , तर मुख्यसल्लागार पदी माजी नगरअध्यक्ष अमृत भदर्गे , नगरसेवक अनंत भदर्गे , आशोकदादा पंडीत ,तुळशीराम डाके , संपत पंडित , गजानन बारहाते ,धम्मपाल सोनटक्के , नारायण धबडगे , आशोक धापसे , महेद्र ठेंगे , सत्यशिल धबडगे ,सचिन रनखाब , संजय उजगरे , रामाभाऊ जोधळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .या बैठकीचे प्रस्ताविक चंद्रकांत मगर यांनी मांडले तर आभार बन्सीदादा भदर्गे यांनी मानले यावेळी शहरातील सर्व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.या निवडिचे शहरात सर्वच स्तरावर स्वागत होत असुन कार्यकारणीस शुभेच्छा मिळत आहे.
आ.मोहन फड यांच्यावतीने महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन.
आ.मोहन फड यांच्यावतीने महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०८: पाथरी विधानसभाचे आमदार मोहन फड यांच्या वतीने महिलादिनानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात गर्भपिशवीच्या आजारांच्या महिलांना आज दिनांक ९ मार्च रोजी मानवत रोड रेल्वेस्टेशन येथुन तपोवन रेल्वेन डॉ.डी.वाय पाटील हास्पिटल मुंबई येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले या रुग्णांचा जाण्यायेणाचा व जेवणाचा संपुर्ण खर्च आमदार मोहन फड करत आहेत .या वेळी पांडुरंग नखाते ,शिंदें मनोलीकर ,बाबा शेख व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार साहेबांनी नागरिकाच्या आरोग्यासाठी आता पर्यत गंभीर विविध आजारपणाने ञस्त नागरिकांना मोफत उपचार सुरु करुन एक मोठे समाजकार्य मतदारसंघात सुरु केले असल्याने नागरीक आनंद व समाधान व्यक्त करीत आहे.
Tuesday, March 6, 2018
मानवत येथे शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप.
मानवत येथे शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकाचे वाटप.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०६: मानवत शहरातील शिवनेरी प्रतिष्ठानचा स्पर्धा परिक्षा केंद्रात शिवजयंतीचे निमित्ताने विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकाचे वाटप करून विधायक उपक्रमातुन शिवजयंती साजरी करण्यात आली.
नगरसेवक ॲड.किरण सुरेशराव बारहाते आपल्या शिवनेरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासुन शहरातील रचना
कॉलनी येथे विनामूल्य स्पर्धा परिक्षा केंद्र चालवितात.या ठिकाणी शहरातील चाळीस-पन्नास विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षाची तयारी करतात.या केंद्राचे शिवनेरी प्रतिष्ठान कडून व्यवस्थापन केले जाते .सर्व सदस्य आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून या स्पर्धा परिक्षा केंद्राचे व्यवस्थापन करतात.या ठिकाणी स्पर्धा परिक्षासाठी आवश्यक असणारी पुस्तके व इतर साधनसामग्री विनामूल्य दिली जाते. ॲड.बारहाते यांनी विद्यार्थ्यांची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी सांगितलेली पुस्तके उपलब्ध त्यांना करून दिली.
ॲड.बारहाते यांनी पुणे येथून मागवलेली नव्वद पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाचे शहरात कौतुक केले जाते. ही पुस्तके पुणे येथून आणण्यासाठी डॉ. परमेश्वर तिडके व ॲड. अरविंद खेडकर पाटील यांनी मदत केली.
या वेळी प्रसाद जोशी,सुरेश चव्हाण , प्रा.किशन बारहाते,विष्णु लाड,संदीप काळे,नितीन लाड,शशिकांत नेवरेकर आदी उपस्थित होते.
Monday, March 5, 2018
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या अध्यक्ष पदी विजय खरात यांची बिनविरोध निवड .
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती च्या अध्यक्ष पदी विजय खरात यांची बिनविरोध निवड .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०५: मानवत येथिल बौध्दनगर नगर येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती भव्य दिव्य साजरी करण्यासाठी बौध्दनगर येथे दि.२८ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ८ वाजता कमशिल बुध्दविहार येथे माजी नगरसेवक बन्सी भदर्गे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली .
१४ एप्रिल २०१८ रोजी होणाऱ्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती अध्यक्ष पदी विजय खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर खालीलप्रमाणे कार्यकारणी ची निवडित उपाध्यक्षपदी विजय धबडगे ,सचिव योगेश गायकवाड , कोषाध्यक्ष बापुराव धबडगे , सहसचिव अमोल डंबाळे , कार्यध्यक्ष जनार्धन किर्तने तर सल्लागार समिती वर सखाराम व्हावळे , मुंजाजी गायकवाड , किशोर भदर्गे , विष्णू भदर्गे , अभिमान धबडगे , उत्तम घनघाव ,मुंजाजी घनघाव , लहु अंभोरे , बाबाराव भदर्गे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी प्रभाग दोन चे नगरसेवक अनंत भदर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारणी चे निवडीचे कार्यक्रम संपन्न झाला तर बौध्दनगर मधिल उपासक मोठ्या संख्येने या बैठकीस सहभागी झाले होते या निवडिबद्दल अध्यक्ष व पदाधिकारिना शुभेच्छा मिळत आहे.
Sunday, March 4, 2018
युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या प्रमुख उपस्थीत स्नेहसम्मेलनाचे आयोजन.
युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या प्रमुख उपस्थीत स्नेहसम्मेलनाचे आयोजन संपन्न .
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत येथिल आनंदवन इंटरनॅशनल स्कुल चा दुसरा 'तरंग' हा रंगारंग स्नेहसंमेलन कार्यक्रम मंगळवार दि.२७ फेब्रुवारी रोजी युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या प्रमुख उपस्थीत स्नेहमेळाव्याचे आयोजन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेच्या वतिने सामाजिक संवेदना जोपासत जन्मभूमी फाऊंडेशन ला गरीब शेतकरी कुटूंबाला मदत करण्या साठी विस हजार रुपये मदतीचा धनादेश संस्थापक अध्यक्ष शेख अली यांनी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमा साठी जि.प. च्या उपाध्यक्षा तथा शिक्षण आणि आरोग्य सभापती सौ भावनाताई नखाते,युवानेते डॉ.अंकुश लाड, मानवत पालीकेच्या नगराध्यक्षा स्वामी, पाथरी न. प .चे गट नेते जुनेदखान दुर्रांनी, नगरसेवक अलोक चौधरी, माजी उपनगराध्यक्ष लालू खान, शहजाद लाला जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष सदाशिव थोरात, सचिव किरण घुंबरे आनंदवन चे संस्थापक अध्यक्ष शेख अली, संस्था अध्यक्षा सौ .शेख शमा अली, प्राचार्या प्रिया जोशेफ यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली या वेळी जागतीक स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल आणि रोख रकमेचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या वेळी गरीब शेतकरी कुटूंबाला मदत करण्या साठी जन्मभूमी फाऊंडेशन ला २० हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. आणि गरीब शेतक-यांच्या पाच मुलींना कोठेही शिक्षणा साठी लागणा-या संपुर्ण खर्चाची जबाबदारी मौलाना आझाद ब.से.संस्था तालखेड संचालीत आनंदवन इंटरनॅशनल स्कूल ने घेतली त्या मुलींची शिफारस जन्मभूमी फाऊंडेशन ने करावी अशी घोषणा या वेळी प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष शेख अली यांनी केली. या नंतर बालगोपाळांच्या तरंग या रंगारंग स्नेहसंमेलन कार्यक्रमाला सुरूवात झाली. यात प्रारंभी भरतनाट्यम, मोबाईलचा अती वापर कसा होतोय हा मुकाभिनय, या नंतर हवा हवाई,हवा हवा, विनोदी गिते, वंदेमातरम, वंदे मातरम, काला चष्मा असे गित सादर केले तर घुमर घुमर या नृत्यावर महिला पालकांनी ठेका धरत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रिया जोशेफ,अमिता सोनी यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापीका आश्विनी हिबारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी आश्विनी हिबारे,पेरेना जैन,आरती पवार, संदिप चंद्रन, शेख जमीर, कुलकर्णी मॅडम, फटाले, राऊत यांनी परिश्रम घेतले.
Friday, March 2, 2018
मानवत येथील आनंदवन इंटरनॅशनल स्कुल येथे 'तरंग' हा रंगारंग स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न .
मानवत येथील आनंदवन इंटरनॅशनल येथे स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न .
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.०२:- मानवत येथील आनंदवन इंटरनॅशनल स्कुल चा दुसरा 'तरंग' हा रंगारंग स्नेहसंमेलन कार्यक्रम मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेच्या वतिने सामाजिक संवेदना जोपासत जन्मभूमी फाऊंडेशन ला गरीब शेतकरी कुटूंबाला मदत करण्या साठी विस हजार रुपये मदतीचा धनादेश संस्थापक अध्यक्ष शेख अली यांनी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमा साठी जि प च्या उपाध्यक्षा तथा शिक्षण आणि आरोग्य सभापती सौ भावनाताई नखाते, मानवत पालीकेच्या नगराध्यक्षा स्वामी, पाथरी न प चे गट नेते जुनेदखान दुर्रांनी, मानवत न प चे उपनगराध्यक्ष डॉ अंकूश लाड, नगरसेवक अलोक चौधरी, माजी उपनगराध्यक्ष लालू खान, शहजाद लाला जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष सदाशिव थोरात, सचिव किरण घुंबरे आनंदवन चे संस्थापक अध्यक्ष शेख अली, संस्था अध्यक्षा सौ शेख शमा अली, प्राचार्या प्रिया जोशेफ यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली या वेळी जागतीक स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल आणि रोख रकमेचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या वेळी गरीब शेतकरी कुटूंबाला मदत करण्या साठी जन्मभूमी फाऊंडेशन ला २० हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. आणि गरीब शेतक-यांच्या पाच मुलींना कोठेही शिक्षणा साठी लागणा-या संपुर्ण खर्चाची जबाबदारी मौलाना आझाद ब.से.संस्था तालखेड संचालीत आनंदवन इंटरनॅशनल स्कूल ने घेतली त्या मुलींची शिफारस जन्मभूमी फाऊंडेशन ने करावी अशी घोषणा या वेळी प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष शेख अली यांनी केली. या नंतर बालगोपाळांच्या तरंग या रंगारंग स्नेहसंमेलन कार्यक्रमाला सुरूवात झाली. यात प्रारंभी भरतनाट्यम, मोबाईलचा अती वापर कसा होतोय हा मुकाभिनय, या नंतर हवा हवाई,हवा हवा, विनोदी गिते, वंदेमातरम, वंदे मातरम, काला चष्मा असे विविध गित सादर केले तर घुमर घुमर या नृत्यावर महिला पालकांनी ठेका धरत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रिया जोशेफ,अमिता सोनी यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापीका आश्विनी हिबारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी आश्विनी हिबारे,पेरेना जैन,आरती पवार, संदिप चंद्रन, शेख जमीर, कुलकर्णी मॅडम, फटाले, राऊत यांनी परिश्रम घेतले.
Wednesday, February 28, 2018
प्रेरणाताई वरपुडकर याच्या संयोजनाखाली पाथरी विधानसभा मतदारसंघात सर्वरोगनिदान शिबीर संपन्न.
प्रेरणाताई वरपुडकर याच्या संयोजनाखाली पाथरी विधानसभा मतदारसंघातिल आवीॅ ता.परभणी येथे २८ फेब्रुवारी रोजी सर्वरोगनिदान शिबिर घेण्यात आले .
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
दि. २८: माननिय माजीमंजी श्री सूरेशरावजी वरपूड़कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणाताई वरपुडकर याच्या संयोजनाखाली पाथरी विधानसभा मतदारसंघातिल आवीॅ ता.परभणी येथे आज दि.२८ फेब्रुवारी रोजी सर्वरोगनिदान शिबिर घेण्यात आले .
या शिबिरात आवीॅ शाहापूर हासनापूर येथील गावकरी उपस्थित होते या शिबिरात एकुण ५८४ रूग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये मोतीबिंदू असलेले ६८ रूग्ण व ईतर आजाराचे ३७ रूग्ण आढळले एकुण १०५ रूग्ण ऑपरेशन साठी मूंबई ला पाठविण्यात येणार आहेत. या रूग्णांचि तपासणी ड़ाॅ. कूमावत सर ड़ाॅ. गजानन टाक यांनी केलि या रूग्णांचा प्रवासाचा सर्व खर्च सूरेशरावजी वरपूड़कर साहेब हे करनार आहेत या शिबिरात प्रेरणाताई वरपुडकर स्वताहा उपस्थित होत्या.
मानवतचे भुमिपुञ अॅड. महेश भरड न्यायधीश परिक्षेत उत्तीर्ण.
अॅड.महेश भरड न्यायधीश परिक्षेत उत्तीर्ण.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२८. मानवत शहरातील रहिवाशी अॅड महेश सुनीलदत्त भरड हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या वतिने घेण्यात आलेल्या परिक्षा सन २०१७-१८ या वर्षात दिवाणी न्यायधीश कनिष्ठस्तर परीक्षेत उत्तीर्ण होवुन त्यांनी महाराष्ट्रातुन १६वा क्रमांक पटकावला आहे.
यांना यशस्वी होण्यासाठी अॅड सतीश देशपांडे व गणेश सीरसार बी.ई.आव्हाड क्लास यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.त्यांच्या यशाबद्दल शहरातील सामाजीक,शैक्षणीक व सर्व स्तरावरील नागरिक व मिञपरिवारा कडुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Tuesday, February 27, 2018
छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रामेटाकळी येथे २८ फेब्रुवारी रोजी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान.
रामेटाकळी येथे २८ फेब्रुवारी रोजी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२७: मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे उद्दघाटन महाराष्ट्र चेंबर आँफचे उपाध्यक्ष समीर दुधगावकर यांच्या हस्ते होणार आहे तर शिवसेनेचे जिल्हाअध्यक्ष डाँ.संजय कच्छवे, बाजार समीतीचे सभापती गंगाधर कदम, काँग्रेसच्या प्रेरणा वरपुडकर, नायब तहसिलदार एन.पी.वांगुडे, पो.नि.प्रदीप पालीवाल, जि.प.च्या उपाध्यक्षा श्रीमती भावना नखाते, बाजार समीतीचे उपसभापती पंकज आंबेगावकर,बाबुराव नागेश्वर, हे प्रमुख पाव्हुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी भा.ज.पा.युवा मोर्चाचे किरण खरात, प.स.सदस्या सुमन गाढे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष वैजनाथ महीपाल, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उध्दव हारकळ, डिगांबर भिसे, अनुरथ काळे, केशव शिंदे, सरपंच सुशिला काळे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी मानवत तालुक्यासह परीसरातील शिवभक्तानी व्याख्यानास उपस्थित रहावे असे आवाहन रामेटाकळी येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.
Friday, February 23, 2018
पाथरी विधानसभा निवडणुक शिवसेनेकडुन लढवणार - डॉ.संजय कच्छवे
पाथरी विधानसभा निवडणुक शिवसेनेकडुन लढवणार - डॉ.संजय कच्छवे
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२३: शिवसेना पक्षाला वाढविण्यासाठी मी पाच वर्षापासुन सतत ईमाने एतबारे संघटन वाढण्याचे काम करत आसुन पुढिल पाथरी विधानसभा निवडणुक मी लढविनार असल्याचे परभणी जिल्हाप्रमुख डॉ.संजय कच्छवे म्हणाले ते पञकार संघ कार्यालय मानवत येथे पञकारांशी चर्चा करत असताना बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,पुढिल विधानसभा निवडणुक शिवसेना स्वबळावर लढविनार आसुन पाथरी विधानसभा मी लढविनार आहे तसेच मी ऐन निवडणुकिच्या वेळेस पक्षाकडे उमेदवारी मागणारा व्यक्ती नाही किंवा पक्षाचा ए.बी.फार्म मिळाल्यानंतर कामाला लागनार नाही तर मी सतत पाच वर्षापासुन पाथरी विधानसभेत सामान्य नागरीकांची कामे करत असुन पक्षबांधणीसाठी ही काम करत आहेत असे ते यावेळी म्हणाले . शिवसेनेचे पक्ष निरीक्षक मा.ओमराजे निंबाळकर माजी आमदार पाथरी विधानसभा कार्यकर्ता मेळाव्यास मानवत येथे आले असता त्या कार्यक्रमासाठी ते मानवतला आले असता पञकार संघाच्या कार्यलयास डॉ.संजय कच्छवे यांनी भेट दिली असता पञकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता ते बोलत होते.यावेळी शहर प्रमुख राजेश कच्छवे ,धनंजय दहे,गोविंद दहे,गणेश नाईक,सचीन बबलुजर,समाधान सोळंके ,रोहित अंधारे,नारायण बोचरे,सचीन बोचरे आदीसह शिवसैनीक मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.
औरंगाबाद येथील होणाऱ्या ईज्तेमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची सदिच्छा भेट.
लिंबे जळगाव येथील इज्तेमाला ना. बबनराव लोणीकर यांची भेट.
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
औरंगाबाद तालुक्यातील लिंबे जळगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित इज्तेमा कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरूवारी सायंकाळी सदिच्छा भेट देऊन तेथील तयारीची पाहणी केला. हा इज्तेमा दि. २४ ते २६ फेब्रुवारी या दरम्यान होत असून, देशभरातून विविध प्रांतातील मुस्लिम बांधव कार्यक्रमस्थळी दाखल होत आहेत.
लिंबे जळगाव येथे विशाल प्रांगणात या इज्तेमाचे अत्यंत शिस्तीमध्ये आयोजन केले आहे. ना. बबनराव लोणीकर यांच्यासमवेत आ. अतुल सावे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आमिर साहब, धर्मगुरू कारी शकिल साहब, जुबेर मोतीवाला, राजू बागडे, आयोजक डाँ. रियाज शेख, आयेशाखान, अतीकखान, एजाज देशमुख, नबी पटेल, अतीक पटेल, सय्यद अतहर, अन्सुल रहेमान, फेरोज कुरैशी, इम्रान शेख, सय्यद सलिम, हाजी दौलत पठाण, आमेर पठाण, शेख निसार, अन्वर अली, शाहरूख पठाण, शेख मुजाहिद, जुबेर पठाण, आदींची उपस्थिती होती. इज्तेमाच्या ठिकाणी ना. लोणीकर, आ. सावे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी रूग्णांसाठी उभारण्यात आलेल्या दवाखान्याची ना. लोणीकर यांनी पाहणी केली. तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.
गेल्या चार महिन्यांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. सुमारे दोन हजार एकर परिसरात हा इज्तेमा होत आहे. या परिसरातील शेतक-यांनी स्वखुशीने या कार्यक्रमाला जागा उपलब्ध करून दिली. जागोजागी भव्य शामियाने उभारण्यात आले असून, तीन दिवस मान्यवर धर्मगुरूंचे विचार एेकण्यासाठी मोठा मंडप उभारला असून, जिल्हा व राज्यनिहाय भाविकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्युत व्यवस्थेची सोय करण्यात आली असून, जेवणाची, राहण्याची तसेच स्वच्छताग,हांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, इज्तेमाला भेट देण्यासाठी जाताना, औरंगाबाद शहरात क्रांती चौक, भडकल गेट, वाळूज, पंढरपूर आदी ठिकाणी ना. लोणीकर यांचे मुस्लिम बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल देऊन स्वागत करण्यात आले.
Wednesday, February 21, 2018
भाजपा तालुकाध्यक्ष अनंतराव गोलाईत यांची कृ.ऊ.बा समितीला विविध मागणीचे निवेदन.
मानवत शहरातील सर्व जिनिंग मध्ये वजन काट्याना डिजिटल लोडसेल अॉनलाइन करण्याची मागणी.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२१: मानवत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जिनिंग मध्ये शेतकऱ्यांचा कापुस मोजण्या करीता डिजिटल लोडसेल वापर करून अॉनलाइन काट्याचा वापर करण्याचे कृषी उत्पादन समितीने द्यावे आशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष अनंत गोलाईत यांनी बाजार समितीचे सचिव यांना निवेदनात केली आहे.
शेतकऱ्यांच्या वारंवार कापूस मोजमापा मध्ये अफरातफर होत आसल्याने जिनिंग मालाक कशलीही दाद शेतकऱ्यांना देत नसल्यामुळे भाजपा तालुका अध्यक्ष अनंत गोलाईत यांनी दि.२० फेब्रुवारी रोजी बाजार समिती चे सचिव यांना लेखी निवेदन देले या निवेदन नमुद केली आहे की, शेतकऱ्यांची जिनिंग मालका कडून होत आसलेली लूट व बाजार समितीच्या व्यावहारात तसेच खरेदी मध्ये पारदर्शकता येण्यासाठी सर्व जिनिंग चे वजन काटे डिजिटल लोडसेलचा वापर करून ते मोडेमच्या माध्यमातून बाजारसमितीचे कार्यालयाला जोडावे आँपरेटर ची काट्यावर नियुक्ती करावी व त्या व्दारे मार्केटलाअॉनलाइन नोंद करेल आशी व्यवस्था करावी व सर्व जिनिंग च्या प्रवेश व्दारवर सि.सि.टिव्हि अॉनलाइन कराव्यात यामुळे जिनिंग मध्ये होणाऱ्या प्रत्येक हालचाली वर लक्ष राहील मार्केटला महसूल चा भरपूर फायदा होईल व जिनिंग वाले मार्केटचा महसूल चुकविणार नाही असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर भाजपा तालुका अध्यक्ष अनंत गोलाईत यांची स्वाक्षरी आहे.
Monday, February 19, 2018
मानवत पञकार संघाचे अध्यक्ष सत्यशिल धबडगे याच्यां प्रमुख उपस्थीतीत शिवजयंती साजरी .
मानवत पञकार संघाच्या वतीने शिवजयंती साजरी .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१९: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज याच्यां ३८८ वी जयंती निमित्त मानवत पञकार संघाच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . हा कार्यक्रम कचरुलालाजी बारहाते यांच्या पुण्यनगरी कार्यालयात घेण्यात आला.यावेळी छञपती शिवाजी महाराज याच्या प्रतिमेचे पुजन करुन व पुष्पहार घालुन त्यांना आभिवादन करण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष सत्यशिल धबडगे ,कचरुलालाजी बारहाते,भैय्यासाहेब गायकवाड ,किशन बारहाते,हफिज बागवान ,अलीम खान,सचीन कोक्कर ,मुस्तखीम बेलदार आदी उपस्थीत होते.
मानवत येथे मुख्यंमंञी याच्या हस्ते लवकरच शिवाजी महाराजाच्या अश्वरुढि पुतळ्याचे अनावरन करनार- आ.मोहन फड
आ.मोहन फड याच्यां हस्ते शिवाजी महाराज याच्यां आश्वरुढ पुतळ्याच्या नियोजित जागेचे सुशोभीकरणाचे भुमीपुजन संपन्न .
[]मानवत येथे मुख्यंमंञी याच्या हस्ते लवकरच शिवाजी महाराजाच्या अश्वरुढि पुतळ्याचे अनावरन करनार- आ.मोहन फड []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१९: मानवत शहरातील छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्याचे अनावरन लवकरच छञपती शिवाजी महाराजाचे वंशज संभाजी राजे व महाराष्ट्राचे मुख्यमंञी देवेन्द्र फडणविस याच्यां हस्ते करनार असल्याचे आश्वासन मा.आमदार मोहन फड यांनी दिले आहे ते मानवत येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या भुमीपुजनाच्या कार्यक्रमात बोलत होते.शहरात अनेक वर्षापासुन शिवप्रेमी जनतेकडुन छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळा व्हावा अशी मागणी होत होती या मागणीचा विचार करुन मा.आमदार मोहन फड यांनी या मागणीनुसार राज्याचे मुख्यमंञी देवेन्द्र फडणविस याच्याकडे निधीसाठी वारंवार मागणी केली व त्यांच्या मागणीला यश आले असुन मुख्यमंञी यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये निधी मंजुर केला असुन या कामाचे भव्य असे भुमीपुजन शिवजयंतीचे औचीत्य साधुन आज दि.१९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता छञपती शिवाजी महाराज पुतळा नियोजित जागा मेनरोड मानवत येथे आमदार मोहन फड याच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम दिपज्वलन करुन व छञपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी अनंतश्री विभुषीत १००८ श्री.महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज यांचा सत्कार आमदार मोहन फड याच्या हस्ते करण्यात आले.व आमदार फड यांचा सत्कार युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी केला तसेच यावेळी व्यासपिठावर उपस्थीत मान्यवराचे हि स्वागत करण्यात आले.यावेळी प्रास्तविक करताना युवानेते डॉ.अंकुश लाड म्हणाले की,आम्ही आमदार साहेबाकडे शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासाठी व सुशोभीकरणासाठी वेळोवेळी मागणी केली व आमदार साहेबानी मुख्यंमंञी याच्यां कडुन ५० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला या बद्दल त्यांचे आभार मानले तसेच यावेळी व्यासपिठावरील मान्यवर श्री.महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज ,केशव शिंदे सर,विजयकुमार कञुवार ,सुरेशराव बारहाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतश्री विभुषीत १००८ श्री.महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज हे होते. तर प्रमुख उपस्थीती म्हणुन ॲड.सुरेश बारहाते,ॲड.सतीष बारहाते,ॲड.सुधाकरराव उदावंत ,नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी,उपनगराध्यक्ष युवानेते डॉ.अंकुश लाड,पञकार संघाचे अध्यक्ष सत्यशिल धबडगे ,पंकज आंबेगावकर ,पंडितराव चौकट,संजयकुमारजी लड्डा ,जयकुमार काला, केशव शिंदे ,बालाजी गजमल,विजयकुमार दलाल,उध्दव हारकाळ ,संतोष आंबेगावकर ,आश्रोबा कुर्हाडे ,श्रीकिशन सारडा,दिलीप हिबारे,कचरुलाल कुमावत ,कचरुलालाजी बारहाते,ॲड.अनुरुध्द पांडे,सचीन कोक्कर ,शैलेश यादव,दत्ता जाधव,राजेश कच्छवे ,डिंगांबर बाकळे,गोपाळ लाड,शाम झाडगावकर ,ॲड.सुनील जाधव,मुंजाभाऊ तरटे,विष्णु आळसपुरे आदी उपस्थीत होते.या कार्यक्रमाचे प्रास्तविक युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी केले तर सुञसंचालन शंकर महाजन यांनी केले व आभार अब्दुल रहिम भाई बागवान यांनी मानले. .महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराजाच्या आश्वरुढ पुतळ्याच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या भुमीपुजनाच्या कार्यक्रमास शिवप्रेमी नागरीक व महिला मोठ्याप्रमाणात यावेळी उपस्थीत होते.
मानवत गँस एजन्सी येथे शिवजयंती उत्साहात साजरी .
मानवत गँस एजन्सी येथे शिवजयंती साजरी .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१९: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज याच्यां ३८८ वी जयंती निमित्त मानवत गँस एजन्सी येथे शिवरायाची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी छञपती शिवाजी महाराज याच्या प्रतिमेचे पुजन करुन व पुष्पहार घालुन त्यांना आभिवादन करण्यात आले.या वेळी गँस एजन्सी चे संचालक राहुल डाके,विशाल डाके,सिध्दार्थ मोरे,माणीक कांबळे ,संदिप लाटे उपस्थीत होते.
Sunday, February 18, 2018
गारपीटग्रस्त शेतकर्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी भा.ज.पा. चे उपाध्यक्ष बालाप्रसालजी मुदंडा यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंञी बबनरावजी लोणीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
सोनपेठ तालुक्यासह जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्यांना तात्काळ मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन सोनपेठ तालुका भा.ज.पा.च्या वतिने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्राचे संपर्क मंत्री मा.ना.श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांना दि.१७ फेब्रुवारी शनिवारी रोजी पालम तालुक्यातील मौ. नाव्हा येथे भेटुन देण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री बालाप्रसालजी मुदंडा,सोनपेठ तालुकाध्यक्ष महादेवराव गिरे पाटील, तालुका उपाध्यक्ष सुभाषराव सावंत,युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष गणेशराव हांडे, जेष्ठ मार्गदर्शक व्यकंटराव कसपटे,प्रा.अशोक खोडवे, हनुमंतराव सावंत आदि उपस्थित होते .
Saturday, February 17, 2018
मानवत येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळा उभारणीच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणासाठी आ. मोहन फड याच्या प्रयत्नास यश ५० लाख रुपये निधी मंजुर.
आ.मोहन फड याच्यां हस्ते १९ फेब्रुवारी रोजी छ.शिवाजी महाराज याच्या आश्वरुढ पुतळ्याच्या नियोजित जागेचे भुमीपुजन.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१७: मानवत शहरात अनेक वर्षापासुन शिवप्रेमी जनतेकडुन छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळा व्हावा अशी मागणी होत होती या मागणीचा विचार करुन मा.आमदार मोहन फड यांनी या मागणीनुसार राज्याचे मुख्यमंञी देवेन्द्र फडणविस याच्याकडे निधीसाठी वारंवार मागणी केली व त्यांच्या मागणीला यश आले असुन मुख्यमंञी यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये निधी मंजुर केला असुन या कामाचे भव्य असे भुमीपुजन शिवजयंतीचे औचीत्य साधुन दि.१९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता छञपती शिवाजी महाराज पुतळा नियोजित जागा मेनरोड मानवत येथे आमदार मोहन फड याच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतश्री विभुषीत १००८ श्री.महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज हे राहणार आहेत तर उदघाटक म्हणुन पाथरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार मोहनरावजी फड हे राहणार आहेत तर प्रमुख उपस्थीती म्हणुन मा.आ.माणीकराव आंबेगावकर ,कृ.ऊ.बा.सभापती गंगाधरराव कदम,ॲड.सुरेश बारहाते,ॲड.सतीष बारहाते,ॲड.सुधाकरराव उदावंत ,नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी,उपनगराध्यक्ष युवानेते डॉ.अंकुश लाड,पंकज आंबेगावकर ,पंडितराव चौकट,संजयकुमारजी लड्डा ,जयकुमार काला, केशव शिंदे ,बालाजी गजमल,विजयकुमार दलाल,उध्दव हारकाळ,सिध्देश्वर लाडाने ,संतोष आंबेगावकर ,आश्रोबा कुर्हाडे ,श्रीकिशन सारडा,दिलीप हिबारे,कचरुलाल कुमावत ,कचरुलालाजी बारहाते,ॲड.अनुरुध्द पांडे,सचीन कोक्कर ,शैलेश यादव,दत्ता जाधव,राजेश कच्छवे ,डिंगांबर बाकळे,गोपाळ लाड,शाम झाडगावकर ,ॲड.सुनील जाधव,मुंजाभाऊ तरटे,विष्णु आळसपुरे आदी उपस्थीत राहणार आहेत.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराजाच्या आश्वरुढ पुतळ्याच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या भुमीपुजनाच्या कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन युवानेते डॉ.अंकुश लाड व नगरपरिषदचे सर्व सन्माननिय सदस्यांनी केले आहेत.
मानवत कोतवाल संघटने तर्फे पाणीपुरवठा मंञी बबनराव लोणीकर यांना निवेदन.
मानवत कोतवाल संघटने तर्फे बबनराव लोणीकर यांना निवेदन.
[]कोतवालाना चतुर्थश्रेणीत समाविष्ट करण्याची मागणी []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१७: मानवत येथे राज्यसरकार च्या वतिने विस्तारीत समाधान शिबीर व कार्यशाळेच्या कार्यक्रमासाठी पाणीपुरवठा मंञी बबनराव लोणीकर हे दि .१५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता माऊली मंगल कार्यालय येथे आले आसताना महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना मानवत शाखाच्या वतिने यावेळी विविध मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.
मानवत तालुक्यातील सर्व कोतवाल कर्मचाऱ्यांच्या वतिने हे निवेदन देण्यात आले या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, प्रशासनातील शेवटचा घटक कोतवाल म्हणुन कोतवालास चतूर्थश्रेणीत देण्या सदर्भात निर्णय असुन शासन स्तरावर प्रलंबीत आसुन शासनाने कोतवाल कर्मचाऱ्यांना चतूर्थश्रेणीत समाविष्ट करावा व या शेवटच्या घटकासही समाधानी आयूष्य जगण्याची संधी उपलब्ध करून देउन न्याय करावा आसे निवेदन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटने चे जिल्हा अध्यक्ष शिवाजी देवणे याच्या नेत्तृत्वाखाली देण्यात आले. यावेळी शरद दहे , बापू रासवे ,मोहन गिरी ,मूरलीधर खंदारे ,एकनाथ मगर ,रामा काळे ,ईश्वर भाकरे ,हमीद जिलानी माणीक पाथरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
बालाप्रसादजी मुंदडा याच्यां सामाजीक कार्याची पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री मा.बबनराव लोणीकर साहेबांनी केली प्रशंसा.
मानवत येथे मा.बबनराव लोणीकर यांचा उदयगिरी नेञालयच्या वतीने भव्य सत्कार.
[] बालाप्रसादजी मुंदडा याच्यां सामाजीक कार्याची लोणीकर साहेबांनी केली प्रशंसा []
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.१७: मानवत येथील उदयगिरी नेत्रालय उदगीर संलग्न स्वर्गीय चंद्रकला बालाप्रसाद मुंदडा दृष्टी केंद्र मानवत येथे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांचा ह्रदयसत्कार मोठ्या ऊत्साहात संपन्न झाला .
पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनरावजी लोणीकर साहेब हे मानवत येथे विस्तारीत समाधान योजना कार्यशाळा शिबीराचे आयोजनाच्या कार्यक्रमास दि.१५ फेब्रुवारी रोजी मानवत येथे आले असताना यावेळी भाजपा नेते बालाप्रसादजी मुदडा यांनी ना.लोणीकर साहेब याचा भव्य स्वागत उदयगिरी नेत्रालय उदगीर संलग्न स्वर्गीय चंद्रकला बालाप्रसाद मुंदडा दृष्टी केंद्र मानवत येथे करण्यात आला . यावेळी स्वागत भाषणात मा.बबनराव लोणीकर यांनी बालाप्रसादजी मुंदडा यांच्या सामाजिक कार्याची भरभरुन प्रशंसा केली व त्याच्या कार्यावर समाधान व्यक्त करत मुंदडा यांना पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .या स्वागत कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती गणेशराव रोकडे,मानवत कृ.उ.बा.सभापती गंगाधराव कदम,माजी सभापती शिवहरी खिस्ते,बालाप्रसाद मुंदडा,बाबा पठाण,डॉ प्रफुल्ल पाटील,तालुकाध्यक्ष अंनता गोलाईत,दत्तप्रसाद बांगड,घनश्यामदास कासट,गिरीष मंत्री,गंगाधर कंकाळ,व्यंकटराव कसपटे,नागनाथराव सातभाई,ज्योतीबा काटे,नागेश जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
मानवत येथे पाणीपुरवठा मंञी मा.बबनराव लोणीकर यांचा भाजपा चे तालुकाध्यक्ष अनंत गोलाईत याच्या वतीने भव्य सत्कार.
मानवत येथे पाणीपुरवठा मंञी मा.बबनराव लोणीकर विस्तारीत समाधान योजना कार्यशाळा शिबीराचे आयोजनाच्या कार्यक्रमास दि.१५ फेब्रुवारी रोजी आले असताना त्यांचा भव्य सत्कार भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी युवानेते तालुकाध्यक्ष अनंत गोलाईत ,माणिक मोगरे ,शिवाजी बोचरे ,हरिभाऊ निर्मळ, महादेव कोल्हे ,परमेश्वर पाटील, प्रभाकर उक्कलकर, महादु कदम ,रुस्तुम होगे ,श्रीकांत माकुडे ,अतुल मनियार ,पवन मंत्री आदी उपस्थीत होते.
छाया- मुस्तखीम बेलदार मानवत
Thursday, February 15, 2018
मानवत तालुक्याच्या विकासकामासाठी तीन वर्षात ४४१ कोटींचा निधी- ना.बबनराव लोणीकर
मानवत तालुक्यातील विकास कामांसाठी
तीन वर्षात ४४१ कोटींचा निधी - ना. बबनराव लोणीकर
मानवत / मुस्तखीम बेलदार
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे काम सुरु असून गेल्या तीन वर्षात मानवत तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ४४१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
मानवत येथील माऊली मंगल कार्यालयात आयोजित विस्तारीत समाधान शिबीर पूर्वतयारीसंदर्भात आयोजित कार्यशाळेस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी युवा नेते राहुलभैय्या लोणीकर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष भावनाताई नखाते, अनिल नखाते, गणेशदादा रोकडे, विठ्ठलराव राबदडे, अनंतराव गोलाईत,अतुल मणियार, श्रीकांत माकुडे,उद्धवराव नाईक, पी.दि. पाटील, बाबासाहेब फळे, नानासाहेब वाकणकर, शिवहरी खिस्ते, चंद्रकांत चौधरी, उमेश देशमुख, सुभाष आंबट, मोहन धाराशिवकर, डॉ राठी, मधुकर नाईक, हनुमान घुंबरे, बेग, दादाराव रासने, शिवराज नाईक, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी कोकणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, तहसीलदार शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. लोणीकर पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवत तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी ७३ कोटी ५८ लाख, जलयुक्त शिवार २२ कोटी ९३ लाख, ग्रामीण पाणीपुरवठा योजना ४ कोटी ४२ लाख, स्वच्छ भारत अभियान ( ग्रामीण) ५ कोटी ८९ लाख , कृषी विभाग योजनांना अनुदान ७ कोटी १३ लाख, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना १३ कोटी ७२ लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग १९ कोटी २७ लाख आदी कामांचा समावेश असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत ४० कोटींचे कर्जवाटप केल्याची माहिती ना. लोणीकर यांनी दिली.
गावोगाव विजेचा प्रश्न सोडविण्यात येत असून, पाथरी तालुक्यात २ उपकेंद्र व विद्दुतिकारणाच्या कामासाठी ३८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या तालुक्यात पीक विमा योजनेअंतर्गत ११८ कोटी तर दुष्काळी अनुदानापोटी ६३ कोटी ७० लाख रुपयांचे वाटप झाल्याचे ना. लोणीकर यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच होणाऱ्या समाधान शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यात एक लाख लोकांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी सुरु आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही संपर्कमंत्री लोणीकर यांनी सांगितले. याप्रसंगी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप करण्यात आले. उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस व टाकी, बचत गटाच्या लाभार्थ्यंना प्रत्येकी एक लाख रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, परिसरातील शेतकरी आदी उपस्थित होते.
Tuesday, February 13, 2018
रत्नापुर येथे जुनेद भैय्या दुर्राणी याच्यां हस्ते क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन संपन्न .
रत्नापुर येथे भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन जुनेद भैय्या दुर्राणी याच्यां हस्ते संपन्न !
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत तालुक्यातील रत्नापुर येथील जयहिंद ग्राउन्ड येथे भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन रत्नापुर येथील राष्टृवादि पक्षाच्या वतीने करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन दि.११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जुनेद भैय्या दुर्राणी गटनेता न.प.पाथरी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य परभणी याच्यां शुभ हस्ते करण्यात आले.
८-८ षटकाच्या या सामन्यात शहरी व ग्रामीण असे एकुण ४० क्रिकेट संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला असुन प्रथम पारितोषिक जुनेद भैय्या दुर्राणी याच्यावतीने १५००१ रुपये देण्यात येणार आहे तर द्वितीय पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेशदादा विटेकर याच्याकडुन ११००१ रुपये देण्यात येनार आहे तर तृतीय पारितोषिक ५००१ रुपये रत्नापुर कमीटी तर्फे देण्यात येणार आहेत.या उदघाटन कार्यक्रमावेळी गणेश उक्कलकर ,मोहम्मद रफीक,संदिप हजारे ,मुंजाभाऊ केदारे,विजय केदारे,ऊत्तम नंदनवरे,सुरेश केदारे,भारत तळेकर याच्यांसह क्रिकेट खेळाडू तसेच रसिक प्रेक्षक मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.
युवानेते डॉ.अंकुश लाड याच्यां वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन.
युवानेते डॉ.अंकुश लाड याच्यां वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत नगरीचे उपनगराध्यक्ष तथा युवानेते डॉ. अंकुशभाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त ओम ब्लास्टर्स टीम मानवत यांच्यावतीने १०-१० षटकाच्या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेटचे आयोजन दि.१५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
तरी क्रिकेट खेळाडू तसेच रसिक प्रेक्षकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा या स्पर्धेचे प्रथम बक्षीस २१००० रुपये अंकु्शभाऊ मित्र मंडळातर्फे तर द्वितीय बक्षीस १५००० रुपये मा. सभापती जि. प.सदस्य श्री .पंकज भाऊ आंबेगावकर यांच्यातर्फे,तृतीय बक्षीस ७००० रु श्री .गणेश कुमावत माजी नगराध्यक्ष यांच्यातर्फे,आणि चौथे बक्षीस श्री सचिन दोडके सरपंच रत्नापुर यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तसेच पुढील बक्षीस यांच्या तर्फे देण्यात येतील मॅन ऑफ द सिरीज २१००रु .श्री सचिन कोक्कर,वृंदावन ट्रेडिंग कं मानवत,बॅटर ऑफ द सिरीज ११०० रु श्री डॉ योगेश तोडकरी,बॉलर ऑफ द सिरीज ११०० रु श्री स्वप्नील शिंदे ,शिव कलेक्शन मानवत,बेस्ट विकेटकीपर ११०० रु .श्री मा नगरसेवक विनोद भैया रहाटे,तसेच प्रोत्साहनपर बक्षिसे श्री गिरीशसेठ कत्रूवार (मा नगरसेवक),श्री संतोष सपाटे,श्री अनिरुद्ध पांडे सर,श्री नियामत खान,श्री बाजीराव हलनोर, श्री अनंत भदर्गे(मा नगरसेवक),श्री ज्ञानेश्वर मोरे(संचालक,कृ बा उ स मानवत) यांच्यातर्फे देण्यात येतील या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणुन श्री बालाजी दहे(मुकादम),श्री श्रीहरी कच्छवे सर,आणि श्री प्रशांत टोपे सर हे राहणार आहे.या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेटचे आयोजन
फिल्टर टाकी मैदान,मानवत येथे होणार आहे.
प्रवेश फि ५००रुपये आहे ईच्छुक क्रिकेट संघानी
नोंदणीसाठी शिव कलेक्शन-९९२१९१८८८८ ,श्री रामभाऊ हलनोर- ८०५५१८९४९४,श्री संदीप पवार-९४०५७८१८८४,श्री नागनाथ कुऱ्हाडे-८८८८९११५४४ याच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजका कडुन करण्यात आले आहे.
Friday, February 9, 2018
परभणी तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनाच्या सचीवपदी ना.त.नकुल वाघुंडे यांची निवड.
परभणी जिल्हा तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनाच्या कार्यकारीनीची निवड.
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायबतहसिलदार संघटनाच्या परभणी जिल्हा कार्यकारीनीची निवड ८ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी जिवराज डापकर तहसिलदार सोनपेठ, सचीवपदी नकुल वाघुंडे नायब तहसिलदार मानवत, कार्याध्यक्षपदी सखाराम मांडवगडे,सचीवपदी रामदास कोलगने,उपाध्यक्षपदी आश्विनी जाधव तहसिलदार मानवत,स्वराज कंकाळ,सुरेश शेजुळ ,कोषाध्यक्षपदी गणेश चव्हाण ,श्रीकांत विसपुते,सहसचीवपदी वंदना मस्के,निलेश पळसकर,टि.एस.सुगंधे,विवेक पाटिल,संघटकपदी श्रीरंग कदम,परमानंद गावंडे,नंदकुमार भाताब्रेकर,प्रसिद्धी प्रमुखपदी प्रकाश गायकवाड ,मंदार ईदुंरकर ,महिला संघटकपदी मंजुषा भगत,शितल कच्छवे तर सल्लागारपदि विद्याचरन कडवकर,श्याम मदनुरकर,वासुदेव शिंदे आदीची निवड करण्यात आली.या महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायबतहसिलदार संघटनाच्या निवडिच्या पञावर विभागीय सचीव विद्याचरन कडवकर ,विभागीय संघटक विजय चव्हाण ,विभागीय अध्यक्ष किरन अंबेकर यांच्या स्वाक्षरी आहेत.संघटनेच्या या नविन कार्यकारणीच्या निवडिचे स्वागत होत आहेत.
Monday, February 5, 2018
जुनेद भैय्या यांची महात्मा कबीर समता परिषद महाराष्ट्रभुषण पुरस्कारासाठी निवड.
जुनैद भैय्या दुर्राणी यांची महात्मा कबीर समता परिषद महाराष्ट्रभुषण पुरस्कारासाठी निवड.
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
सामाजीक व राजकीय कार्यासाठी,
महात्मा कबीर समता परिषद,तर्फे
देण्यात येणारा व महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा समजला जानारा महाराष्ट्रभुषण पुरस्कारासाठी जुनैद भैय्या दुर्राणी यांची निवड झाल्याबद्दल,व त्यांच्या सामाजीक संस्कृतीक,व राजकीय कार्याची दखल घेऊन व त्यांच्या कडुन समाजाची झालेली प्रगती लक्षात घेऊन संस्थेने सन २०१७ ह्या वर्षीचा महाराष्ट्रभुषण पुरस्कारा साठी निवड केलेली आहे.
हा पुरस्कार ४मार्च २०१८रोजी शंकरराव चव्हाण सभागृहात
माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब,ब्रीगेडीअर सुधीर सावंत,विधीतज्ञ हायकोट वकील अँड,राम हारपाळे,व आनिल मोकाशे,महापौर महा नगर पालीका नांदेड,व इतर मान्यवराच्या उपस्थीत हा पुरस्कार जुनैद भैय्या दुर्राणी यांना देण्यात यणार आहे.
)
Friday, February 2, 2018
ऊरुस समितीच्या सदस्यपदी समाजसेवक कादर ईनामदार यांची निवड.
परभणी येथील ऊरुस समीतीच्या सदस्यपदी सय्यद कादर ईनामदार यांची निवड.
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
परभणी येथील सय्यद शहा तुराबुल हक रहेमतुल्लाहि ऊरुस समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली.यात सदस्यपदी जेष्ठ समाजसेवक सय्यद कादर ईनामदार यांची निवड करण्यात आली.औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाच्या वतीने एस.सी.तडवी यांनी याची माहिती दिली.या समितीच्या अध्यक्षपदी अतीख पटेल तर उपाध्यक्षपदी अब्दुल बारी तर सदस्यपदी कादर ईनामदार ,अकरम खान,काझी फईमोदीन,अशरफ कादरी,अनुप शिरडकर,सिकंदर खान,शेख शाकेर,मो.बारी,शाहेद खान,खुर्शिद खान,कामगार नेते जलील खान यांची निवड करण्यात आली आहे.या निवडिबद्दल सर्वच स्तरावरुन स्वागत होत असुन नुक्तेच एका सभारंभात सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार हि करण्यात आला.
Wednesday, January 31, 2018
आ. मोहन भाऊ फड,युवानेते डॉ.अंकुश लाड यांची प्रमुख उपस्थीतीत मानवत येथे श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी .
मानवत येथे श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी .
[]कार्यक्रमास आमदार मोहन फड,डॉ.अंकुश लाड यांची प्रमुख उपस्थीती []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.३१: मानवत शहरात लोहार सुतार समाज बांधवाच्या वतीने दि.२९ जानेवारी रोजी श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पञकार गोपाळ लाड सर हे होते तर प्रमुख अतीथी म्हणुन पाथरी विधानसभाचे आमदार मोहन भाऊ फड तर प्रमुख पाहुणे म्हणुन युवानेते डॉ.अंकुश लाड,आर.एस.चाफे अध्यक्ष लोहार विकास महामंडळ जि.परभणी हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.तसेच समाजातील मानवत तालुक्यातील दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थाचे यावेळी सत्कार करण्यात आले.तसेच मान्यवराचे ही यावेळी सत्कार करण्यात आले.यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार मोहन फड म्हणाले की,लोहार सुतार समाजबांधवासाठी लवकरच आमदार निधीतुन समाजमंदिर व जागेला संरक्षण भिंत बाधुन देण्याचे यावेळी आश्वासन दिले.या नंतर श्री.ह.भ.प.विनोदमुर्ति वैजनाथ महाराज यांचे किर्तन पार पडले.कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि मानवत येथील श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारि यांनी प्रयत्न केले.यावेळी मोठ्याप्रमाणात लोहार सुतार समाजबांधव मोठ्याप्रमाणात उपस्थीत होते.
Tuesday, January 30, 2018
ज्ञानोबा शहाणे यांचा परभणी जिल्हा कारागृहात ७ दिवसापासुन आमरन उपोषण सुरु!
मानवत तालुक्यातील वझुर येथील शहाणे यांचा ७ दिवसापासुन जिल्हा कारागृहात उपोषण!
[] धान्यघोटाळा करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याची मागणी []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.३०: मानवत तालुक्यातील वझुर येथील ज्ञानोबा सोनाजी शहाणे यांनी धान्य घोटाळ्यातील आरोपिवर कारवाई होत नसल्याकारणाने औरंगाबाद आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा ईशारा दिला होता.यामुळे पोलीसानी त्यांना पकडुन दंडाधिकारी मानवत याच्यां समोर हजर केले असता त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला असता त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती व कारवाई आरोपीवर न करता प्रशासन माझ्यावर कारवाई करतो व न्याय मिळेपर्यत आमरन उपोषण ज्ञानोबा शहाणे यांनी जिल्हा कारागृहात सुरु केले आहे व आज त्यांना पेशीसाठी दंडाधिकारी मानवत येथे आनले असता दंडाधिकारी रजेवर असल्याने आज ७ व्या दिवशीही त्यांचे आमरन उपोषण सुरुच होते.
ज्ञानोबा शहाणे यांनी ४ वर्षापासुन या घोटाळेबहाद्दर विरोधात एकाकी लडाई लढुन धान्यघोटाळा उघळकिस आणला वझुर येथील धान्याचा व केरोसीन चा भ्रष्टाचार ही प्रशासनासमोर आणला होता तसेच मानवत तालुक्यातील तीन हजार शिधापञीका तहसिल कार्यालयातुन गायब करुन सहा लाख रुपयाचा काळाबाजार या संबधित अधिकाऱ्यांनी केला होता या संबधीही शहाणे यांनी पाठपुरावा केला होता व यासर्व आरोपीवर कारवाई व्हावी म्हणुन आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे २६ जानेवारी २०१७ रोजी ३६ तास आमरन उपोषण केले होते परंतु आश्वासनापलीकडे काहीही मिळत नसल्याने त्यांनी २६ जानेवारी २०१८ रोजी आत्मदहनाचा ईशारा दिला होता म्हणुन २२ जानेवारी रोजी त्यांना पोलीसानी पकडुन मा.ता.दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर केले असता कलम १०७ नुसार यांनी जमानत नाकारली म्हणुन त्यांना जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले.न्याय मिळत नसल्यामुळे ज्ञानोबा शहाणे यांनी जिल्हाधिकारी यांना पञ लिहुन २४ जानेवारी पासुन जेलमध्येच आमरन उपोषण सुरु केले त्यानंतर २५ जानेवारी रोजी मा.ता.दंडाधिकारी याच्या समोर त्यांना आणले असता तेव्हाही त्यांनी जमानत घेण्यास नकार दिला व आज दि.३० जानेवारी रोजी त्यांना मा.ता.दंडाधिकारी कार्यालय येथे आनले होते परंतु मा.ता.दंडाधिकारी हे रजेवर असल्यामुळे पुन्हा उद्या दि.३१ जानेवारी रोजी त्याना मा.ता.दंडाधिकारी याच्या समक्ष हजर केले जाणार आहेत.आज ७ व्या दिवशीही उपोषण सुरु असल्याने त्याचीही तब्येत खालावत असल्याने त्यांना लवकरात लवकर न्याय देऊन संबधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांचा मुलगा अमोल ज्ञानोबा शहाणे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.आता प्रशासन काय कारवाई करते ते बघुया?खरच ज्ञानोबा शहाणे यांना न्याय मिळेल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.
Saturday, January 27, 2018
युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी घेतली वाचादोष शस्त्रक्रिया झालेल्या बालकांची भेट.
मानवत येथे राष्ट्रिय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत वाचादोष शस्त्रक्रिया शिबीर संपन्न .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२७:मानवत येथील ग्रामीण रुग्णालय येथे दि.२५ जानेवारी रोजी राष्ट्रिय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत वाचादोष या आजाराच्या १६ बालकावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जावेद अथर याच्यां मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय आधिक्षक डॉ.नरेद्र वर्मा याच्या पुढाकाराने डॉ.लक्ष्मण माळकुंजे यांच्या हस्ते शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी या विद्याथ्याना भेट दिली व या बद्दल कुतुहल व समाधान व्यक्त केले.या वाचादोष शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठि ग्रा.रु.मानवत येथील राष्ट्रिय बाल स्वास्थ पथकातील डॉ.गजदंत्त चव्हाण ,डॉ.सुषमा भदर्गे ,डॉ.ललीत कोकरे ,डॉ.प्रिती दिक्षीत ,सुनील खरात ,सचीन कदम,पल्लवी काटे,दिक्षा गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले तसेच श्रीमती काटकर,माधुरी सुरे,प्रशांत खिंलारे व ईतर अधिकारि कर्मचारि यांनी मोलाचे सहकार्य केले.
आ.मोहन फड यांच्या प्रमुख उपस्थीतीत तिरंगा एकता संम्मेलन!
भारतीय जनतापक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा एकता संमेलनास युवकाकडुन उत्फुर्स प्रतिसाद .
पाथरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनतापक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा एकता संमेलनास उत्फुस प्रतिसाद मिळाला आ.मोहनभाऊ फड यांच्या पुढाकाराने दहा ठिकाणी काढलेल्या तिरंगा एकता संमेलनास युवकाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.पोखरणी फाटा, दैठणा,शेळगाव,सोनपेठ,डीघोळ,वाघाला,पाथरी,नाथरा,रामपुरी, मानवत आदी ठिकाणी प्रारंभी युवकानी मोटारसायकल रॅली काढली. त्यांनतर ध्वजारोहन करण्यात आले.पोखरणी फाटा येथील तिरंगा एकता संमेलनाचे ध्वजारोहन आणि खुल्या किर्केट स्पर्धेचे उदघाटन आ.मोहनभाऊ फड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष बाबा पठाण,डॉ. शेख जवळेकर,मोहमंद गोस, सतीश दलाल,रामभाऊ स्वपने,गजानन जोरवर,वसिष्ठ वाघ,आदीसह युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
Friday, January 26, 2018
मानवत येथे हर्षउल्हासात गणतंञ दिवस साजरा!
मानवत येथे राजकिय,सामाजिक व शैक्षणिक संस्थाच्या वतीने प्रजासत्ताक दिन ऊत्साहात साजरा.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि,२६: मानवत शहरात ६९ वा प्रजासत्ताक दिन हर्ष उल्हासात विविध राजकीय सामाजिक व शैक्षणिक संस्थाच्या वतीने साजरा करण्यात आला.यात नगरपरिषद मानवत येथे सकाळी ७-४५ वाजता नगाराध्यक्षा शिवकन्या स्वामी याच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी सर्व नगरपरिषद कर्मचारि व नगरसेवक यावेळी उपस्थीत होते.तसेच तहसिल कार्यालय येथे सकाळी ९-१५ वाजता तहसिलदार आश्विनी जाधव याच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी नायबतहसिलदार नकुल वाघुंडे,शेख वसीम,गटविकास अधिकारि छडिदार साहेब याच्यासह राजकिय व सामाजिक तसेच पञकार यावेळी उपस्थीत होते.मानवत येथील ईखरा ऊर्दु शाळेत सकाळी ७-५० वाजता शिवसेना शहरप्रमुख अनील जाधव याच्यां हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी ॲड.लुकमान बागवान ,एम.ए.रिजवान सर आदी उपस्थीत होते.मानवत पोलीस ठाणे,ग्रामीण रुग्णालय तसेच शहरातील शासकिय कार्यालयात ध्वजारोहन करण्यात आले.जमीअत उलेमा हिंद ( अरशद मदनी ) अध्यक्ष हाफेज लतीफ यांनी शहरातील शाळेत जमीअत च्या वतीने विद्याथ्याना बिस्किटचे वाटप केले.तसेच जि.प.प्राथमिक शाळा शाखा क्र.४ येथे अल्पसंख्याक शहरअध्यक्ष आसद खान यांनी शाळेतील विद्यार्थाना बिस्किटचे वाटप केले.फ्रेन्डस मिञमंडळाच्या वतीने पेठमोहल्ला येथे प्रभात भेरीत येणाऱ्या शालेय विद्यार्थाचे स्वागत करण्यात आले तसेच बिस्किटचे वाटप युवानेते डॉ.अंकुश लाड याच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक जमील चाऊस,हाफेज लतीफ,हबीब बागवान ,सद्दाम बागवान ,आवेस बागवान ,अकरम मिलन,अय्युब बागवान मिलन आदि उपस्थीत होते.एम आय एम च्या वतीने जि.प.ऊर्दु प्राथमिक शाळा,साईनाथ अस्थिव्यंग विद्यालयात पेन व बिस्किटचे वाटप सय्यद समीर,शेख शफिक,अरबाज बेलदार ,शेख मोबीन,शोएब बागवान याच्या वतीने करण्यात आले.शहरातील सर्व शाळा विद्यालयातुन सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली व मोठ्या हर्ष उल्हासात गणतंञ दिवस साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त अल्पसंख्याक शहर अध्यक्ष असद खान याच्यावतीने विद्यार्थाना बिस्किटचे वाटप.
मानवत येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.प्रा.शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन .
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२६: मानवत शहरातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा शाखा क्र.४ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आझाद चिञकला स्पर्धेमध्ये शाळेतील १०८ विद्याथ्यानी सहभाग घेतला होता या स्पर्धात शाळेतील सानीया मोबीन शेख,समीक्षा जाधव,क्रांती भालेराव आणी आम्रपाली गायकवाड यांना सुवर्ण पदक मिळाले तसेच उर्वरीत विद्यार्थाना प्रोत्साहन्तमक प्रमाणपत्र यावेळी वाटप करण्यात आले.तसेच शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धात विजयी झालेल्या विद्यार्थिना अल्पसंख्याक शहर अध्यक्ष असद खान,विजय खरात ,सहादु घनसावंत,बाळासाहेब आवचार ,दिपा केसापुरे,अशोक नितनवरे,सौ.कांता गवळी,दिपा केसापुरे यांनी स्वखर्चाने बक्षीस वितरन व बिस्किटचे वाटप करण्यात आले
.या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माया गायकवाड ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन अल्पसंख्याक शहर अध्यक्ष असद खान,विजय खरात ,शाळा समीतीचे अध्यक्ष सहादु घनसावंत,बाळासाहेब आवचार ,दिपा केसापुरे,अशोक नितनवरे,सौ.कांता गवळी,दिपा केसापुरे हे होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन खरात सर यांनी केले तर आभार अहिरे सर यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पैंजने सर,कऱ्हाळे सर,जाधव सर,मुसांडे मँडम ,टेगसे मँडम ,पौळ मँडम ,तमन्ना मँडम,सताळकर मँडम आदीनी परिश्रम घेतले.
Wednesday, January 24, 2018
मानवत येथे माजी उपमुख्यमंञी अजीतदादा पवार यांचा भव्य रोड शो!
मानवत येथे माजी उपमुख्यमंञी अजीतदादा पवार यांचा रोडशो दरम्यांन नागरिकाकडुन भव्य स्वागत!
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२४:महाराष्ट्रातील युती सरकारच्या साडेतीन वर्षाच्या आतापर्यत च्या कारभारा विरोधात राष्टृवादि पक्षाच्या वतीने भाजप शिवसेना सरकार विरोधात हल्लाबोल मोर्चाचे आयोजन महाराष्ट्रभर होत आसुन माजी उपमुख्यमंञी अजीतदादा पवार सत्ताधारिवर प्रत्येक सभेत हल्ले करत आहेत व यास जनतेकडुन ही मोठा प्रतिसाद मिळत असुन काल दि.२३ जानेवारी रोजी पाथरी येथे हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते.या हल्लाबोल मोर्चासाठी रुढि पाटिजवळ पासुन अजीतदादा याच्यां स्वागतासाठी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते मोटार सायकल रँली काढुन यावेळी मोठ्या ऊत्साहात सामील झाले होते.रुढिपाटि पासुन ते पाथरी येथील जि.प.सभापर्यत हि मोटार सायकल रँली काढण्यात आली यावेळी मानवत शहरात जागोजागी माजी उपमुख्यमंञी अजीतदादा पवार व आमदार बाबाजानी दुर्राणी याचा भव्य स्वागत व सत्कार नागरीकाकडुन यावेळी करण्यात आला.या रँलीत अजीतदादा पवार यांचा ताफा निघाल्यानंतर दादांनी मानवत येथे रोडशो दरम्यांन नागरिकांना हात दाखवुन रोडशो करत व नागरीकांच्या शुभेच्छा घेत पाथरी येथील नियोजित सभेच्या ठिकाणी पोहचले. मोटर सायकल रँलीमुळे मानवत शहरातील राष्टृवादि च्या कार्यकर्त्यांना नविन संजिवनी मिळाली आहे व कार्यकर्ते पक्षाच्या अधिक बळकटिसाठी आधिक जोमाने कामाला लागले आहेत. यावेळी मोटर सायकल रँलीत आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब, जि.प.सदस्य पंकज आंबेगावकर ,शहरअध्यक्ष मोईन अन्सारी ,शहरउपाध्यक्ष सिध्दार्थ ढाले,अफसर तांबोळी,शहर सचीव शेख पाशा,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष असद खान,गुलाब तांबोळी,शेख शाकेर ,शेख अफरोज,शेख वाजीद,असीर बेलदार ,सद्दाम भाई,शेख बशीर याच्यांसह मोठ्याप्रमाणात पाथरी ,मानवत शहरातील राष्टृवादि पक्षाचे कार्यकर्ते या मोटर सायकल रँलीत आवर्जून उपस्थीत होते .
लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमींवर संघटना बळकटीसाठी तयारीला लागा-बबनराव लोणीकर
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे - बबनराव लोणीकर
केंद्र व राज्य सरकारने शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबविलेल्या असताना विरोधी पक्ष हल्लाबोल सारखे कोणताही ठोस मुद्दा नसलेली आंदोलने करून जनतेची दिशाभूल करत आहेत. भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमींवर संघटना बळकटीसाठी तयारीला लागावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
परभणी येथील वरद मंगल कार्यालयात समाधान शिबिराच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोजित पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार मोहन फड, माजी आ. विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, बालाजी देसाई, आनंद भरोसे, मेघनाताई बोर्डीकर, डॉ. प्रफुल्ल पाटील, राहुलभैय्या लोणीकर, गणेश दादा रोकडे, श्यामसुंदर मुंढे, खंडेराव आघाव, डॉ. विद्याताई पाटील, डॉ. मीना परतणे, संजय साडेगावकर, मंगलताई मुग्दलकर, अरविंद थोरात, राधाजी शेळके, अशोकराव डहाळे, गणेशराव काजळे, नसरीन पठाण, शिवहारी खिस्ते आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
ना. लोणीकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे परभणी व जालना जिल्ह्यात रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबई किंवा नागपूरला ५ तासात पोहचता येणार आहे. त्याचा फायदा शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य जनतेला होणार आहे. शेगाव ते पंढरपूर हा वारकरी बांधवांच्या सोयीसाठीच्या रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या रस्त्याबद्दल वारकरी बांधवांमधुन समाधान व्यक्त होत असताना परतूरमधील विरोधी पक्षांच्या काही मोजक्या मंडळींना मात्र ते सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनी विरोध केला. अशा विरोध करणाऱ्या राजकीय मंडळींच्या घरावर दिंडी मोर्चे काढावेत, असेही ना. लोणीकर म्हणाले.
कार्यकत्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींपर्यंत पोहोचवावा,असे आवाहन करून ना. लोणीकर म्हणाले की, समाधान शिबिरामध्ये सरकारी वरील जनतेचे विविध प्रश्न सोडविले जाणार आहेत. त्यामुळे या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घ्यावे असे आवाहन ना. लोणीकर यांनी केले. दि. २६ जानेवारी रोजी परभणी जिल्ह्यात ४० ठिकाणी तिरंगा यात्रा निघणार आहे. त्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही ना. लोणीकर यांनी केले. यावेळी आमदार मोहन फड, माजी आ. गव्हाणे, जिल्हाध्यक्ष चाटे आदींची भाषणे झाली. यावेळी सुमारे दीड हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tuesday, January 23, 2018
मानवत येथील आर्यवैश्य महिला मंडळाच्या सदस्यांनी सामुदायिक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातुन महिलांनी दिला जनजागृती चा संदेश.
मानवत येथील आर्यवैश्य महिला मंडळाच्या हळदि कुंकवाच्या कार्यक्रमातुन महिलांनी केली जनजागृती.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२३: नका वाया घालवु पाणी आणी ईधंन बचत करु देशाचे धन या सारखे जनजागृती करनारे संदेश मानवत येथील आर्यवैश्य महिला मंडळाच्या सदस्यांनी सामुदायिक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातुन महिलांनी दिला.
शहरातील संभाजी नगर भागातील नगरेश्वर मंदिरात आर्य वैश्य महिला मंडळाच्या वतीने सामुदायिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पर्यावरणासाठी झाडे लावा देश वाचवा दुनिया वाचवा,स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे,रक्तदान जिवनदान तसेच बेटि बचाओ बेटि पढाओ असे संदेश देनारे बँनर लावण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्यवैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा अनुजा डंमढेरे ,उपाध्यक्षा ममता चिद्रवार ,सचीव निर्मला गुडाळे,कोषाध्यक्ष सुचिता पेन्सलवार व सदस्यांनी प्रयत्न केले.
मानवत येथे छञपती शिवाजी महाराज याच्या जयंती निमित्त मानवत येथे २५ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन.
छञपती शिवाजी महाराज याच्या जयंती निमित्त मानवत येथे बैठकीचे आयोजन.
मानवत / मुस्तखीम बेलदार शहरामध्ये १९ फेब्रुवारी रोजी छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार त्यासाठी नियोजन व समीती निवडी संदर्भात उद्या २५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जुन्या पाथरी नाक्याजळ छञपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .
या बैठकीस मानवत शहरासह संपुर्ण तालुक्यातील समाज बांधवाने उपस्थित रहावे असे आवाहन सकल शिवप्रेमीच्या वतीने करण्यात आले आहे.
मानवत शहरात दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी जानता राजा छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते याही वर्षी १९ फेब्रुवारी २०१८ रोजी मानवत मध्ये नावीण्य पुर्ण छञपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार या अनूशंगाने विवीध विषयावर सविस्तर चर्चा करुन छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाची समीती निवडण्यात येणार आहे या शिवाय अनेक समीत्या गठीत करण्यात येणार आहे बैठकीमध्ये शिस्तबद्धता, प्रत्येकाच्या मताचा आदर ठेवण्यात येणार आहे, जेष्टाना सन्मान मिळेल,व आनंदमय वातावरणात ही बैठक पार पडले याची दक्षता प्रत्येकानी घ्यावी यासाठी उद्या २५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मेनरोड वरील पाथरी नाक्याजवळ असलेल्या छञपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्यच्या ठिकाणी मानवत शहरासह संपुर्ण ग्रामीण भागातील समाज बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन मानवत तालुक्यातील सकल शिवप्रेमीनी केले आहे.

















































