Wednesday, February 28, 2018

प्रेरणाताई वरपुडकर याच्या संयोजनाखाली पाथरी विधानसभा मतदारसंघात सर्वरोगनिदान शिबीर संपन्न.

प्रेरणाताई वरपुडकर याच्या संयोजनाखाली पाथरी विधानसभा मतदारसंघातिल आवीॅ ता.परभणी येथे २८ फेब्रुवारी रोजी  सर्वरोगनिदान शिबिर घेण्यात आले .

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

दि. २८: माननिय माजीमंजी श्री सूरेशरावजी वरपूड़कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणाताई वरपुडकर याच्या संयोजनाखाली पाथरी विधानसभा मतदारसंघातिल आवीॅ ता.परभणी येथे आज दि.२८ फेब्रुवारी रोजी  सर्वरोगनिदान शिबिर घेण्यात आले .
या शिबिरात आवीॅ शाहापूर हासनापूर  येथील गावकरी उपस्थित होते या शिबिरात एकुण ५८४ रूग्णांची तपासणी  करण्यात आली यामध्ये मोतीबिंदू  असलेले ६८ रूग्ण व ईतर आजाराचे ३७ रूग्ण आढळले एकुण  १०५  रूग्ण ऑपरेशन साठी मूंबई ला पाठविण्यात येणार आहेत.  या रूग्णांचि तपासणी ड़ाॅ. कूमावत सर ड़ाॅ. गजानन टाक यांनी केलि  या रूग्णांचा प्रवासाचा सर्व खर्च सूरेशरावजी वरपूड़कर साहेब हे करनार आहेत या शिबिरात प्रेरणाताई वरपुडकर स्वताहा उपस्थित होत्या.

मानवतचे भुमिपुञ अॅड. महेश भरड न्यायधीश परिक्षेत उत्तीर्ण.

अॅड.महेश भरड न्यायधीश परिक्षेत उत्तीर्ण.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२८. मानवत शहरातील रहिवाशी अॅड महेश सुनीलदत्त भरड हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग  च्या वतिने घेण्यात आलेल्या परिक्षा  सन २०१७-१८ या वर्षात दिवाणी न्यायधीश कनिष्ठस्तर परीक्षेत उत्तीर्ण होवुन त्यांनी महाराष्ट्रातुन १६वा क्रमांक पटकावला आहे.
यांना यशस्वी होण्यासाठी अॅड सतीश देशपांडे व गणेश सीरसार बी.ई.आव्हाड क्लास  यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.त्यांच्या यशाबद्दल   शहरातील सामाजीक,शैक्षणीक व सर्व स्तरावरील नागरिक व मिञपरिवारा कडुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tuesday, February 27, 2018

छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रामेटाकळी येथे २८ फेब्रुवारी रोजी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान.

रामेटाकळी येथे २८ फेब्रुवारी रोजी  श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान   .

                   मानवत / मुस्तखीम बेलदार   
            
दि.२७: मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने  २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .
       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे उद्दघाटन महाराष्ट्र  चेंबर आँफचे उपाध्यक्ष समीर दुधगावकर यांच्या हस्ते होणार आहे तर शिवसेनेचे जिल्हाअध्यक्ष डाँ.संजय कच्छवे, बाजार समीतीचे सभापती गंगाधर कदम, काँग्रेसच्या प्रेरणा वरपुडकर, नायब तहसिलदार एन.पी.वांगुडे, पो.नि.प्रदीप पालीवाल, जि.प.च्या उपाध्यक्षा श्रीमती भावना नखाते, बाजार समीतीचे उपसभापती पंकज आंबेगावकर,बाबुराव नागेश्वर, हे प्रमुख पाव्हुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी भा.ज.पा.युवा मोर्चाचे किरण खरात, प.स.सदस्या सुमन गाढे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष वैजनाथ महीपाल, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उध्दव हारकळ, डिगांबर भिसे, अनुरथ काळे, केशव शिंदे, सरपंच सुशिला काळे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी मानवत तालुक्यासह परीसरातील शिवभक्तानी व्याख्यानास उपस्थित रहावे असे आवाहन रामेटाकळी येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Friday, February 23, 2018

पाथरी विधानसभा निवडणुक शिवसेनेकडुन लढवणार - डॉ.संजय कच्छवे

पाथरी विधानसभा निवडणुक शिवसेनेकडुन  लढवणार - डॉ.संजय कच्छवे

मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.२३: शिवसेना पक्षाला वाढविण्यासाठी मी पाच वर्षापासुन सतत ईमाने एतबारे संघटन वाढण्याचे काम करत आसुन पुढिल पाथरी विधानसभा निवडणुक मी लढविनार असल्याचे परभणी जिल्हाप्रमुख  डॉ.संजय कच्छवे म्हणाले ते पञकार संघ कार्यालय मानवत येथे पञकारांशी चर्चा करत असताना बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,पुढिल विधानसभा निवडणुक शिवसेना स्वबळावर लढविनार आसुन पाथरी विधानसभा मी लढविनार आहे तसेच मी ऐन निवडणुकिच्या वेळेस पक्षाकडे उमेदवारी मागणारा व्यक्ती नाही किंवा पक्षाचा ए.बी.फार्म मिळाल्यानंतर कामाला लागनार नाही तर मी सतत पाच वर्षापासुन पाथरी विधानसभेत सामान्य नागरीकांची कामे करत असुन पक्षबांधणीसाठी ही काम करत आहेत असे ते यावेळी म्हणाले . शिवसेनेचे पक्ष निरीक्षक मा.ओमराजे निंबाळकर माजी आमदार पाथरी विधानसभा कार्यकर्ता मेळाव्यास मानवत येथे आले असता त्या कार्यक्रमासाठी ते मानवतला आले असता पञकार संघाच्या कार्यलयास डॉ.संजय कच्छवे यांनी भेट दिली असता पञकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता ते बोलत होते.यावेळी शहर प्रमुख राजेश कच्छवे ,धनंजय दहे,गोविंद दहे,गणेश नाईक,सचीन बबलुजर,समाधान सोळंके ,रोहित अंधारे,नारायण बोचरे,सचीन बोचरे आदीसह शिवसैनीक मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.

औरंगाबाद येथील होणाऱ्या ईज्तेमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची सदिच्छा भेट.

लिंबे जळगाव येथील इज्तेमाला   ना. बबनराव लोणीकर यांची भेट.

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार       

औरंगाबाद तालुक्यातील लिंबे जळगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित इज्तेमा कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरूवारी सायंकाळी सदिच्छा भेट देऊन तेथील तयारीची पाहणी केला. हा इज्तेमा दि. २४ ते २६ फेब्रुवारी या दरम्यान होत असून, देशभरातून विविध प्रांतातील मुस्लिम बांधव कार्यक्रमस्थळी दाखल होत आहेत.
लिंबे जळगाव येथे विशाल प्रांगणात या इज्तेमाचे अत्यंत शिस्तीमध्ये आयोजन केले आहे. ना. बबनराव लोणीकर यांच्यासमवेत आ. अतुल सावे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आमिर साहब, धर्मगुरू कारी शकिल साहब, जुबेर मोतीवाला, राजू बागडे, आयोजक डाँ. रियाज शेख, आयेशाखान, अतीकखान, एजाज देशमुख, नबी पटेल, अतीक पटेल,  सय्यद अतहर, अन्सुल रहेमान, फेरोज कुरैशी, इम्रान शेख, सय्यद सलिम, हाजी दौलत पठाण, आमेर पठाण, शेख निसार, अन्वर अली, शाहरूख पठाण, शेख मुजाहिद, जुबेर पठाण, आदींची उपस्थिती होती. इज्तेमाच्या ठिकाणी ना. लोणीकर, आ. सावे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी रूग्णांसाठी उभारण्यात आलेल्या दवाखान्याची ना. लोणीकर यांनी पाहणी केली. तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.    
गेल्या चार महिन्यांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. सुमारे दोन हजार एकर परिसरात हा इज्तेमा होत आहे. या परिसरातील शेतक-यांनी स्वखुशीने या कार्यक्रमाला जागा उपलब्ध करून दिली. जागोजागी भव्य शामियाने उभारण्यात आले असून, तीन दिवस मान्यवर धर्मगुरूंचे विचार एेकण्यासाठी मोठा मंडप उभारला असून, जिल्हा व राज्यनिहाय भाविकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्युत व्यवस्थेची सोय करण्यात आली असून, जेवणाची, राहण्याची तसेच स्वच्छताग,हांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.    दरम्यान, इज्तेमाला भेट देण्यासाठी जाताना, औरंगाबाद शहरात क्रांती चौक, भडकल गेट, वाळूज, पंढरपूर आदी ठिकाणी ना. लोणीकर यांचे मुस्लिम बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल देऊन स्वागत करण्यात आले.

Wednesday, February 21, 2018

भाजपा तालुकाध्यक्ष अनंतराव गोलाईत यांची कृ.ऊ.बा समितीला विविध मागणीचे निवेदन.

मानवत शहरातील सर्व जिनिंग मध्ये वजन काट्याना डिजिटल लोडसेल अॉनलाइन करण्याची मागणी.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२१:  मानवत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जिनिंग मध्ये शेतकऱ्यांचा  कापुस मोजण्या करीता डिजिटल लोडसेल वापर करून अॉनलाइन काट्याचा वापर करण्याचे कृषी उत्पादन समितीने द्यावे आशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष अनंत गोलाईत यांनी बाजार समितीचे सचिव यांना निवेदनात केली आहे.
शेतकऱ्यांच्या वारंवार कापूस मोजमापा मध्ये अफरातफर होत आसल्याने जिनिंग मालाक कशलीही दाद शेतकऱ्यांना देत नसल्यामुळे भाजपा तालुका अध्यक्ष अनंत गोलाईत यांनी दि.२० फेब्रुवारी रोजी बाजार समिती चे सचिव यांना लेखी निवेदन देले या निवेदन नमुद केली आहे की, शेतकऱ्यांची जिनिंग मालका कडून होत आसलेली लूट व बाजार समितीच्या व्यावहारात तसेच खरेदी मध्ये पारदर्शकता येण्यासाठी सर्व जिनिंग चे  वजन काटे डिजिटल लोडसेलचा वापर करून ते मोडेमच्या माध्यमातून बाजारसमितीचे कार्यालयाला जोडावे आँपरेटर ची काट्यावर नियुक्ती करावी व त्या व्दारे मार्केटलाअॉनलाइन नोंद करेल आशी व्यवस्था करावी व सर्व जिनिंग च्या प्रवेश व्दारवर सि.सि.टिव्हि अॉनलाइन  कराव्यात यामुळे  जिनिंग मध्ये होणाऱ्या प्रत्येक हालचाली वर लक्ष राहील  मार्केटला महसूल चा भरपूर फायदा होईल व  जिनिंग वाले मार्केटचा महसूल चुकविणार नाही असे  निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर भाजपा तालुका अध्यक्ष अनंत गोलाईत यांची स्वाक्षरी आहे.

Monday, February 19, 2018

मानवत पञकार संघाचे अध्यक्ष सत्यशिल धबडगे याच्यां प्रमुख उपस्थीतीत शिवजयंती साजरी .

मानवत पञकार संघाच्या वतीने शिवजयंती साजरी .

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१९: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज याच्यां ३८८ वी जयंती निमित्त मानवत पञकार संघाच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . हा कार्यक्रम कचरुलालाजी बारहाते यांच्या पुण्यनगरी कार्यालयात घेण्यात आला.यावेळी छञपती शिवाजी महाराज याच्या प्रतिमेचे पुजन करुन व पुष्पहार घालुन त्यांना आभिवादन करण्यात आले.यावेळी  पञकार संघाचे अध्यक्ष सत्यशिल धबडगे ,कचरुलालाजी बारहाते,भैय्यासाहेब गायकवाड ,किशन बारहाते,हफिज बागवान ,अलीम खान,सचीन कोक्कर ,मुस्तखीम बेलदार आदी उपस्थीत होते.

मानवत येथे मुख्यंमंञी याच्या हस्ते लवकरच शिवाजी महाराजाच्या अश्वरुढि पुतळ्याचे अनावरन करनार- आ.मोहन फड

आ.मोहन फड याच्यां हस्ते शिवाजी महाराज याच्यां आश्वरुढ पुतळ्याच्या नियोजित जागेचे सुशोभीकरणाचे भुमीपुजन संपन्न .

[]मानवत येथे मुख्यंमंञी याच्या हस्ते लवकरच शिवाजी महाराजाच्या अश्वरुढि पुतळ्याचे अनावरन करनार- आ.मोहन फड []

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१९: मानवत शहरातील छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्याचे अनावरन लवकरच छञपती शिवाजी महाराजाचे वंशज संभाजी राजे व महाराष्ट्राचे मुख्यमंञी देवेन्द्र फडणविस याच्यां हस्ते करनार असल्याचे आश्वासन मा.आमदार मोहन फड यांनी दिले आहे ते मानवत येथील  छञपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या भुमीपुजनाच्या  कार्यक्रमात बोलत होते.शहरात अनेक वर्षापासुन शिवप्रेमी  जनतेकडुन छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळा व्हावा अशी मागणी होत होती या मागणीचा विचार करुन मा.आमदार मोहन फड यांनी या मागणीनुसार राज्याचे मुख्यमंञी देवेन्द्र फडणविस याच्याकडे निधीसाठी  वारंवार मागणी केली व त्यांच्या मागणीला यश आले असुन मुख्यमंञी यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये निधी मंजुर केला असुन या कामाचे भव्य असे भुमीपुजन शिवजयंतीचे औचीत्य साधुन आज  दि.१९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता छञपती शिवाजी महाराज पुतळा नियोजित जागा मेनरोड मानवत येथे आमदार मोहन फड याच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम दिपज्वलन करुन व छञपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी अनंतश्री विभुषीत १००८ श्री.महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज यांचा सत्कार आमदार मोहन फड याच्या हस्ते करण्यात आले.व आमदार फड यांचा सत्कार युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी केला तसेच यावेळी व्यासपिठावर उपस्थीत मान्यवराचे हि स्वागत करण्यात आले.यावेळी प्रास्तविक करताना युवानेते डॉ.अंकुश लाड म्हणाले की,आम्ही आमदार साहेबाकडे शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासाठी व सुशोभीकरणासाठी  वेळोवेळी मागणी केली व आमदार साहेबानी मुख्यंमंञी याच्यां कडुन ५० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला या बद्दल त्यांचे आभार मानले तसेच यावेळी व्यासपिठावरील मान्यवर श्री.महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज ,केशव शिंदे सर,विजयकुमार कञुवार ,सुरेशराव बारहाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतश्री विभुषीत १००८ श्री.महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज हे होते. तर प्रमुख उपस्थीती म्हणुन ॲड.सुरेश बारहाते,ॲड.सतीष बारहाते,ॲड.सुधाकरराव उदावंत ,नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी,उपनगराध्यक्ष युवानेते डॉ.अंकुश लाड,पञकार संघाचे अध्यक्ष सत्यशिल धबडगे ,पंकज आंबेगावकर ,पंडितराव चौकट,संजयकुमारजी लड्डा ,जयकुमार काला, केशव शिंदे ,बालाजी गजमल,विजयकुमार दलाल,उध्दव हारकाळ ,संतोष आंबेगावकर ,आश्रोबा कुर्हाडे ,श्रीकिशन सारडा,दिलीप हिबारे,कचरुलाल कुमावत ,कचरुलालाजी बारहाते,ॲड.अनुरुध्द पांडे,सचीन कोक्कर ,शैलेश यादव,दत्ता जाधव,राजेश कच्छवे ,डिंगांबर बाकळे,गोपाळ लाड,शाम झाडगावकर ,ॲड.सुनील जाधव,मुंजाभाऊ तरटे,विष्णु आळसपुरे आदी उपस्थीत होते.या कार्यक्रमाचे प्रास्तविक युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी केले तर सुञसंचालन शंकर महाजन यांनी केले व आभार अब्दुल रहिम भाई बागवान यांनी मानले. .महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराजाच्या आश्वरुढ पुतळ्याच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या भुमीपुजनाच्या कार्यक्रमास शिवप्रेमी नागरीक व महिला मोठ्याप्रमाणात यावेळी उपस्थीत होते.

मानवत गँस एजन्सी येथे शिवजयंती उत्साहात साजरी .

मानवत गँस एजन्सी येथे शिवजयंती साजरी .

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१९: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज याच्यां ३८८ वी जयंती निमित्त मानवत गँस एजन्सी येथे  शिवरायाची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी छञपती शिवाजी महाराज याच्या प्रतिमेचे पुजन करुन व पुष्पहार घालुन त्यांना आभिवादन करण्यात आले.या वेळी गँस एजन्सी चे संचालक राहुल डाके,विशाल डाके,सिध्दार्थ मोरे,माणीक कांबळे ,संदिप लाटे  उपस्थीत होते.

Sunday, February 18, 2018

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यात यावी अशी मागणी भा.ज.पा. चे उपाध्यक्ष बालाप्रसालजी मुदंडा यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंञी बबनरावजी लोणीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

सोनपेठ तालुक्यासह जिल्ह्यातील  गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना  तात्काळ मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन सोनपेठ तालुका भा.ज.पा.च्या वतिने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्राचे संपर्क मंत्री मा.ना.श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांना दि.१७ फेब्रुवारी शनिवारी रोजी  पालम तालुक्यातील मौ. नाव्हा येथे भेटुन देण्यात आले.
यावेळी  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री बालाप्रसालजी मुदंडा,सोनपेठ तालुकाध्यक्ष महादेवराव गिरे पाटील, तालुका उपाध्यक्ष सुभाषराव सावंत,युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष गणेशराव हांडे, जेष्ठ मार्गदर्शक व्यकंटराव कसपटे,प्रा.अशोक खोडवे, हनुमंतराव सावंत आदि उपस्थित होते .

Saturday, February 17, 2018

मानवत येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळा उभारणीच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणासाठी आ. मोहन फड याच्या प्रयत्नास यश ५० लाख रुपये निधी मंजुर.

आ.मोहन फड याच्यां हस्ते १९ फेब्रुवारी रोजी छ.शिवाजी महाराज याच्या आश्वरुढ पुतळ्याच्या नियोजित जागेचे भुमीपुजन.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१७: मानवत शहरात अनेक वर्षापासुन शिवप्रेमी  जनतेकडुन छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळा व्हावा अशी मागणी होत होती या मागणीचा विचार करुन मा.आमदार मोहन फड यांनी या मागणीनुसार राज्याचे मुख्यमंञी देवेन्द्र फडणविस याच्याकडे निधीसाठी  वारंवार मागणी केली व त्यांच्या मागणीला यश आले असुन मुख्यमंञी यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये निधी मंजुर केला असुन या कामाचे भव्य असे भुमीपुजन शिवजयंतीचे औचीत्य साधुन दि.१९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता छञपती शिवाजी महाराज पुतळा नियोजित जागा मेनरोड मानवत येथे आमदार मोहन फड याच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतश्री विभुषीत १००८ श्री.महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज हे राहणार आहेत तर उदघाटक म्हणुन पाथरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार मोहनरावजी फड हे राहणार आहेत तर प्रमुख उपस्थीती म्हणुन मा.आ.माणीकराव आंबेगावकर ,कृ.ऊ.बा.सभापती गंगाधरराव कदम,ॲड.सुरेश बारहाते,ॲड.सतीष बारहाते,ॲड.सुधाकरराव उदावंत ,नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी,उपनगराध्यक्ष युवानेते डॉ.अंकुश लाड,पंकज आंबेगावकर ,पंडितराव चौकट,संजयकुमारजी लड्डा ,जयकुमार काला, केशव शिंदे ,बालाजी गजमल,विजयकुमार दलाल,उध्दव हारकाळ,सिध्देश्वर लाडाने ,संतोष आंबेगावकर ,आश्रोबा कुर्हाडे ,श्रीकिशन सारडा,दिलीप हिबारे,कचरुलाल कुमावत ,कचरुलालाजी बारहाते,ॲड.अनुरुध्द पांडे,सचीन कोक्कर ,शैलेश यादव,दत्ता जाधव,राजेश कच्छवे ,डिंगांबर बाकळे,गोपाळ लाड,शाम झाडगावकर ,ॲड.सुनील जाधव,मुंजाभाऊ तरटे,विष्णु आळसपुरे आदी उपस्थीत राहणार आहेत.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराजाच्या आश्वरुढ पुतळ्याच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या भुमीपुजनाच्या कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिकांनी  मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन युवानेते डॉ.अंकुश लाड व नगरपरिषदचे सर्व सन्माननिय सदस्यांनी केले आहेत.

मानवत कोतवाल संघटने तर्फे पाणीपुरवठा मंञी बबनराव लोणीकर यांना निवेदन.

मानवत कोतवाल संघटने तर्फे बबनराव लोणीकर यांना निवेदन.

[]कोतवालाना चतुर्थश्रेणीत समाविष्ट करण्याची मागणी []

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१७: मानवत येथे राज्यसरकार च्या वतिने विस्तारीत समाधान शिबीर व कार्यशाळेच्या कार्यक्रमासाठी पाणीपुरवठा मंञी बबनराव लोणीकर हे दि .१५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता माऊली मंगल कार्यालय येथे आले आसताना महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना मानवत शाखाच्या वतिने यावेळी विविध मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.
मानवत तालुक्यातील सर्व कोतवाल कर्मचाऱ्यांच्या वतिने हे निवेदन देण्यात आले या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, प्रशासनातील शेवटचा घटक कोतवाल  म्हणुन  कोतवालास चतूर्थश्रेणीत देण्या सदर्भात निर्णय असुन शासन स्तरावर प्रलंबीत आसुन शासनाने कोतवाल कर्मचाऱ्यांना चतूर्थश्रेणीत समाविष्ट करावा व या शेवटच्या घटकासही समाधानी आयूष्य जगण्याची संधी उपलब्ध करून देउन न्याय करावा आसे निवेदन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटने चे जिल्हा अध्यक्ष शिवाजी देवणे याच्या नेत्तृत्वाखाली देण्यात आले. यावेळी शरद दहे , बापू रासवे ,मोहन गिरी ,मूरलीधर खंदारे ,एकनाथ मगर ,रामा काळे ,ईश्वर भाकरे ,हमीद जिलानी माणीक पाथरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

बालाप्रसादजी मुंदडा याच्यां सामाजीक कार्याची पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री मा.बबनराव लोणीकर साहेबांनी केली प्रशंसा.

मानवत येथे मा.बबनराव लोणीकर यांचा उदयगिरी नेञालयच्या वतीने भव्य सत्कार.

[] बालाप्रसादजी मुंदडा याच्यां सामाजीक कार्याची लोणीकर साहेबांनी केली प्रशंसा []

मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.१७: मानवत येथील उदयगिरी नेत्रालय उदगीर संलग्न स्वर्गीय चंद्रकला बालाप्रसाद मुंदडा दृष्टी केंद्र मानवत येथे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांचा ह्रदयसत्कार मोठ्या ऊत्साहात संपन्न झाला .
पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनरावजी लोणीकर साहेब हे मानवत येथे विस्तारीत समाधान योजना कार्यशाळा  शिबीराचे आयोजनाच्या कार्यक्रमास दि.१५ फेब्रुवारी रोजी मानवत येथे आले असताना  यावेळी  भाजपा नेते बालाप्रसादजी मुदडा यांनी ना.लोणीकर साहेब याचा भव्य स्वागत उदयगिरी नेत्रालय उदगीर संलग्न स्वर्गीय चंद्रकला बालाप्रसाद मुंदडा दृष्टी केंद्र मानवत येथे  करण्यात आला . यावेळी स्वागत भाषणात मा.बबनराव लोणीकर यांनी बालाप्रसादजी  मुंदडा यांच्या सामाजिक कार्याची भरभरुन प्रशंसा केली व त्याच्या कार्यावर समाधान व्यक्त करत मुंदडा यांना पुढिल कार्यासाठी शुभेच्छा  दिल्या .या स्वागत कार्यक्रमावेळी  जिल्हा परिषदेचे माजी सभापती गणेशराव रोकडे,मानवत कृ.उ.बा.सभापती गंगाधराव कदम,माजी सभापती शिवहरी खिस्ते,बालाप्रसाद मुंदडा,बाबा पठाण,डॉ प्रफुल्ल पाटील,तालुकाध्यक्ष अंनता गोलाईत,दत्तप्रसाद बांगड,घनश्यामदास कासट,गिरीष मंत्री,गंगाधर कंकाळ,व्यंकटराव कसपटे,नागनाथराव सातभाई,ज्योतीबा काटे,नागेश जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

मानवत येथे पाणीपुरवठा मंञी मा.बबनराव लोणीकर यांचा भाजपा चे तालुकाध्यक्ष अनंत गोलाईत याच्या वतीने भव्य सत्कार.

मानवत येथे पाणीपुरवठा मंञी मा.बबनराव लोणीकर  विस्तारीत समाधान योजना कार्यशाळा  शिबीराचे आयोजनाच्या कार्यक्रमास दि.१५ फेब्रुवारी रोजी आले असताना त्यांचा भव्य सत्कार भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी  युवानेते तालुकाध्यक्ष  अनंत गोलाईत ,माणिक मोगरे ,शिवाजी बोचरे ,हरिभाऊ निर्मळ, महादेव कोल्हे ,परमेश्वर पाटील, प्रभाकर उक्कलकर, महादु कदम ,रुस्तुम होगे ,श्रीकांत माकुडे ,अतुल मनियार ,पवन मंत्री आदी उपस्थीत होते.

छाया- मुस्तखीम बेलदार मानवत

Thursday, February 15, 2018

मानवत तालुक्याच्या विकासकामासाठी तीन वर्षात ४४१ कोटींचा निधी- ना.बबनराव लोणीकर

मानवत तालुक्यातील विकास कामांसाठी
तीन वर्षात ४४१  कोटींचा निधी - ना. बबनराव लोणीकर

मानवत / मुस्तखीम बेलदार

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे काम सुरु असून गेल्या तीन वर्षात  मानवत  तालुक्यातील  विविध विकास कामांसाठी ४४१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
मानवत येथील माऊली मंगल कार्यालयात आयोजित विस्तारीत समाधान शिबीर पूर्वतयारीसंदर्भात आयोजित कार्यशाळेस  मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी युवा नेते राहुलभैय्या लोणीकर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष भावनाताई नखाते, अनिल नखाते, गणेशदादा रोकडे,  विठ्ठलराव राबदडे, अनंतराव गोलाईत,अतुल मणियार, श्रीकांत माकुडे,उद्धवराव नाईक,  पी.दि. पाटील, बाबासाहेब फळे, नानासाहेब वाकणकर, शिवहरी खिस्ते, चंद्रकांत चौधरी, उमेश देशमुख, सुभाष आंबट, मोहन धाराशिवकर, डॉ राठी, मधुकर नाईक,  हनुमान घुंबरे, बेग, दादाराव रासने, शिवराज नाईक, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी कोकणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, तहसीलदार शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. लोणीकर पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवत तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी ७३ कोटी ५८ लाख, जलयुक्त शिवार २२ कोटी ९३ लाख, ग्रामीण पाणीपुरवठा योजना ४ कोटी ४२ लाख, स्वच्छ भारत अभियान ( ग्रामीण) ५ कोटी ८९ लाख , कृषी विभाग योजनांना अनुदान ७ कोटी १३ लाख, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना १३ कोटी ७२ लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग १९ कोटी २७ लाख आदी कामांचा समावेश असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत ४० कोटींचे कर्जवाटप केल्याची माहिती ना. लोणीकर यांनी दिली.
गावोगाव विजेचा प्रश्न सोडविण्यात येत असून, पाथरी तालुक्यात २ उपकेंद्र व विद्दुतिकारणाच्या कामासाठी ३८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या तालुक्यात पीक विमा योजनेअंतर्गत ११८ कोटी तर दुष्काळी अनुदानापोटी ६३ कोटी ७० लाख रुपयांचे वाटप झाल्याचे ना. लोणीकर यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच होणाऱ्या समाधान शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यात  एक लाख लोकांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी सुरु आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही संपर्कमंत्री लोणीकर यांनी सांगितले. याप्रसंगी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप करण्यात आले. उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस व टाकी, बचत गटाच्या लाभार्थ्यंना प्रत्येकी एक लाख रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, परिसरातील शेतकरी आदी उपस्थित होते.

Tuesday, February 13, 2018

रत्नापुर येथे जुनेद भैय्या दुर्राणी याच्यां हस्ते क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन संपन्न .


रत्नापुर येथे भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन जुनेद भैय्या दुर्राणी याच्यां हस्ते संपन्न !

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१३: मानवत तालुक्यातील रत्नापुर येथील जयहिंद ग्राउन्ड येथे भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन रत्नापुर येथील राष्टृवादि पक्षाच्या वतीने करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन  दि.११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता   जुनेद भैय्या दुर्राणी गटनेता न.प.पाथरी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य परभणी याच्यां शुभ हस्ते करण्यात आले.
८-८ षटकाच्या या सामन्यात शहरी व ग्रामीण असे एकुण ४० क्रिकेट संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला असुन प्रथम पारितोषिक जुनेद भैय्या दुर्राणी याच्यावतीने १५००१ रुपये देण्यात येणार आहे तर द्वितीय पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेशदादा विटेकर याच्याकडुन ११००१ रुपये देण्यात येनार आहे तर तृतीय पारितोषिक ५००१ रुपये रत्नापुर कमीटी तर्फे देण्यात येणार आहेत.या उदघाटन कार्यक्रमावेळी गणेश उक्कलकर ,मोहम्मद रफीक,संदिप हजारे ,मुंजाभाऊ केदारे,विजय केदारे,ऊत्तम नंदनवरे,सुरेश केदारे,भारत तळेकर याच्यांसह क्रिकेट खेळाडू तसेच रसिक प्रेक्षक  मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.

युवानेते डॉ.अंकुश लाड याच्यां वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन.

युवानेते डॉ.अंकुश लाड याच्यां वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१३: मानवत नगरीचे  उपनगराध्यक्ष तथा युवानेते डॉ. अंकुशभाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त ओम ब्लास्टर्स टीम मानवत यांच्यावतीने  १०-१० षटकाच्या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेटचे आयोजन दि.१५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
तरी क्रिकेट खेळाडू तसेच रसिक प्रेक्षकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा या स्पर्धेचे प्रथम बक्षीस २१००० रुपये अंकु्शभाऊ मित्र मंडळातर्फे तर द्वितीय बक्षीस १५००० रुपये  मा. सभापती जि. प.सदस्य श्री .पंकज भाऊ आंबेगावकर यांच्यातर्फे,तृतीय बक्षीस ७००० रु श्री .गणेश कुमावत माजी नगराध्यक्ष यांच्यातर्फे,आणि चौथे बक्षीस श्री सचिन दोडके सरपंच रत्नापुर यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तसेच पुढील बक्षीस यांच्या तर्फे देण्यात येतील मॅन ऑफ द सिरीज २१००रु .श्री सचिन कोक्कर,वृंदावन ट्रेडिंग कं मानवत,बॅटर ऑफ द सिरीज ११०० रु श्री डॉ योगेश तोडकरी,बॉलर ऑफ द सिरीज ११०० रु श्री स्वप्नील शिंदे ,शिव कलेक्शन मानवत,बेस्ट विकेटकीपर ११०० रु .श्री मा नगरसेवक विनोद भैया रहाटे,तसेच प्रोत्साहनपर बक्षिसे श्री गिरीशसेठ कत्रूवार (मा नगरसेवक),श्री संतोष सपाटे,श्री अनिरुद्ध पांडे सर,श्री नियामत खान,श्री बाजीराव हलनोर, श्री अनंत भदर्गे(मा नगरसेवक),श्री ज्ञानेश्वर मोरे(संचालक,कृ बा उ स मानवत) यांच्यातर्फे देण्यात येतील या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणुन  श्री बालाजी दहे(मुकादम),श्री श्रीहरी कच्छवे सर,आणि श्री प्रशांत टोपे सर हे राहणार आहे.या  भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेटचे आयोजन
फिल्टर टाकी मैदान,मानवत येथे होणार आहे.
प्रवेश फि ५००रुपये आहे ईच्छुक क्रिकेट संघानी
नोंदणीसाठी शिव कलेक्शन-९९२१९१८८८८ ,श्री रामभाऊ हलनोर- ८०५५१८९४९४,श्री संदीप पवार-९४०५७८१८८४,श्री नागनाथ कुऱ्हाडे-८८८८९११५४४ याच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजका कडुन करण्यात आले आहे.

Friday, February 9, 2018

परभणी तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनाच्या सचीवपदी ना.त.नकुल वाघुंडे यांची निवड.

परभणी जिल्हा तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनाच्या कार्यकारीनीची निवड.

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायबतहसिलदार संघटनाच्या परभणी जिल्हा कार्यकारीनीची निवड ८ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. या संघटनेच्या  अध्यक्षपदी जिवराज  डापकर तहसिलदार सोनपेठ, सचीवपदी नकुल वाघुंडे नायब तहसिलदार मानवत, कार्याध्यक्षपदी सखाराम मांडवगडे,सचीवपदी  रामदास  कोलगने,उपाध्यक्षपदी आश्विनी जाधव तहसिलदार मानवत,स्वराज कंकाळ,सुरेश शेजुळ ,कोषाध्यक्षपदी गणेश चव्हाण ,श्रीकांत विसपुते,सहसचीवपदी वंदना मस्के,निलेश पळसकर,टि.एस.सुगंधे,विवेक पाटिल,संघटकपदी श्रीरंग कदम,परमानंद गावंडे,नंदकुमार भाताब्रेकर,प्रसिद्धी प्रमुखपदी प्रकाश गायकवाड ,मंदार ईदुंरकर ,महिला संघटकपदी मंजुषा भगत,शितल कच्छवे तर सल्लागारपदि विद्याचरन कडवकर,श्याम मदनुरकर,वासुदेव शिंदे आदीची निवड करण्यात आली.या महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायबतहसिलदार संघटनाच्या निवडिच्या पञावर विभागीय सचीव विद्याचरन कडवकर ,विभागीय संघटक विजय चव्हाण ,विभागीय अध्यक्ष किरन अंबेकर यांच्या स्वाक्षरी आहेत.संघटनेच्या या नविन कार्यकारणीच्या निवडिचे स्वागत होत आहेत.

Monday, February 5, 2018

जुनेद भैय्या यांची महात्मा कबीर समता परिषद महाराष्ट्रभुषण पुरस्कारासाठी निवड.

जुनैद भैय्या दुर्राणी यांची महात्मा कबीर समता परिषद महाराष्ट्रभुषण पुरस्कारासाठी निवड.

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

सामाजीक व राजकीय कार्यासाठी,
महात्मा कबीर समता परिषद,तर्फे 
देण्यात येणारा व महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा समजला जानारा महाराष्ट्रभुषण पुरस्कारासाठी जुनैद भैय्या दुर्राणी यांची निवड झाल्याबद्दल,व त्यांच्या सामाजीक संस्कृतीक,व राजकीय कार्याची दखल घेऊन व त्यांच्या कडुन समाजाची झालेली प्रगती लक्षात घेऊन संस्थेने सन २०१७ ह्या वर्षीचा महाराष्ट्रभुषण पुरस्कारा साठी निवड केलेली आहे.
हा पुरस्कार ४मार्च २०१८रोजी शंकरराव चव्हाण सभागृहात
माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब,ब्रीगेडीअर सुधीर सावंत,विधीतज्ञ हायकोट वकील अँड,राम हारपाळे,व आनिल मोकाशे,महापौर महा नगर पालीका नांदेड,व इतर मान्यवराच्या उपस्थीत हा पुरस्कार जुनैद भैय्या दुर्राणी यांना देण्यात यणार आहे.
)

Friday, February 2, 2018

ऊरुस समितीच्या सदस्यपदी समाजसेवक कादर ईनामदार यांची निवड.

परभणी येथील ऊरुस समीतीच्या सदस्यपदी सय्यद कादर ईनामदार यांची निवड.

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

परभणी येथील सय्यद शहा तुराबुल हक रहेमतुल्लाहि ऊरुस समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली.यात सदस्यपदी जेष्ठ समाजसेवक सय्यद कादर ईनामदार यांची निवड करण्यात आली.औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाच्या वतीने एस.सी.तडवी यांनी याची माहिती दिली.या समितीच्या अध्यक्षपदी अतीख पटेल तर उपाध्यक्षपदी अब्दुल बारी तर सदस्यपदी कादर ईनामदार ,अकरम खान,काझी फईमोदीन,अशरफ कादरी,अनुप शिरडकर,सिकंदर खान,शेख शाकेर,मो.बारी,शाहेद खान,खुर्शिद खान,कामगार नेते जलील खान यांची निवड करण्यात आली आहे.या निवडिबद्दल सर्वच स्तरावरुन स्वागत होत असुन नुक्तेच एका सभारंभात सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार हि करण्यात आला.