Saturday, August 29, 2020

गणेश विसर्जन करताना नियमावलीचे पालन करा - मानवत पोलीस निरीक्षक उमेश पाटिल यांचे आवाहान.

गणेश विसर्जन करताना  नियमावलीचे  पालन करा - पो.नि.उमेश पाटिल  
मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.२९: जिल्हा अधिकारी साहेब  परभणी व पोलीस अधीक्षक साहेब परभणी यांनी कोरोना संसर्गजन्य आजार परभणी जिल्ह्यात जास्त प्रमाणात प्रसार होत असल्यामुळे  सर्व गणेश मंडळाचे विसर्जन मिरवणुका यापूर्वीच रद्द केले आहेत .तरी प्रत्येकाने आपापल्या गणेश मंडळाची आरती करून  विसर्जन करिता नगरपरिषद मानवत यांचे  ट्रॅक्टर  प्रत्येक गल्लीत व वार्डत येणार आहे.त्याच ट्रॅक्टर मध्ये गणेश मुर्ती  ठेवावे कोणीही स्वतः गणेश मूर्तीचे विसर्जन करणार नाही याची नोंद  मानवत शहरातील  सर्व सार्वजनिक  गणेश मंडळ व घरगुती गणपती  यांच्या  अध्यक्ष उपाध्यक्ष  व इतर सदस्यांनी  घ्यावी असे आवाहान मानवत पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक उमेश पाटिल यांनी केले आहे.

Friday, August 21, 2020

मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन [] कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी []

मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन
[] कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी []

मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२१ : केंद्राने काढलेल्या नेमणुकीचा आदेश मागे घ्यावा व बाजार समिती कर्मचाऱ्यांना  कर्नाटक राज्याप्रमाणे शासकीय सेवेत घ्यावे या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या  कर्मचाऱ्यांनी २१ ऑगस्ट रोजी बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवत आंदोलन केले. 
केंद्र सरकारने ५ जून रोजी अध्यादेश काढून बाजार समित्यांच्या आवराबाहेरील शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार नियमन मुक्त करून बाजार शुल्क रद्द केले आहे.बाजार शुल्क रद्द केल्यामुळे बाजार समितीचे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. यामुळे कर्मचारी वर्गाच्या वेतनावर परिणाम होणार आहे. तसेच बाजार समितीच्या आवारात बाहेर शेतमालाची खरेदी विक्री झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. बाजार समितीला बाजार शुलकातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा देखरेख, वीज पाणी,  गोडाऊन, शेड,  वजन काटे, आदि खर्च भागविणे अवघड होणार आहे. यामुळे केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश मागे घेऊन राज्यातील बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनात सचिव बालासाहेब कदम, सहाय्यक सचिव शिवनारायण सारडा, संजय होगे,शांता गवारे, रंगनाथ अब्दल, राम पांचाळ, राम राऊत, कैलास किरवले, दत्तात्रय चोखट, नंदू कच्छवे,  मिलिंद राक्षे, सत्यशील धबडगे,विनोद सोळंके, विजय रणेर,  बाळू कदम,सागर कडतन, रमेश मारेवाड, कैलास करडले, मारोती साठे, रेखा पवार, श्रीकांत वाघमारे,विकास काळे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.  

Sunday, August 16, 2020

औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी व रोटी बँक च्या वतीने काढा वाटप.

औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी व रोटी बँक च्या वतीने काढा वाटप.

औरंगाबाद प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार 

दि.१६: कोरोना या आजारावर मात देण्यासाठी व रोगप्रतिकात्मक शक्ती वाढविण्यासाठी  प्रसिध्द  मालेगाव चा मंसुरा  काढा याचे नागरीकांना  वाटप करण्यासाठी शिबीर  लावण्यात आले  होते ते आज पूर्ण झाले शेवटचे शिबीर समता नगर वार्ड क्रमांक ६९ येथे आयोजित केले होते यास ३  दिवस पुर्ण झाले  नागरीक व पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांनी पण मोठ्या संख्येने काढा अल्बम ३० च्या गोळ्याचा  लाभ घेतला व सर्व समता नगर येथील नागरिकांनी यास चागला प्रतीसाद दिला.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद राष्ट्रवादी चे  शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी,
शहर जिल्हा सचिव जफर कूरैशी, शेख जावेद गुडु कुरेशी, शामेक कुरेशी, ईतेशाम कुरेशी ,आनंद गायकवाड यांच्यासह  मोठ्या संख्येने समता नगर भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, August 12, 2020

मानवत येथे महामंडलेश्वर मनिषानंद पूरीजी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण. मानवत / मुस्तखीम बेलदार

मानवत येथे महामंडलेश्वर मनिषानंद पूरीजी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण.
मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१२: मानवत शहरामध्ये  दि.१२ अॉगस्ट  बुधवार रोजी  श्री.खंडोबा मंदिर  परिसरात जवळपास १०० झाडे लावून ते पुर्ण झाडे वाचवण्याचा श्री.खंडोबा मंदिर मित्र मंडळाच्या सदस्याने हा मनात संकल्प घेऊन  वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला
१००८ महामंडलेश्वर मनिषानंद पूरीजी महाराज  व
ह.भ.प.श्री.१००८ स्वामी शिवेंन्द्र चैतन्य महाराज यांच्या वृ शुभहस्ते  पार पडला यावेळी  प्रमुख उपस्थिती म्हणुन तहसिलदार डि.डि.फुफाटे,
पोलीस निरीक्षक उमेश पाटील , मुख्याधिकारी जयवंत सोनवने उपस्थीत होते.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन  अनिल जाधव,नरेश गौड,दिनेश देशमुख,ॲड.सुनिल जाधव,बालाजी दहे,आशोक नितनवरे,विलास देशमुख,बंडू तुरे,आप्पा भिसे व खंडोबा मंदिर मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांच्यावतीने करण्यात आले होते.

मानवत येथील पान टपरी व्यवसाय सुरु करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी . [] पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन []

मानवत येथील पान टपरी व्यवसाय सुरु करण्याची
परवानगी द्या .
[] पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने तहसिलदारांना  निवेदन []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१२: कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे लागु झालेल्या  लॉकडाऊनमुळे मागील पाच महिण्यापासुन मानवत येथील पान टपरी व्यवसाय बंद असल्यामुळे पान टपरी व्यवसायीकांवर व त्यांच्या परीवारावर उपासमारीची वेळ आली असुन यामुळे पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांना दि.१२ अॉगस्ट रोजी पान मसाला व पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात नमुद आहे की, मानवत येथील पान मसाला व पान टपरी व्यवसायीकांचे लॉकडाऊन पासुन आज पर्यत पान टपरी बंद आहे व्यवसाय बंद झाल्यामुळे कुटुबांवर उपासामारीची वेळ आली आहे आरोग्यखर्च ,घरगुती खर्च करण्यासाठी हतबल झाले आहे त्या सर्व बाबीमुळे आमच्या कुटुबांवर उपासामारीचा फटका बसत आहे यामुळे पान टपरी व्यवसायीकांना आर्थिक मदत द्यावी किंवा ईतर कोणत्याहि प्रकारची कामे करण्यासाठी सुविधा पुरवुन द्यावी अन्यथा आम्हास आमचे पान टपरी व्यवसाय सुरु करण्याचे आदेशीत करावे नसता आपल्या कार्यालयाच्या समोर शासन नियमाप्रमाणे आमरण उपोषण करण्यात येईल परीणामी आपल्यावर ह्याची जबाबदारी राहिल असे नमुद केले आहे.
निवेदनावर अजमत खान, नंदुभाऊ राजे, रफिक बागवान , शफिक तांबोळी , जावेद बागवान ,अ. अजमत, रफिक तांबोळी ,मुखीद कुरेशी ,मतीन बागवान ,हरी ठोंबरे , अजीम तांबोळी ,कृष्णा मेहेञे आदीच्या स्वाक्षरी आहेत.