Wednesday, January 31, 2018

आ. मोहन भाऊ फड,युवानेते डॉ.अंकुश लाड यांची प्रमुख उपस्थीतीत मानवत येथे श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी .

मानवत येथे श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी .
[]कार्यक्रमास आमदार मोहन फड,डॉ.अंकुश लाड यांची प्रमुख उपस्थीती  []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.३१: मानवत शहरात लोहार सुतार समाज बांधवाच्या वतीने दि.२९ जानेवारी रोजी श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पञकार गोपाळ लाड सर हे होते तर प्रमुख अतीथी म्हणुन पाथरी विधानसभाचे आमदार मोहन भाऊ फड तर प्रमुख पाहुणे म्हणुन युवानेते डॉ.अंकुश लाड,आर.एस.चाफे अध्यक्ष लोहार विकास महामंडळ जि.परभणी हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.तसेच समाजातील मानवत तालुक्यातील दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थाचे यावेळी सत्कार करण्यात आले.तसेच मान्यवराचे ही यावेळी सत्कार करण्यात आले.यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार मोहन फड म्हणाले की,लोहार सुतार समाजबांधवासाठी लवकरच आमदार निधीतुन समाजमंदिर व जागेला संरक्षण भिंत बाधुन देण्याचे यावेळी आश्वासन दिले.या नंतर श्री.ह.भ.प.विनोदमुर्ति वैजनाथ महाराज यांचे किर्तन पार पडले.कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि मानवत येथील श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारि यांनी प्रयत्न केले.यावेळी मोठ्याप्रमाणात लोहार सुतार समाजबांधव मोठ्याप्रमाणात उपस्थीत होते.

Tuesday, January 30, 2018

ज्ञानोबा शहाणे यांचा परभणी जिल्हा कारागृहात ७ दिवसापासुन आमरन उपोषण सुरु!

मानवत तालुक्यातील वझुर येथील शहाणे यांचा ७ दिवसापासुन जिल्हा कारागृहात उपोषण!
[] धान्यघोटाळा करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याची मागणी []

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.३०: मानवत तालुक्यातील वझुर येथील ज्ञानोबा सोनाजी शहाणे यांनी धान्य घोटाळ्यातील आरोपिवर कारवाई होत नसल्याकारणाने औरंगाबाद आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा ईशारा दिला होता.यामुळे पोलीसानी त्यांना पकडुन दंडाधिकारी मानवत याच्यां समोर हजर केले असता त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला असता त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती व कारवाई आरोपीवर न करता प्रशासन माझ्यावर कारवाई करतो व न्याय मिळेपर्यत आमरन  उपोषण ज्ञानोबा शहाणे यांनी जिल्हा कारागृहात सुरु केले आहे व आज त्यांना पेशीसाठी दंडाधिकारी मानवत येथे आनले असता दंडाधिकारी रजेवर असल्याने आज ७ व्या दिवशीही त्यांचे आमरन उपोषण सुरुच होते.
ज्ञानोबा शहाणे यांनी ४ वर्षापासुन या घोटाळेबहाद्दर विरोधात एकाकी लडाई लढुन धान्यघोटाळा उघळकिस आणला वझुर येथील धान्याचा व केरोसीन चा भ्रष्टाचार ही प्रशासनासमोर आणला होता तसेच मानवत तालुक्यातील तीन हजार शिधापञीका तहसिल कार्यालयातुन गायब करुन सहा लाख रुपयाचा काळाबाजार या संबधित अधिकाऱ्यांनी केला होता या संबधीही शहाणे यांनी पाठपुरावा केला होता व यासर्व आरोपीवर कारवाई व्हावी म्हणुन आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे २६ जानेवारी २०१७ रोजी ३६ तास आमरन उपोषण केले होते परंतु आश्वासनापलीकडे काहीही मिळत नसल्याने त्यांनी २६ जानेवारी २०१८ रोजी आत्मदहनाचा ईशारा दिला होता म्हणुन २२ जानेवारी रोजी त्यांना पोलीसानी पकडुन मा.ता.दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर केले असता कलम १०७ नुसार यांनी जमानत नाकारली म्हणुन त्यांना जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले.न्याय मिळत नसल्यामुळे ज्ञानोबा शहाणे यांनी जिल्हाधिकारी यांना पञ  लिहुन २४ जानेवारी पासुन जेलमध्येच आमरन उपोषण सुरु केले त्यानंतर २५ जानेवारी रोजी मा.ता.दंडाधिकारी याच्या समोर त्यांना आणले असता तेव्हाही त्यांनी जमानत घेण्यास नकार दिला व आज दि.३० जानेवारी रोजी त्यांना मा.ता.दंडाधिकारी कार्यालय येथे आनले होते परंतु मा.ता.दंडाधिकारी हे रजेवर असल्यामुळे पुन्हा उद्या दि.३१ जानेवारी रोजी  त्याना मा.ता.दंडाधिकारी याच्या समक्ष हजर केले जाणार आहेत.आज ७ व्या दिवशीही उपोषण सुरु असल्याने त्याचीही तब्येत खालावत असल्याने त्यांना लवकरात लवकर न्याय देऊन संबधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांचा मुलगा अमोल ज्ञानोबा शहाणे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.आता प्रशासन काय कारवाई करते ते बघुया?खरच ज्ञानोबा शहाणे यांना न्याय मिळेल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.

Saturday, January 27, 2018

युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी घेतली वाचादोष शस्त्रक्रिया झालेल्या बालकांची भेट.

मानवत येथे राष्ट्रिय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत वाचादोष शस्त्रक्रिया शिबीर संपन्न .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२७:मानवत येथील ग्रामीण रुग्णालय येथे दि.२५ जानेवारी रोजी राष्ट्रिय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत वाचादोष या आजाराच्या १६ बालकावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जावेद अथर याच्यां मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय आधिक्षक डॉ.नरेद्र वर्मा याच्या पुढाकाराने डॉ.लक्ष्मण माळकुंजे यांच्या हस्ते शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी या विद्याथ्याना भेट दिली व या बद्दल कुतुहल व समाधान व्यक्त केले.या वाचादोष शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठि  ग्रा.रु.मानवत येथील राष्ट्रिय बाल स्वास्थ पथकातील डॉ.गजदंत्त चव्हाण ,डॉ.सुषमा भदर्गे ,डॉ.ललीत कोकरे ,डॉ.प्रिती दिक्षीत ,सुनील खरात ,सचीन कदम,पल्लवी काटे,दिक्षा गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले तसेच श्रीमती काटकर,माधुरी सुरे,प्रशांत खिंलारे  व ईतर अधिकारि कर्मचारि यांनी मोलाचे सहकार्य केले.

आ.मोहन फड यांच्या प्रमुख उपस्थीतीत तिरंगा एकता संम्मेलन!

भारतीय जनतापक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा एकता  संमेलनास युवकाकडुन  उत्फुर्स प्रतिसाद .

पाथरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनतापक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा एकता  संमेलनास उत्फुस प्रतिसाद मिळाला आ.मोहनभाऊ फड यांच्या पुढाकाराने दहा ठिकाणी काढलेल्या तिरंगा एकता संमेलनास युवकाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.पोखरणी फाटा, दैठणा,शेळगाव,सोनपेठ,डीघोळ,वाघाला,पाथरी,नाथरा,रामपुरी, मानवत आदी ठिकाणी प्रारंभी युवकानी मोटारसायकल रॅली काढली. त्यांनतर ध्वजारोहन करण्यात आले.पोखरणी फाटा येथील तिरंगा एकता संमेलनाचे ध्वजारोहन आणि खुल्या किर्केट स्पर्धेचे उदघाटन आ.मोहनभाऊ फड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष बाबा पठाण,डॉ. शेख जवळेकर,मोहमंद गोस, सतीश दलाल,रामभाऊ स्वपने,गजानन जोरवर,वसिष्ठ वाघ,आदीसह युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

Friday, January 26, 2018

मानवत येथे हर्षउल्हासात गणतंञ दिवस साजरा!

मानवत येथे राजकिय,सामाजिक व शैक्षणिक संस्थाच्या वतीने प्रजासत्ताक दिन ऊत्साहात साजरा.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि,२६: मानवत शहरात ६९ वा प्रजासत्ताक दिन हर्ष उल्हासात विविध राजकीय सामाजिक व शैक्षणिक संस्थाच्या वतीने साजरा करण्यात आला.यात नगरपरिषद मानवत येथे  सकाळी ७-४५ वाजता नगाराध्यक्षा शिवकन्या स्वामी याच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी सर्व नगरपरिषद कर्मचारि व नगरसेवक यावेळी उपस्थीत होते.तसेच तहसिल कार्यालय येथे सकाळी ९-१५ वाजता तहसिलदार आश्विनी जाधव याच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी नायबतहसिलदार नकुल वाघुंडे,शेख वसीम,गटविकास अधिकारि छडिदार साहेब याच्यासह राजकिय व सामाजिक तसेच पञकार यावेळी उपस्थीत होते.मानवत येथील ईखरा ऊर्दु शाळेत सकाळी ७-५० वाजता शिवसेना शहरप्रमुख अनील जाधव याच्यां हस्ते ध्वजारोहन  करण्यात आले यावेळी ॲड.लुकमान बागवान ,एम.ए.रिजवान सर आदी उपस्थीत होते.मानवत पोलीस ठाणे,ग्रामीण रुग्णालय तसेच शहरातील शासकिय कार्यालयात ध्वजारोहन  करण्यात आले.जमीअत उलेमा हिंद ( अरशद मदनी ) अध्यक्ष हाफेज लतीफ यांनी शहरातील शाळेत जमीअत च्या वतीने विद्याथ्याना बिस्किटचे वाटप केले.तसेच जि.प.प्राथमिक शाळा शाखा क्र.४ येथे अल्पसंख्याक शहरअध्यक्ष आसद खान यांनी शाळेतील विद्यार्थाना बिस्किटचे वाटप केले.फ्रेन्डस मिञमंडळाच्या वतीने पेठमोहल्ला येथे प्रभात भेरीत येणाऱ्या शालेय विद्यार्थाचे स्वागत करण्यात आले तसेच बिस्किटचे वाटप युवानेते डॉ.अंकुश लाड याच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक जमील चाऊस,हाफेज लतीफ,हबीब बागवान ,सद्दाम बागवान ,आवेस बागवान ,अकरम मिलन,अय्युब बागवान मिलन आदि उपस्थीत होते.एम आय एम च्या वतीने जि.प.ऊर्दु प्राथमिक शाळा,साईनाथ अस्थिव्यंग विद्यालयात पेन व बिस्किटचे वाटप सय्यद समीर,शेख शफिक,अरबाज बेलदार ,शेख मोबीन,शोएब बागवान याच्या वतीने करण्यात आले.शहरातील सर्व शाळा विद्यालयातुन सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली व मोठ्या हर्ष उल्हासात गणतंञ दिवस साजरा करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त अल्पसंख्याक शहर अध्यक्ष असद खान याच्यावतीने विद्यार्थाना बिस्किटचे वाटप.

मानवत येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.प्रा.शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन .

मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.२६: मानवत शहरातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा शाखा क्र.४ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आझाद चिञकला स्पर्धेमध्ये शाळेतील १०८ विद्याथ्यानी सहभाग घेतला होता या स्पर्धात शाळेतील सानीया मोबीन शेख,समीक्षा जाधव,क्रांती भालेराव आणी आम्रपाली गायकवाड यांना सुवर्ण पदक मिळाले तसेच उर्वरीत विद्यार्थाना प्रोत्साहन्तमक  प्रमाणपत्र यावेळी वाटप करण्यात आले.तसेच शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धात विजयी झालेल्या विद्यार्थिना अल्पसंख्याक शहर अध्यक्ष असद खान,विजय खरात ,सहादु घनसावंत,बाळासाहेब आवचार ,दिपा केसापुरे,अशोक नितनवरे,सौ.कांता गवळी,दिपा केसापुरे यांनी स्वखर्चाने बक्षीस वितरन व बिस्किटचे वाटप करण्यात आले
.या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माया गायकवाड ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन अल्पसंख्याक शहर अध्यक्ष असद खान,विजय खरात ,शाळा समीतीचे अध्यक्ष सहादु घनसावंत,बाळासाहेब आवचार ,दिपा केसापुरे,अशोक नितनवरे,सौ.कांता गवळी,दिपा केसापुरे हे होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन खरात सर यांनी केले तर आभार अहिरे सर यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पैंजने सर,कऱ्हाळे सर,जाधव सर,मुसांडे मँडम ,टेगसे मँडम ,पौळ मँडम ,तमन्ना मँडम,सताळकर मँडम आदीनी परिश्रम घेतले.

Wednesday, January 24, 2018

मानवत येथे माजी उपमुख्यमंञी अजीतदादा पवार यांचा भव्य रोड शो!

मानवत येथे माजी उपमुख्यमंञी  अजीतदादा पवार यांचा रोडशो दरम्यांन नागरिकाकडुन भव्य स्वागत!

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२४:महाराष्ट्रातील युती सरकारच्या साडेतीन वर्षाच्या आतापर्यत च्या कारभारा विरोधात राष्टृवादि पक्षाच्या वतीने भाजप शिवसेना सरकार विरोधात  हल्लाबोल मोर्चाचे आयोजन महाराष्ट्रभर होत आसुन माजी उपमुख्यमंञी अजीतदादा पवार सत्ताधारिवर प्रत्येक सभेत हल्ले करत आहेत व यास जनतेकडुन ही मोठा प्रतिसाद मिळत असुन काल दि.२३ जानेवारी रोजी पाथरी येथे हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते.या हल्लाबोल मोर्चासाठी रुढि पाटिजवळ पासुन अजीतदादा याच्यां स्वागतासाठी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते मोटार सायकल रँली काढुन यावेळी मोठ्या ऊत्साहात  सामील झाले होते.रुढिपाटि पासुन ते पाथरी येथील जि.प.सभापर्यत हि मोटार सायकल रँली काढण्यात आली यावेळी मानवत शहरात जागोजागी माजी उपमुख्यमंञी अजीतदादा पवार व आमदार बाबाजानी दुर्राणी याचा भव्य स्वागत व सत्कार नागरीकाकडुन यावेळी करण्यात आला.या रँलीत अजीतदादा पवार यांचा ताफा निघाल्यानंतर दादांनी मानवत येथे रोडशो दरम्यांन नागरिकांना हात दाखवुन रोडशो करत व नागरीकांच्या शुभेच्छा घेत  पाथरी येथील नियोजित सभेच्या ठिकाणी पोहचले. मोटर सायकल रँलीमुळे मानवत शहरातील राष्टृवादि च्या कार्यकर्त्यांना नविन संजिवनी मिळाली आहे व कार्यकर्ते पक्षाच्या अधिक बळकटिसाठी आधिक जोमाने कामाला लागले आहेत. यावेळी मोटर सायकल रँलीत आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब, जि.प.सदस्य पंकज आंबेगावकर ,शहरअध्यक्ष मोईन अन्सारी ,शहरउपाध्यक्ष सिध्दार्थ ढाले,अफसर तांबोळी,शहर सचीव शेख पाशा,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष असद खान,गुलाब तांबोळी,शेख शाकेर ,शेख अफरोज,शेख वाजीद,असीर बेलदार ,सद्दाम भाई,शेख बशीर याच्यांसह मोठ्याप्रमाणात पाथरी ,मानवत शहरातील राष्टृवादि पक्षाचे कार्यकर्ते या मोटर सायकल रँलीत आवर्जून  उपस्थीत होते .

लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमींवर संघटना बळकटीसाठी तयारीला लागा-बबनराव लोणीकर

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे - बबनराव लोणीकर

केंद्र व राज्य सरकारने शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबविलेल्या असताना विरोधी पक्ष हल्लाबोल सारखे कोणताही ठोस मुद्दा नसलेली आंदोलने करून जनतेची दिशाभूल करत आहेत. भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमींवर संघटना बळकटीसाठी तयारीला लागावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

परभणी येथील वरद मंगल कार्यालयात समाधान शिबिराच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोजित पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार मोहन फड, माजी आ. विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, बालाजी देसाई, आनंद भरोसे, मेघनाताई बोर्डीकर, डॉ. प्रफुल्ल पाटील, राहुलभैय्या लोणीकर, गणेश दादा रोकडे, श्यामसुंदर मुंढे, खंडेराव आघाव, डॉ. विद्याताई पाटील, डॉ. मीना परतणे, संजय साडेगावकर, मंगलताई मुग्दलकर, अरविंद थोरात, राधाजी शेळके, अशोकराव डहाळे, गणेशराव काजळे, नसरीन पठाण, शिवहारी खिस्ते आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
ना. लोणीकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे परभणी व जालना जिल्ह्यात रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबई किंवा नागपूरला ५ तासात पोहचता येणार आहे.  त्याचा फायदा शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य जनतेला होणार आहे. शेगाव ते पंढरपूर हा वारकरी बांधवांच्या सोयीसाठीच्या रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या रस्त्याबद्दल वारकरी बांधवांमधुन समाधान व्यक्त होत असताना परतूरमधील विरोधी पक्षांच्या काही मोजक्या मंडळींना मात्र ते सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनी विरोध केला. अशा विरोध करणाऱ्या राजकीय मंडळींच्या घरावर दिंडी मोर्चे काढावेत, असेही ना. लोणीकर म्हणाले.
कार्यकत्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींपर्यंत पोहोचवावा,असे आवाहन करून ना. लोणीकर म्हणाले की, समाधान शिबिरामध्ये सरकारी वरील जनतेचे विविध प्रश्न सोडविले जाणार आहेत. त्यामुळे या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घ्यावे असे आवाहन ना. लोणीकर यांनी केले. दि. २६ जानेवारी रोजी परभणी जिल्ह्यात ४० ठिकाणी तिरंगा यात्रा निघणार आहे. त्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही ना. लोणीकर यांनी केले. यावेळी आमदार मोहन फड, माजी आ. गव्हाणे, जिल्हाध्यक्ष चाटे आदींची भाषणे झाली. यावेळी सुमारे दीड हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuesday, January 23, 2018

मानवत येथील आर्यवैश्य महिला मंडळाच्या सदस्यांनी सामुदायिक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातुन महिलांनी दिला जनजागृती चा संदेश.

मानवत येथील आर्यवैश्य महिला मंडळाच्या  हळदि कुंकवाच्या कार्यक्रमातुन महिलांनी  केली जनजागृती.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२३: नका वाया घालवु पाणी आणी ईधंन बचत करु देशाचे धन या सारखे जनजागृती करनारे संदेश मानवत येथील आर्यवैश्य महिला मंडळाच्या सदस्यांनी सामुदायिक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातुन महिलांनी दिला.
शहरातील संभाजी नगर भागातील नगरेश्वर मंदिरात आर्य वैश्य महिला मंडळाच्या वतीने सामुदायिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पर्यावरणासाठी झाडे लावा देश वाचवा दुनिया वाचवा,स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे,रक्तदान जिवनदान तसेच बेटि बचाओ बेटि पढाओ असे संदेश देनारे बँनर लावण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्यवैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा अनुजा डंमढेरे ,उपाध्यक्षा ममता चिद्रवार ,सचीव निर्मला गुडाळे,कोषाध्यक्ष सुचिता पेन्सलवार व सदस्यांनी प्रयत्न केले.

मानवत येथे छञपती शिवाजी महाराज याच्या जयंती निमित्त मानवत येथे २५ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन.

छञपती शिवाजी महाराज याच्या जयंती निमित्त मानवत येथे बैठकीचे आयोजन.
मानवत  / मुस्तखीम बेलदार                      शहरामध्ये १९ फेब्रुवारी रोजी छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार त्यासाठी नियोजन व समीती निवडी संदर्भात उद्या २५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जुन्या पाथरी नाक्याजळ छञपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .
या बैठकीस मानवत शहरासह संपुर्ण तालुक्यातील समाज बांधवाने उपस्थित रहावे असे आवाहन सकल शिवप्रेमीच्या वतीने करण्यात आले आहे.
मानवत शहरात दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी जानता राजा छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते याही वर्षी १९ फेब्रुवारी २०१८ रोजी मानवत मध्ये नावीण्य पुर्ण छञपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार या अनूशंगाने विवीध विषयावर सविस्तर चर्चा करुन छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाची समीती निवडण्यात येणार आहे या शिवाय अनेक समीत्या गठीत करण्यात येणार आहे बैठकीमध्ये शिस्तबद्धता, प्रत्येकाच्या मताचा आदर ठेवण्यात येणार आहे, जेष्टाना सन्मान मिळेल,व आनंदमय वातावरणात ही बैठक पार पडले याची दक्षता प्रत्येकानी घ्यावी यासाठी उद्या २५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मेनरोड वरील पाथरी नाक्याजवळ असलेल्या छञपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्यच्या ठिकाणी मानवत शहरासह संपुर्ण ग्रामीण भागातील समाज बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन मानवत तालुक्यातील सकल शिवप्रेमीनी केले आहे.

Monday, January 22, 2018

हिंगोलीचे जिल्हा जात प्रमाणपञ समितीचे भ्रष्टाचारी अध्यक्ष राम गगराणी यांची चौकशी करण्याची मागणी

हिंगोलीचे जिल्हा जात प्रमाणपञ समिती चे अध्यक्ष राम गगरानी यांची हकालपट्टि करण्याची मागणी.
[]प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा ईशारा[]

विशेष प्रतिनीधी -

हिंगोली जिल्हा जात प्रमाणपञ समिती चे अध्यक्ष राम गगराणी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन भ्रष्टाचार करुन वसमत येथील नगरअध्यक्ष श्रीनिवास पोराजवार याचा जातप्रमाणपञ वैध केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करुन त्यांची हकालपट्टि करण्यात यावी या मागणीचे निवेदन दि.१५ जानेवारी रोजी विभागीय जातप्रमाणपञ समिती औरंगाबाद यांना जिल्हाधिकारी हिंगोली याच्या मार्फत देण्यात आले व मागणी मान्य न झाल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे अमरन उपोषणाचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,वसमत येथील नगरअध्यक्ष श्रीनिवास पोराजवार याचे जातप्रमाणपञ अवैध आसल्याचे कारनावरुन हिंगोली येथील जिल्हा जातप्रमाणपञ पडताळणी समिती येथे राहुल यादवराव दातार,ॲड.भागवत मुगाजी वाव्हुळे,ॲड.सखाराम राघोजी आझादे यांनी तक्रार केली होती,या तक्रारीवरुन जातप्रमाणपञ पडताळणी समिती ने दोन्ही बाजुचे म्हणने ऐकुन निर्णय देने अपेक्षित होते परंतु समितीचे अध्यक्ष राम गगराणी यांनी अगोदर पासुनच श्रीनिवास पोराजवार याच्यां नातेवाईकाची तपासणी व फेर तपासणी करण्यास न्यायालयात परवानगी दिली नाहि.तसेच राम गगराणी याच्या समितीने दि.९ जानेवारी रोजी प्रकरणावर निकाल दिला आसल्याचे समजले.परंतु हा निर्णय देताना न्यायालयीन नियम व प्रघातानुसार वादि व प्रतिवादि याच्यांसह त्याच्या वकिलाना पूर्वसुचना देने आवश्यक आहे आणी जर न्यायनिवाडा गुप्तपणे द्यायचा असेल तर वादि व प्रतिवादिना टपाल पोस्टाने त्याच्या पत्यावर न्यायनिवाडा चे कागदपत्रे जाने आवश्यक आहे परंतु सदर प्रकरणात निकाल देताना राम गगराणी यांनी न्यायालयीन प्राघातानुसार पायदळी तुडवुन निकाल देताना तक्रारदाराना कोणतीही माहिती दिली नाहि.जातप्रमाणपञ वैध झाल्याचे नगरअध्यक्ष यांना ८ जानेवारी रोजी सागण्यात आले व नगरअध्यक्ष यांनी निकाल आपल्या बाजुने लागणार असल्याचे राजकिय वर्तुळात सागुनहि टाकले.तसेच निकाल देतानाही श्रीनिवास पोराजवार यांना निकाल सागुन टाकला व यानंतर नगरअध्यक्ष पोराजवार यांनी शहरात फटाके फोडुन जल्लोष साजरा केला.या शिवाय पोस्टाने पाठवलेली निकालाची प्रत तक्रारदार यांना दि.२५ जानेवारी रोजी मिळाली परंतु काहि वर्तमानपत्रात दि.१३ जानेवारी रोजीच जातप्रमाणपञ वैध झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.तसेच या वर्तमानपञात पोराजवार यांचे पद कायम राहणार आहे व त्यांना क्लीनचीट देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.याचाच अर्थ वादि व प्रतिवादि ना गुप्त निकाल मिळण्यापुर्वीच राम गगराणी यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रकरणाची व्याख्याता करुन न्यायव्यवस्थेचे नियम डावलले आहेत,तसेच निकाल देताना केवळ वादी श्रीनिवास पोराजवार यांनाच कळविले आहे.त्यामुळे देण्यात आलेल्या निकालात न्यायनिवाडा न करता पुर्वग्रहदुषीत हेतुने देण्यात आला आहे व हे सिध्द होते.त्यामुळे असा व्यक्ती या पदावर आसने न्यायव्यवस्थेच्या हिताचे नाही यामुळे गगराणी यांची हकालपट्टि करुन त्याच्या संपत्तीची चौकशी करुन त्यांना पदावरुन काढण्यात यावे अन्यथा २६ जानेवारी पासुन आमरन उपोषणाचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.या निवेदनावर ॲड.भागवत मुगाजी वाव्हुळे,ॲड.सखाराम राघोजी आझादे,राहुल यादवराव दातार याच्या स्वाक्षरी आहेत.

Sunday, January 21, 2018

मानवत नगरपरिषदच्या नियोजन व विकास सभापतीपदी सौ.राणी अंकुश लाड यांची बिनविरोध निवड!

मानवत नगरपरिषदच्या नियोजन व विकास सभापतीपदी सौ.राणी अंकुश लाड यांची बिनविरोध निवड!

मानवत/  मुस्तखीम बेलदार

मानवत नगरपरिषदच्या सभागृहात दि.२० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता स्थायी समिती व विशेष समिती सभापती व सदस्य याची निवड करण्यात आली.पिठासिन आधिक्षक तथा उपविभागीय अधिकारि परभणी डॉ.सुचिता शिंदे व सहाय्यक पिठासिन आधिकारी तथा मुख्याधिकारी उमेश ढाकणे याच्यां अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत विषय समित्या सभापतीची बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच अध्यक्ष स्वामी शिवकन्या नंदकुमार ह्या स्थायी समितीच्या पदसिध्द सभापती आसल्याचे पिठासिन आधिकारी यांनी घोषीत केले.पुढिल प्रमाणे स्थायी समिती व विशेष समिती सभापती व सदस्य याची निवड करण्यात आली .राणी अंकुश लाड उपनगराध्यक्षा यांची नियोजन व विकास समीतीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली,अ.रहिम अ.करिम बागवान यांची सार्वजनिक बांधकाम सभापती  पदि निवड करण्यात आली,दत्ता निवृती चौधरी यांची पाणीपुरवठा व जलनिसारन समितीच्या सभापती पदी निवड करण्यात आली,मिरा मोहन लाड याची स्वच्छता ,वैध्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती निवड करण्यात आली,शैलजा उमेशराव बारहाते यांची महिला व बालकल्यान समीतीच्या सभापती पदी निवड करण्यात आली.या निवडिच्या कामकाजामध्ये नगरपरिषद चे कार्यालयीन कर्मचारि एस.एल.बोरेवाड ,मनमोहन बारहाते ,बळीराम दहे,पंकज पवार यानी कामकाज पाहिले.

मानवत येथील रागीनी वेदपाठक ठरल्या जिंका म्हाळसा पैठणीच्या मानकरी.

रागीनी वेदपाठक ठरल्या जिंका म्हाळसा पैठणीच्या मानकरी.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
मानवत येथील महिलांच्या वतिने मकर संक्रात हळदी कुकंवाच्या निमीत्ताने शहरातील खंडोबा मंदिर सभागृहात  जिंका म्हाळसा पैठणी कार्यक्रम संपन्न झाला.
मकर संक्रांतीचे औचित्य साधुन महिलांच्या मनोरंजनासाठी माजी नगरसेविका मिनाताई देशमुख यांनी सुनिता झाडगांवकर प्रस्तुत जिंका म्हाळसा पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिंका म्हाळसा पैठणीच्या मानकरी ठरल्या रागीनी वेदपाठक,व्दितीय बक्षीस मंगल सोरेकर यांना मोठे स्टील रॅक,तृतीय बक्षीस संध्या राऊत यांना स्टील टाकी व उत्तेजनार्थ बक्षीस  निळकंठ यांना मोठे ब्लॅकेट मिळाले. या कार्यक्रमासाठी परभणी महानगरपालीका महापोर मिनाताई सुरेश वरपुडकर , नगरसेविका शोभा शाम चव्हाण जि.प.सदस्या वैशाली पंकज आंबेगांवकर यांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण करण्यात आले.या स्पर्धेसाठी शहरातील २०० महिलांनी नोंदणी केली होती.
सुनिति झाडगांवकर यांनी त्यांच्या नियोजन बद्धशैलीने व वैविण्यपुर्ण खेळाने महिलांचे मन जिंकुन घेतले.
या कार्यक्रमाच्या बक्षीसाचे प्रायोजक महापोर मिनाताई वरपुडकर,जि.प.सदस्या  वैशाली आंबेगावकर,नगरसेविका शोभा चव्हाण,आदिनाथ कलेक्शन होते.
या हळदी-कुंकवांच्या कार्यक्रमात मिनाताई देशमुख,वैशाली आंबेगांवकर, रेखा देशमुख,कुसुमताई देशमुख,जना टेकाळे,शकुंतला जाधव,ञिशला जाधव,आयोध्या जाधव,संध्या जाधव यांनी सहभाग घेतला होता.
शहरातील  हजोरो महिलांनी कार्यक्रमाचा आंनद घेतला.

Saturday, January 20, 2018

पाथरी येथील खान अब्दुल गफ्फार खान उर्दू माध्यमिक शाळेत खरी कमाई व स्कूल-डे कार्यक्रमाचे आयोजन.

पाथरी येथील खान अब्दुल गफ्फार खान उर्दू माध्यमिक शाळेत खरी कमाई व स्कूल-डे कार्यक्रमाचे आयोजन.
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

आज २० जानेवारी २०१८  रोजी भारत रत्न  खान अब्दुल गफ्फार खान उर्दू माध्यमिक  व उच्च  माध्यमिक  विद्यालय पाथरी येथे खरी कमाई व स्कूल-डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यास विद्यार्थि व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
       महात्मा गांधी एजुकेशन सोसायटी संचालित भारत रत्न खान अब्दुल गफ्फार खान उर्दू माध्यमिक व उच्च  माध्यमिक  विद्यालय पाथरी येथे सदरील शाळेत खरी कमाई व स्कूल-डे कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमा मध्ये विध्यार्थीयांनी आपले घरून वेगवेगळे प्रकारचे खाद्द पदार्थ तयार करून आणले होते.तसेच स्कूल-डे च्या निमित्त काही विध्यार्थीयांनी शिक्षक होऊन  मुलांना शिकविले व सोबत स्वछ भारत अभियान ची मोहीम राबवेनियात आली.
       संस्था सचीव तथा सदस्य न.प.पाथरी श्री.दुर्रानी तारेख खान साहेब , अध्यक्ष न.प.पाथरी श्री.नितेश भोरे साहेब,सदस्य  न.प.पाथरी अन्सारी कलिमुद्दीन साहेब,सदस्य न.प.पाथरी हसीब खान साहेब.व सर्व संस्थे अंतर्गत चालणारे शाखेचे मुख्याधापक व कर्मचारी, केंद्रे प्रमुख तेंगेसे सर, राऊत सर.इतर शाळाचे मुख्याध्यापक  व कर्मचारी या वेळी उपस्थीत होते. खरी कमाई चा उदघाटन अध्यक्ष न.प.पाथरी श्री.नितेश भोरे साहेब यांचे हस्ते झाला.
       सदरील शाळे चे मुख्याधापक व प्रिंसिपल पठाण रईस खान सर ,  शेख साजेद सर,डॉ.अब्दुल मुजीब सर,मोहम्मद शफी सर,अफसर खान सर,शेख अब्दुल मुजीब सर,अब्दुल हसीब सर ,अल्ताफ खान सर, बिलाल सर, अब्दुल अजीज सर, मोहम्मद आखेल सर,सोहेल सर,राशेद अहमद खान, बिस्मिला खान सर, हबीब भाई,पठाण भाई यांनी या कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी  परिश्रम घेतले.

मानवत येथील जागृती महिला मंडळाचा आदर्श उपक्रम; वानावर खर्च न करता शाळेस दिला शौचालय बाधुन.

वानावर खर्च न करता महिला मंडळाने शाळेस बाधुन दिला शौचालय;
मानवत येथील जागृती महिला मंडळाचा नवीन आदर्श उपक्रम!
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२०: मानवत शहरातील शिवाजी नगर भागातील महिलानी रुढि व पारंपारिक पध्दतीने वानावर खर्च न करता महिलांनी निधी जमवुन शहरातील नेताजी सुभाष विद्यालयातील मुलीसाठी शौचालय बांधुन देण्याचा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.
स्वच्छ भारत अभियानास प्रोत्साहन मिळावे तसेच स्वच्छतेसाठी त्यांनी घेतलेला निर्णय हा एक आदर्श समाजापुढे आला आसुन गेल्या तीन वर्षापासुन या महिला मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासुन दरवर्षी या महिला नवनवीन उपक्रम हाती घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करीत आहे. यावर्षि नेताजी सुभाष विद्यालयातील मुलीसाठी स्वखर्चाने शौचालय बांधुन देण्यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा मीरा सदाशिव होगे,उपाध्यक्षा ज्योती खडसे,सचीव आनीता मुढे,नंदा रोकडे,राणी निर्वळ,माधुरी चाफे करंडे,मिनाक्षी बुधवंत,मिनाक्षी शिसोदीया ,गंगासागर बोडखे,सुरेखा मोरे,जयश्री आरबाडे,अरुना खिस्ते या पदाधिकार्यानी आर्थीक निधी उभारला.या महिलाच्या अनोख्या उपक्रमाबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारि रेणुका वागळे यांनी या महिला मंडळाच्या सदस्याचा सत्कार केला.या महिलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल शहरातील सर्वच स्तरावरुन त्याचे स्वागत होत आहे.

मानवत येथे जमात ए ईस्लामी हिंद मानवतच्या वतीने "शांती प्रगती आणी मुक्तीसाठी ईस्लाम" सदभावना कार्यक्रम संपन्न.

मानवत येथे सदभावना कार्यक्रम संपन्न !
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२० : जमात ए ईस्लामी हिंद मानवतच्या वतीने दि.१९ जानेवारी रोजी सध्याकाळी ६-३० वाजता संत सावता माळी चौक येथे  सदभावना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
"शांती प्रगती आणी मुक्तीसाठी ईस्लाम" या अभियानाअंतर्गत जातीय सदभावना ,बंधुभाव आणी सफलता या उद्देशाने जमात ए ईस्लामी हिदच्या वतीने देशभर या सदभावना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन यासाठी मानवत शहरातही दि.१९ जानेवारी शुक्रवार सध्याकाळी ६-३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा सदभावना कार्यक्रम मौलाना मुफ्ती मो.ईसाक याच्यां मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.आजीज मोहीयोदीन हे होते तर प्रमुख वक्ते म्हणुन डॉ.ईकरामोदीन हे उपस्थीत होते.
प्रमुख पाहुणे म्हणुन सत्यशिल धबडगे ,विठ्ठल भुसारे,डॉ.ओमप्रकाशजी समदानी,पोलीस उपनिरीक्षक किरन पवार  ,मौलाना मुजाहिद ,शफी फारुकी हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात कुरानाचे पठण करुन करण्यात आली . यावेळी उपस्थीत मान्यवराचे स्वागतही करण्यात आले तसेच उपस्थीत पञकाराना मराठीत अनुवाद असलेली दिव्य कुरान मजीद यावेळी भेट म्हणुन देण्यात आली.यावेळी मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक शफी फारुकी सर यांनी केले तर सुञसंचालन व आभार नजायत खान पठान सर यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमात ए ईस्लामी हिंद व सर्व युवा मंडळ मानवत यांनी परिश्रम घेतले.

Thursday, January 18, 2018

ओंकार मल्टी स्पेशियालीटी हॉस्पीटलच्या वतीने पाथरी येथे पञकारांचा सत्कार.

ओंकार मल्टी स्पेशियालीटी हॉस्पीटलच्या वतीने पञकारांचा सत्कार!

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१८: ओंकार मल्टी स्पेशियालीटी हॉस्पीटलच्या वतीने दर्पन दिनाचे औचीत्य साधुन मानवत व पाथरी येथील पञकारांचे स्वागत समारंभाचे आयोजन दि.१८ जानेवारी रोजी राञी ७ वाजता हॉटेल सीटि प्राईड पाथरी येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.जगदिश शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन सत्यशिल धबडगे ,पाशा बेग,धनंजय देशपांडे ,माणीक केद्रे,धारासुरकर सर होते.यावेळी मानवत व पाथरी येथील पञकारांचा  डायरी ,पेन व पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी मान्यवरानी आपले मनोगत हि व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुञसंचालन सदाशिव होगे सर यांनी केले तर,आभार प्रदषण डॉ.जगदिश शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.सचीन कदम,डॉ.जगदिश शिंदे ,निवृत्ती पवार यांनी परिश्रम घेतले .

मानवत येथील खान अब्दुल गफ्फार खान शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धाचे आयोजन.

मानवत येथील खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळा येथे सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१८:मानवत तालुका स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा चे आयोजन दि.१८ जानेवारी रोजी खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळात करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्ताक ईनामदार सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन सदाशिव होगे सर हे होते.तर व्यासपिठावर अरकरे गणेश ,प्रकाश रासवे,सौ.कमळु मँडम ,बालासाहेब पवार यांची उपस्थीती होती.
या सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम येण्याचा मान शकुतलाबाई कञुवार विद्यालयास मिळाला तर द्वितीय येण्याचा मान नेताजी सुभाष विद्यालयास मिळाला तर तृतीय येण्याचा मान  खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेस मिळाला.निकालानंतर लगेच प्रथम,द्वितीय  व तृतीय येणाऱ्या शाळेस मान्यवराचे हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले.स्पर्धाच्या यशस्वीतेसाठी मुस्ताक सर,मोईन सर,रहमान सर,जुबेर सर ,जावेद सर यांनी परीश्रम घेतले तर हा कार्यक्रम खान अब्दुल गफ्फार खान शाळेचे मुख्याध्यापक मुखतार सर याच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

पाथरी येथे होणाऱ्या हल्लाबोल मोर्चास मोठ्याप्रमाणात उपस्थीत राहण्याचे आ.बाबाजानी दुर्राणी यांचे आवाहान.

मानवत येथे आ.बाबाजानी याच्यां उपस्थीतीत हल्लाबोल मोर्चा संबधी कार्यकर्ता मेळावा संपन्न!

मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.१८: राष्टृवादि कॉग्रेस पक्षाच्या वतीने शासनाच्या विरोधात हल्लाबोल मोर्चाच्या दुसऱ्या टप्यास १६ जानेवारी पासुन सुरुवात झाली असुन ही हल्लाबोल संवाद याञा दि.२३ जानेवारी रोजी पाथरी येथे होणार असुन या ठिकाणी माजी उपमुख्यमंञी अजीतदादा पवार,खासदार सुप्रिया सुळे,विरोधी पक्षनेते धनंजय मुढे हे उपस्थीत राहणार आहे.या हल्लाबोल मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी याच्या प्रमुख उपस्थीतीत मानवत येथील विश्राम गृहात आज दि.१८ जानेवारी रोजी दुपारी ०१ वाजता राष्टृवादिच्या पदाधिकारि व कार्यकर्ताची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मोर्चा संबधी कार्यकर्त्यांना आ.बाबाजानी यांनी मार्गदर्शन  केले व मोठ्याप्रमाणात या हल्लाबोल मोर्चास उपस्थीत राहण्याचे आवाहन केले.
यावेळी  जि.प.सदस्य पंकज आंबेगावकर , अनील नखाते,शहरअध्यक्ष मोईन अन्सारी ,शहरउपाध्यक्ष अफसर तांबोळी,शहर सचीव शेख पाशा,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष असद खान,युवा शहरअध्यक्ष गुलाब तांबोळी,शेख शाकेर ,शेख अफरोज,शेख वाजीद,असीर बेलदार ,सद्दाम भाई,शिंदे भाऊ,भगवान सुरवसे,शेख युसुफ याच्यांसह मोठ्याप्रमाणात ग्रामीण व शहरातील राष्टृवादि पक्षाचे कार्यकर्ता उपस्थीत होते.

Wednesday, January 17, 2018

मा.स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज याच्या प्रमुख उपस्थीतीत सदभावना कार्यक्रमाचे आयोजन .

मानवत येथे जमात ए ईस्लामी हिंदच्या वतीने सदभावना कार्यक्रमाचे आयोजन!
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१७: जमात ए ईस्लामी हिंद मानवतच्या वतीने दि.१९ जानेवारी रोजी सध्याकाळी ६-३० वाजता संत सावता माळी चौक येथे  सदभावना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
"शांती प्रगती आणी मुक्तीसाठी ईस्लाम" या अभियानाअंतर्गत जातीय सदभावना ,बंधुभाव आणी सफलता या उद्देशाने जमात ए ईस्लामी हिदच्या वतीने देशभर या सदभावना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन यासाठी मानवत शहरातही दि.१९ जानेवारी शुक्रवार सध्याकाळी ६-३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन मौलाना मुफ्ती मो.ईसाक याच्यां मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे .
तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थीती म्हणुन मा.स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज हे उपस्थीत राहणार आहे.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.आजीज मोहीयोदीन राहणार तर प्रमुख वक्ते म्हणुन डॉ.ईकरामोदीन हे उपस्थीत राहणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणुन युवानेते डॉ.अंकुश लाड,सत्यशिल धबडगे ,विठ्ठल भुसारे,ओमप्रकाशजी स्वामी,अनुरथ काळे,पोलीस निरीक्षक प्रदिप पालीवाल ,मौलाना मुजाहिद ,शफी फारुकी हे राहणार आहे.तरी या कार्यक्रमास मोठ्याप्रमाणात उपस्थीत राहण्याचे आवाहन जमात ए ईस्लामी हिंद व सर्व युवा मंडळ मानवतच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuesday, January 16, 2018

मानवत गँस एजन्सी व राजर्षी शाहु महाराज अर्बन मल्टिस्टेट को.अॉप.क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव याच्या विद्यमाने सामान्य गोरगरीब नागरीकांना सवलती च्या माफक व्याजदरात गँस कनेकशन देण्यात येणार आहे.

आता गँस कनेकशन फायनान्स वर घेण्याची सुवर्णसंधी!
मानवत / मुस्तखीम बेलदार

मानवत गँस एजन्सी व राजर्षी शाहु महाराज  अर्बन मल्टिस्टेट को.अॉप.क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव याच्या विद्यमाने सामान्य गोरगरीब नागरीकांना सवलती च्या माफक व्याजदरात गँस कनेकशन देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी नागरीकांनी गँस कोटेशन घेऊन सोसायटी कडे जायच आहे आणी गँस कनेकशन फायनान्स वर देण्यात येणार आहे.ज्या गरीब नागरीकांना एक सोबत पैशे देऊन गँस कनेकशन घेता येत नाही अशा नागरीकांसाठी हि सुवर्ण संधी असुन या संधीचा फायदा मानवत तालुक्यातील गोरगरीब जनतेने घ्यावा असे आवाहन मानवत गँस एजन्सी चे व्यवस्थापक राहुल तुळसीराम डाके,किशोर तुळसीराम डाके,विशाल तुळसीराम डाके,महिपाल अरुणराव भाले यांनी केले आहे.

Monday, January 15, 2018

अबरार बेलदार याच्यां प्रमुख उपस्थीतीत आष्टी येथे बेलदार समाज सेवा मंडळाची शाखेचे स्थापना .

आष्टी येथे बेलदार समाज सेवा मंडळ शाखेची स्थापना.
मुस्तखीम बेलदार / विशेष प्रतिनीधी
  बेलदार समाज सेवा मंडळाच्या वतीने आष्टी ता.परतुर जि. जालना येथे नुकतीच बेलदार समाज सेवा मंडळ मर्या. महाराष्ट्र शाखेची
स्थापना करण्यात आली .
यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणुन
सय्यद अबरार बेलदार महाराष्ट्र  संघटक, मुस्तखीम  बेलदार मराठवाड़ा  संघटक, नजम बेलदार बेलदार समाज मार्गदर्शक , शेख रईस बेलदार जालना जिल्हा अध्यक्ष, कौसर भाई बेलदार मा.नगर सेवक परभणी, मुख्तार बेलदार परतुर ता. अध्यक्ष, बशीर बेलदार परतुर शहर अध्यक्ष उपस्थीत होते .
  यावेळी आष्टी बेलदार समाज च्या उपस्थीतीत आष्टी शहर अध्यक्ष पदी वसीम असगर बेलदार तर उप अध्यक्ष पदी वसीम करीम बेलदार, सचिव पदी मुजीब बेलदार, कोषाध्यक्ष पदी मुख्तार बेलदार यांची  बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी पाहुण्याचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.यावेळी मान्यवरानी आपले मनोगत ही व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसीम अजगर  बेलदार,वसीम बेलदार,मुजीब बेलदार ,मुखतार बेलदार आदीनी परिश्रम घेतले.यावेळी मोठ्याप्रमाणात बेलदार समाज बांधव उपस्थीत होते.

Sunday, January 14, 2018

डॉ.अंकुश लाड याच्या प्रमुख उपस्थीतीत नाम विस्तार दिन साजरा!

मानवत येथे मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिन उत्साहात साजरा.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१४:  २४  व्या विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनी लिंबुनी नगर मानवत येथे कार्यक्रमाचे आयोजन आज दि.१४ जानेवारी रोजी करण्यात आले होते .
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थीती म्हणून  मानवत नगर परिषद चे युवानेते  डाॅ. अंकुश लाड हे होते. यावेळी बोलताना लिंबुनी नगर येथील बौद्ध बांधवास त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार  
दिनांच्या शुभेच्छा देऊन  लिंबुनी नगर येथे लिंबुनी बुध्द विहार व सभा मंडपाची मंजुरी व बांधकामाची घोषणा केली. यावेळी मोठ्याप्रमाणात बौध्द अनुयायी उपस्थीत होते.

Saturday, January 13, 2018

खो.खो.स्पर्धेत यश मिळविल्या बद्दल प्रशिक्षक प्रा.पवन बारहाते यांचा सत्कार.

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी अजिंक्य राहिलेल्या नांदेड विद्यापीठाचे प्रशिक्षक प्रा.पवन बारहाते यांच्या सत्कार करताना उपविभाग अधिकारी रेणुका वागळे सोबत विजयकुमार कत्रूवार, प्राचार्य अशोक चिंदुरवार छायाचिञात दिसत आहे.

छाया- मुस्तखीम बेलदार मानवत

मानवत येथे राष्टृमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अस्थिव्यंग विद्यार्थिना चादरचे वाटप.

राष्टृमाता  जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अस्थिव्यंग विद्यार्थिना चादरचे वाटप.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१३: राष्टृमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या जयंती निमित्त मानवत शहरातील साईनाथ मतिमंद मुकबधीर विद्यालयातील ४०  विद्यार्थिना चादर चे वाटप डॉ.नेञदिप दगडु ट्रस्टच्या वतीने दि.१२ जानेवारी रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मनीषा गुजराथी ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस निरिक्षक प्रदिप पालीवाल ,पोलीस उपनिरिक्षक किरन पवार,सत्यशिल धबडगे ,मुस्तखीम बेलदार ,डॉ.निनांद दगडु सदाशिव होगे हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्टृमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या प्रतिमेचे पुजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले व या नंतर गरिब होतकरु विद्यार्थाना सामाजिक बांधिलकी म्हणुन ट्रस्टच्या वतीने चादर वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि ट्रस्टचे सदस्य मानवत भुषन ॲड.गणेश मोरे याच्यासह ,सचीव निनांद दगडु ,संदिप भाकरे,विशाल कडतन आदिनी परिश्रम घेतले.तसेच साईनाथ मतिमंद मुकबधीर विद्यालयातील काळजी वाहक मुख्याध्यापक अमीत राठोड सर ,अमर भिसे सर ,आशोक वाघमारे सर यांनी देखील सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार सदाशिव होगे सर यांनी मानले.

आ.बाबाजानी याच्यां हस्ते वाटर फिल्टर चे उदघाटन

मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे ग्रामपंचायत ने बसवलेल्या  वॉटर फिल्टर चे उदघाटन  आमदार बाबाजानी दुर्रानी साहेब याच्या हस्ते करण्यात आले .यावेळी   जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, जि.प.सदस्य पंकज आंबेगावकर सरपंच सचिन पठाडे,उपसरपंच उमर खान,सदस्य रतन पठाडे,प्रल्हाद पठाडे,राजाराम पठाडे,शेख रियाज,शिवाजी गुंगाने याच्यांसह  गावकरी मोठ्याप्रमाणात उपस्थीत होते.

छाया - मुस्तखीम बेलदार मानवत

मानवत येथील ईखरा ऊर्दु शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन

मानवत येथील ईखरा ऊर्दु शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.१३: मानवत येथील गालीब नगर येथील ईखरा ऊर्दु प्राथमीक शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन आज दि.१३ जानेवारी रोजी सकाळी करण्यात आले होते.विद्यार्थि मध्ये स्वालंबन निर्माण होणे या मागचा मुख्यउद्देश यासाठी ईखरा ऊर्दु शाळेत प्रत्येक वर्षि प्रमाणे याहि वर्षि आनंद मेळावा (खरी कमाई) चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन बडौदा बँक चे मँनेजर दुर्गादास कोडगीरकर याच्यां शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन ॲड.लुकमान बागवान ,भैय्यासाहेब गायकवाड ,ईम्रान बागवान ,आतीक आन्ना,अफसर फुलारी,ईरफान बागवान हे होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन मौलाना मुजाहिद सर यांनी केले तर आभार संस्थेचे सचीव एम.ए.रिजवान सर यानी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि  जुनेद सर,ईम्रान सर,मुजाहिद सर,सीराज सर,ईलीयास सर ,रिजवान सर,खुदसिया मँडम ,अल्ताफ सर आदीनी प्रयत्न केले.

वालुर येथे विश्वभुषन डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी मानवत येथे निषेध

वालुर येथे विश्वभुषन डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी मानवत येथे निषेध.
मानवत/ मुस्तखीम बेलदार 
दि.०९: भिमा कोरेगाव चे प्रकरण ताजे असताना वालुर ता.सेलु जि.परभणी येथे ८ जानेवारी ते ९ जानेवारी च्या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याची  विटंबना करण्यात आली.या घटनेचा मानवत येथील आंबेडकरी संघटनाच्या वतीने निषेध करुन तहसिलदार मानवत यांना आज दि.९ जानेवारी रोजी निवेदन देऊन विटंबना करणाऱ्या व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भिमा कोरेगाव येथील घटनेनंतर महाराष्ट्रात शांतता नादत आसताना ज्या समाजाची डोके भडकविण्याचा प्रयत्न मनुवादी विचारधारेने केला होता त्यास खीळ बसुन सर्व समाज गुण्यागोंविदाने नादत आसताना मौजे वालुर ता.सेलु जि.परभणी येथे मनुवादी विचारधारेने डोके वर करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याची विटंबना ८ जानेवारी ते ९ जानेवारी च्या दरम्यान चेहऱ्यास काळे फासुन विटंबना करण्यात आली.या घटनेचा जाहिर निषेध करण्यात येत आसुन सदरील घटनेतील आरोपिना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर अमृतराव भदर्गे ,छगन भदर्गे ,अशोक पंडित ,आनंद भदर्गे ,राजकुमार खरात,संपत पंडित ,धम्मपाल सोनटक्के ,दिपक ठेंगे ,महेद्र ठेंगे ,चंद्रकांत मगर,रवी पंडित ,शैलेश वडमारे ,अर्जुन झिंजुर्टे,मिलींद तुपसमुद्रे,नागसेन भदर्गे ,नितीन गवळी,अर्जुन झिंजुर्टे आदीच्या स्वाक्षरी आहेत.