Saturday, April 27, 2024

मानवत शहरांमध्ये २६ बुथवर ५७% मतदान

मानवत शहरांमध्ये २६ बुथवर  ५७% मतदान 

[]नव मतदारांसह महिला व जेष्ठा मध्ये दिसून आला  मतदानाचा उत्साह []
मानवत / मुस्तखीम बेलदार 

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक २६ मार्च शुक्रवारी रोजी मानवत शहरांमध्ये एकूण २६ बुथवर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती नव मतदारांसह महिला व जेष्ठामध्ये मतदानाचा  ऊत्साह दिसून आला
मानवत शहरात ३०४६८ मतदार असुन 
पुरुष १५३६३ तर महिला मतदार १५१०५ 
आहे शहरातील २६ बुथवर १७४३६ मतदान झाले यात पुरुष ९३३६ व ८१०० महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला 
 मानवत शहरांमध्ये २६ बुथवर   एकुण ५७% मतदान झाले आहे .
मानवत नगर परिषद च्या वतीने दिव्यांग, वयोवृद्ध नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर ठेवण्यात आल्या होत्या.
मतदान केंद्रावर मतदाराच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या मतदान शांततेत पार पडला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मानवत पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात  आला होता  मानवत शहरासह तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.महाविकास आघाडिचे संजय जाधव व महायुतीचे महादेव जानकर याच्यांत मुख्य लढत झाल्याचे निवडणुकित दिसुन आले भावी खासदाराचे भवितव्य मतपेटित बंद झाले असुन निकाल ४ जुन रोजी जाहिर होणार आहे याकडे आता पुर्ण परभणी जिल्हयाचे लक्ष लागले आहे.

Wednesday, April 24, 2024

मानवत येथे रमजान ईद ऊत्साहात साजरी

मानवत येथे रमजान ईद ऊत्साहात साजरी

मानवत / मुस्तखीम बेलदार 

बुधवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यावर दि. ११  एप्रिल रोजी शहरातील उक्कलगाव रोड येथील मोठी ईदगाह येथे सार्वजनिक ईद ची नमाज सकाळी साडेआठ वाजता अदा करुन ईद ऊल फिञ अर्थात रमजान ईद मोठ्या ऊत्साहात मुस्लीम बांधवांनी साजरी केली.

या वेळी खुदबा हाफेज अय्याज यांनी  दिला 
हाफेज हाजी मोहम्मद लतिफ यांनी सार्वजनिक नमाज पठण केली. सर्व मुस्लिम बांधवांनी एक मेकांना गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

भारत देशामध्ये सामाजिक सलोखा व भाईचारा कायम राहावा, सोशल मीडियाचा वापर योग्य करावा कोणाच्याही भावना दुखवणारी पोस्ट टाकू नये, त्याचबरोबर आपण एक दुसऱ्या चा धर्माचा आदर करावा असा संदेश धर्मगुरूंनी मौलाना असलम खान इशाती यांनी दिला .
मौलाना मुजाहिद यांनी मानवत नगर परिषद व पोलीस प्रशासन यांचे आभार व्यक्त केले.ईदगाह मैदानावर नागरिकांसाठी आझाद पाणी सप्लायर यांच्यावतीने मोफत जारचे पाणी उपलब्ध केले होते. नमाज नंतर सामूहिक प्रार्थना दुवा करण्यात आली.
पोलीस प्रशासन व राजकीय पुढारीना  जमाते इस्लामी हिंद च्या वतीने  दिव्य कुराण मराठी अनुवाद भेट म्हणुन देऊन  शुभेच्छा देण्यात आले
यावेळी पो.नि.दिपक दंतुलवार ,आनंद मामा भदर्गे ,दिपक बारहाते,रुषीकेष बारहाते, पवन बारहाते,फकिरा सोनवने, श्रीकांत देशमुख ,विक्रम दहे ,भारत पवार आदीनी ईदगाह मैदानात उपस्थीत राहुन मुस्लिम बांधवाना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

मानवत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था

 मानवत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर व रॅम्पची  व्यवस्था 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मानवत शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रभागात मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली असून मतदानाची टक्केवारी वाढावी व समाजातील सर्व स्तरांमधील मतदारांना मतदान करता यावे याकरिता मानवत नगर परिषद प्रशासनाच्या वतीने दिव्यांग मतदारांना प्रशासनाच्या वतीने व्हील चेअर व रॅम्प ची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदान करण्यापासून कोणीही वंचित राहू नये हा यामागचा उद्देश आहे. ही व्यवस्था शहरातील सर्व मतदान केंद्रावरती करण्यात आलेली आहे जेणेकरून मतदान करणे सोयीचे व सुखकर होईल. दिव्यांग असलेल्या व्यक्तींनी या सोयीचा लाभ घ्यावा व आपल्या मतदानाचा हक्क बजवावा तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान रुपी आपले योगदान द्यावे असे आवाहन श्रीमती. कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांच्या वतीने करण्यात आले आहे. सोबत नगर परिषदेचे श्री. सय्यद अन्वर  शहर अभियंता, श्री भगवानराव शिंदे, कार्यालयीन अधिक्षक, श्री.संतोष उन्हाळे, कर निरीक्षक, श्री. मुंजासा खोडवे, लेखापाल, श्री. महेश कदम, अंतर्गत लेखापरीक्षक, श्री शतानिक जोशी, विद्युत अभियंता,श्री संतोष खरात, संगणक अभियंता,श्री. मुंजाभाऊ गवारे, स्वच्छता निरीक्षक,श्री.भारत पवार, श्री.राजेश शर्मा,श्री. संजय रुद्रवार,श्री. सुनील कीर्तने, मुक्कादाम, श्री दीपक भदर्गे, श्री. जावेद मीर व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी काटेकोरपणे निवडणुकांचे कामकाज पाहत आहेत.

Saturday, March 30, 2024

उष्माघातापासून नागरीकांनी स्वताचा बचाव करावा - डॉ. हमीद खान

उष्माघातापासून नागरीकांनी स्वताचा बचाव करावा - डॉ. हमीद खान
मानवत / मुस्तखीम बेलदार 

सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन ऊन वाढले आहे यासाठि नागरीकांनी स्वताची काळजी घेऊन उष्माघात  टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे असे आवाहान मानवत ग्रामीण रुग्णालयाचे  डॉ. हमीद खान यांनी केले आहे.

घराबाहेर पडण्यापूर्वी भरपुर पाणी प्यावे 
,सुती, सैल आणि आरामदायी कपडे घाला,भरपूर ताजे अन्न खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडा,उन्हात बाहेर जाताना डोके झाका. टोपी/कपडा/छत्रीचा वापर करा,पाणी, ताक, ओ.आर.एस पाण्याचे द्रावण किंवा लस्सी, लिंबूपाणी, आंबा पन्हे इत्यादी पेय घ्यावे तसेच रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडू नये,उन्हात अधिक वेळ राहू नका,तिखट मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नका नेहमी पाणी सोबत ठेवा. शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका
ताप आल्यास थंड पाण्याची पटटी ठेवा. कूलर किंवा एअर कंडिशनर्समधून थेट उन्हात बाहेर पडू नका उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे असे आवाहान मानवत ग्रामीण रुग्णालयाचे  डॉ. हमीद खान यांनी नागरीकांना  केले आहे

Friday, March 29, 2024

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना

 


पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना

pmsuryaghar yojna

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना

Pm suryaghar muft bijli yojana

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना में आप अपने घर पर सोलर प्लांट लगवा सकते हैं

जिससे आपको बिजली तो फ्री मिलेगी ही साथ ही आपको सरकार की तरफ से ₹ 78000 तक की

सब्सिडी Pm suryaghar muft bijli yojana subsidy  भी मिलेगी.

 इस योजना में रजिस्ट्रेशन का कंप्लीट प्रोसेस  रजिस्ट्रेशन के बाद एक से दो हफ्ते के अंदर-अंदर आपके पास एसएमएस और ईमेल आ जाएगा कि आपकी एप्लीकेशन अप्रूव हो चुकी है.

pmsruyaghar-installation-sms-pathridaily


और एप्लीकेशन अप्रूव होने के बाद आपको क्या-क्या प्रोसेस फॉलो करना है मैं आपको बताने वाला हूं तो चलिए शुरू करते हैं इस योजना में एप्लीकेशन अप्रूव होने के बाद आगे का प्रोसेस करने के लिए आपको https://pmsuryaghar.gov.in/इसी पोर्टल पर आ जाना है इसमें आप लॉग इन करें 
pmsuryaghar login

लॉग इन करने के लिए अपना मोबाइल नंबर और कैप्चा फिल करें  इसके बाद  मोबाइल नंबर और ईमेल आईडी पर एक ओटीपी सेंड किया जाएगा ओटीपी यहा एंटर करें.
pm suryaghar otp enter

इसके बाद इस तरह से आपके सामने डैशबोर्ड आ जाएगा इसमें आप अपनी एप्लीकेशन का स्टेटस देख सकते हैं. जितने भी स्टेप्स आपके कंप्लीट होते जाएंगे उन पर आपको  ग्रीन टिक यहां पर मिलता जाएगा.

pm suryaghar dashboard

 
एप्लीकेशन अप्रूव हो गई है तो आप डाऊनलोड पर क्लिक करें  इस तरह से अप्रूवल लेटर डाउनलोड हो जाएगा.  


pm suryaghar Approval receipt

इसको आप ओपन करके देख सकते हैं  यह है आपका अप्रूवल लेटर जो आपको सेव करके रख लेना है इसके बाद आपको किसी भी रजिस्टर्ड वेंडर से अपने एड्रेस पर सोलर प्लांट इंस्टॉल करवा लेना है. आपके एरिया में कौन-कौन से रजिस्टर्ड वेंडर्स अवेलेबल है यह चेक करने के लिए आप यहां vender list पर क्लिक करें सोलर प्लांट इंस्टॉल करने के लिए आपके एरिया में जितने भी रजिस्टर्ड वेंडर्स अवेलेबल है उन सब की लिस्ट्  आपके सामने  आजाएगी.

pm suryaghar vendor search list

 इसमें आप उस वेंडर का नेम ईमेल आईडी उसका मोबाइल नंबर देख सकते हैं साथ ही उस वेंडर ने अब तक कितने सोलर प्लांट इंस्टॉल कर दिए हैं वो नंबर भी आप यहां पर देख सकते हैं. नीचे

स्क्रॉल करते जाएंगे तो आपके सामने ये पूरी लिस्ट आ जाएगी इस लिस्ट में से आप किसी भी रजिस्टर्ड वेंडर से अपने एड्रेस पर सोलर प्लांट इंस्टॉल करवा सकते हैं. आप उस वेंडर से डायरेक्ट कॉल कर सकते हे ईमेल कर सकते हे या फिर कांटेक्ट मी पर क्लिक करेंगे तो ये वेंडर डायरेक्ट आपको  कांटेक्ट कर लेगा इसके बाद ये वेंडर आपकी लोकेशन पर आएगा एक एग्रीमेंट आप दोनों के बीच में साइन होगा और जितने किलोवाट का आप सोलर प्लांट लगवा रहे हैं यह आपकी लोकेशन पर इंस्टॉल कर देगा. सोलर प्लांट इंस्टॉल करवाने में जितना भी खर्चा आएगा व आप इस वेंडर को अपने पास से पे करेंगे और सरकार की तरफ से जो सब्सिडी आएगी वो सीधे आपके बैंक अकाउंट में क्रेडिट होगी. जैसे ही आपका सोलर प्लांट इंस्टॉल हो जाएगा तो आपको इंस्टॉलेशन डिटेल्स साईट पर सबमिट करनी होगी. इसके लिए आप यहां सबमिट इंस्टॉलेशन डिटेल्स पर क्लिक करें.

pm suryaghar submit installation report

 इसमें आप वेंडर चूज करेंगे किस वेंडर से आपने सोलर प्लांट इंस्टॉल करवाया है इसके बाद आपके और वेंडर के बीच में जो एग्रीमेंट हुआ था उसको आप स्कैन कर लेंगे और इस एग्रीमेंट को आप पीडीएफ फॉर्मेट में अपलोड करेंगे मैक्सिमम फाइल साइज 500 kb तक हो सकता है फाइल को सेलेक्ट करें इसके बाद सेव एंड नेक्स्ट इसके बाद आपको मॉड्यूल डिटेल्स फिल करनी होगी तो इसमें आप सोलर कनेक्शन टाइप चूज करें सिंगल फेस है या थ्री फेस नीचे सोलर इन्वर्टर डिटेल्स फिल करें इसके बाद सोलर पीवी मॉड्यूल डिटेल्स फिल करेंगे अगर आपको ये डिटेल्स नहीं पता है तो आपका वेंडर आपको बता देगा आप  फिल करें इसके बाद सेव एंड नेक्स्ट इसके बाद आपको सोलर प्लांट की फोटोज अपलोड करनी होगी किस तरह की फोटोस आपको अपलोड करनी है वो आप तीन फोटोज आपको क्लिक करने हैं एक तो आप सोलर प्लांट के पास में खड़े होकर फोटो क्लिक कराएंगे दूसरे आप सोलर प्लांट के पास खड़े होंगे और साथ ही आपके पास एक पेपर होना चाहिए जिस पर आपका नेम और एड्रेस होगा और तीसरा फोटो आपको सोलर प्लांट के पास में क्लिक कराना है फोटो को सेलेक्ट करेंगे और अपलोड पर क्लिक कर दें तो फोटो यहां पर अपलोड हो जाएगी अगर आपको कोई और डॉक्यूमेंट भी अपलोड करना है तो उस डॉक्यूमेंट का नेम यहां पर एंटर करें  फाइल सेलेक्ट करें अपलोड कर दें इसके बाद सेव एंड नेक्स्ट इसके बाद आपके सामने प्रोटेक्शन चेक लिस्ट आजाएगी जो आपके यहां पर इंस्टॉल हुआ है उसको आप यस करें और जो इंस्टॉल नहीं हुआ है उसको आप नो करें तो जैसे यहां पर यह सब इंस्टॉल हो गया है मैं इन सब को यहां पर यस कर दे  इसके बाद.

pm suryaghar final submission









Thursday, March 28, 2024

पीएम विश्वकर्मा योजना: टूल किट ई वाउचर

 पीएम विश्वकर्मा योजना: टूल किट ई वाउचर


पीएम विश्वकर्मा योजना: टूल किट ई वाउचर प्राप्त करना

नमस्कार दोस्तों अगर आपने भी पीएम विश्वकर्मा योजना के तहत आवेदन किया है और

आपके ग्राम प्रधान या पार्षद ने आपके आवेदन को स्वीकृत कर दिया सत्यापन कर दिया

तो आपको कुछ इस तरह से मैसेज मिलेगा


प्रिय लाभार्थी बधाई हो अब आप 000 का टूल किट ईवाउचर प्राप्त करने के पात्र हैं उसमें

आपको टूल किट का विकल्प मिलेगा जिसे आप चुन करके जो भी टूल किट आप लेना चाहते हैं

उसे आपको पीएम विश्वकर्मा की वेबसाइट पर लॉग इन करके उस टूल किट के वाउचर को

सेलेक्ट करके आपके रजिस्टर्ड मोबाइल में आप प्राप्त कर सकते हैं.


तो इसके लिए सबसे पहले आपको पीएम विश्कर्मा वेबसाइट पे जाना

है यहां पर एप्लीकेंट/बेनिफिसरी लॉगइन पे जाना है लॉगिन करने के बाद आवेदन

करते समय जो आपका मोबाइल नंबर था जो आपके आधार से रजिस्टर मोबाइल नंबर है वह मोबाइल

नंबर आपको डालना है आपके मोबाइल नंबर पे ओटीपी रिसीवड हो जाएगी यह बार-बार एरर

देता है इसलिए आपको ओटीपी को बहुत ही जल्दी सेकंड में इसको एंटर करना होगा तभी

आप यहां पर फिलहाल लॉगइन कर पाएंगे तो जैसे ही आपका यह मोबाइल पे ओटी ी रिसीव

होता है आप तुरंत उसे यहां एंटर करके और एंटर बटन प्रेस कर देंगे जिसके बाद आप इस

पोर्टल पे आसानी से लॉगइन कर पाएंगे अगर आप इसके जो ओटीपी है उसको डालने में लेट

करते हैं तो यह बार-बार ओटीपी एरर शो करता है तो यहां पर जैसे ही हमने इस पे ओटीपी

को एंटर किया देन हमें कंटिन्यू बटन पे क्लिक करना है तो जो भी हमारा आवेदन है

उसका यहां पर नाम दिख जाएगा कुछ इस तरह से दिखेगा अप्रूवल के बाद कुछ इस तरह से यहां

आप पीएम विश्वकर्मा का सर्टिफिकेट आईडी कार्ड और अपने एप्लीकेशन के पीडीएफ

फॉर्मेट को भी डाउनलोड कर सकते हैं अब यहां पर आप ऊपर की ओर देखेंगे चूज फ्री

राशि 15000 टूल किट ई वाउचर यहां पर आपको क्लिक करना है उसके बाद आपने जो भी यहां

पर व्यवसाय जो 18 व्यवसाय थे जिसे आपने आवेदन भरते समय चूज किया था जैसे कि टेलर

है बूटमेकर है ब्लैकस्मिथ है पोर्टर है मेशन है राज मिस्त्री तो यहां पर आपको दिख

जाएंगे जैसे आवेदन टेलर के लिए था तो यहां टेलर से संबंधित जो टूल किट है उससे

रिलेटेड जो इंस्ट्रूमेंट है आपको दिखाई देते हैं यहां स्विंग मशीन है रिपर है

बोबिन है ट्रेसिंग व्हील है ट्रेलर का चक है सेफ्टी पिन मेजरिंग टेप टूल किट बैग या

स्टेशनरी इसी तरह सेट बी है बूटीक का तो यह जो भी इंस्ट्रूमेंट है जो भी सेट आप इस

पर लेना चाहते हैं तो नीचे ऑप्शन दिया है सेलेक्ट ऑप्शन ए सेलेक्ट ऑप्शन टू तो यहां

से आपको सेलेक्ट करना है आप देख सकते हैं एलिजिबल फॉर फ्री टूल किट वर्थ राशि 15000

यू विल रिसीव ई वाउचर ऑफ 50000 ऑन योर रजिस्टर्ड मोबाइल नंबर तो यहां पर आपके

रजिस्टर मोबाइल पे वो वाउचर भेज दिया जाता है तो यहां से आप सेलेक्ट ऑप्शन वन अगर

आपको पसंद है तो यह आप चूज कर लेंगे और नीचे आप देखेंगे तो सबमिट रिसेट और बैक का

बटन दिया है आप रिसेट कर सकते हैं और अगर आप सबमिट करना चाहते हैं तो चूज करने के

बाद आप यहां सबमिट करेंगे तो आपको एक कंफर्मेशन मैसेज यहां पर मिल जाएगा यू हैव

सक्सेसफुली सूजन योर प्रेफर्ड टूल किट यू विल शॉर्टली रिसीव एन ई वाउचर व रासी

15000 ऑन योर रजिस्टर्ड मोबाइल नंबर उस ई वाउचर की वैलिडिटी सिक्स मंथ तक है और जो

हमारी चूज की गई टूल किट है वो हमारे रजिस्टर्ड एड्रेस पे पहुंच

Wednesday, March 27, 2024

मानवत शहरातील नागरिकांना मुलभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठि भाडेवाढ आवश्यक - मुख्याधिकारी कोमल सावरे

मानवत शहरातील नागरिकांना मुलभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठि भाडेवाढ आवश्यक - मुख्याधिकारी कोमल सावरे
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत नगर परिषदेने, नगर परिषदेच्या जागेवर मेनरोड व मार्केट या ठिकाणी व्यावसायीकांकरीता विविध योजने अंतर्गत नगर परिषदेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने साल सन १९८३-८४ पासुन टप्याटप्याने शॉपींग सेंटरचे बांधकाम हाती घेवुन आज मित्तीस एकूण ८७ गाळे हे व्यवसाय धारकांना किरायावर दिलेले आहे यात भाडेवाढ नगरपरिषद च्या वतीने करण्यात आली आहे.
नगर परिषद मानवत अंतर्गत शासनाने नगर परिषदेला ठरवुन दिलेल्या नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ करणे बंधनकारक केलेले आहे. त्यामध्ये शासनाकडुन मंजूर होणारे अनुदानात व पंधरावा वित्त आयोग यांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे व शहरात मुलभुत सोय सुविधा पुरविणे च्या दृष्टीकोणातुन भाडे वाढ करणे अत्यंत गरजेचे होते. शहरातील वाढती लोकसंख्या व वस्त्यांचा विचार करता मानवत नगर परिषदेवर स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर अनुषंगीक बाबी पुरविणे गरजेचे आहे. परंतू उत्पन्नाचा स्त्रोत पहाता या सर्व बाबीचा नगर परिषदेवर आर्थिक ताण वाढत आहे. तसेच शासनाने वारंवार दिलेल्या सुचनेचे पालन करणेसाठी नगर परिषदेने शहरात मालमत्ता कर रिव्हीजन चे काम हाती घेतलेले आहे. सदरील काम सध्या पूर्णत्वाकडे आहे. त्यामध्ये शहरातील व्यापा-यांसाठी गाळेधारक व जमिन किरायाधारक यांना मुबलक व त्यांचावर बोजा होणार नाही या दृष्टीकोणातुन नगर परिषदेने नगर रचना व मुल्य निर्धारण विभाग यांनी नेमुन दिलेल्या भाडेवाढ करणेच्या नियमाप्रमाणे प्रति वर्षी भाडे वाढ करणे गरजेचे आहे. त्यानुसार यापुर्वी नगर परिषदेने यापुर्वी निश्चित केलेली शॉपींग किराया व जमिन किराया मध्ये वाढ करणेसाठी शहरातील इतर बाजारपेठेतील दुकानांचा किराया लक्षात घेता कोणत्याही व्यापा-यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेवुन सदरील किराया वाढ निश्चित केलेली आहे. ज्यामध्ये शासनाने ठरवुन दिलेल्या करयोग्य मुल्य दरापेक्षा कमी प्रमाणात भाडेवाढ केलेली आहे.
नगर परिषदेने शॉपींग सेंटर व जमिन किराया मध्ये केलेल्या भाडेवाढीमुळे नगर परिषदेच्या काही प्रमाणात उत्त्पन्नात वाढ होत असल्याकारणाने स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, मुलभुत सोय सुविधा पुरविणे व इतर अनुषंगीक बाबी पूर्ण करणे सुलभ होईल असे प्रसिद्धी पञिकेद्वारे मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी जनतेस कळविले आहे.



Tuesday, March 26, 2024

मानवत येथील फैजान बागवान व सुमेर बागवान याचां पहिला रोजा पुर्ण मानवत / मुस्तखीम बेलदार


मानवत येथील फैजान बागवान व सुमेर बागवान याचां पहिला रोजा पुर्ण

मानवत  / मुस्तखीम बेलदार 

मानवत शहरातील समाजसेवक खय्युम  बागवान  सहारा यांचा मुलगा फैजान बागवान व पुतण्या सुमेर बागवान  याने  आपल्या आयुष्यातील पहीला रोजा (उपवास) दि.२४ मार्च  २०२४ रविवार रोजी पुर्ण केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून त्यात उन्हामुळे तीव्रतेमुळे चांगलाच कस लागला आहे परंतु इस्लाम धर्माचा पाच कर्तव्य मधील उपवास रोजा हा एक प्रमुख कर्तव्य मानला जातो त्यामुळे उष्णतेचा तीव्रतेतहि मुस्लीम बांधव उपवास रोजा ठेवतात यात लहान मुलेही आपल्या आयुष्यांचा पहिला रोजा ठेवतात आपल्या वयाच्या अवघ्या सातव्या  वर्षी फैजान बागवान व सुमेर बागवान यांनी आपला जीवनातला पहिला रोजा ठेवला जवळपास उपवास हा १४ तासाचा असून उपवासात पाणी पिणे सुद्धा जमत नसते सध्या उन्हाचा पारा चढला असुन मोठ्या माणसाला पाण्याची तहान लागत आहे परंतु फैजान बागवान व सुमेर बागवान या भावडांनी 
उपवास ठेवल्यामुळे त्यांचे आई, वडील खय्युम बागवान सहारा, समाजसेवक हाफिज लतीफ , जुबेर भाई , इलियास पठान, इरशाद बागवान याच्यांसह 
 परिसरातील नागरीक या चिमुकल्यांचे कौतुक करुन शुभेच्छा देत आहे.



Tuesday, March 19, 2024

नारेगाव येथील आमेना साजेद शेख हिचा पहिला रोजा पुर्ण


नारेगाव  येथील आमेना साजेद शेख हिचा पहिला रोजा पुर्ण

नारेगाव   / प्रतिनीधी 


बिस्मिल्ला काँलनी नारेगाव छञपती संभाजी नगर औरंगाबाद येथील  रहिवासी समाजसेवक   हाजी शेख जाफर  यांची नातु आमेना साजेद शेख हिने  आपल्या आयुष्यातील पहीला रोजा (उपवास) दि.१७ मार्च  २०२४ रविवार रोजी पुर्ण केल्या बद्दल त्यांचे खुप अभिनंदन होत आहे.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून त्यात उन्हामुळे तीव्रतेमुळे चांगलाच कस लागला आहे परंतु इस्लाम धर्मियांचा  पाच कर्तव्य मधील उपवास रोजा हा एक प्रमुख कर्तव्य मानला जातो त्यामुळे उष्णतेचा तीव्रतेतहि  उपवास रोजा ठेवतात यात लहान मुलेही आपल्या आयुष्यांचा पहिला रोजा ठेवतात आपल्या वयाचा अवघ्या आठव्या  वर्षी आमेना साजेद शेख यांनी आपला जीवनातला पहिला रोजा ठेवला जवळपास उपवास हा १४ तासाचा असून उपवासात पाणी पिणे सुद्धा जमत नसते सध्या उन्हाचा पारा चढला असुन मोठ्या माणसाला पाण्याची तहान लागत आहे परंतु आमेना साजेद शेख यांनी कडकडत्या ऊन्हात उपवास ठेवल्यामुळे त्यांचे आजी ,अजोबा हाजी शेख जाफर ,आई,वडील साजिद शेख , चुलते वाजेद शेख ,मामा शेख तारेख  ,असलम शेख, वसीम शेख ,जुनेद शेख, जबीन शेख ,आरेफ राज, सय्यद अरबाज ,मुस्तखीम  बेलदार ,शेख चांद ,कुणाल देशमुख सर, सिकंदर शेख, राजेश भराडे सर , इरफान शेख, रईस बेग, सुजाता धुमाल मॅडम ,मीना देवकर मॅडम ,
राजेश बिऱ्हाडे ,गुड्डु भाई,गौतम बोबडे,दिपक गवाले,अमोल खिल्लारे ,सलीम भाई,मुजीब राज ,दानीश राज यांच्यासह बिस्मिल्ला काँलनी  परिसरातील नागरीकांनी  आमेना शेख या चिमुकलीचे कौतुक करुन भरभरून  शुभेच्छा दिल्या आहे.




Wednesday, March 13, 2024

पैठण येथील शेख सदफ हिचा पहिला रोजा पुर्ण

पैठण येथील शेख सदफ  हिचा पहिला रोजा पुर्ण

पैठण  / प्रतिनीधी 


पैठण येथील सादात मोहल्ला दर्गारोड  परिसरातील रहिवासी शेख चाँद राज यांची नातु शेख सदफ शेख तारेख हिने  आपल्या आयुष्यातील पहीला रोजा (उपवास) दि.१२मार्च  २०२४ मंगळवार रोजी पुर्ण केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून त्यात उन्हामुळे तीव्रतेमुळे चांगलाच कस लागला आहे परंतु इस्लाम धर्माचा पाच कर्तव्य मधील उपवास रोजा हा एक प्रमुख कर्तव्य मानला जातो त्यामुळे उष्णतेचा तीव्रतेतहि  उपवास रोजा ठेवतात यात लहान मुलेही आपल्या आयुष्यांचा पहिला रोजा ठेवतात आपल्या वयाचा अवघ्या आठव्या  वर्षी शेख सदफ शेख तारेख यांनी आपला जीवनातला पहिला रोजा ठेवला जवळपास उपवास हा १४ तासाचा असून उपवासात पाणी पिणे सुद्धा जमत नसते सध्या उन्हाचा पारा चढला असुन मोठ्या माणसाला पाण्याची तहान लागत आहे परंतु शेख सदफ शेख तारेख यांनी उपवास ठेवल्यामुळे त्यांचे वडील शेख तारेख , आजोबा शेख चाँद राज ,आजी ,आई,यांच्यासह खडक पुरा परिसरातील नागरीक या चिमुकल्यांचे कौतुक करुत शुभेच्छा देत आहे.

Monday, February 26, 2024

जलशुद्धीकरण परिसर मधील महादेव मंदिराचा जीर्णोद्वार कार्यक्रमाचा युवानेते डॉ.अंकुश लाड याच्यां हस्ते श्री गणेशा

 जलशुद्धीकरण परिसर मधील महादेव मंदिराचा जीर्णोद्वार कार्यक्रमाचा युवानेते डॉ.अंकुश लाड  याच्यां हस्ते श्री गणेशा

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत शहरातील जलशुद्धीकरण  प्रकल्प अंतर्गत  असलेल्या परिसरात  महादेव मंदिराचा  जीर्णोद्धार व्हावा व त्या ठिकाणी सुंदर असे महादेवाचे मंदिर आणि सभागृह असावे अशी परिसरात राहणाऱ्या नागरिकांची विशेष करून महिलांची मागणी होती या मागणीचा विचार करून युवा नेते डॉ. अंकुश लाड यांनी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जलशुद्धीकरण  प्रकल्पात असलेल्या महादेव मंदिराच्या कामाचा श्री गणेशा केला.

मानवत शहरात पाथरी रोडवर असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत परिसरात गेल्या ३० ते ४० वर्षापासून महादेवाची मूर्ती त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी प्रतिष्ठापना करून ठेवलेली आहे.  या मूर्तीला परिसरातील नागरिक व विशेष करून महिला पूजन करण्यासाठी नित्यनियमाने जातात.  त्या ठिकाणची स्वच्छता मंदिराचे पावित्र्य जपण्याचे काम परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी व महिलांनी केले आहे.  याचमुळे या ठिकाणच्या मंदिराला परिसरातील नागरिकांची विशेष अशी नाळ जोडलेली आहे.  यातूनच त्या ठिकाणी चांगले मंदिर बांधून समाज मंदिर बांधावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांची व महिलांची होती.  त्यांनी डॉ. अंकुश लाड यांच्याकडे आपण सर्व गावातील मंदिरे व समाज मंदिर फार मोठ्या प्रमाणात बांधली आहेत जीर्णोद्वार केला आहे.  त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत  असलेल्या परिसरातील महादेवाच्या मूर्तीला छान असे मंदिर बांधून त्या ठिकाणी देखील सभागृह बांधावे या मागणीचा रेटा लावला होता.  या मागणीचा विचार करून २६ फेब्रुवारी  रोजी अखेर या कामाचा श्री गणेशा करण्यात आला यावेळी परिसरातील महिलांसह फार मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.  केवळ मंदिराचा जिर्णोद्वारच नव्हे तर जलशुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत परिसरातील रस्ते , सुशोभीकरण , सभाग्रह व मंदिर या सर्व कामाचा आढावा घेत ही सर्व कामे पूर्णत्वास नेण्याचा मानस यावेळी डॉ. अंकुश लाड यांनी व्यक्त केला.या वेळी डॉ अंकुश लाड यांनी  रुद्र देवाचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. परिसरातील रस्ता, या ठिकाणचे सभागृह तसेच इतर कामांचे भूमिपूजनही याप्रसंगी केले. या कार्यक्रमास परिसरातील  अ‍ॅड. कांचन राठोड, धिरज राठोड, दिगंबर रोकडे, मदन रोकडे, विजय राठोड़, सुनिल दलाल, हणमंतराव ब्रम्हपूरकर, योगेश राठोड, अमित आहेर, बाळू गायकवाड, रवी कच्छवे , सुरज भाकरे, हर्षद खरात,भोला  यादव, पवन सेलूकर, बाळू गायकवाड, गणेश बाराहाते, शर्माजी यांची उपस्थिती होती. या कामाच्या शुभारंभाने   परिसरातील नागरिक व महिलांनी डॉ अंकुश लाड यांचे  विशेष असे आभार मानले.

Sunday, February 18, 2024

ताडबोरगाव येथील शिक्षक अब्दुल माजेद यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

ताडबोरगाव येथील शिक्षक अब्दुल माजेद यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  प्रदान
मानवत /मुस्तखीम बेलदार 
परभणी आज तक एवं आझादभूमी वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अब्दुल माजेद यांना देण्यात आला परभणी येथील फातिमा फंक्शन  हॉल काद्राबाद येथे १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेले परभणी आज तक एवं  व आझादभूमी वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराच्या आयोजन करण्यात आले होते .
ताडबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अब्दुल माजेद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण निवृत्त उपसंचालक आर एस मोगल, आयोजक  महेमूद खान,मोईन खान यांच्या हस्ते देण्यात  आले.
 या वेळी ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे  मुख्याध्यापक जमील रंगरेज ,शिक्षक जुनेद खान,मोहम्मद कलीम, शेख जुनेद ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य व गावकऱ्यांचे वतीने अब्दुल माजेद यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आले.

मानवत शिवसेना शहरप्रमुख पदी अनिल जाधव यांची निवड

मानवत शिवसेना शहरप्रमुख पदी अनिल जाधव यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
   मानवत शिवसेना शहरप्रमुख पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी निष्टावंत व शिवसेना उपनेते खा.संजय जाधव यांचे अत्यंत विश्वासू असलेले आनिल जाधव यांची पुन्हा एकदा शिवसेना शहरप्रमुख पदी निवड झाली असून. या पूर्वी १९ फेब्रुवारी ११ रोजी शहरप्रमुख पदी नियुक्ती झाली होती. दरम्यान त्यांच्या एका वर्षाच्या शहरप्रमुखाच्या कार्यकाळात त्यांनी पक्षासाठी उल्लेखनीय असे अनेक कार्य केले. त्यामध्ये त्यांनी आंदोलन, मोर्चे, रस्ता रोक, उपोषणे, रक्दान शिबीरे, पाणपोई तसेच कोरोना काळात कोविड मदत केंन्द्राद्वारे अनेक रूग्नांना रूग्णवाहीका व बेड उपलब्ध करुन दिले,फळे,काढा ईत्यादिंचे वाटप केले त्यांनी अनेक समाजहिताची कार्ये पार पाडली. सततची पक्षावर असणारी निष्ठा व कार्य तसेच अनिल जाधव यांचा मानवत शहर व मानवत तालुका दांडगा संपर्क असल्या कारणाने
   अनिल जाधव यांची शिवसेना शहरप्रमुख पदी निवड झाली  शिवसेना उपनेते खा.संजय जाधव,आ.राहुल पाटिल, माजी आमदार सौ.मिराताई रेंगे पाटील , परभणी जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. प्रा.पंढरीनाथ धोंडगे ,जिल्हा प्रमुख विशाल कदम,जिल्हा प्रमुख संजय साडेगावकर,जिल्हा प्रमुख सुरेश ढगे,महिला आघाडी सखुबाई लटपटे यांच्यांसह  सर्वच स्तरातून अनील जाधव यांचे अभिनंदन  होत आहे.

Thursday, February 8, 2024

आमदार सुरेशरावजी वरपुडकर याच्यां हस्ते मानवत येथे विविध विकासकामाचे दि.१२ फेब्रुवारी रोजी शुभारंभ

आमदार सुरेशरावजी वरपुडकर याच्यां हस्ते मानवत येथे विविध विकासकामाचे दि.१२ फेब्रुवारी रोजी शुभारंभ 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
पाथरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार  सुरेशरावजी वरपुडकर यांच्या प्रयत्नाने ग्रामीण रूग्णालय, मानवत येथील रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा प्राप्त झाल्या बद्दल नवीन ५० खाटांचा उपजिल्हा रूग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम रक्कम ४८ कोटी रूपये तसेच मानवत बस स्टैंड ते पाळोदी गावाकडे जाणारा सिमेंट रस्ता १४ मीटर रूंदी, लांबी १२५० मीटर डिवायडरसह पुढील पाळोदीकडे जाणारा डांबरी रस्ता ५.३० मी, रूंदीचा तसेच मानवत कडुन मानोलीकडे जाणारा सिमेंट रस्ता १२५० मी. लांबी व ७ मीटर रूंदीसह एकुण रस्त्याची किंमत ३७.५० कोटी मानवत शहरातील पथदिवे मुख्य बाजार पेठेतील हायमास्क किंमत रू.७ कोटी या विविध कामाचा भव्य शुभारंभ दि. १२-०२-२०२४ सोमवार रोजी सकाळी ११.०० वाजता ग्रामीण रूग्णालय मानवत येथे आयोजीत करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.आ.श्री. सुरेशरावजी वरपुडकर साहेब आमदार पाथरी विधानसभा मतदार संघ
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  मा.खा.डॉ. फौजीया खान मॅडम खासदार राज्यसभा
,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  मा. श्री. बालकिशन चांडक मा. नगराध्यक्ष मानवत
, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. खा. श्री. संजय उर्फ बंडु जाधव साहेब खासदार परभणी लोकसभा मतदार संघ ह्या मान्यवरांच्या हस्ते ९२.५० कोटीच्या विकास कामाचा भव्य शुभारंभ समारंभ कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणुन 
मा. सतीशराव बारहाते (मा. नगराध्यक्ष न.प. मानवत) ,मा. अमृतराव भदर्गे (मा. नगराध्यक्ष न.प. मानवत),मा. दिपक बारहाते (युवासेना जिल्हा प्रमुख),मा. डॉ. संतोष खडसे (मा. उपाध्यक्ष न.प.मानवत)
,मा. बाबुराव नागेश्वर (जि.प.सदस्य)
,मा. सिमा शिवनारायण सारडा (मा. नगरसेवीका न.प.मानवत),मा. संजुशेठ बांगड,मा. पंडितराव चौखट (मा. अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती),मा. महेश कोक्कर (मा. नगराध्यक्ष न.प. मानवत),मा. दत्ता रोडे (मा. नगराध्यक्ष न.प. मानवत),मा. प्रकाश पोरवाल (मा. उपाध्यक्ष न.प.मानवत)
,मा. सिदेश्वर लाडाणे (मा. तालुका अध्यक्ष काँग्रेस),मा. मारोती बोलेवार
,मा. युनुसशेठ बागबान (मिलनवाले)
,मा. विजयकुमार दलाल मा. डॉ. तोष्णीवाल
,मा. डॉ. निनाद दगडु मा. प्रमोद बारटक्के, मा. दिनेश देसाई,मा. दतुसेठ बांगड
मा. डॉ. दिलीप जाधव,मा. दिलीपराव हिबारे
मा. प्रा. रामचंद्र भिसे सर, मा. आसारामजी निर्वळ, मा. चंद्रकांत नाना सुरवसे, माणिकराव काळे, प्रदिप कदम, आकशभैय्या चौखट, विशाल यादव, अँड. संतोष लाडाने, कृष्णा शिंदे, गोपाळ सुरवसे, लिंबाजी कचरे पाटील, मुकूंद मगर, दत्तराव पाते, संतोष जाधव, मदनराव कदम, माऊली शिंदे, बंडु नाना मुळे, पांडुरंग तात्या मुळे, कल्याण देशमुख, सुधाकरराव मगर, आन्नासाहेब मगर, उध्दवराव भिसे, गोपाळराव भिसे, सुभाष गुलाबराव देशमुख, सुभाषराव देशमुख, भास्करराव खरावे, भारत इक्कर, रवि निर्वळ, परमेश्वर करडीले, एकनाथराव करडीले, किरण देशमुख, माऊली काजळे, केशवराव देशमुख, राजेश घनघाव, अँड. गणेश धोपटे, माणिकराव आवचार चेतक, उध्दवराव आवचार, केशवराव आवचार, तौफिक खा. पठाण, पिंटु जाधव, आसाराम काळे, परमेश्वर मस्के, रोजेश पुरी, बाबासाहेब सोनटक्के, परभाकरराव होगे, संद्यपाल ठेंगे, भारत उक्कलकर, अशोक उक्कलकर, सर्जेराव धोपटे, श्रीधर धोपटे, प्रदिपराव कदम, रामप्रसाद होंडे, भगिरथ कदम, बालासाहेब भोरकडे, रामप्रसाद शेळके, सुधाकर जाधव, राजाभाऊ शिंदे, प्रताप किसनराव यादव, नरसिंग जोरवर, नंदकुमार जौधरी, गणेश हारगुडे, लिंबाजीराव काळे, भगवानराव काळे, विष्णुपंत शिंदे, पांडुरंग चव्हाण, मनोज चव्हाण, सुरेश चव्हाण, उध्दवराव घाटुळ, रामचंद्र गायकवाड, माणिक सोनेकर आदी उपस्थीत राहणार आहे.
या भव्य शुभारंभ समारंभ कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहान बाळासाहेब फुलारी (जि. सरचिटणीस काँग्रेस),शाम चव्हाण (मानवत शहराध्यक्ष काँग्रेस) ,मा.नगरसेवक अ.रहीम अ. करीम ,गोपाल गौड,बालाजी गोलाईतं,मा.नगराध्यक्ष अकबर अन्सारी,डॉ.लहू सोळंके,अँड. विक्रम दहे,ऋषीकेश बारहाते
पवन बारहाते,बालासाहेब भांगे,भागीरथ आवचार, युवानेते वसीम कुरेशी,आसाराम काळे,श्रीराम जाधव,प्रा. तुकाराम साठे सर (जि. अध्यक्ष ओबीसी विभाग, परभणी)
,मा. बाबासाहेब अवचार (मानवत ता. अध्यक्ष काँग्रेस),मा.नगरसेवक सय्यद जमील स.मसुद,सर्जेराव देशमुख,मा.नगरसेवक आनंदमामा भदर्ग,गणेश दहे,अँड. लुखमान बागवान,शैलेश वडमारे,खय्युम बागवान
सचिन पौळ,मुंजाभाऊ भिसे,उध्दव रामपुरीकर याच्यांसह शहर व तालुका काँग्रेस कमिटी मानवत याच्यांवतीने करण्यात आले आहे.

Wednesday, February 7, 2024

मानवत येथील डॉ. हमीद खान यांची अशी हि समाजसेवा

मानवत येथील डॉ. हमीद खान यांची अशी हि समाजसेवा
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत येथील ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी डॉ नरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय येथे खूप चांगल्या प्रकारे गोरगरीब गरजू रुग्णांवर उपचार होत आहे त्याचाच एक उदाहरण म्हणून मानवत शहरातील एक मतिमंद व्यक्ती ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आला होता त्याचे कपडे अगदी मळकट होते त्यांनी खूप दिवसापासून आंघोळही केली नव्हती अक्षरशा त्याची दाढी कठीण खूप वाढली होती ही बाब ग्रामीण रुग्णालय येथे कार्य करत असलेले डॉ. हमीद खान यांना लक्षात आली व डॉ हमीद खान, दवाखान्यातील आरोग्यकर्मचारी  यांनी त्यांना चांगल्या प्रकारे आंघोळ घातली दाढी कटिंग केली डॉ. हमीद खान यांनी स्वखर्चातून त्यांस कपडे हि घेऊन दिले  त्याच्यावर चांगल्या प्रकारे उपचार केले. याचा एक व्हिडिओ समाज माध्यम वर खूप वायरल होत आहे सर्व स्तरातून मानवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरेंद्र वर्मा व दवाखान्यातील सर्व डॉक्टर आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका , कर्मचारी यांचा सर्व स्तरातून मानवतकर कौतुक करत आहे.डॉ. हमीद खान हे अशाच प्रकारे गोरगरीब गरजु रुग्णांना स्वखर्चाने  मदत करतात अशा समाजसेवी डॉक्टरांना रुग्णालयात कायमस्वरुपी टिकविण्याची मागणी नागरीकांतुन होत आहे.

Monday, January 29, 2024

ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जमील रंगरेज यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जमील रंगरेज यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान 

मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जमील रंगरेज यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व झैन फाउंडेशन परभणी द्वारा आयोजित केलेले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दि.२८ जानेवारी रविवार रोजी परभणी येथे खासदार डॉ.फौजिया खान, गौस झैन,  शिक्षणअधिकारी संजय ससाने यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले या निमित्त शिक्षक जमील रंगरेज याचां  ताडबोरगाव येथील  सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य  सर्व शिक्षक व गावकरी मंडळी यांच्या वतीने जमील रंगरेज यांचे स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

Sunday, January 28, 2024

राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित महामेळाव्यास उपस्थीत राहण्याचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांचे आवाहान

संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ व राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित महामेळाव्यास उपस्थीत राहण्याचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांचे आवाहान

मानवत / मुस्तखीम बेलदार 

 राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष 
समाज भूषण सहादू ठोंबरे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभानिमित्त संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ व राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित महामेळाव्याचे भव्य आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ परभणी च्या वतीने ३१ जानेवारी रोजी जागृती मंगल कार्यालय वसमत रोड परभणी येथे  करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.भानुदास विसावे राष्ट्रीय कार्याध्यक्ष चर्मकार महासंघ
तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन 
मा. रघुनाथ गावडे ( भा.प्र.से. )
जिल्हाधिकारी  परभणी ,
मा.ज्ञानेश्वर कांबळे 
राष्ट्रीय नेते चर्मकार महासंघ ,
मा.अशोकरावजी माने,
चेअरमन देशभक्त रत्नाप्पा कुंभार सूतगिरणी कोल्हापूर तर
प्रमुख पाहुणे म्हणुन 
मा.डॉ. राहुल पाटील
विधानसभा सदस्य परभणी हे उपस्थीत राहणार आहे तसेच 
विशेष उपस्थिती मा.माधवराव गायकवाड
प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय चर्मकार महासंघ ,प्रा. डॉ. शशिकांत सोनवणे
राष्ट्रीय नेते चर्मकार महासंघ ,मा. संभाजी वाघमारे संपर्कप्रमुख विदर्भ विभाग राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रा. डॉ. गोपाल बच्छिरे
राष्ट्रीय प्रवक्ते राष्ट्रीय चर्मकार महासंघ
मा. गजानन भटकर
कार्याध्यक्ष विदर्भ विभाग राष्ट्रीय चर्मकार महासंघ उपस्थीत राहणार आहे 
प्रमुख मार्गदर्शक म्हणुन 
सौ संगीता पराते विभागीय व्यवस्थापक. लीडकॉम ,मा. संभाजी एस पोवार
 सी. ए. कोल्हापुर हे उपस्थीत राहणार.
 या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये समाज भुषण सहादु ठोंबरे यांच्यां सेवापुर्ति निमित्त त्यांचा  सत्कार करुन समाजातील होतकरू युवक युवती यांना उद्योग व्यवसायाची माहिती व तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व विकास महामंडळ महिला सक्षमीकरण या आवश्यक बाबीची पूर्तता करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याची सर्व माहिती या मान्यवरांच्या मार्फत दिली जाणार आहे
 तरी या संधीचा चर्मकार समाजातील सर्व बंधू भगिनींनी लाभ घ्यावा आणि उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करावे असे
 आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघांचे परभणी  जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या वतीने करण्यात आले आहे

Thursday, January 25, 2024

सर्वेक्षणाच्या कॉलम मध्ये बौध्द उल्लेख करण्याची मानवत येथील बौध्द समाज बांधवाची मागणी

सर्वेक्षणाच्या कॉलम मध्ये बौध्द असा उल्लेख करण्याची मानवत येथील बौध्द समाज बांधवाची मागणी
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी पासुन महाराष्ट्र शासनाच्या वतीने  सुरु असुन या सर्वेक्षणामध्ये बौध्द जातीचा उल्लेख येत नसल्यामुळे हा सर्वे  बौध्दांवर अन्याय करणारा आहे सदरील आदेश रद्द करुन सुधारीत आदेश काढण्यात यावा या मागणीचे निवेदन दि.२५ जानेवारी रोजी मानवत शहरातील बौध्द समाज बांधवाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसिलदार रंजित सिंह कोळेकर यांच्यां मार्फत पाठविण्यात आले आहे.
निवेदनात नमुद केले आहे की,मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्रात दिनांक २३ जानेवारी पासून सुरु झाले असून सदरील प्रगणक यांच्या मोबाईल अँपमध्ये हिंन्दु महार असा जातीचा कॉलम येत असून सदरील कॉलम हा चुकीचा व बौध्दांवर अन्याय करणारा आहे. तसेच  दिनांक २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग आयोगाने अनुसुचीत जातीच्या कॉलम मध्ये नवबौध्दांचा व बौध्दांचा धर्मातरापुर्वीची जातीची नोंद करावी असे आदेश दिले आहेत हा आदेश आमच्यावर अन्याय करणारा आहे करीता सदरील आदेश रद्द करुन सुधारीत आदेश काढण्यात यावे असे न झाल्यास आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलने करावी लागतील याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील  मराठा आरक्षणच्या सर्वेक्षणाच्या कॉलम मध्ये बौध्द असा उल्लेख करण्यास वरिष्ठांना कळवावे असे निवेदनात  नमुद केले आहे.
निवेदनावर आनंद मामा भदर्गे , जनार्दन कीर्तने , छगन भदर्गे , शैलेश वडमारे , संपत पंडित , दीपक ठेंगे, रवी पंडित , राहुल भदर्गे, राजू भैय्या खरात , सत्यशील धबडगे ,फकीरा सोनवणे  ,गौतम जमदाडे , बाबासाहेब सोनटक्के यांच्यांसह 
 बौध्द समाज बांधवाच्यां स्वाक्षरी निवेदनावर आहे.

Wednesday, January 17, 2024

मानवत शहरातील बहुप्रतीक्षित मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे उदघाटन डॉ.अंकुश लाड याच्यां हस्ते संपन्न

मानवत शहरातील बहुप्रतीक्षित मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे उदघाटन डॉ.अंकुश लाड याच्यां हस्ते संपन्न 

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे उदघाटन युवानेते विकासपुरुष  डॉ.अंकुश लाड याच्यां शुभ हस्ते दि.१७ जानेवारी रोजी करण्यात आले. अनेक दिवसांपासूनचा प्रश्न मिटल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मानवत शहरातील शासकीय विश्रामगृह ते महाराणा प्रताप चौक हा अडीच कि. मी. लांबीचा एकमेव मुख्य रस्ता असून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण  करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. कपडा मार्केट, भाजी मार्केट असून यासह  महापुरुषांच्या जयंती मिरवणूक,गणेश मिरवणूक या मार्गाने होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला होता. त्यामुळे वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच धुळीचा त्रासही मोठ्या प्रमाणावर होत होता.नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन डॉ.अंकुश लाड यांनी तात्काळ पुढाकार घेत डांबरीकरणासाठी  निधी मंजुर करून आणला. सर्व प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रिया पार पडून बुधवार दि. १७ जानेवारी रोजी प्रत्यक्ष कामाचे उदघाटन करण्यात आले. हे काम कॅट आय  या आधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. यामुळे धूळीची समस्या भेडसावणार नाही.

या वेळी विजयकुमारजी कत्रुवार, जयकुमारजी काला, प्रकाश शेठ पोरवाल, श्रीकिशनजी सारडा, संजयजी लड्डा, अश्रोबा कुऱ्हाडे पाटील , ज्ञानेश्वर मोरे,सुरेश शेठ कडतन,गणेश मोरे पाटिल, बाबुराव हाळनोर, मुंजाभाऊ तरटे, डॉ योगेश तोडकरी, शिवाजी पाटील ,गणेश कुमावत ,राजकुमार खरात, किरण बारहाते, दत्ता चौधरी,मोहन लाड, बालाजी कुऱ्हाडे, शफिक भाई बागवान, नागनाथ कुऱ्हाडे, नगरा अभियंता सय्यद अन्वर  ,बळीराम दहे, ओम भाऊ चव्हाण,पंकज लाहोटी,विजय कीर्तनकार, बाबा कच्छवे ,योगेश जाधव ,डॉ विष्णू काकडे, सूर्यकांत कडतन, आप्पा भिसे, विठ्ठलराव पवार ,संजय नाईक , सचिन मगर याच्यांसह  शहरातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिगल सेल पदी निवड

ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिगल सेल पदी निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिगल सेल पदी    प्रदेश अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख यांच्यां हस्ते नियुक्तीपञ देऊन निवड करण्यात आली आहे.  यावेळी  प्रदेश सरचिटणीस राजेश गायकवाड उपस्थीत होते.ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिगल सेल पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत असुन शुभेच्छा मिळत आहे.

Sunday, January 14, 2024

मकरसंक्रांतला पतंग उडवताना पक्षांची काळजी घ्या पो.नि.दिपक दंतुलवार यांचे नागरिकांना आवाहन .

मकरसंक्रांतला पतंग उडवताना पक्षांची काळजी घ्या पो.नि.दिपक दंतुलवार यांचे नागरिकांना आवाहन 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मकरसंक्रांत सन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अनेक ठिकाणी शाळकरी मुलांसह युवकांमध्ये पतंग उडविण्याचे वेध सुरु होते मात्र पतंग उडवताना प्रत्येकाने आपल्या देशाची संपत्ती असेलल्या पक्षांची काळजी घ्यावी पतंग उडवतांना मांज्याचा नॉयलॉन दोराचा वापर करु नये असे आवाहन मानवत पोलीस स्टेशनचे पो.नि.दिपक दंतुलवार यांनी केले आहे.

मकरसंक्रात हा प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला येणारा महत्वाचा सण या सणामध्ये महिला वाण वाटत ऐकामेकांना शुभेच्छा देतात तर लहान मुले व युवक पतंग उडवण्याचा आनंद घेतात मात्र काही ठिकाणी पतंग उडवण्यासाठी चायनीज मांजाचा वापर केला जातो, अनेकदा पतंग झाडांवर अडकल्या नंतर युवक पतंग तसाच झाडावर सोडून देतात त्या झाडांवर पतंगाचा मांजा अडकून राहिल्याने कित्येकदा पक्षी त्या मांजांमध्ये अडकण्याचे प्रकार घडून पक्षांना अपंगत्व सुद्धा येते तर काही पक्षांचा जीव देखील

जात असतो त्यामुळे नागरिकांनी पतंग उडवण्याचा आनंद मोकळ्या जागी घ्यावा तसेच झाडांवर पतंग अथवा मांजा अडकणार नाही याची काळजी घेऊन कोठे झाडांवर मांजे अडकले तर ते तातडीने काढून घ्यावे जेणे करुन आपल्या देशाची संपत्ती असलेल्या पक्षांना हानी पोहचणार नाही  आपण आपले दुकानात पतंगाचा नायलॉन मांज्या विक्री करतांना अथवा साठवणुक करतांना मिळुन आल्यास आपले विरुध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम ५ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईंल असे प्रसिद्धी पञिकेद्वारे पो.नि.दिपक दंतुलवार यांनी कळविले आहे.


Monday, January 8, 2024

शेख समीर यांची शिवसेना अल्पसंख्यांक मानवत तालुकाध्यक्षपदी निवड

शेख समीर यांची शिवसेना अल्पसंख्यांक   मानवत तालुकाध्यक्षपदी निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत येथील समाजसेवक शेख समीर शेख शफियोदिन यांची  अल्पसंख्यांक  शिवसेना मानवत  तालुकाध्यक्ष पदी निवड  शिवसेना नेते तथा प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना महाराष्ट्र राज्य सईद खान  यांच्यां प्रमुख उपस्थितीत  दि.८ जानेवारी रोजी शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालय  पाथरी येथे करण्यात आली .
खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्यां आदेशाने अल्पसंख्यांक मानवत तालुकाध्यक्ष पदी  आपली नियुक्ती करण्यात येत असून आपण पक्षाचा अधिक विस्तार करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार तळगाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न कराल, पक्षाने आपणास दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विश्वास व्यक्त करतो असे प्रतिपादन  प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना महाराष्ट्र राज्य सईद खान यांनी यावेळी  केले . सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत  निवडिचे पञ शेख समीर यांना देऊन त्यांचा सत्कार करुन पुढिल कार्यास त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या 
यावेळी लाल खान  जिल्हाध्यक्ष  अल्पसंख्यक ,आसेफ खान  अल्पसंख्यक प्रदेश सचिव ,दादा साहेब टेंगसे जिला परिषद माजी सभापति ,चक्रधर उगले माजी जिला परिषद सदस्य ,हसीब खान अल्प संख्यक प्रदेश उपाध्यक्ष ,शाकेर भाई ,युसूफोद्दीन अंसारी ,नाना टकलकर ,
मेहराज खान ,मोइन अंसारी,साजिद अली राज,शेख इरफान ,अनिल पाटिल,
हबीब खान ,सतीश वाकडे ,हाजी, खुरेशी 
हनीफ खुरेशी ,अहमद अतार, फारुख  अंसारी ,मुबारक चाउस,युनुस कुरेशि,आनंत नेब,अनिल ढवले ,शकील बेग 
आलम, अजीज बागवान ,
समीर मकसूद आदीसह मोठ्यासंख्येने शिवसैनिक  उपस्थीत होते.