Thursday, September 24, 2020

बेलदार रत्न ईजि.सय्यद अहेमद साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त कोरोना योध्दा सन्मानपञाचे वाटप.

बेलदार रत्न ईजि.सय्यद अहेमद साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त  कोरोना योध्दा सन्मानपञाचे वाटप.

विशेष प्रतिनीधी   / मुस्तखीम बेलदार 

दि.२४: राज बेलदार समाजसेवा मंडळ व सा.राज घोषणा परिवाराच्या वतीने बेलदार रत्न ईजि.सय्यद अहेमद सय्यद चॉद साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त  कोरोना योध्दा सन्मानपञाचे वाटप करण्याचे आयोजन 
राज बेलदार समाजसेवा मंडळ व सा.राज घोषणा चे मुख्यसंपादक सय्यद अबरार ईलाहि यांच्या मार्गदर्शनाखाली राज बेलदार समाजातील  शिक्षक ,डॉकटर , सामाजिक कार्यकर्ते, पञकार ,शासकिय अधिकारी  यांच्यासह ज्यांनी ज्यांनी कोरोना काळात आपल्या  क्षेत्रात उत्तम कामगीरी करुन कोरोना या महामारीत आपली व आपल्या परीवाराची जिवाची पर्वा ना करता कोरोना या राष्ट्रीय आपदात आपले योगदान दिल्याबद्दल कोरोना योध्दा सन्मानपञ व पुष्पगुच्छ देऊन  गौरविण्यात येणार आहे यासाठी समाजबांधवानी आपले आधारकार्ड ,एक पासपोर्ट फोटो राज बेलदार समाजसेवा मंडळ मुख्य कार्यालय दर्गारोड परभणी येथील कार्यालयात जमा करावा किंवा मो.9011633704, 9860109007 या क्रंमाकावर संपर्क करण्याचे  आवाहान संघटनाचे अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि ,मा. नगरसेवक सय्यद नोमान हुसैनी कौसर , महाराष्ट्र राज्य संघटक मुस्तखीम बेलदार यांनी केले आहे.

Sunday, September 20, 2020

संजय नाईक यांनी वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वृक्षलागवड साठी ३५५५ रु. वृक्षवंल्ली फाउंडेशन ला केली मदत

संजय नाईक यांनी  वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वृक्षलागवड साठी ३५५५ रु. वृक्षवंल्ली फाउंडेशन ला दिली देणगी.
मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.२०: मानवत तालुका पञकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करुन सामाजिक बांधिलकी म्हणुन वृक्षलागवड व संवर्धनासाठी रामपुरी येथील वृक्षवंल्ली फाउंडेशन ला ३५५५   रुपयाची देणगी २० सप्टेंबर रोजी देऊन वाढदिवस साध्यापध्दतीने साजरा करुन समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे या उपक्रमाबद्दल संजय नाईक यांचे अभिनंदन होत आहे व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत.

Monday, September 7, 2020

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या वतीने विविध मागण्या साठी काळ्या फिती लावून आंदोलन.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या  वतीने काळ्या फिती लावून आंदोलन. 

विशेष प्रतिनिधी / मुस्तखीम बेलदार 

दि. ७: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड तर्फ वारंवार प्रत्यक्ष आप्रत्यक्ष मा. मंत्री मा. आमदार, खासदार साहेबाच्या शिफारस सह शासना कडे सातत्याने विविध प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत परंतु शासनाने आतापर्यंत एक ही रास्त  मागणी मान्य केली नाही याचा निषेध म्हणून 
दि.७ सप्टेंबर  रोजी जिल्हा परिषद नांदेड येथील  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पदवीधर संघटनेच्या  वतीने विविध मागण्यांचे निवेदन देऊन काळ्या फिती लावून नियमित कर्तव्य कर्मचाऱ्यांचे वतीने बजावन्यायत आले आहे या वेळी शेख मतीन, सुनील आघाव, श्री वैद्य इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

Sunday, September 6, 2020

भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी गुलाब शेख यांची निवड.

भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी गुलाब शेख यांची निवड. 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि. ६: भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असणारे तथा जेष्ट समाजसेवक  गुलाब शेख यांची दि. ६ सप्टेंबर रोजी भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.तालुका अध्यक्ष विश्वनाथ प्रल्हादराव लाडाने यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र  पाथरी विधानसभा चे माजी आमदार मोहन फड यांच्या हस्ते मानवत येथील गार्डन परिसरात गुलाब शेख यांना देण्यात आले आहे. 
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, मोईज अन्सारी, ओ बी सी  जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, राजू रणदिवे, आसेफ खान, बोचरे पाटील आदी उपस्थित होते. गुलाब शेख  यांच्या  निवडीचे स्वागत होत असून त्यांना पुढील कार्यासाठी  शुभेच्छा मिळत आहें.