Sunday, September 24, 2023

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २८ वा वर्धापन दिन मानवत येथे ऊत्साहात साजरा

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २८ वा वर्धापन दिन मानवत येथे ऊत्साहात साजरा 

[] सुमनांजली निवासी मूकबधिर विद्यालय येथे फळे आणि शालेय साहित्याचे वाटप []
मानवत / मुस्तखीम बेलदार 
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २४ /०९ /२०२३ रविवार रोजी
 राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त
 सुमनांजली निवासी मूकबधिर विद्यालय मानवत येथे  
मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे आणि शालेय साहित्याचे 
वाटप करून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, सचिव विलास भाऊ पतंगे, 
मानवत तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे, उपाध्यक्ष रमेश केंदळे, शहर प्रमुख हनुमान नांदुरे, कार्याध्यक्ष ओमकार वाघमारे, युवा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, चर्मकार महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २८ वा वर्धापन दिन मानवत येथे ऊत्साहात साजरा

 राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २८ वा वर्धापन दिन मानवत येथे ऊत्साहात साजरा

[] सुमनांजली निवासी मूकबधिर विद्यालय येथे फळ वाटप []

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली
 दिनांक २४ /०९ /२०२३ रविवार रोजी
 राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे आणि शालेय साहित्याचे 
वाटप करून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, सचिव विलास भाऊ पतंगे, 
मानवत तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे, उपाध्यक्ष रमेश केंदळे, शहर प्रमुख हनुमान नांदुरे, कार्याध्यक्ष ओमकार वाघमारे, युवा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, चर्मकार महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, September 6, 2023

पाऊस पडावा यासाठी मानवत येथे मुस्लीम बांधवाच्या वतीने सामुहिक प्रार्थना!

पाऊस पडावा यासाठी मानवत येथे मुस्लीम बांधवाच्या वतीने सामुहिक  प्रार्थना 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत सह पुर्ण राज्यात  पाऊस पडावा या साठी मुस्लिम समाज बांधवांनी  दिनांक ६  सप्टेंबर रोजी उक्कलगाव रोड येथील इदगाह मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता सामुहिक रित्या नमाज पठण करुन पाऊसासाठी  प्रार्थना करण्यात आली.
मौलाना सुलतान मिल्ली यांनी नमाज अदा केली व पाऊस  चांगला पडावे शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न व्हावे व सर्व लोक सुखी राहावे यासाठी प्रार्थना केली.
गेल्या काही महिन्यापासून पावसाने खंड पडला आहे .सध्या शहरासह तालुक्यात उन्हाचा चटका वाढत आहे .. सातत्याने पाऊस नसल्यामुळे कापसाने आपली माने खाली टाकलेली आहे सोयाबीन पिवळे पडून करपून जात आहे शेतकरी राजा हतबल झाला आहे यासाठी मानवत शहरांमध्ये दिनांक ६-७-८- सप्टेंबर रोजी इदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात येत आहे.. शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी इदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी  साडेनऊ वाजता तसेच शुक्रवारी दुपारी  तीन वाजता नमाजसाठी उपस्थीत राहण्याचे आवाहान शहरातील धर्मगुरु च्या वतीने करण्यात आले आहे.

ईटाळी येथील विद्यार्थीसाठी बससेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण

ईटाळी येथील विद्यार्थीसाठी बससेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी  आमरण उपोषणास सुरुवात
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत तालुक्यातील ईटाळी येथील विद्यार्थीना शिक्षणासाठी मानवत येथे येण्या जाण्यासाठी बससेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी व युवकांनी  दि.५ सप्टेंबर रोजी पासुन मानवत तहसिल कार्यालय येथे आमरण  उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. 
निवेदनात नमुद आहे की, इटाळी  येथील गावातील पाच ते सहा मुली मानवत येथे शिक्षणासाठी येत आहेत या मुलीचे आई-वडील कारखान्याला जातात अशावेळी मुलीच्या शिक्षणासाठी वाहनांसाठी पैसे देण्याची अडचण निर्माण होत आहे गेल्या अनेक वर्षापासून हे कुटुंब या समस्यांना  तोंड देत आहेत यासाठी अनेक अर्ज एस टि  महामंडळाकडे केले आहेत तरी देखील यावरती कोणती कारवाई झाली नाही त्यामुळे भारतीय संविधानानुसार मुलीचे शिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाचे आहे तेव्हा आपण लवकरात लवकर बस सुविधा सुरू करण्यात यावी यासाठी  सर्व कुटुंबाकडून  आमरण साखळी उपोषणास आपल्या कार्यालया समोर  बसत आहे .
 यावेळी मेघराज गवारे ,महेश गायकवाड, मारुती खंदारे ,बाबासाहेब गायकवाड, महादेव गायकवाड ,सखुबाई खंदारे ,मुंजाजी खंदारे यांच्यांसह विद्यार्थी व विद्यार्थीनी व पालक  उपोषणास बसले आहे. 

Friday, September 1, 2023

सकल मराठा समाजाच्या वतीने २ सप्टेंबर रोजी मानवत बंद ची हाक !

सकल मराठा समाजाच्या वतीने २ सप्टेंबर रोजी मानवत बंद ची हाक !

मानवत / मुस्तखीम बेलदार 

अंतरवाली (सराटी) ता.अंबड जि. जालना येथे मराठा आरक्षण साठी उपोषणास बसलेल्या मराठा समाज बांधवावर पोलीसानी अमानुष पणे लाठिचार्ज करत  महिला व पुरुषांना बेदम मारहान केल्या प्रकरणी पोलीस  प्रशासन व सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी मानवत येथील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने दि.२ सप्टेंबर शनीवार रोजी मानवत बंद ची हाक देण्यात आली आहे या बाबत मानवत  पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांना मानवत येथील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे .
मौजे अंतरवाली (सराटी) ता. अंबड जिल्हा जालना येथे मनोज जरांगे पाटील व गावकरी यांचे मराठा आरक्षण साठी गेल्या तीन दिवसापासून शांततेत उपोषण सुरू होते, पण आज सरकारने पोलीस बळाचा वापर करून उपोषण कर्ते व गावकरी यांच्यावर अमानुष पणे लाठी चार्ज करून उपोषण उधळून लावले आहे. यात काही गावकरी व महिला सुध्दा जखमी झालेले आहेत. याच्या निषेधार्थ दिनांक ०२/०९/२०२३ रोजी वार शनिवार रोजी मानवत बंदची हाक
देण्यात येत आहे तरी सर्व समाज बांधवांनी स्वयंपुर्तीने मानवत बंदमध्ये सहभागी व्हावे अशी विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने प्रसिद्धी पञिकेद्वारे निवेदनात  करण्यात आली आहे.