Thursday, August 26, 2021

परभणी जिल्हा कामगार अधिकारी मा.टि.ई.कराड साहेब यांचा परभणी जिल्हा मजदुर युनियन लाल बावटा यांच्या वतीने सत्कार

 जिल्हा कामगार अधिकारी टि.ई.कराड साहेब यांचा सत्कार
परभणी /प्रतिनीधी 
परभणी जिल्हा कामगार अधिकारी मा.टि.ई.कराड साहेब यांचा सत्कार  परभणी जिल्हा मजदुर युनियन लाल बावटा यांच्या वतीने दि.२६ आँगस्ट रोजी करण्यात आला.यावेळी  कॉ. रामराजे महाडिक सेक्रेटरी परभणी जिल्हा मजदुर युनियन, कॉ. बाबुखॉ पठाण सह सेक्रेटरी परभणी जिल्हा मजदुर युनियन लाल बावटा आदी उपस्थीत होते.सत्कार सभारंभ नंतर  कामगारांच्या रखडलेल्या मागण्यांसाठी सविस्तर चर्चा  करण्यात आली 

Sunday, August 15, 2021

मानवत तालुक्यातील रुढी येथील सरपंच श्रीमती बीबी रज्जाक कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण .

रुढी येथील सरपंच श्रीमती बीबी रज्जाक कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण .
मानवात / मुस्तखीम बेलदार 
१५ आँगस्ट  अमृत महोत्सवाचे औचित्य साधून व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन ग्रामपंचायत रुढी येथे मोठ्या ऊत्साहाच्या  वातावरणात मानवत तालुक्यातील रुढी येथे सरपंच श्रीमती बीबी रज्जाक कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
 यावेळी श्री व्हि.आर.वाघमारे,आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी पंचायत समिती मानवत ,
 श्री बी.एन.घनचक्कर मुख्याध्यापक 
   जि.प.प्रा.शाळा रुढी,
   श्री जी.बी गीते ग्रामसेवक रुढी‍,मुसा कुरेशी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद, आशा कार्यकर्ती अंगणवाडी कार्यकर्ती व गावकरी उपस्थित होते

Wednesday, August 11, 2021

मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांची पाच जणांची टोळी केली जेरबंद

चोरी करण्यापुर्वीच पाच चोरांना मानवत पोलीसांनी केली अटक
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  दरोडेखोरांची पाच जणांची एक टोळी दि.११ आँगस्ट च्या राञी  जेरबंद केली रात्री गस्त घालीत असताना पाच जण वाहनाद्वारे जात असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यामध्ये त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडण्यात आले 

अनिल पवार परबीन सिंग कृष्णागिरी अर्जुन पवार रमेश दाभाडे अशी या आरोपींची नावे  आहे 

पाळोदी रोड  टी पॉईंट मध्ये रात्री दीड वाजताच्या सुमारास एका मोटरसायकलवर पाच दरोडेखोर जात असताना सपोनि भरत जाधव पो ना वड राख क्षीरसागर शेख वसीम वायाळ चव्हाण घुगे यांनी पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दरोडेखोर हत्यारानिशी पकडले आहे सदर आरोपींनी यापूर्वीसुद्धा मानवत पाथरी शहरात चोरी केली होती रेकार्डवर ते सराईत गुन्हेगार आहेत अशी माहिती मिळत आहे.

Friday, August 6, 2021

दिपकभाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त मानवत ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप

दिपकभाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप
मानवत / मुस्तखीम बेलदार 
इंडिया पैथंर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या वाढदिवसा निमीत्त मानवत येथील ग्रामीण रुग्णालय येथे गोरगरीब रुग्णांना   फळ वाटप करण्यात आले. या वेळी डॉ.कलीम खान ,विजय खरात ,राजरत्न ठेंगे ,धम्मा मोर ,दिप लोंढे ,आकाश भाले ,संदीप ढाले, यशपाल भाले, करण ढवळे,आदेश धबडगे ,शुभम पंचांगे आदी उपस्थीत होते.