Thursday, November 15, 2018

Manwath news

मानवत येथे हजरत  टिपु सुलतान यांच्या जयंतीचे आयोजन.
मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.१५: हजरत टिपु सुलतान यांच्या २६८ व्या जयंती निमित्त मानवत शहरात २० नोव्हेंबर रोजी शासकिय विश्रामगृह पासुन या मिरवणुकिस सुरुवात होऊन  मेनरोडमार्ग  पोलीस ठाणे पासुन टिपु सुलतान चौक पर्यत मिरवणुक काढुन जयंती साजरी करण्यात येणार आहे. हजरत टिपु सुलतान यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवानेते डॉ.अंकुश लाड हे राहणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक विनोद राहाटे उपस्थीत राहणार आहे.हजरत टिपु सुलतान जयंती कार्यक्रमात युवकांनी व नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहान समीतीचे संयोजक वाजेद भाई शेख, एजाज़ खान,अमोल मगर
,हुसेन खान,वसीम अन्सारी
,शेख शफियोदिन
, इरफान खान यांनी केले आहे.

स्व.नेञदिप दगडु यांच्या जन्म दिनानिमित्त रोग निदान व भव्य रक्तदान शिबीराचे मानवत येथे आयोजन.

स्व.नेञदिप दगडु यांच्या जन्म दिनानिमित्त रोग निदान व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.

मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.१५: मानवत येथील स्वर्गिय नेञदिप नंदुभाऊ यांच्या जन्म दिनानिमित्त सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया तसेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन १७ नोव्हेंबर रोजी गोदावरी मंगल कार्यालय बांगड टॉकिज रोड येथे डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
या सर्वरोगनिदान शिबीरात मधुमेह ,र्हदयविकार,दमा,अस्थमा,पोटविकार,नेञरोग तपासणी,स्ञीरोग ,अस्थिरोग,कान नाक घसा,त्वचारोग ,बालरोग आदी आजाराचे तपासणी व रोगनिदान करण्यात येणार असुन यासाठी तज्ञ डॉकटर रुग्णाची तपासणी करनार आहे.तसेच स्वर्गिय नेञदिप नंदुभाऊ यांच्या जन्म दिनानिमित मानवत शहरातील सर्व सेवाभावी संस्था व विविध मिञमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी ईच्छुक रक्तदात्यांनी या शिबीरात येऊन रक्तदान करण्याचे आवाहान डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टचे डॉ.नारायणसा दगडु ,डॉ.निनांद दगडु ,अँड गणेश मोरे पाटिल,कुलदिप दगडु ,विशाल कडतन यांनी केले आहे.

Wednesday, November 7, 2018

मानवत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या वतीने विद्यार्थी दिन उत्साहात साजरा .

मानवत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या वतीने  विद्यार्थी दिन उत्साहात साजरा .

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.७: मानवत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या वतीने ईडिया बँकजवळ मेनरोड येथे  आज दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम शाळेत प्रवेश दिन निमित्त विद्यार्थि दिवस साजरा करण्यात आला .

७ नोव्हेंबर १९०० या दिवशी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील  शाळेत प्रवेश घेतला होता यासाठी शासनाने ७ नोव्हेंबर हा विद्यार्थि दिन साजरा करावा असा निर्णय घेण्यात आला होता या निमित्त मानवत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या वतीने विद्यार्थि दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नगरसेवक  आनंद भदर्गे ,असीर बेलदार ,ॲड. संजय हजारे,विलास खरात सर,सपंत पंडित,चंन्द्रकांत मगर,छगन भदर्गे , विलास खरात सर, सरोदे सर,  अनिरुद्ध भाले, सचिन धबडगे, पैंजने सर, राजेश महिपाल या मान्यवराचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशास ११८ वर्ष पुर्ण झाले या निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थीतांना अमोल मगर व विलास खरात सर यांनी मार्गदर्शन केले .
सुञसंचालन व आभार प्रदषण विजय खरात यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण पंडित, कार्तिक मजमुने, शुभम पंचांगे, विनोद लोखंडे, आनंद पंचांगे, पवन धापसे, सावन जोंधळे, सागर गाडे, विकी नितनवरे,सुनील खरात,नागसेन पंडित , दादा खंदारे, दयासागर भक्ते, विजय भदर्गे, प्रवीण बनसोडे,विजय धबडगे , बाबा ढवळे,अमित दुध्वडे, बाळू अवचार
किरण पंडित, नागशेन पंडित, संविधान पंडित आदीनी परिश्रम घेतले .

Monday, November 5, 2018

भाजपा कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजना गावोगावी नागरीकांपर्यत पोहचवाव्यात - आमदार मोहन फड

शासनाच्या योजना गावोगावी नागरीकांपर्यत पोहचवा-आ.मोहन फड
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.५ : भारतीय जनता पक्षाची केद्रात व महाराष्ट्रात ४ वर्षापासुन सत्ता असुन या माध्यमातून शासनाच्या वतीने नागरीकांसाठी विविध योजना काढल्या आहेत त्या योजना गावोगावी नागरीकांपर्यत कार्यकर्तानी पोहचवावेत असे आवाहन पाथरी विधानसभाचे आमदार मोहन फड यांनी केले ते यावेळी सी एम चषक मानवत येथील  आढावा बैठकित कार्यकर्तेना मार्गदर्शन करताना म्हणाले.
मानवत येथे  दि. ४ नोव्हेंबर  रविवार रोजी  वाघेश्वर मंदिर नवीन गार्डन नेताजी सुभाष विद्यालय जवळ १२ वाजता सी एम चषकानिमित्य आढावा बैठकीचे आयोजन व बुथप्रमुख आढावा बैठकीचे आयोजन  करण्यात आले होते  यावेळी व्यासपिठावर
भाजपा चे जिल्हा अध्यक्ष अभय भाऊ चाटे, जिल्हा संघटन सरचिटणीस बाबासाहेब जामगे,युवानेते डॉ.अंकुश लाड, भाजपाचे तालुका अध्यक्ष अंनंत  गोलाईत,  सी एम चषकाचे जिल्हा संयोजक रंगनाथ सोळंके आदी उपस्थीत होते.
यावेळी व्यासपिठावरील मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व देशातील सर्वात मोठ्या क्रिडा व कला महोत्सव होणार असुन पाथरी विधानसभात हि या क्रिडा स्पर्धाचे आयोजन होणार आहे यासाठी कार्यकर्ता ची अडी अडचणी यावेळी जाणुन घेण्यात आल्या .या कार्यक्रमाचे प्रास्तविक अंकुश जगताप यांनी केले तर सुञसंचालन ॲड.वैजनाथ काळे यांनी केले या कार्यक्रमास पाथरी विधानसभाचे भाजपाचे कार्यकर्ते व  इंद्राणी मिञमंडळाचे पदाधिकारि मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.