Friday, June 18, 2021

वाढत्या डिझेल पेट्रोल दरा विरुध्द मानवत येथे एम आय एम पक्षाच्या वतीने निवेदन

वाढत्या डिझेल पेट्रोल दरा विरुध्द मानवत  
एम आय एम पक्षाच्या वतीने निवेदन
मानवत / मुस्तखीम बेलदार 
देशात व राज्यात  वाढत्या डिझेल पेट्रोल दरा विरुध्द मानवत  
एम आय एम पक्षाच्या वतीने दि.१८ जुनरोजी तहसिलदार मानवत मार्फत केद्रिय सचीव पेट्रोलीयम विभाग गोवरमेन्ट आँफ ईडिया न्यु दिल्ली व विक्रिकर विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की आजच्या परिस्थितीमध्ये अन्न वस्त्र व निवारा याच प्रमाणे पेट्रोल व डिझेल आवश्यक झाली आहे  माहितीप्रमाणे केंद्रशासन तरी ३० रुपये प्रति लिटर पेट्रोल ३२ रुपये प्रति लिटर डिझेल आकारत आहे तसेच राज्य सरकार वँटच्या  नावावर २५ टक्के प्रति लिटर पेट्रोल २२ टक्के डिझेलवर आकारित आहे ही वस्तुस्थिती १५ मार्च २०१९ चा डाटा प्रमाणे आहेत परंतु पेट्रोल व डिझेलवर संपूर्ण भारतात सर्वसामान्य जनतेची लूट केली जात आहे त्यामुळे मा.साहेबानी केंद्र शासन व राज्य शासन यांनी आपले टॅक्स कमी करून सध्या करण्यात आलेल्या किमतीमध्ये २५ टक्के घट कपात केली पाहिजे हे आमच्या पक्षाची मागणी करत आहोत अन्यथा लोकशाही मार्गाने लढा देऊन तहसील कार्यालय समोर एम आय एम पक्ष तर्फे धरणे आंदोलन करण्यात येईल असे नमूद केले आहे. या वेळी एम आय एम पक्षाचे तालुकाध्यक्ष  सय्यद समीर,सय्यद सुल्तान,महेफुजूरहेमान सय्यद,मुजाहिद फारुखी, मुख्तार शेख,अयाज़ शेख,अज़ीम शेख,अरबाज़ शेख,समीर शेख,मोबिन राज,साहिल बेलदार,तल्हा खान,शादाब सय्यद,शाहेद बागवान,रहीम तंबोली  आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

Thursday, June 17, 2021

मानवत येथील मुस्लीम युवकाच्या वतीने मुख्यमंत्रीना ५०० पोस्ट कार्डद्वारे आरक्षणाची मागणी.

मानवत येथील मुस्लीम युवकाच्या वतीने मुख्यमंत्रीना ५०० पोस्ट कार्डद्वारे आरक्षणाची मागणी.

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत येथे मुस्लिम आरक्षण संदर्भात सकल मुस्लिम युवक महाराष्ट्राच्या आव्हानाला प्रतिसाद देत दि.१७ जुनरोजी  एक युवक एक पोस्ट कार्ड मोहीम अंतर्गत  मानवत येथील मुस्लिम युवकांच्या वतीने मा.ऊध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ५०० पोस्ट कार्डद्वारे मागण्या करण्यात आल्या आहे यात मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा,मॉबलिंचिंग केलेल्या मोहसीन शेखला न्याय देण्यात यावा,मॉब लिंचिंग विरुद्ध कायदा तयार करावा,प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारण्यात यावे,बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर मुस्लिम मुला-मुलींना यूपीएससी,एमपीएससीसाठी संस्था स्थापन करण्यात यावी,मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करण्यात यावी,राज्यातील वक्फ जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावेत, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच बळकटीकरण करण्यात यावं,वक्फ संपत्तीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा आदी मागण्या पोस्टद्वारे  निवेदनात नमुद करण्यात आल्या आहे यावेळी सय्यद समीर,महेबूब मंसूरी,वसीम कुरेशी,शेख वाजेद,इलीयास पठान,सय्यद सईद,पाशा पटेल,ख़य्युम बागवान,समीर खान,मुन्ना खान,अश्पाक कुरेशी,सुल्तान मंसूरी, वसीम खान,जावेद तंबोली आदी युवक उपस्थीत होते.

Tuesday, June 1, 2021

मानवत येथे खा. संजय जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त जिवनदायी वस्तूंचे वाटप

मानवत येथे खा. संजय जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त जिवनदायी वस्तूंचे वाटप
मानवत / मुस्तखीम बेलदार 
परभणी लोकसभा मतदारसंघा चे कार्यदक्ष  खासदार संजय जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त १ जून मंगळवार रोजी मा.शिवसेना शहरप्रमुख अनिल जाधव यांच्या संकल्पनेतुन व मानवत तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतिने वारकरी संप्रदाय  यांना जिवनदायी वस्तूंचे वाटप १००८ महामन्डलेश्वर स्वामी मणिषानंद पुरीजी महाराज व भारती ताई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी  मा.शिवसेना शहरप्रमुख अनिल जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख दिपक बारहाते,शिवसेना उपतालुकाप्रमुख माणिकराव काळे,पं.स.सभापती शिवाजीराव उक्कलकर,मा.प.स.सभापती बंडू मुळे,प.स.सदस्य दत्ताराव जाधव,शहरप्रमुख बालाजी दहे,गोगलगाव सरपंच अंक्रूर मगर,नरेश गौड,युवासेना तालुकाप्रमुख संतोष अंबेगावकर,युवासेना उप तालुकाप्रमुख विठ्ठल जोगदंड पाटील,बबलू राजे,शिवसेना उपशहरप्रमुख शिवाजी सोरेकर,गणेश नाईक,शंकर तर्टे,किरण मगर पाटील,मुरली ठोंबरे,सतिष मगर,वसंत जोगदंड,मनोज भिसे,पिंटू फल्ले,राजू महिपाल,सुनिल जाधव,बाळू चव्हाण  ईतर शिवसैनिक ,युवासैनिक वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होते.