Friday, May 29, 2020

आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवरील गुन्हे माघे घ्या - मानवत राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांचे मानवत तहसिलदार मार्फत गृहमंत्रीना निवेदन

आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवरील गुन्हे माघे घ्या - मानवत राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांची गृहमंत्रीना निवेदन

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२९: पाथरी येथे सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी ,तरबेज खान,तारेख खान यांच्यासह १२५ जणांवर पाथरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे  प्रशासनाने केलेल्या या  कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक असंतोष व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवर पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे या मागणीचे निवेदन राष्ट्वादि कॉग्रेस पार्टि मानवत चे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यावतीने दि.२९ मे रोजी मानवत तहसिलदार डि डि फुफाटे यांच्या मार्फत मा. गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी ,तरबेज खान,तारेख खान यांच्यासह १२५ जणांवर पाथरी पोलीस स्टेशन येथे सामुहिक रित्या नमाज पठण केल्या बद्दल  तसेच संचारबंदि  जमाव बंदि आदेशाचे उल्लंघन केल्या बद्दल  गुन्हा दाखल झाला आहे हे दुर्दैवी असुन आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पुर्ण लॉकडाऊन च्या काळात गोरगरीबांना मोठ्याप्रमाणात मदत केली असुन त्यांनी केलेल्या  वेळोवेळी आवाहानामुळे पाथरी शहरासह तालुक्यातील नागरीकांनी लॉकडाऊन चे कठोर पालन केले आहे तसेच ईदची नमाज पठण करताना त्यांनी शारीरिक अंतराचे महत्वपुर्ण पालन केले आहे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक असंतोष व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवर पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे असे निवेदनात नमुद केले आहे.निवेदनावर राष्ट्वादि कॉग्रेस पार्टि मानवत चे शहराध्यक्ष शेख जुबेर,बळीराम माने,शेख तन्वीर ,अर्जुन वाघमारे,खमर राज यांच्या स्वाक्षरी आहे.


Sunday, May 24, 2020

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांचे आवाहान .

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांचे आवाहान

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२४: आज दि. २४ मे रोजी चंन्द्र दर्शन झाले असुन उद्या दि.२५ मे रोजी ईद ऊल फिञ अर्थात रमजान ईद देशभरात साजरी होणार आसुन  कोरोना कोव्हीड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारने  ३१ मे पर्यत लॉकडाऊन वाढवला  यामुळे  मानवत येथील  मुस्लिम समाज बांधवानी नमाजसाठी  मस्जिद मध्ये व ईदगाह येथे  न जाता घरातच नमाज पठण करुन  आपले विविध धार्मिक कार्य पार पाडुन ईद साजरी करावी असे  परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांनी केले आहे.
१४०० वर्षानंतर कदाचीत पहिलीच हि वेळ असेल जेव्हा  मुस्लिम समाजात रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये न जाता घरातच नमाज पठण करत विविध धार्मिक कार्यसह  उपवास ठेवत आहे व पुढिल येणाऱ्या रमजान ईद हि घरातच राहुन उत्साहात साजरी करावी तसेच कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन हात मिळविने व गळाभेट टाळावी जेने करुन आपले कोरोना पासुन संरक्षण होईल तसेच देशासह जगभरातुन कोरोना नष्ट व्हावा यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करावी असे आवाहान परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांनी करुन शहरातील  जनतेस रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - युवानेते डॉ.अंकुश लाड

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - युवानेते डॉ.अंकुश लाड

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.२४:  कोरोना कोव्हीड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारने  ३१ मे पर्यत लॉकडाऊन वाढवला असुन सर्व बाजारपेठ धार्मिक स्थळे बंद आहेत त्यात मुस्लीम बांधवाची रमजान ईद २५ मे रोजी होणार आहे यामुळे  मानवत येथील  मुस्लिम समाज बांधवानी ईद ऊल फिञ नमाजसाठी  मस्जिद मध्ये व ईदगाह येथे  न जाता घरातच नमाज पठण करुन  आपले विविध धार्मिक कार्य पार पाडुन ईद साजरी करावी असे  आवाहान मानवत येथील युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी केले आहे.
१४०० वर्षानंतर कदाचीत पहिलीच हि वेळ असेल जेव्हा  मुस्लिम समाजात रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये न जाता घरातच नमाज पठण करत विविध धार्मिक कार्यसह  उपवास ठेवत लॉकडाऊन   चे पालन करत  आहे व पुढिल येणाऱ्या रमजान ईद ईद ऊल फिञ हि घरातच राहुन उत्साहात साजरी करावी तसेच कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन हात मिळविने व गळाभेट टाळावी जेने करुन आपले कोरोना पासुन संरक्षण होईल तसेच देशासह जगभरातुन कोरोना नष्ट व्हावा यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करावी असे आवाहान करुन शहरातील  जनतेस रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी  रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन  
                                              
सोनपेठ प्रतिनीधी / शेख युसुफ 

दि.२४: सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी यावर्षीची ईदची नमाज ईदगाह मैदानाऐवजी घरातच अदा करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व ईदगाह चे इमाम हाफिज गफ्फार यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.                      देशात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाच्या वतिने लागू करण्यात आलेले लाँकडाऊनमध्ये कायद्याचे सुचनाचे पालन करत मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यातील तराविहची नमाज,रोजा ईफ्तारी व पाच वक्तची नमाज हे सर्व धार्मिक कार्यक्रम आज पर्यंत आपापल्या घरीच अदा केले.तसेच ईद-ऊल-फित्र ईदची नमाज देखील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर न पठन करता आपापल्या घरीच अदा करून अल्लाह कडे  प्रार्थना करावी की जगात पसरलेला कोरोना साथी पासून जगातील नागरिकांची लवकर सुटका व्हावी व देशाच्या प्रगती साठी प्रार्थना करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व हाफिज गफ्फार 
यांनी सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांना केले आहे

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी  रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन  
                                              
सोनपेठ प्रतिनीधी / सद्दाम हुसैन 

दि.२४: सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी यावर्षीची ईदची नमाज ईदगाह मैदानाऐवजी घरातच अदा करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व ईदगाह चे इमाम हाफिज गफ्फार यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.                              .                                                                   देशात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाच्या वतिने लागू करण्यात आलेले लाँकडाऊनमध्ये कायद्याचे सुचनाचे पालन करत मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यातील तराविहची नमाज,रोजा ईफ्तारी व पाच वक्तची नमाज हे सर्व धार्मिक कार्यक्रम आज पर्यंत आपापल्या घरीच अदा केले.तसेच ईद-ऊल-फित्र ईदची नमाज देखील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर न पठन करता आपापल्या घरीच अदा करून अल्लाह कडे  प्रार्थना करावी की जगात पसरलेला कोरोना साथी पासून जगातील नागरिकांची लवकर सुटका व्हावी व देशाच्या प्रगती साठी प्रार्थना करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व हाफिज गफ्फार 
यांनी सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांना केले आहे.

Wednesday, May 20, 2020

मानवत येथील शहजिन शकिल बेलदार हिचा पहिला रोजा संपन्न.

शहजिन  बेलदार हिचा  पहिला रोजा
मानवत / प्रतिनीधी
दि.२१: मुस्लिम बांधवांचा पवित्र  रमजान महिना   सुरु  असून याचे  औचित्य साधून मानवत शहरातील राजगल्ली  येथील रहिवासी सय्यद शहजिन शकिल बेलदार वय ९ वर्ष या मुलीने पवित्र रमजान महिन्यात दि. २० मे रोजी  उपवास ठेऊन पवित्र रमजान महिन्यात  आपल्या आयुष्यातील पहिला रोजा  पूर्ण केला व  आपले कर्तव्य पार पाडले यावेळी त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे  
यासाठी त्याचे वडिल शकिल बेलदार ,आजोबा अखील बेलदार ,एकबाल राज,मोबीन बेलदार ,मुस्तखीम बेलदार  यांनी शहजिन  बेलदार   याचे कौतुक करुन त्यास शुभेच्छा दिल्या आहे.

Monday, May 18, 2020

लोकडाऊन काळातील नागरीकांचे वीजबिल माफ करा - परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव युवानेते वसीम भैय्या कुरेशी यांची मागणी

लोकडाऊन काळातील मध्यमवर्गीयांचे  वीजबिल माफ करा .
[] मानवत तहसिलदारांना युवक काँग्रेसची मागणी []

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि,१८: सध्या कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे देशभरात चौथ्या टप्प्यात हि लॉकडाऊन सरकार कडुन वाढविण्यात आला आहे यामुळे गोरगरीब मजुर व मध्यमवर्गीय नागरीकांवर  आर्थिक संकट निर्माण झाले आहे यामुळे शासनाने लॉकडाऊन काळातील वीजबील नागरीकांचे माफ करावे अशा मागणीचे निवेदन परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दि.१८ मे रोजी मानवत तहसिलदार डि डि फुफाटे यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,    कोरोना मुळे लॉकडाऊनची परिस्थिती उदभवल्या मुळे गोर गरीब, मजदूर, हमाल मध्यम वर्गीय लोकांवर उदरनिर्वाह चे मोठं संकट निर्माण झाले आहे  त्यामुळे सरकारने लोकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे  असे म्हटले आहे निवेदनावर  परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव युवानेते  वसीम भैय्या कुरेशी ,काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष इलियास पठाण, सय्यद आरेफ, महेबूब मंसुरी, अफरोज लाला,अरशद मिलन ,सय्यद मोईन, मोहम्मद शाह, दुर्गेश कुमावत आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Sunday, May 17, 2020

मानवत येथून तीस उत्तर प्रदेश येथील परप्रातीय मजुर एस टि बस ने रवाना.

मानवत येथून तीस मजुर औरंगाबाद येथे एस टि बस ने रवाना.
[]औरंगाबाद येथुन रेल्वेने उत्तर प्रदेशला पाठविणार []

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि. १७:  लॉकडाऊन मुळे प्रत्येक जिल्ह्यात इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत मजुरांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिल्यानंतर आता मजूर आपल्याला आपल्या गावी परतु लागले आहे  प्रशासनाच्यावतीने एसटी बसची सोय केली जात आहे मानवत तालुक्यात  उतरप्रदेश येथून आलेल्या  ३० मजुर आलेले होते या मजुरांना जाण्यासाठी  तालुका प्रशासनाने माननीय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी बसची सोय करून दि.१६ मे रोजी  सकाळी त्यांना मानवत येथून औरंगाबाद येथे पाठविण्यात आले  गेल्या खूप दिवसापासून देशभरात लाँकडाउन सुरू आहे या मुळे प्रत्येकी तालुक्यात जिल्हास्तरावर इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत या मजुरांचे हाल होत असल्याने सदरील मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी शासनाने दिली आरोग्य तपासणी करून मजुरांना त्यांच्या गावी पाठवले जात आहेत त्यांची प्रवासाची सोय महामंडळाच्यावतीने केली जात असून मानवत येथे तीस मजूर अडकून पडले होते या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी माननीय तहसीलदार डी.डी. फुपाटे साहेब ,नायब तहसीलदार नकुल वाघुंडे साहेब, न.पा.चे. मुख्य अधिकारी उमेश ढाकणे साहेब, मानवत बस स्थानकाचे  प्रमुख  जाधव साहेब,  गोपनीय शाखेचे नारायण ठमके यांनी मजुरांसाठी बसची व्यवस्था केली होती डॉ.ललित कोकरे. वैद्यकीय अधिकारी,श्री.सुनिल खरात.औषध निर्माण अधिकारी.ग्रा.रु. यांनी   डॉ.नरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांची  मानवत बसस्थानक येथे थरमल तपासणी करुन मजुराना सकाळी बसमध्ये बसवुन  मानवत बसस्थानकावरुन औरंगाबाद येथे  पाठवून दिले आहे औरंगाबाद येथुन विशेष रेल्वेने हे मजुर उत्तर प्रदेशला रवाना होणार आहे.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक,तलाठी अरविंद चव्हाण ,अरुण मानेकर,हाफिज बागवान आदी उपस्थीत होते.

Thursday, May 14, 2020

आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांच्या हस्ते हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन .

आमदार सुरेशरावजी  वरपुडकर यांच्या हस्ते  हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन .

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार 

दि.१४: परभणी येथे खरेदी विक्री संघात शासकीय नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष तथा पाथरी विधानसभाचे आमदार सुरेशरावजी वरपूडकर साहेब यांच्या हस्ते  दि. १३ मे रोजी करण्यात आले.
शेतकऱ्यांनी केलेल्या ऑनलाइन नोंदणी नुसार ही खरेदी करण्यात येणार असून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एस एम एस  द्वारे आमंत्रित करण्यात येणार आहे.

Wednesday, May 13, 2020

मानवत येथे परमपूज्य श्री .श्री .रविशंकर जी याच्यां जन्म दिवसानिमित्त रक्तदान शिबिर.

मानवत येथे परमपूज्य श्री .श्री .रविशंकर जी याच्यां जन्म दिवसानिमित्त रक्तदान शिबिर.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत येथील  वाघेश्वर उद्यान येथे सोशल डिस्टनस चे पालन करुन १३ मे रोजी  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी परमपूज्य श्री श्री रविशंकर जी  गुरुजी याच्यां जन्म दिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करुन जन्मदिवस  साजरा करण्यात आला या रक्तदान शिबीरात ७१  रक्तदात्यांनी रक्तदान  केले पाथरी विधानसभाचे माजी आ.मोहनराव फड,युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते रक्तदानाचे प्रमाणपञ देण्यात आले.यावेळी शरद भैय्या ,भास्कर भैय्या,अंकुश भैय्या,नंदू भैय्या तामादे, थोरे भाऊ ,तिवारी काका  व सर्व गुरुप्रेमी उपस्थीत  होते.

मानवत येथील गोरगरीब व मध्यमवर्गीयांना अन्नधान्य उपलब्ध करा- राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष शेख जुबेर

मानवत येथील गोरगरीब व मध्यमवर्गीयांना  अन्नधान्य उपलब्ध करा- राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष शेख जुबेर

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.१३: कोरोना कोव्हीड १९ या  आजारामुळे देशभरात लॉकडाऊन लागु करण्यात आला असुन यात मानवत येथील  गोरगरीब व मध्यमवर्गीय नागरीकांचे फार हाल होत असुन ज्या नागरीकांकडे कोणत्याही प्रकारचे राशनकार्ड नाहित अशा नागरीकांना अन्नधान्य उपलब्ध करुन द्यावे अशा मागणीचे निवेदन मा. अन्नधान्य पुरवठा मंञी महाराष्ट्र राज्य यांना तहसिलदार डि डि फुफाटे यांच्या मार्फत दि.११ मे रोजी मानवत राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांनी दिले आहे.
निवेदनात नमुद केले आहे की,  कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे केन्द्रसरकारने १७ मे पर्यत  लॉकडाऊन केले  आहे तसेच मागील दिड महिण्यापासुन लॉकडाऊन  सुरु असल्यामुळे शहरातील रोज मजुरी करुन आपली उपजीविका चालविणारे तसेच मध्यमवर्गीय नागरीकांवर उपासमारीची वेळ आली आहे कारण हाताला काम नसल्यामुळे पैसे नाहित यामुळे घर कसे चालवावे हा प्रश्न त्यांना पडला आहे यामुळे शासनाने ज्या नागरीकांकडे राशनकार्ड नाहित अशा लोकांना अन्नधान्य पुरवठा करावा जेने करुन बुखबळीमुळे कोणीहि उपाशी मरणार नाहि यासाठी लवकरात लवकर ज्या नागरिकाकडे राशनकार्ड नाहि अशा लोकांकडून अर्ज घेऊन त्यांना राशन वितरित करावे असे नमुद करण्यात आले आहे.निवेदनावर शेख जुबेर
शेख साबेर शहराध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस , तन्वीर खान,अर्जुन वाघमारे,सलीम पठाण आदीच्या स्वाक्षरी आहेत.

मानवत येथील हरिविठ्ठल स्वस्त औषधी कडून पोलिसांना सँनिटाइजर चे वाटप

मानवत येथील हरिविठ्ठल स्वस्त औषधी कडून पोलिसांना  सँनिटाइजर चे वाटप      
  मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत येथील पोलीस प्रशासनाला त्यांच्या कामांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सँनिटाइजर चा वापर करण्यासाठी पॉकेट सँनिटाइजर  चे वाटप शहरातील केंद्र सरकारच्या जेनेरिक मेडिसिन संकल्पनेतून असलेले हरिविठ्ठल स्वस्त औषधी सेवा यांच्याकडून जेवढे कर्मचारी तेवढे  सनीटाझर  चे वाटप करण्यात आले यावेळी मानवत नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे हरिविठ्ठल स्वस्त औषधी चे संचालक राणा संजय नाईक यांच्या हस्ते हे सँनिटाइजर  पोलीस प्रशासनाला पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी मानवत नगरपालिकेचे नगरसेवक विनोद रहाटे यांच्यासह पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार साहेब, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांची उपस्थित होती यावेळी ब्रँडेड कंपनीचे म्हणजे हिंदुस्तान यूनिलिव्हर या कंपनी चे लाईफबॉय हे पॉकेट सँनिटाइजर  पोलिसांना देण्यात आले त्याबद्दल पोलीस प्रशासनाने आभार व्यक्त केले.