Sunday, November 29, 2020

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतिश चव्हाण यांना मोठ्या मताधिंक्यांने निवडुन द्या - प्रेरणा ताई वरपुडकर

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतिश चव्हाण यांना मोठ्या मताधिंक्यांने निवडुन द्या - प्रेरणा ताई वरपुडकर 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२९: औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. श्री.चव्हाण सतिश भानुदासराव यांच्या प्रचारार्थ दि.२९ नोव्हेंबर रोजी  पाथरी विधानसभा मतदारसंघातील मानवत येथे प्रेरणाताई समशेर वरपुडकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या प्रमुख उपस्थीतीत शहर व ग्रामीण भागातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मतदारांना बुथ निहाय मार्गदर्शन करुन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. श्री.चव्हाण सतिश भानुदासराव यांना मोठ्या मतध्यिंक्यांने विजयी करण्याचे आवाहान यावेळी केले.
यावेळी तुकाराम साठे सर (जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल परभणी), बाबुरावजी नागेश्वर (जि. प. सदस्य परभणी), सिध्देश्वर लाडाणे (ता.अध्यक्ष काँग्रेस कमेटी मानवत), चंद्रकांत सुरवशे (संचालक कृ.उ.बा.समीती मानवत), बाबासाहेब अवचार (संचालक कृ.उ.बा.समीती मानवत), अंबादास तुपसमुंद्रे (संचालक कृ.उ.बा.समीती मानवत), प्रभाकर जाधव (संचालक कृ.उ.बा.समीती मानवत), महेश कोक्कर (नगरसेवक मानवत), ऋषीकेश बारहाते (नगरसेवक मानवत), सर्जेराव देशमुख (नगरसेवक मानवत), गोपाल गौड (नगरसेवक मानवत) डॉ.रामचंद्र भिसे, आसाराम काळे (ता.अध्यक्ष युवक काँग्रेस मानवत), विशाल यादव (उपाध्यक्ष मानवत), भगिरथ कदम (सचिव मानवत), ॲड.लुकमान बागवान, होगे सर ,आनंद पठाडे, ज्ञानेश्वर निर्वळ, मनोहर कदम, मधुकर कदम, श्रीकांत देशमुख, मनोज चव्हाण श्रीधर धोपटे, ओंकार आर्दड व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.


Wednesday, November 18, 2020

मानवत येथील डॉ. नेत्रदीप दगडू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांग तरुणाला तीन चाकी सायकलचे वाटप

दिव्यांग तरुणाला तीन चाकी सायकलचे वाटप 
[] डॉ. नेत्रदीप दगडू चॅरिटेबल ट्रस्ट चा उपक्रम[] 
मानवत/ मुस्तखीम बेलदार 
दि.१८ : स्वर्गीय डॉ. नेत्रदीप दगडू यांच्या जयंती निमित्त शहरातील डॉ. नेत्रदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील गरजु दिव्यांग तरुणांला  मदतीचा हात देत मोफत तीन चाकी सायकलचे वाटप  १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या सायकलच्या साहाय्याने तरुणाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत मिळणार आहे.
चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, अध्यक्ष डॉ एन बी दगडू, डॉ निनाद दगडु, डॉ मनिषा गुजराथी, ॲड गणेश मोरे पाटील,महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष मोहन गिराम, श्री वीरकर, डॉ कहेकर, कुलदिप दगडु, आदी उपस्थित होते. शहरातील बांगड प्लॉट भागतातील रहिवाशी शेख लतीफ शेख मोईन या दिव्यांग तरुणाला तीन चाकी सायकल भेट दिली. यावेळी  झालेल्या कार्यक्रमात बोलताना नाना साहेब भेंडेकर यांनी सामजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवून गरजूना मदत करण्याचे आव्हान केले. दगडु चॅरिटेबल ट्रस्टच्या इतर उपक्रमाची माहिती दिली . डॉ निनाद दगडु यांनी नव्याने सुरु करण्यात आलेल्या उपक्रमा विषयी माहिती दिली.  प्रास्तावीक सत्यशील धबडगे यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार  किशोर तूपसागर यांनी मानले. 


Saturday, November 14, 2020

जळगाव येथील अमानुष घटनेचा मानवत येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघांच्या वतीने निषेध

जळगाव येथील अमानुष घटनेचा मानवत येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघांच्या वतीने निषेध 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.१३: मानवत येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ
च्या वतीने दिनांक १२ नोव्हेंबर रोजी मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार  मानवत मार्फत  निवेदन सादर करुन पिडित चर्मकार समाजातील तरुणीवर सामूहिक बलात्कार करून विष पाजुन मारण्याचे अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करून फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमुद केले आहे की चर्मकार समाजातील २० वर्षीय युवती मामाच्या गावी टोळी ता. पारोळा जि. जळगाव येथे दिवाळीसाठी आली असता. गावातील चार नराधमांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला विष पाजले व मेली समजून सोडून दिले. या अमानुष घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघ जाहीर निषेध करीत आहे व  पिडितावर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फास्टट्रॅक कोर्टात केस चालून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी पिडिताच्या  कुटुंबाचे पुनर्वसन शहरात करण्यात यावे व त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे,ज्या पोलिसांनी पिडिताचा  मृत्यूपूर्व जबाब घेतला नाही त्या सर्व पोलीसांना सह आरोपी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,पडळी ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील चर्मकार समाजाच्या २० वर्षीय तरूणीवर बलात्कार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.  यामध्ये जर लवकरात लवकर कारवाही नाही झाली तर राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष मुरली ठोंबरे,उपअध्यक्ष
ज्ञानेश्वर पानझाडे,सल्लागार विलास पतंगे,शहर प्रमुख हनुमान नांदुरे,कार्याध्यक्ष नितीन हाळणे,
युवा अध्यक्ष परमेश्वर पाटील,केशव पवार
अर्जुन ठोंबरे,गणपत ठोंबरे,राधेश्याम कुरील,रमेश केंदळे,राजेंद्र कांबळे,रामेश्वर आगवणे आदीच्या स्वाक्षरी आहेत.


Sunday, November 1, 2020

पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मानवत येथे नेञरोग तपासणी शिबीर,

मानवत येथे नेञरोग तपासणी शिबीर संपन्न.
मानवत / प्रतिनिधी 
दि.१: टायगर ग्रुप चे महाराष्ट्र अध्यक्ष पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१ नोव्हेंबर रोजी मानवत येथील वाघेश्वर मंदिर स्वामी दिव्यानंद उद्यान येथे नेत्ररोग तपासणी निदान शिबिराचे आयोजन सुनील भाऊ जाधव व प्रीतम भाऊ खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते,
 या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर असोसिएशनचे मानवत अध्यक्ष डॉ.योगेश तोडकरी, नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ.मोहन कुमावत, नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ. खान शकिल अहेमद, युवा नेते यश दादा कत्रुवार, टायगर ग्रुपचे समीर शेख यांच्या हस्ते करुन कार्यक्रम सुरु करण्यात आले .या शिबिरात ४२ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली यात १२ नागरीकांना  मोती बिंदू झालेले आढळले यांना यावेळी  योग्य मार्गदर्शन करून  परभणी येथे शस्त्रक्रिया साठी पाठविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास माजी आमदार मोहनभाऊ फड,युवानेते डॉ.अंकुश लाड,सुरेश भुमरे,बाबा हालनोर,दत्तराव चौधरी यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीर शेख, अविनाश दहे,शुभम दहे, अनिल पडूळकर वाजेद भैया शेख, दिपक लाड, अभी सांगुळे , वसीम शेख आदींनी परिश्रम घेतले.