Tuesday, June 26, 2018

मानवत येथील बेलदार फंगशन हॉल येथे २७ जुनरोजी सकाळी ८-३० वाजता ग्रामीण रुग्णालय मानवत च्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन.

मानवत येथील बेलदार फंगशन हॉल येथे २७ जुनरोजी  आरोग्य शिबिराचे आयोजन.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२६: ग्रामीण रुग्णालय मानवत च्या वतीने  दि.२७ जुनरोजी सकाळी ८-३० वाजता बेलदार फंगशन हॉल येथे नागरीकासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबीरात ४० वर्षावरील नागरीकांची संपुर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तसेच गर्भवती महिलाची हि तपासणी करण्यात येणार आहे व नेञतपासणी ,शुगर तपासणी,रक्त तपासणी व बीपी तपासणी अशा सर्व तपासण्या या शिबीरात करण्यात येणार आहे.या आरोग्य तपासणी साठी शिबीर प्रमुख  वैद्यकीय अधिकारि  डॉ.नजम शेख,स्ञीरोग तज्ञ डॉ.मनीषा गुजराथी ,नेञ चिकित्सा अधिकारि डॉ.कुमावत,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारि श्री.टोनपे,औषध निर्माण अधिकारि सचीन कदम,समुपदेषक राजु कच्छवे ,प्रयोगशाळा तंञज्ञ श्री.कपील भरड,प्रयोगशाळा तञज्ञ कु.करवलकर ,एस.एस.मानवतकर आदी नागरीकांच्या तपासणीसाठी  उपस्थीत राहणार आहे.तरी या आरोग्य शिबीराचे लाभ नागरीकांनी घेण्याचे आवाहान वैद्यकीय अधिक्षक नरेद्र वर्मा,शिबीर प्रमुख  वैद्यकीय अधिकारि  डॉ.नजम शेख यांनी केले आहे.

Thursday, June 14, 2018

मानवत येथील युवक पुर्णा रेल्वेस्टेशनवरुन बेपत्ता !

मानवत येथील युवक पुर्णा रेल्वेस्टेशनवरुन बेपत्ता !
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१४: मानवत येथील राहणारा युवक नाव शेख मुस्तफा शेख.अब्दुल करीम वय १९ हा युवक पुर्णा रेल्वेस्टेशन वरुन दि.१२ जुन रोजी सध्याकाळ पासुन बेपत्ता झाला आहे.
या विषयी प्राप्त माहितीनुसार मानवत शहरातील बिहारी कॉलनी येथील  रहिवाशी शेख मुस्तफा शेख.अब्दुल करीम वय १९ हा युवक कामासाठी हिगोली येथे गेला होता पण रमजानईद साठी तो मानवतला दि.१२ जुन रोजी हिगोली येथुन मानवतकडे निघाला होता व सध्याकाळी ६ वाजुन ३५ मिनीटाला त्याने घरी फोन करुन आपण पुर्णा रेल्वेस्टेशन ला उतरलो आहे आसे त्याने कळविले माञ त्यानंतर त्याचा काहि पत्ता लागला नाही व फोन हि बंद येत आहे युवकाच्या वडिलांनी मुलगा घरी कसकाय पोहचला नाही म्हणुन हिंगोली येथे व जवळपास च्या नातेवाईकाकडे विचारपुस केली पण त्या युवकाचा काहि ठावठिकाणा बातमी लिहिपर्यत लागलेला नाहि प्राप्त माहितीनुसार हिगोली पोलीसस्टेशन येथे मिसिंग असल्याबाबत तक्रार अजुन दाखल झाली नाही युवकाच्या अचानकपणे बेपत्ता झाल्याने त्याचे आई वडिल काळजी करत असुन हा युवक कोणास कुठे दिसल्यास  ९०४९०५०६०२ या मोबाईल क्रमाकावर कळवावे असे आवाहान त्याचे वडिलाकडुन  करण्यात येत आहे.

Thursday, June 7, 2018

पाथरी येथील ॐ कार मल्टीस्पेशालिटि हॉस्पीटल येथे येत्या रविवारी दि.१० जुन रोजी वेध भविष्याचा कार्यक्रमाचे आयोजन.

पाथरी येथे वेध भविष्याचा कार्यक्रमाचे आयोजन.

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

दि.०७: पाथरी येथील  ॐ कार मल्टीस्पेशालिटि हॉस्पीटल येथे  येत्या रविवारी दि.१० जुन रोजी १० वी १२ वी पास विद्याथ्याना पुढिल शिक्षणासाठी  मार्गदर्शन करण्यासाठि सर्व  क्षेत्रातील मान्यवर मंडळी मार्गदर्शन करणार आहेत .           
या एकदिवशीय कार्यशाळेचा उपयोग परिसरातील सर्व १०वी व १२वी उत्तीर्ण अनुत्तीर्ण केव्हा निकाल बाकी आहेत अशा प्रत्येक विद्यार्थिना मार्गदर्शन होणार आहे . 
सर्व मुलांपर्यंत हा निरोप जाणे अतिशय महत्वाचे आहे जेणे करून त्या विध्यार्त्याला त्याच्या भविष्यासाठी योग्य तेच क्षेत्र निवडता येईल .                            कार्यशाळेचे हे प्रथम वर्ष आहे  तरी सर्व विद्यार्थि मिञानी व पालकानी व नागरिकांनी तसेच पञकार मिञानी  मोठ्याप्रमाणात उपस्थीत राहण्याचे आवाहान या कार्यक्रमाचे संयोजक डॉ.जगदिश शिंदे ॐकार मल्टीस्पेशालिटि हॉस्पीटल पाथरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Friday, June 1, 2018

हटकरवाडि च्या उपसरपंचपदी श्रीमती नाजरिन रुस्तुम शेख यांची बिनविरोध निवड!!!

हटकरवाडीच्या सरपंचपदी सौ. कांताबाई नाईक यांची एकमताने निवड.
[]तर उपसरपंचपदी नाजरिन रुस्तुम शेख यांची निवड[]
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.०१:  दोन महिन्यांपासून रिक्त झालेल्या हटकरवाडी तालुका मानवत येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. कांताबाई विठ्ठलराव नाईक यांची गुरूवारी दि ३१ मे रोजी  एकमताने निवड करण्यात आली.
सरपंचपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा निवडणूकपुर्व अटिमुळे  माजी सरपंच सखाराम जोरवर व सौ. कांताबाई नाईक यांच्यात झाला होता. या करारानुसार सरपंच श्री.जोरवर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही निवड लांबणीवर पडली. दरम्यान  गुरूवारी ३१ मे रोजी  सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या उपस्थितीत निवड सभा बोलाविण्यात आली. यावेळी सर्व नऊ सदस्यांनी उपस्थिती लावली. सर्व सदस्यांनी एकमताने सौ.कांताबाई  विठ्ठलराव नाईक यांची निवड केली. तर उपसरपंचपदी नाजरिन रुस्तुम शेख यांचेच नाव कायम ठेवण्यात आले .त्यानंतर पिठासीन अधिकारी वसंतराव वाघमारे यांनी या निवडीला अधिकृत दुजोरा दिला. ग्राम विकास अधिकारी परमेश्वर घाटगे यांनीही पीठासीन अधिकार्यांना सहाय्य केले. यावेळी सरपंच सौ. नाईक यांचा सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बिट जमादार शेख व पोलीस नाईक जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त दिला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला.

उपसरपंचपदी नाजरिन रुस्तुम शेख यांची बिनविरोध निवड !

हटकरवाडीच्या सरपंचपदी सौ. कांताबाई नाईक यांची एकमताने निवड.
[]तर उपसरपंचपदी नाजरिन रुस्तुम शेख यांची बिनविरोध निवड[]