Sunday, January 30, 2022

आफताब ए सहाफत पुरस्काराने हाफिज बागवान नांदेड येथे सन्मानित

आफताब ए सहाफत पुरस्काराने हाफिज बागवान सन्मानित 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
खादमीन - ए - उम्मत नांदेड येथील संस्थाच्या वतीने  सामाजिक  व पञकारीतेत उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तिनां संस्थे मार्फत दरवर्षी सन्मानित करण्यात येते या निमित्त दि.३० जानेवारी २०२२ रविवार रोजी अनवर गार्डन देगलुर नाका नांदेड येथे जिल्हास्तरीय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते  यात (आफताब ए सहाफत ) हा पञकारीतेतील  पुरस्कार  दै.औरंगाबाद टाईम्स चे पञकार मानवत - पाथरी तालुका प्रतिनीधी अब्दुल हफिज बागवान यांना मान्यवरांच्या उपस्थीतीत प्रशस्तीपञ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  यावेळी व्यासपिठावर खादमीन ए  उम्मत संस्थाचे अध्यक्ष आबेद सर, उपाध्यक्ष मकसुद सर तर 
प्रमुख पाहणे म्हणुन मौलाना मुफती सय्यद सादेक मोईयोदीन फहीम मोलाना ,मुफती मोहम्मद अयुब मोलाना मुफती कौसर अफफाक, मौलाना मुफ्ती गाजी ,सय्यद उमीर ,अहैमद मौलाना ,अयुब वकील एम ज ऐद सीदीकी वकील मोहम्मद अब्दुल रहेमान सिद्दीकी ,अब्दुल सत्तार सेट काजी मोहम्मद रफीक,
 हाफेज लतीफ फुरखानी ,मोहम्मद हुसैन ,जावेद बागवान , वसीम अन्सारी उपस्थीत होते.पुरस्कार मिळाल्या बद्दल अब्दुल हाफिज बागवान यांचे पञकारिता क्षेञातुन त्यांचे अभिनंदन होत आहे व त्यांना शुभेच्छा मिळत आहे.

Friday, January 7, 2022

मानवत भुषण विधीतज्ञ गणेश मोरे पाटिल यांचा वाढदिवस ऊत्साहात साजरा

मानवत भुषण विधीतज्ञ गणेश मोरे पाटिल यांचा वाढदिवस ऊत्साहात साजरा 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत शहरातील डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष  सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे  प्रगतशील शेतकरी तथा उद्योजक  पोलिस मित्र,आरोग्य मित्र  गोर गरीब लोकांना मदत करणारे युवा बेरोजगार मुलांना त्यांचा रोजगार मिळून देणारे विधीतज्ञ  गणेश मोरे  पाटील यांच्या  वाढदिवसानिमित्त  त्यांच्या ईष्ट मिञ ,राजकिय मंडळी ,पञकार संघाकडुन  व शहरातील विविध सामाजिक संस्था व  शुभचिंतकाकडुन मोठ्या ऊत्साहात ७ जानेवारी  रोजी वाढदिवस  साजरा  करण्यात आला हार फुल व विविध सप्रेम भेटवस्तु देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पञकार संघाचे कार्याध्यक्ष  भैय्यासाहेब ,राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र संघटक तथा दै.गाववालाचे मानवत तालुका प्रतिनीधी  मुस्तखीम बेलदार ,अलीम खान,ईरफान बागवान ,हाफिज बागवान आदी उपस्थीत होते.


Monday, January 3, 2022

मानवत तालुका पञकार संघाच्या अध्यक्षपदी शामभाऊ झाडगावकर यांची बिनविरोध निवड

मानवत तालुका पञकार संघाच्या अध्यक्षपदी शामभाऊ झाडगावकर यांची बिनविरोध निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत तालुका पञकार संघाच्या अध्यक्षपदी शामभाऊ झाडगावकर यांची बिनविरोध निवड दि.२ जानेवारी रोजी करण्यात आली.
शहरातील कृषी ऊत्पन्न बाजार समिती येथील कार्यालयात या बैठकिचे आयोजन मावळते अध्यक्ष किशन बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या बैठकित सर्वानुमते अध्यक्षपदी शामभाऊ झाडगावकर ,सचिवपदी  विलासराव बारहाते,कार्याध्यक्षपदी भैय्यासाहेब गायकवाड , डॉ. सचिन चिद्रवार,उपाध्यक्षपदी रमेशराव यादव , प्रमोद तारे ,सहसचिवपदी इरफान बागवान ,अलीम खान पटेल,कोषाध्यक्षपदी प्रा. गोविंद गोलाईत ,
सहकोषाध्यक्षपदी  सचिन मगर तर सल्लागारपदी      
अश्रोबा केदारे , के. डि. वर्मा ,गोपाळराव लाड यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पञकार संघाचे माजी सचीव पञकार अरुन मानेकर यांचे दुखद निधन झाल्याबद्दल  दोन मिनीट मौन ठेवुन त्यांना  आंदराजली वाहण्यात आली तसेच नूतन कार्यकारणीचे हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पञकार कचरुलाल बारहाते,संजय नाईक,मुस्तखीम बेलदार ,हाफिज बागवान ,प्रसाद जोशी,अनील चव्हाण ,सय्यद वसीम यांच्यासह  सर्व सन्माननीय सदस्य तालुका पत्रकार संघ मानवत उपस्थीत होते.

Sunday, January 2, 2022

मानवत तालुकास्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हमदापूर शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हमदापूर शाळेचे घवघवीत यश
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत तालुक्यातील हमदापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे . याबाबत सविस्तर वृत असे की , मानवत येथे दिनांक ३१ डिसेंबर रोजी तालुका संशोधन केंद्राचा वतीने केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
यावेळी हमदापूर जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दुसरी वर्गातील विदयार्थीनी कु . मनस्वी विक्रम शिंदे हिने मानवत तालुक्यातील प्रथम क्रमांक मिळविला 
तालुकास्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून लाभलेले शिक्षक हमदापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नजात पठाण सर , श्याम सुर्यवंशी सर, हनुमंत नागरगोजे सर , योगेश कांबळे सर, न्याजुद्दीन शेख सर , कल्पेश खैरनार सर या सर्व शिक्षकांचे व यशस्वी विदयार्थ्यांचे व पालक श्री.विक्रम बालासाहेब शिंदे यांचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी डी . आर . रणमाळे साहेब , केंद्रप्रमुख  सौ.माया जानराव मॅडम व सावरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख शिरीषजी लोहट सर , यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले . तसेच स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल तालुका गट साधन केंद्राच्या टीमचे ही विशेष आभार मानले. तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.अंजली नामदेव उपाडे व उपाध्यक्ष श्री.भगवान निळे तसेच सर्व सन्माननीय सदस्य यांनी स्पर्धक विद्यार्थ्यानी व शिक्षकवृंद यांचे अभिनंदन केले.