Monday, July 19, 2021

गुन्हेगारांचे कर्दनकाळ मानवत पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांची बदली

गुन्हेगारांचे कर्दनकाळ मानवत पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांची बदली
मानवत / मुस्तखीम बेलदार 
गुन्हेगाराचा कर्दनकाळ ठरलेले पोलीस अधिकारी ज्याच्या नावाने दोन नंबर धंदेवाल्यांचे धाबे दणाणत जात असे ख्याती प्राप्त मानवत पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांची परभणी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अधीक्षक कार्यालय परभणी येथे बदली झाली आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे हे मानवत पोलीस स्टेशन ला हजर झाल्यापासून गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर ,अवैध प्रवासी वाहतूक ,अवैध धंदे ,अवैध दारु विक्रेतावर ,राशन चा काळाबाजार करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली यामुळे मानवत तालुक्यातील अवैध व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले होते . पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांनी मानवत तालुक्यातील इटाली येथील पाण्याच्या कॅनल मध्ये कुजलेली अज्ञात मयती ची ओळख पटवून गुन्ह्यांचा छडा लावुन आरोपींना अटक केली होती त्याच प्रमाणे मागील दोन वर्षापासून कोरोणा महामारी च्या काळात मानवत शहर व तालुक्यात चागले कार्य केले होते शहरात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमी ते प्रयत्नशिल राहत होते नागनाथ तुकडे हे एक शिस्तप्रिय  प्रमाणिक मनमिळावू पोलीस अधिकारी म्हणून मानवत तालुक्यातील नागरिकांच्या मनात त्यांनी आपुलकिचे स्थान निर्माण केले होते.

Wednesday, July 14, 2021

कोरोणाच्या सर्व नियमांचे पालन करुन ईदुल अज्हा सण मुस्लिम बांधवानी साजरा करावा - पो.नि.चंन्द्रशेखर चौधरी

कोरोणाच्या सर्व नियमांचे पालन करुन ईदुल अज्हा सण मुस्लिम बांधवानी साजरा करावा - पो.नि.चंन्द्रशेखर चौधरी
मानवत / मुस्तखीम बेलदार 
  मुस्लिम धर्मियांत महत्वपुर्ण मानला जाणाऱ्या ईदुल अज्हा हा सण दि.२१ जुलैरोजी साजरा होणार असुन या निमित्त  मानवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ जुलै रोजी बैठकिचे आयोजन मानवत पोलीस स्टेशन येथे करण्यात आले होते.
 बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, राज्यात कोरोणाची परिस्थिती लक्षात घेता गेल्या वर्षापासून सर्व सार्वजनिक उत्सव कार्यक्रम आणि सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले 
आहेत कोरोणाचा प्रार्दुभाव  जरी कमी होत असला तरी अद्यापही धोका कायमच आहे
येत्या २१ जुलै रोजी ईदुल अज्हा हा सण साजरा केला जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केले असून गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी ईद वर कोरोणाचा सावट आहे 
  त्यामुळे कोरोणाच्या  सर्व नियमांचे पालन करून हा सण मुस्लिम बांधवानी साजरा करावा  
या काळात नागरिकांनी शारीरिक अंतर ठेवावे, मास्कचा वापर आणि सॕनिटायझरचा वापर करुन ईदची नमाज घरीच अदा करावी असे आवाहान यावेळी केले.  या बैठकिस  सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार ,पोलीस उपनिरीक्षक रमेश गीरी,जमियत उलमा ऐ हिन्द चे तालुकाध्यक्ष मौलाना मोहम्मद सलीम, मुक्ती मोहम्मद मुजाहिद,  मौलाना मोहम्मद असलम, मौलाना मोहम्मद मुजाहिद, हाफेज खिजर, मौलाना तौफिक,पञकार ईरफान बागवान ,पञकार  एम. ए. रिजवान , माजी नगरसेवक हबिब भडके, समाजसेवक शेख मुस्ताक, वसीमभैय्या कुरेशी , हाजी रफिक कुरेशी आदी उपस्थित होते .हि बैठक यशस्वी करण्यासाठी गोपिनिय शाखेचे नारायण ठमके यांनी परिश्रम घेतले.

Monday, July 12, 2021

मानवत येथे पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन

मानवत येथे ईधन दरवाढ विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने  आंदोलन
मानवत / मुस्तखीम बेलदार 
 महागाईचा दाह सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आता इंधन दरवाढीचेही चटके बसू लागले आहेत. 
देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून,
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांच्या खिशालाही झळ बसू लागली आहे. 
गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्यानं वाढत आहे. 
महाराष्ट्रासह अनेक राज्यात पेट्रोलच्या दरांनी केव्हाच शंभरी ओलांडली असून, डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे याच्या निषेधार्थ मानवत तालुका काँग्रेस कमिटिचे वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ व वाढत्या महागाई विरोधात केन्द्र सरकारचा निषेध करत महाराणा प्रताप चौक येथुन पेट्रोल पंप पर्यत  सायकल रँली काढुन आंदोलन करण्यात आले.
 या वेळी बाळासाहेब फुलारी, जिल्हा परीषद  सदस्य बाबूराव नागेश्वर, तालुकाध्यक्ष सिध्देश्वर लाड़ाने,मानोली सरपंच  ज्ञानेश्वर शिंदे,शाम चव्हाण,  बाबाजी अवचार, नगरसेवक आंनद भदर्गे , परभणी जिल्हा युवक कॉंग्रेसचे सचिव वसीम कुरेशी,  आसाराम काळे,  खय्युम बागवान आदी कॉग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.यावेळी  सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार ,सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Thursday, July 1, 2021

डॉक्टर म्हणजे देवदूतच - उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल

डॉक्टर म्हणजे देवदूतच - उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत येथे १ जुलै रोजी डॉक्टर दिवसचे औचित्य साधुन  पत्रकार इरफान बागवान यांच्यावतीने बाल रोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे व सौ.माधुरी काळे यांचा सत्कार सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल ,डॉ. मोरे ,पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी ,उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, शिवसेना शहर प्रमुख बालाजी दहे ,पत्रकार भैय्यासाहेब गायकवाड ,हाफिज बागवान ,अलिम खान पटेल, शेख मुस्ताक ,आसिर खान ,शगीर खान ,रफिक बागवान यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी सेलू येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना  ते म्हणाले की
आजही गावखेड्यांत डॉक्‍टरास परमेश्वराचे रूप मानले जाते. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यानंतर अनेकांना डॉक्‍टरांमुळे पुनर्जन्म मिळाला, अशी भावना असते.  ते तसे बोलूनही दाखवितात. अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्‍टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला "देवदूत' ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. भारतात एक जुलै हा दिवस "डॉक्‍टर्स डे' म्हणून साजरा केला जातो.सध्या भारतातील सर्वच डॉक्‍टर "कोविड-१९' अर्थात "कोरोना'विरोधात लढा देत आहेत. आपला जीव धोक्‍यात घालून रुग्णांचे प्राण वाचवीत आहेत असे ते म्हणाले  त्यानंतर मानवत येथील डॉ. निनांद  दगडू ,डॉ.जुबेर खान ,डॉ.सय्यद अलीम,डॉ. भारत कदम,डॉ. मनीषा गुजराथी तसेच ग्रामीण रुग्णालय येथील प्रशांत खिल्लारे व डॉक्टरांचा ही सत्कार करण्यात आला.