Saturday, September 25, 2021

मानवत राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी पंकज आंबेगावकर यांची निवड

मानवत राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी पंकज आंबेगावकर यांची निवड
[] जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान []

मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवारी दि.२४ सप्टेंबर रोजी  पाथरी येथे आयोजित मेळाव्यात त्यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले .

आ . बाबाजानी दुर्राणी सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा.१०० शिलाई मशिन व ५० पिठाच्या गिरणी वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता . यावेळी पंकज आंबेगावकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले . यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री राजेश टोपे,
आ. बाबाजानी दुर्राणी ,
मा .खा . जयसिंगराव गायकवाड , मा जि.प .अध्यक्ष राजेश विटेकर,राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के , नगराध्यक्षा मिना नितिन भोरे,
मा .जि.प .सदस्य दादासाहेब टेंगसे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मुंजाजी भालेपाटील , मुजाहिद खान, अनिलराव नखाते , तबरेज दुर्राणी , मानवतचे तालुकाध्यक्ष संतोष लाडाने यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी पंकज आंबेगावकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांना सर्वच स्तरारुन शुभेच्छा मिळत असुन पुढिल नगरपरिषदच्या निवडणुकित याचा फायदा पक्षाला होणार आहे.

Saturday, September 18, 2021

मोहम्मद ईस्माईल सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

मोहम्मद ईस्माईल सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
 जिल्हा परिषद प्रशाला  पाथरी येथील शिक्षक मोहम्मद ईस्माईल  याना यंदाचा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या निवडी बद्दल च्या प्रस्तावास मान्यता दिल्या बाबत चे विभागीय आयुक्त कार्यलयाचे पत्र नुकतेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले असून त्या पत्रान्वये ह्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण कोरोना आजाराच्या मार्गदर्शक तत्व नुसार करण्यात येणार आहे . 
राज बेलदार समाजातील भटक्या जमातीतुन येणारे पाथरी  येथील भुमीपुञ मोहम्मद ईस्माईल  सर यांनी जिल्हा परिषद केंद्रीय माध्यमिक शाळेत काम करीत असताना शाळेतील होतकरू मेहनती विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे तसेच  कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये  विद्यार्थ्यांचा संपर्क साधून शिक्षण चालू ठेवून शांत स्वभाव सर्वाना मन मिळावू असे काम त्यांनी आपल्या कर्त्यव्य पार पडताना केले म्हणूनच त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या असला चे बोलले जात आहे. पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल राज बेलदार संघटनाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि ,मा.नगरसेवक सय्यद नोमान हुसैनी कौसर,सय्यद विखार ईलाहि ,मुस्तखीम बेलदार , त्यांचे शाळेतील शिक्षक आदी नातेवाईकांनी   अभिनंदन करत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Friday, September 3, 2021

औरंगाबाद येथे शिक्षक दिनानिमित्त आदर्श व गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन.

शिक्षक दिनानिमित्त आदर्श व गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन.
औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार 
औरंगाबाद महानगरपालिका क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा व केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंदिरानगर बायजीपुरा  औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक क्षेत्रात समाज व विद्यार्थी हिताचे विविध ऊपक्रम राबवुन शैक्षणिक दर्जा उंचावणाऱ्यां आदर्श व गुणवंत शिक्षकाचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. ६ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी तीन वाजता मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केन्द्र सभागृह मजनु हिल गार्डन समोर औरंगाबाद येथे केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.डॉ.संतोष टेगले उपायुक्त  शिक्षण विभाग प्रमुख मनपा औरंगाबाद तर प्रमुख अतिथी म्हणून मा श्री. आ. अतुल सावे आमदार पूर्व औरंगाबाद तथा माजी उद्योग मंत्री यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.
तर प्रमुख उपस्थीती म्हणुन माननीय राखीताई प्रशांत देसरडा मा. नगरसेवक तथा मानंद अध्यक्षा  शालेय व्यवस्थापन समिती , मा. डॉ. संजीवनी मुळे प्राचार्य शासकीय बीएड महाविद्यालय औरंगाबाद, मा. श्री संजीव सोनार सांस्कृतिक अधिकारी मनपा औरंगाबाद, मा.श्रीमती छायाबाई चव्हाण अध्यक्षा  शालेय व्यवस्थापन समिती इंदिरानगर बायजीपुरा , मा. डॉ. जी एम गायकवाड ज्येष्ठ अधिव्याख्याता शासकीय बीएड कॉलेज औरंगाबाद, मा. श्री कैलास भाऊ गायकवाड ज्येष्ठ मा. नगरसेवक, मा. श्री रामनाथ थोरे सर  शिक्षणाधिकारी मनपा औरंगाबाद, मा.श्री रमेश जायभाये मा. नगरसेवक इंदिरानगर बायजीपुरा , मा.श्री संजय जाईबहार कार्याध्यक्ष शालेय  व्यवस्थापन समिती, मा. श्री ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षा मनपा औरंगाबाद व सर्व पदाधिकारी शालेय व्यवस्थापन समिती इंदिरानगर बायजीपुरा  यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास सर्व शिक्षकांनी  उपस्थीत राहण्याचे आवाहान मुख्यध्यापक  श्री देवेंद्र रूपरावजी सोळंके , शिक्षक वृंद व कर्मचारी इंदिरानगर बायजीपुरा  व चिकलठाणा यांनी केले आहे.

Wednesday, September 1, 2021

मानवत नगर परिषद येथे सी सी टिव्ही कॅमेराचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न

मानवत नगर परिषद येथे सी सी टिव्ही कॅमेराचा लोकार्पण सोहळा संपन्न 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मागील काही दिवसांपासून मानवत शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते यापार्श्वभूमीवर मानवत नगर परिषदेने याची गंभीर दखल घेत शहरातील प्रमुख ठिकाणांवर एकूण ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा शब्द दिला होता अवघ्या काही दिवसातच दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करीत आज मान्यवरांच्या उपस्थितीत या सी सी टिव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा नगरपरीषद येथे दि.१ सप्टेंबर रोजी पार पडला.

या प्रसंगी पोलीस निरीक्षक सुभाष राठोड साहेब म्हणाले की, शहरातील महत्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आल्याने मानवत मध्ये यापुढे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने निगराणी राहणार असुन शहराची एकता व सुरक्षा कायम राखण्यासाठी नगर परिषदेचे हे कार्य चांगले असल्याचे सांगत कौतुक केले. सदरील कॅमेऱ्याचे कन्ट्रोल  ही आज मानवत पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आला.
नागरिकांची सुरक्षितता जोपासतानाच गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यासाठीच नगर परिषदेने हा उपक्रम राबवला. यापुढे सुद्धा गरज पडेल तेंव्हा अशा विविध कार्यासाठी नगर परिषद कार्यरत राहील व  नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचा प्रयत्न करेल असे युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रा. एस. एन पाटील सर, तहसीलदार श्री. फुफाटे साहेब, पोलीस निरीक्षक सुभाष राठोड साहेब, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, युवानेते डॉ.अंकुश लाड,वैद्यकीय अधीक्षक नरेंद्र वर्मा,नगरसेवक गिरीश जी कत्रुवार, बाबुराव हालनोर, गणेशशेठ कुमावत, मोहनराव लाड, दत्ता चौधरी, नगरसेवक विनोद रहाटे, श्रीकांत देशमुख, किरण बारहाते, समाजसेवक अफसर भाई,नगरसेवक  जमिल भाई,नगरसेवक  रहीम भाई, कार्यकारी अभियंता सय्यद अन्वर, अमोल तांदळे, असिस्टंट टाऊन प्लॅनर सचिन पवार, पत्रकार महासंघाचे अध्यक्ष किसनराव बारहाते, अंकुशराव फड, सुरेशराव कच्छवे, वाजेद भाई, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी , अधिकारी व शहरातील इतर व्यापारी उपस्थित होते.