Wednesday, July 6, 2022

माजी आमदार मोहनभाऊ फड यांच्यावतीने माननीय उपमुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन सत्कार करण्यात आला

मा.आ.मोहनभाऊ फड यांनी मा. उपमुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस यांचा केला सत्कार
मानवत / मुस्तखीम बेलदार 
 दिनांक ६ जुलैरोजी  मुंबई येथे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची पाथरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार मोहनभाऊ फड यांनी भेट  घेऊन  शुभेच्छा दिल्या तसेच  पाथरी विधानसभा मतदारसंघ सदर्भात  महत्त्वपूर्ण चर्चा केली आगामी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुका साठी मा.आ.मोहनभाऊ फड हे सक्रिय झाले असल्याचे दिसत आहे.

Wednesday, June 15, 2022

नारेगाव ऊर्दु प्राथमिक शाळा येथे शाळा पुर्व तय्यारी मेळावा संपन्न .


नारेगाव ऊर्दु प्राथमिक शाळा येथे शाळा पुर्व तय्यारी मेळावा संपन्न 
औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार 
 दि. १५  जून २०२२ रोजी नारेगाव येथील महानगर पालिका उर्दू शाळा येथे केन्द्रिय मुख्याध्यापिका श्रीमती  ताजवे मँडम व मुख्याध्यापक श्री. रहिम सर यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२-२३ या शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने  शाळा  प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा २  यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन  डाएटच्या अधिव्याख्याता  श्रीमती भारती फिल्लारे मॅडम , श्री.झेरपे सर,व  मल्लीकार्जुन सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी पालकांनी ऊत्साहपुर्ण हजेरी लावली यावेळी विद्यार्थीचे गुलाबपुष्प व चाँकलेट  देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शिक्षकांनी वेगवेगळी खेळनी व कृतीयुक्त पध्दतीने विद्यार्थ्याची क्षमता चाचणी केली यावेळी सर्व शिक्षक वृंद, पालक व शाळा प्रवेश पात्र विद्यार्थी  उपस्थीत होते.

Tuesday, May 17, 2022

आंबेगाव - सावळी सोसायटीवर पंकज आंबेगावकर यांचे वर्चस्व .

आंबेगाव - सावळी   सोसायटीवर पंकज आंबेगावकर यांचे वर्चस्व 

[] शेतकरी विकास पॅनेलचे सर्व ११ उमेदवार विजयी []
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत तालुक्यातील आंबेगाव - सावळी येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या गटाने सर्वच्या सर्व ११ जागा  जिंकत एकहाती वर्चस्व प्राप्त केले आहे निवडणुकीचे निकाल लागताच आंबेगावकर यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला.
विविध कार्यकारी सेवा संस्था आंबेगाव या संस्थेची पुढिल पंचवार्षिक संचालक निवडीसाठी रविवारी दि. १५ मे रोजी मतदान पार पडले विद्यमान बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर यांच्या हा मतदारसंघ असल्याने या निवडणुकीसाठी विशेष महत्त्व प्राप्त झाले होते  परिवर्तन शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून विरोधकांनी  पंकज आंबेगावकर यांच्याविरोधात मोट बांधली होती त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली  होती मात्र ११ जागेसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत सभापती पंकज आंबेगावकर याच्या शेतकरी विकास पॅनेलचने   सर्व ११ जागावर  विजय संपादन करीत सोसायटी ताब्यात घेतली या निवडणुकित  सर्व अकरा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले .
या निवडणुकीत विजयी उमेदवार पंकज जाधव ,केशव काळे, दत्ता काळे ,बाबासाहेब काळे ,लक्ष्मण काळे ,मीरा काळे ,गंगा काळे, ज्ञानेश्वर रासवे, चंद्रकांत जाधव, दत्ता जाधव, मारुती जाधव यांचा समावेश आहे तर राखीव प्रवर्गातील दोन जागा रिक्त राहिल्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शेख उस्मान , अण्णासाहेब बारहाते  व होगे यांनी काम पाहिले.
विशेष म्हणजे जिल्हा पातळीवर नेत्यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते या निकालाने पुढे होणाऱ्या मानवत  बाजार समिती निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत हे माञ  निच्शित आहे असे राजकिय जाणकार म्हणत आहेत.

Sunday, April 24, 2022

सेलु येथील शेख जिशान शेख मुखीद बेलदार याचा पहिला रोजा

सेलु येथील शेख जिशान याचा पहिला रोजा 
सेलु / प्रतिनीधी 
सेलु  येथील  राजगल्ली  परीसरातील रहिवासी शेख जिशान शेख मुखीद वय ०८ वर्ष यांनी आपल्या आयुष्यातील  पहिला  (उपवास )रोजा पुर्ण केल्याबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.
मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरु असुन  त्यात ऊन्हामुळे  तीव्रतेमुळे   चांगलाच कस लागत आहे परंतु इस्लाम धर्माच्या पाच कर्तव्य मधील उपवास रोजा हा एक प्रमुख कर्तव्य मानला जातो त्यामुळे उष्णतेच्या तीव्रतेचा काहीही विचार न करता उपवास धरणारे अल्लाच्या श्रद्धे साठी उपवास रोजा ठेवतात यात लहान मुलेहि आपल्या आयुष्यांचा पहिला रोजा ठेवतात याचीच प्रचिती म्हणुन आपल्या वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी शेख जिशान शेख मुखीद बेलदार यांनी आपल्या जीवनातला पहिला रोजा ठेवला जवळपास उपवास हा १४ तासाचा असून उपवासात पाणी पिणे सुद्धा जमत नसते सध्या उन्हाचा पारा चढला असतानासुध्दा शेख जिशान शेख मुखीद बेलदार  यांनी उपवास ठेवल्यामुळे त्यांचे आई,आजी ,वडिल शेख मुखीद बेलदार , चुलते शेख मैनु बेलदार ,शेख मोसीन बेलदार  ,हाजी शेख सखाऊद्दिन , मुस्तखीम बेलदार ,एकबाल राज ,अखील राज,मोबीन बेलदार ,शकिल राज  ,समीर राज ,नवीद राज यांच्यासह राजगल्ली   परीसरातील  नागरिक या चिमुकल्याचे   कौतुक करीत शुभेच्छा देत आहे.

Saturday, April 2, 2022

ईधन दरवाढ विरोधात मानवत युवक कॉग्रेसच्या वतीने आंदोलन


ईधन दरवाढ विरोधात मानवत  युवक कॉग्रेसच्या वतीने  आंदोलन
मानवत / मुस्तखीम बेलदार 
कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आदेशाने मोदी सरकारच्या महागाई विरोधात महागाई मुक्त भारत आंदोलन मानवत येथील राम राजेराम कञुवार पेट्रोल पंपावर युवक काँग्रेस च्या वतीने ईधन दरवाढ व गँस दरवाढ विरोधात श्रीराम जाधव युवक कॉग्रेस पाथरी विधानसभा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी ईधन दरवाढ विरोध करण्यासाठी युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात  जोरदार घोषणाबाजी करत पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी आलेल्या नागरीकांना पुष्पगुच्छ दिले व पेढे खाऊ घालुन आंदोलन केले.

यावेळी  कॉग्रेस पाथरी विधानसभा अध्यक्ष श्री राम जाधव पाटील, अमोल जाधव प्रदेश युवक कांग्रेस सचिव ,जगन्नाथ कोलते जिला उपाध्यक्ष, सिद्धेश्वर लाड़ाने तालुका अध्यक्ष, शाम भाऊ चौहान शहर अध्यक्ष ,बाबूराव बुरुड जिला परिषद सदस्य ,तूकाराम साठे सर ,बाबासाहेब अवचार, अंबादास तुपसमुंद्रे, नगरसेवक जमील भाई, अफसर भाई, रहीम भाई, शेख परवेज, सरजेराव देशमुख, सचिन जावंजाळ श्रीकांत पाटिल विद्यार्थी कांग्रेस जिला अध्यक्ष आसारामजी काळे , परमेश्वर निर्वळ, बालासाहेब भांगे, शिवराज पिंपळे विद्यार्थी कांग्रेस तालुका अध्यक्ष, नवनाथ जाधव पाटिल लोहरेकर विद्यार्थी कांग्रेस उपाध्यक्ष, वसीम भाई, युवानेते अमोल कुराड़े, मनोज चौहान, राजेभाऊ शिंदे, शिवराज कदम, करण गवळी, छत्रपति शिंदे, अनुरथ, रोडगे अर्जुन जाधव तुकाराम जाधव ,सुधाकर जाधव ,उद्धव घाटुळ मनोहर कदम, सुरेश होगे ,नाथा पींपळे, मुंजा भाऊ भिषे, सिद्धांत सुरवसे , शाहनूर भाई यांच्यासह मोठ्या संख्येने  युवक कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


Monday, March 28, 2022

प्रशांत बनसोडस् क्लासेसच्या वतीने गोरगरीब होतकरु विद्यार्थ्यासाठी मोफत क्लासेसची सुवर्ण संधी.

प्रशांत बनसोडस् क्लासेसच्या वतीने गोरगरीब होतकरु विद्यार्थ्यासाठी मोफत क्लासेसची सुवर्ण संधी

औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार 

आपल्या समाजात असे आपण  विद्यार्थी पाहतो ज्यांच्याकडे गुणवत्ता असूनदेखील ते क्लासेसची फीस न भरु शकल्यामुळे दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात  विद्यार्थीच्या  उज्ज्वल भवितव्यासाठी  प्रशांत बनसोडस् क्लासेसच्या माध्यमातून १० वीची परिक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक योजना घेऊन आले आहे ज्यामध्ये फक्त एक छोटी परीक्षा देऊन ते ११वी+१२वी+NEET/JEE साठी संपूर्ण दोन वर्षे मोफत शिक्षण मिळवू शकतात आता गुणवत्ता व पैशांअभावी हुशार विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी
आपल्या परिसरातील १० वीची परिक्षा देणार्‍या गुणवंत व गरजुवंत विद्यार्थ्यांपर्यंत प्रशांत बनसोडस् सुपर ३३ परीक्षेची माहिती पोहोचवा आणि आपल्या प्रशांत बनसोडस् क्लासेस परिवाराच्या या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा सदर परीक्षेसाठी दि. ०३ एप्रिल २०२२ च्या आधी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे तसेच पूर्वनोंदणीसाठी९८८८९९०१११,९८८८९९३१११ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहान प्रा. प्रशांत बनसोड पाटील
संचालक प्रशांत बनसोडस् क्लासेस, सिडको
   औरंगाबाद यांनी केले आहे .


Wednesday, March 23, 2022

मानवत येथील प्रा.नागनाथ कदम यांनी पी. एच .डी केल्या बद्दल सत्कार


मानवत येथील प्रा.नागनाथ कदम यांना पी. एच डी प्रदान
मानवत  मुस्तखीम बेलदार 
मानवत येथील फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नागनाथ कदम सर यांना फार्मास्युटिकल सायन्सेस मधील पी. एच डी भोपाळ विद्यापीठाने नुकतीच प्रदान केली त्यानी फार्मास्युटिकल अँड फयटोकेमिकल अनाललिसिस ऑफ कुरकमा मॅक्सिमा अँड हेलिनतस 
ट्यूबरोसिस प्लांटस या विषयावर संशोधन केले होते.डॉ. नागनाथ कदम यांची पीएचडी पूर्ण झाल्याबद्दल  उपप्राचार्य डॉ. तुकाराम मुंढे ,एम एस ई बी चे सहाय्यक अभियंता जाधव, पत्रकार कचरूलाल जी बारहाते, खरबा चे माजी सरपंच रामप्रसाद जी निर्मळ, विशाल दलाल, शुभम पंचांगे  विजय खरात ,विधीतज्ञ   गणेश मोरे पाटील यांनी त्यांचे  सत्कार करून अभिनंदन केले

Thursday, February 17, 2022

मानवत डॉक्टर्स संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.अंकुश लाड यांची निवड .

मानवत डॉक्टर्स संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.अंकुश लाड यांची निवड 
 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
   मानवत तालुका डॉक्टर्स संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ. अंकुश लाड, कार्याध्यक्षपदी डॉ. सचिन कदम तर सचिवपदी डॉ. सुशील नाकोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली . 
     नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष डॉ. योगेश तोडकरी उपस्थित होते . याप्रसंगी सन २०२२ ते २०२५ या तिन वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली . या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष पदी डॉ सचिन चिद्रवार, डॉ रामकिशन इक्कर, सहसचिव डॉ नामदेव हेंडगे, डॉ अक्षय खडसे, कोषाध्यक्ष डॉ विजय कहेकर, सहकोषाध्यक्ष डॉ भारत कदम , सीएमइ कमिटी प्रमुख डॉ राजकुमार लड्डा, डॉ स्वप्नील वट्टमवार, डॉ निनाद दगडू, डॉ विठ्ठल काळे यांची तर सल्लागारपदी जेष्ठ व्यावसायिक डॉ डी बी लड्डा, डॉ एन बी दगडू, डॉ एस एल ढमढेरे, डॉ आनंद कत्रूवार यांची निवड करण्यात आली . 
   महिला प्रतिनिधी म्हणून  डॉ शरयू खेकाळे, डॉ मनीषा गुजराथी, डॉ वर्षा वाघमारे यांची निवड करण्यात आली . 
    बैठकीस डॉ संतोष खडसे, डॉ विनोद सोमाणी, डॉ दिलीप जाधव, डॉ शशांक खेकाळे, डॉ सुरेश भिसे, डॉ राजेश लाटकर, डॉ श्याम वाघमारे, डॉ लहुकुमार सोळंके, डॉ नामदेव लेंगुळे, डॉ राजीव जाधव, डॉ रतन चामलवार
, डॉ हर्षद बाकळे, डॉ तन्मय कोक्कर , डॉ तुषार कोक्कर, डॉ अक्षय सोमाणी आदी जण उपस्थित होते .या वेळी बोलताना डॉकटरांसाठी वैद्यकीय भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार विविध कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ अंकुश लाड यांनी दिली .

Sunday, January 30, 2022

आफताब ए सहाफत पुरस्काराने हाफिज बागवान नांदेड येथे सन्मानित

आफताब ए सहाफत पुरस्काराने हाफिज बागवान सन्मानित 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
खादमीन - ए - उम्मत नांदेड येथील संस्थाच्या वतीने  सामाजिक  व पञकारीतेत उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तिनां संस्थे मार्फत दरवर्षी सन्मानित करण्यात येते या निमित्त दि.३० जानेवारी २०२२ रविवार रोजी अनवर गार्डन देगलुर नाका नांदेड येथे जिल्हास्तरीय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते  यात (आफताब ए सहाफत ) हा पञकारीतेतील  पुरस्कार  दै.औरंगाबाद टाईम्स चे पञकार मानवत - पाथरी तालुका प्रतिनीधी अब्दुल हफिज बागवान यांना मान्यवरांच्या उपस्थीतीत प्रशस्तीपञ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  यावेळी व्यासपिठावर खादमीन ए  उम्मत संस्थाचे अध्यक्ष आबेद सर, उपाध्यक्ष मकसुद सर तर 
प्रमुख पाहणे म्हणुन मौलाना मुफती सय्यद सादेक मोईयोदीन फहीम मोलाना ,मुफती मोहम्मद अयुब मोलाना मुफती कौसर अफफाक, मौलाना मुफ्ती गाजी ,सय्यद उमीर ,अहैमद मौलाना ,अयुब वकील एम ज ऐद सीदीकी वकील मोहम्मद अब्दुल रहेमान सिद्दीकी ,अब्दुल सत्तार सेट काजी मोहम्मद रफीक,
 हाफेज लतीफ फुरखानी ,मोहम्मद हुसैन ,जावेद बागवान , वसीम अन्सारी उपस्थीत होते.पुरस्कार मिळाल्या बद्दल अब्दुल हाफिज बागवान यांचे पञकारिता क्षेञातुन त्यांचे अभिनंदन होत आहे व त्यांना शुभेच्छा मिळत आहे.

Friday, January 7, 2022

मानवत भुषण विधीतज्ञ गणेश मोरे पाटिल यांचा वाढदिवस ऊत्साहात साजरा

मानवत भुषण विधीतज्ञ गणेश मोरे पाटिल यांचा वाढदिवस ऊत्साहात साजरा 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत शहरातील डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष  सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे  प्रगतशील शेतकरी तथा उद्योजक  पोलिस मित्र,आरोग्य मित्र  गोर गरीब लोकांना मदत करणारे युवा बेरोजगार मुलांना त्यांचा रोजगार मिळून देणारे विधीतज्ञ  गणेश मोरे  पाटील यांच्या  वाढदिवसानिमित्त  त्यांच्या ईष्ट मिञ ,राजकिय मंडळी ,पञकार संघाकडुन  व शहरातील विविध सामाजिक संस्था व  शुभचिंतकाकडुन मोठ्या ऊत्साहात ७ जानेवारी  रोजी वाढदिवस  साजरा  करण्यात आला हार फुल व विविध सप्रेम भेटवस्तु देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पञकार संघाचे कार्याध्यक्ष  भैय्यासाहेब ,राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र संघटक तथा दै.गाववालाचे मानवत तालुका प्रतिनीधी  मुस्तखीम बेलदार ,अलीम खान,ईरफान बागवान ,हाफिज बागवान आदी उपस्थीत होते.


Monday, January 3, 2022

मानवत तालुका पञकार संघाच्या अध्यक्षपदी शामभाऊ झाडगावकर यांची बिनविरोध निवड

मानवत तालुका पञकार संघाच्या अध्यक्षपदी शामभाऊ झाडगावकर यांची बिनविरोध निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत तालुका पञकार संघाच्या अध्यक्षपदी शामभाऊ झाडगावकर यांची बिनविरोध निवड दि.२ जानेवारी रोजी करण्यात आली.
शहरातील कृषी ऊत्पन्न बाजार समिती येथील कार्यालयात या बैठकिचे आयोजन मावळते अध्यक्ष किशन बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या बैठकित सर्वानुमते अध्यक्षपदी शामभाऊ झाडगावकर ,सचिवपदी  विलासराव बारहाते,कार्याध्यक्षपदी भैय्यासाहेब गायकवाड , डॉ. सचिन चिद्रवार,उपाध्यक्षपदी रमेशराव यादव , प्रमोद तारे ,सहसचिवपदी इरफान बागवान ,अलीम खान पटेल,कोषाध्यक्षपदी प्रा. गोविंद गोलाईत ,
सहकोषाध्यक्षपदी  सचिन मगर तर सल्लागारपदी      
अश्रोबा केदारे , के. डि. वर्मा ,गोपाळराव लाड यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पञकार संघाचे माजी सचीव पञकार अरुन मानेकर यांचे दुखद निधन झाल्याबद्दल  दोन मिनीट मौन ठेवुन त्यांना  आंदराजली वाहण्यात आली तसेच नूतन कार्यकारणीचे हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पञकार कचरुलाल बारहाते,संजय नाईक,मुस्तखीम बेलदार ,हाफिज बागवान ,प्रसाद जोशी,अनील चव्हाण ,सय्यद वसीम यांच्यासह  सर्व सन्माननीय सदस्य तालुका पत्रकार संघ मानवत उपस्थीत होते.

Sunday, January 2, 2022

मानवत तालुकास्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हमदापूर शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हमदापूर शाळेचे घवघवीत यश
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत तालुक्यातील हमदापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे . याबाबत सविस्तर वृत असे की , मानवत येथे दिनांक ३१ डिसेंबर रोजी तालुका संशोधन केंद्राचा वतीने केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
यावेळी हमदापूर जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दुसरी वर्गातील विदयार्थीनी कु . मनस्वी विक्रम शिंदे हिने मानवत तालुक्यातील प्रथम क्रमांक मिळविला 
तालुकास्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून लाभलेले शिक्षक हमदापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नजात पठाण सर , श्याम सुर्यवंशी सर, हनुमंत नागरगोजे सर , योगेश कांबळे सर, न्याजुद्दीन शेख सर , कल्पेश खैरनार सर या सर्व शिक्षकांचे व यशस्वी विदयार्थ्यांचे व पालक श्री.विक्रम बालासाहेब शिंदे यांचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी डी . आर . रणमाळे साहेब , केंद्रप्रमुख  सौ.माया जानराव मॅडम व सावरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख शिरीषजी लोहट सर , यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले . तसेच स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल तालुका गट साधन केंद्राच्या टीमचे ही विशेष आभार मानले. तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.अंजली नामदेव उपाडे व उपाध्यक्ष श्री.भगवान निळे तसेच सर्व सन्माननीय सदस्य यांनी स्पर्धक विद्यार्थ्यानी व शिक्षकवृंद यांचे अभिनंदन केले.