Thursday, August 31, 2023

किर्ती सुरेंद्र करपे यांना राष्ट्रीय कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर .

किर्ती सुरेंद्र करपे यांना राष्ट्रीय कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर .
मानवत / मुस्तखीम बेलदार 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त दर्पण कार बालशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार जि.प प्रा .शा खरबा येथील शिक्षिका श्रीमती कीर्ती सुरेंद्र करपे यांना जाहीर झाला आहे.
श्रीमती करपे मॅडम यांचे सामाजिक संस्कृती धार्मिक व राष्ट्रीय कार्य उल्लेखनीय  आहे शिक्षण क्षेत्रा बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून बाल संस्कार शिबिर अंधश्रद्धा निर्मूलन वृक्ष लागवड व राष्ट्रीय एकात्मता यांचे विषय कार्य केले आहे हा राष्ट्रीय पुरस्कार समारंभ दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी कालिदास कला मंदिर नाशिक येथे सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.
 या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी केले आहे या पुरस्कारासाठी श्रीमती कीर्ती करपे यांचे परिवार नातेवाईक व सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत असुन त्यांना शुभेच्छा मिळत आहे.

हारेगाव येथील जातीयवादी गावगुंडावर कठोर कारवाई करण्याची मानवत येथील आंबेडकरी समाज बांधवाची मागणी

हारेगाव येथील जातीयवादी गावगुंडावर कठोर कारवाई करण्याची मानवत येथील आंबेडकरी  समाज बांधवाची मागणी
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मौजे हारेगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर येथील जातीवादी  गाव गुंडावर अँट्रॉसीटी अँक्ट नुसार व जीवे मारण्याच्या उदद्देशाने मारहान केल्या बाबत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी व त्यांची मालमत्ता जप्त करून पिडीतांना देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मानवत येथील आंबेडकरी  समाज बांधवाच्या वतीने पल्लवी टेमकर  तहसिलदार मानवत मार्फत मुख्यमंत्री यांना दि.३१ आँगस्ट रोजी देण्यात आले आहे .
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मौजे हारेगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर येथील जातीवादी गावगुंड युवराज गलांडे पाटील व त्याचे चार ते पाच साथीदारांनी कबुतर व शेळ्या चोरल्याच्या संशयावरुन बौध्द तरुण शुभम माघाडे यास जेवन करीत असतांना घरातुन उचलून नेले व त्यास झाडाल उलटे टांगुन व नग्न करून मारहान केली अंगावर लघवी सुध्दा केली व थुंकी चाटायला लावली, तसेच घृणास्पद तिरस्काराने जातीय मानसीकतेतुन शिवीगाळ व अपमान करून लाथाबुक्याने व काठयाने मारहान व हिंसा केली. अशा काळीमा फासणाऱ्या घटनेचा तिव्र निषेध करून संबंधीत घटनेवरील सर्व आरोपींवर अँट्रोसिटी अँक्ट नुसार व इतर मारहाणीचे कलमे लावून कायदयाने कठोर कार्यवाही करण्यात यावी व सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करून पिडीतास देण्यात यावी किंवा शासनाने जप्त करून घ्यावी व पिडीताला पोलीस संरक्षण देण्यात यावे.
अन्यथा सर्व आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरुन संविधानाने दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असे नमुद केले आहे.
निवेदनावर  समाजसेवक रविभाऊ पंडीत , आदर्श धबडगे ,राहुल कुंभकर्ण ,
,सुरज खरात, अनिल बुरखंडे ,कुंदन पारवे,प्रशांत पौळ,कृष्णा मोहिते,प्रितम ढवळे,अक्षय साळवे ,शेख मुज्जु यांच्या स्वाक्षरी आहेत.

Wednesday, August 30, 2023

कोल्हा येथील पशु वैद्यकिय दवाखान्यास कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी देण्याची शेतकऱ्यांची मागणी

कोल्हा येथील पशु वैद्यकिय दवाखान्यास  कायमस्वरुपी पशुधन विकास वैद्यकिय अधिकारी देण्याची शेतकऱ्यांची मागणी 

मानवत / मुस्तखीम बेलदार 

 मानवत तालुक्यातील कोल्हा येथील पशु वैद्यकिय दवाखाना  येथे कायमस्वरुपी पशुधन विकास वैद्यकिय अधिकारी असणे आवश्यक आहे कारण की, कोल्हा पशु वैद्यकिय दवाखाना श्रेणी-१ अंतर्गत १६ गावांचा समावेश आहे. परंतु मागील तीन महिन्या पासुन तेथे वैद्यकिय अधिकारी नाही. सध्या पशुवैद्यकिय अधिकारी असणे अत्यंत गरज आहे कारण की, महाराष्ट्रामध्ये जनावरांना लंपी हा आजार जास्त प्रमाणात झाला आहे व होत आहे तसाच  कोल्हा तसेच इतर १६ गावात १५०पेक्षा जास्त जनावरांना लंपी हा आजार झाला व त्यापैकी अंदाजे १०जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. लंपी आजारावर मात करण्यासाठी दवाखान्यात मुबलक औषध साठा पण नाही.
मागील तीन महिण्यांपासून पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-१ कोल्हा येथे पशुधन विकास वैद्यकिय अधिकारी नसल्यामुळे जनावरांना उपाचाराची सोय होत नसल्यामुळे त्यांचा बळी जात आहे व तसेच जनावरांना खाजगी मेडीकलवर औषध घेण्याकरीता खुप खर्च करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच सध्या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला तसेच लंपी या आजारामुळे शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडत आहेत यामुळे शेतकरी चिंतेत आहे अर्जाचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन गांभीर्याने नोंद घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा व तात्काळ पशु वैद्यकिय दवाखाना श्रेणी-१ कोल्हा येथे पशुधन विकास वैद्यकिय अधिकारी यांची तात्काळ कायमस्वरुपी व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवाच्या वतीने  मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व जिल्हा पशुवर्धन अधिकारी परभणी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर शेतकरी बांधवाच्या स्वाक्षरी आहेत.

Tuesday, August 29, 2023

लोक शाहीर साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांची जयंती हटकरवाडि येथे ऊत्साहात साजरी

लोक शाहीर साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांची जयंती हटकरवाडि येथे ऊत्साहात साजरी .
मानवत / मुस्तखीम बेलदार 
२९ऑगस्ट २०२३ रोजी मानवत तालुक्यातील मौजे हटकरवाडी  येथे लोक शाहीर साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांची जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास आणाभाऊ साठे यांचे नातू श्री .सचिन साठे, माजी आमदार मोहनभाऊ फड , शिव व्याख्याते नृसिंह सदगे, विद्याभूषण चव्हाण, रवी चव्हाण आदी व्यासपिठावर उपस्थीत होते.
या वेळी उपस्थीत मान्यवराचे हस्ते लोक शाहीर साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांच्यां प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन ढोल ताशे च्या गजरात भव्य मिरवणूक काढुन अभिवादन करण्यात आले.यावेळी शिव व्याख्याते नृसिंह सदगे  यांनी आपले विचार मांडले.
तसेच माजी आमदार मोहनभाऊ  फड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महापूरूषाच्या जयंती साजरी करत असताना  त्याचे विचार, त्यांचे आचरण प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जिवनात  आणावे. समाजातील अनिष्ठ  परंपरा झुंगारून पुरोगामी विचार आत्मसात करावे अपल्या पाल्यांना उच्च, शिक्षित करून  शिक्षणा विषयी आवड निर्माण करावी. या सोबतच जयंती दिनी रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिवीर स्वच्छता राबवावी असे ते म्हणाले.
अध्यक्षिय समारोपात  मा. सचिन साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती कमीटी अध्यक्ष भेगाद साठे अशोक साठे, अंकुश साठे ,  बाबासाहेब जोरवर, गोविंद नाईक प्रसिद्ध जोरवर, जागोबा जोरवर, गोविंद साठे विठ्ठल साठे, इंद्रायनी मित्र मंडळ अन्वर भैय्या शेख, शेख गुलाब यांच्यासह गावकरी मंडळीनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार  तुकाराम पकाले यांनी मानले.या वेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थीत होते.

युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या प्रयत्नाने तलाबकट्टा परीसरातील रस्त्याचे काम प्रगतिपथावर

युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या प्रयत्नाने  तलाबकट्टा परीसरातील रस्त्याचे काम  प्रगतिपथावर
मानवत / मुस्तखीम बेलदार 
 मानवत शहरातील तलाबकट्टा परीसरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती जागोजागी खड्डे पडल्याने नागरीकांना रहदारीस ञास होत होता या बद्दल  युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्याकडे परिसरातील नागरीक रस्त्याची मागणी करत होते याची दखल घेत  युवा नेते डॉ. अंकुश लाड यांनी   पुढाकार घेत  तल्लाब कट्टा परिसरातील रोड काम युध्द पातळीवर सुरू केले असुन रोडचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे.
तलाब कट्टा मजीद पासुन  टिपु सुलतान चौक पर्यंत काम पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे येथील तलाब कट्टा मस्जिद जवळील 
परिसरामध्ये घाणीचे स्वरूप होते परंतु युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या पुढाकाराने  स्वच्छता करण्यात आली .मुख्य रोडाला जोडणारा रस्ता होत असल्याने या परीसरातील नागरीकांनी  डॉ.अंकुश लाड यांचे  आभार मानले आहे.

Monday, August 28, 2023

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी धरने आंदोलनात पञकारांनी सहभाग घ्यावा - अध्यक्ष कचरुलाल बारहाते

                             
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी धरने आंदोलनात पञकारांनी सहभाग घ्यावा - अध्यक्ष कचरुलाल बारहाते                                 
मानवत / मुस्तखीम बेलदार
 परभणी जिल्हा व्हॉइस ऑफ मीडिया च्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत परभणी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनासाठी मानवत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया च्या सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहान                                     कचरूलाल विनायकराव बारहाते           अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघ मानवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Friday, August 25, 2023

पाण्याचा काटकसरीने वापर करा मानवत शहरवासीयांना डॉ.अंकुश लाड यांचे आवाहन

पाण्याचा काटकसरीने वापर करा
मानवत शहरवासीयांना डॉ.अंकुश लाड यांचे आवाहन 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
 या वर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंत  पडलेला पाऊस पहाता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे हीच काळाची गरज असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. तालुक्यात पडलेला पाऊस सरासरीच्या खूपच कमी आहे त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे 
मानवत शहरवासीयांना डॉ.अंकुश लाड यांनी आवाहन केले आहे.
सद्यस्थितीत शेतकऱ्यांची खरिपाची पिके सुकू लागली आहेत. मुगाचे पीक हातचे गेल्यात जमा आहे. सोयाबीन सारख्या पिकाला जास्त पाण्याची गरज असते. परंतु पाऊसच नसल्याने या पिकाची स्थितीही दयनीय झाली आहे. कापसाच्या पिकाला पाणी कमी लागत असले तरी पाऊस पाहिजेच. उर्वरित काळात पावसाची उणीव भरून निघेल की नाही याची शंका आहे. उरलेल्या पावसाच्या दिवसात योग्य प्रमाणात आणि सरासरी पेक्षा  कमी पाऊस झाला तर जमिनीतील पाण्याची पातळी निश्चितच खोल जाणार आहे. आशा स्थितीत जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. यासाठी आत्ता पासूनच उपाय करण्याची गरज आहे. पाणी निर्माण करता येत नसल्याने त्याची बचत आणि काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. पाणी बचती बाबत लोकांना जागरूक करणेही तेवढेच महत्वपूर्ण ठरणार आहे. 'पाणी हे नुसते द्रव्य नाही तर ते अमृततुल्य आहे'. आणि 'पाण्याची बचत म्हणजेच पाणी निर्मिती'. हे मूल्य समाजमनात रुजविणे गरजेचे आहे. हवामान विभागाचा अंदाज आणि वृत्तपत्रातील बातम्या पहिल्या तर यावर्षीच्या मान्सूनवर अलनिनो चा प्रभाव स्पष्ट दिसत आहे. जून, जुलै व ऑगस्ट च्या तुलनेत सप्टेंबर मध्ये याची तीव्रता जास्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. न.प. प्रशासन त्या दृष्टीने खबरदारी घेत आहे. मानवत शहराला पाणी पुरवठा करणारा झरी तलाव नेमकाच भरून घेतला आहे जवळपास सहा ते सात महिने हे पाणी शहरवासीयांना पुरेल. सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस झाला तर  एखादा महिना पुन्हा जास्तीचे पाणी पुरेल मात्र एप्रिल ते जून महिन्याच्या शेवटी पर्यन्त टंचाई जनावण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही याबाबत जागरूक असायला हवे. 'पाणी हेच जीवन' अथवा 'जल हैं तो कल हैं'. या म्हणी अंगी बनवून आपणा सर्वांना पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. आपण जल संसाधनांची संख्या वाढवू शकत नाही, परंतु जे काही उपलब्ध आहे त्याला वाया जाण्यापासून रोखू शकतो. ही भूमिका घेऊन प्रत्येकाला काम करावे लागणार आहे असे युवानेते डॉ.अंकुश लाड म्हणाले.
                
                

Friday, August 18, 2023

मानवत पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार पोलीस स्टेशनमध्ये थेट सायकलवरुन दाखल

 मानवत  पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार  पोलीस स्टेशनमध्ये थेट  सायकलवरुन दाखल 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
 
पूर्वी एक काळ असा होता ज्याच्याकडे सायकल असेल तो श्रीमंत समजला जायचा. तेव्हा आपल्याकडे वाहतुकीचे उत्तम साधन सायकल असायचे. लोक त्यांच्या घरी ऑफिस, मार्केट, शैक्षणिक संस्था किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी सायकल वापरायचे. मात्र दिवसेंदिवस सायकलचा वापर फारच कमी होऊ लागला आहे.लोक आता मोटरसायकल, डिझेल पेट्रोलवर चालणारी वाहने वापरू लागले आहेत.
त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे.
आरोग्य आणि वाढते प्रदूषण पाहता प्रत्येकाच्या जीवनात तंदुरुस्त आरोग्यासाठी तरी सायकलचे महत्त्व असावे, याचा विचार करून  मानवत ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपक दंतुलवार हे  सकाळपासून नेहमीच सायकलचा वापर करत असतात परंतु त्यांनी आज पासुन पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी आपल्या घरा पासून ते पोलीस स्टेशन पर्यंत 
रोज सायकलवर येण्याचा  निर्धार  केला असुन पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार  पोलीस स्टेशनमध्ये थेट गणवेशात सायकलीवर दाखल झाले 
 तसेच पो स्टे चे अधिकारी व अंमलदार यांना देखील सायंकाळी सायकल पेट्रोलींग करण्यास प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले व याचा वापर गणेशोत्सव,शारदात्सोव या सारख्या सणा सुदीच्या काळात करणार असल्याचे प्रतिपादन केले.

मानवत शहरात निर्भया पथक ची करडि नजर


मानवत शहरात निर्भया पथक ची करडि नजर
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत शहरात मा.पोलीस अधीक्षक रागसुधा मॅडम यांच्या आदेशाने पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक, निर्भया पथक यांच्यावतीने मानवत शहरातील शाळा व महाविद्यालय कोचिंग क्लासेस या परिसराला भेट देऊन मुला मुलींच्या अडचणी जाणून घेतल्या व तसेच त्यांना काही मार्गदर्शनही केले.
कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास पोलीस निरीक्षक (9923422425) किंवा डायल 112,दामिनी पथक ,निर्भया पथकचे  हिना शेख ( 9579841184),  नरेंद्र कांबळे ( 8888802130 ),  सय्यद फय्याज(  9421568683) यांना संपर्क करावा, रोडरोमियो ,भरधाव वेगाने वाहन चालवणारे,बुलेटचा फटाके सारखा आवाज करणारे यांची आता कसलीही गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक  दिपक दंतुलवार यांनी दिली आहे.

Thursday, August 17, 2023

पाथरी विधानसभा निवडणुक प्रमुख पदी माजी आमदार मोहन भाऊ फड यांची नियुक्ती मानवत / मुस्तखीम बेलदार

पाथरी विधानसभा निवडणुक प्रमुख पदी माजी आमदार मोहन भाऊ फड यांची  नियुक्ती
मानवत / मुस्तखीम बेलदार 
महाविजय २०२४ पाथरी विधानसभा निवडणुक प्रमुख पदी माजी आमदार मोहन भाऊ फड यांची  नियुक्ती करण्यात आली आहे अशा आशयाचे पञ  भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.संजय जी केनेकर , भाजपा परभणी जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.या निवडिचे सर्वञ स्वागत होत आहे.

पाथरी विधानसभा निवडणुक प्रमुख पदी माजी आमदार मोहन भाऊ फड यांची नियुक्ती

पाथरी विधानसभा निवडणुक प्रमुख पदी माजी आमदार मोहन भाऊ फड यांची  नियुक्ती
मानवत / मुस्तखीम बेलदार 
महाविजय २०२४ पाथरी विधानसभा निवडणुक प्रमुख पदी माजी आमदार मोहन भाऊ फड यांची  नियुक्ती करण्यात आली आहे अशा आशयाचे पञ  भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.संजय जी केनेकर , भाजपा परभणी जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.या निवडिचे सर्वञ स्वागत होत आहे.

Wednesday, August 16, 2023

युवानेते डॉ.अंकुशभाऊ लाड यांच्या प्रयत्नामुळे श्रीमती सुनीता वाढकर यांना अनुकंपा श्रेणीतून मिळाली नोकरी

युवानेते डॉ.अंकुशभाऊ लाड यांच्या प्रयत्नामुळे श्रीमती सुनीता वाढकर यांना अनुकंपा श्रेणीतून मिळाली नोकरी
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत नगरपरिषदेच्या बांधकाम विभागात स्व. राजेभाऊ वाडकर हे लिपिक म्हणून कार्यरत होते. कामावर रुजू असताना गतवर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात घरात कोणीही कर्ता व्यक्ती नसल्याने कुटुंबियांवर संकट कोसळले होते.

  ही गोष्ट मा.नगरसेवक  दत्ताभाऊ चौधरी व राजेभाऊ यांच्या  आई या दोघांनी युवानेते डॉ. अंकुशभाऊ लाड यांना कळवली असता डॉक्टर साहेबांनी तात्काळ सूत्र हलवून मुख्याधिकारी, बांधकाम विभाग आदींशी संपर्क केले त्यांच्या  प्रयत्नांना यश मिळाले असुन स्व. राजेभाऊ यांच्या पत्नी श्रीमती सुनीता वाढकर यांना अनुकंपा श्रेणीतून नौकरीत समाविष्ट करण्यात आले आहे खऱ्या अर्थाने राजेभाऊ यांना डॉ.अंकुशभाऊ लाड  साहेबांकडून ही श्रद्धांजली ठरली आहे.
माळी समाज बांधवांच्या वतीने डॉ. अंकुशभाऊ लाड, मुख्याधिकारी कोमल सावरे मॅडम व बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता सय्यद अन्वर भाई यांचे जाहीर आभार मानले आहे.

Monday, August 14, 2023

आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांनी घेतली राज बेलदार संघटनाच्या वतीने सुरु असलेल्या उपोषणास्थळी भेट

आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांनी घेतली राज बेलदार संघटनाच्या वतीने सुरु असलेल्या  उपोषणास्थळी भेट 

परभणी / प्रतिनीधी 
राजबेलदार समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य  च्या वतिने परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती च्या विरुध्द प्राणांतिक उपोषणास सुरुवात दि.१४ आँगस्ट रोजी पासुन जिल्हाधिकारी कार्यालय समोर  सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त  श्रीमती छाया कुलाल यांची बदली रद्द करून समितीला व प्रस्ताव धारकाना वाचवा , समिती मध्ये गेल्या अनेक वर्षापासुन ठाण मांडुन बसलेले ब्रिक्स कंपणी चे कंत्राटी कर्मचारी नामे संजय आरगडे व परमेश्वर पवार यांची त्वरित हकाल पट्टी करावी आदी मागण्यासाठी 
राजबेलदार समाज सेवा मंडळाचे सय्यद विखार ईलाहि व  परभणी राज बेलदार सघटनेचे  पदाधिकारी उपोषणास बसले आहे. या उपोषणस्थळी आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांनी भेट घेऊन राज बेलदार संघटनाच्या कार्यकर्तेशी चर्चा करुन 
संबधित विभागास  आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सर्वतोपरी  प्रयत्न करु असे आश्वासन दिले.यावेळी राज बेलदार समाजसेवा मंडळाचे राज्य अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि उपस्थीत होते.

राजबेलदार समाज सेवा मंडळच्या वतिने परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती च्या विरुध्द प्राणांतिक उपोषणास सुरुवात

राजबेलदार समाज सेवा मंडळच्या वतिने परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती च्या विरुध्द प्राणांतिक उपोषणास सुरुवात

परभणी / प्रतिनीधी 
राजबेलदार समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य  च्या वतिने परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती च्या विरुध्द प्राणांतिक उपोषणास सुरुवात दि.१४ आँगस्ट रोजी पासुन जिल्हाधिकारी कार्यालय समोर  सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त पदी श्रीमती छाया कुलाल यांची बदली रद्द करून समितीला व प्रस्ताव धारकाना वाचवा , समिती मध्ये गेल्या अनेक वर्षापासुन ठाण मांडुन बसलेले ब्रिक्स कंपणी चे कंत्राटी कर्मचारी नामे संजय आरगडे व परमेश्वर पवार यांची त्वरित हाकाल पट्टी करावी आदी मागण्यासाठी 
राजबेलदार समाज सेवा मंडळाचे सय्यद विखार ईलाहि व  परभणी राज बेलदार सघटनेचे  पदाधिकारी उपोषणास बसले आहे.

Sunday, August 13, 2023

ओबीसी समन्वय समिती व भारतीय पिछडा ओबीसी शोषित संगठन मराठवाडा विभाग याच्या वतीने विविध मागण्यासाठी प्रचंड धरणे आंदोलन.

ओबीसी समन्वय समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे विविध मागण्यासाठी प्रचंड धरने आंदोलन

औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार 

ओबीसी समन्वय समिती व भारतीय पिछडा ओबीसी शोषित संगठन मराठवाडा विभाग
याच्या वतीने विविध मागण्यासाठी  प्रचंड धरणे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे दि.१३ आँगस्ट रोजी करण्यात आले.

ओबीसी विजे एनटि एस बी सी 
च्या मागण्यांसाठी दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर धरणे आंदोलन करुन यात  मंडल आयोगांच्या संपुर्ण शिफारशींची अंमलबजावणी करा, ओबीसींची जात निहाय जनगणना करा,ओबीसी विजे एनटि एस बी सी  कर्मचाऱ्यांना प्रमोशन मध्ये आरक्षण द्या, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वस्तीगृहे व २१६०० विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना लागु करा,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रा.घेऊन सर्व ठिकाणी ५०% आरक्षण लागु करा तसेच  नॉन क्रिमिलेयरची असंविधानिक अट रद्द करा या विविध  मागण्या शासनाद्वारी मांडल्या.
यावेळी एस जी माचनवार ,प्रा.सुदाम चिंचाणे ,डॉ.कालिदास भांगे,डॉ.देवराज दराडे,डॉ.लक्ष्मण शिंदे,निशांत पवार,प्रा.वसंत हारकळ,जनार्धन कापुरे,सुशीलाताई मोराळे,सुरेश आगलावे,विष्णु वखरे,नागनाथ गोरे,प्रा.विश्वनाथ कोक्कर ,विधीतज्ञ महादेव आंधळे,सरस्वती ताई हारकळ,प्राचार्य ग.ह. राठोड ,मुस्तखीम बेलदार ,अंबादास रगडे,विजय महाजन,डॉ.ज्ञानदेव घुगे, यांच्यांसह मोठ्यासंख्येने ओबीसी कार्यकर्ते उपस्थीत होते.

Friday, August 11, 2023

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मानवत येथील पञकारांच्या वतीने निषेध.

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मानवत येथील पञकारांच्या वतीने निषेध

मानवत / मुस्तखीम बेलदार 
पाचोरा येथील पत्रकार संदिप महाजन यांना झालेल्या मारहाण प्रकरणी तात्काळ कारवाई करावी या मागणीचे निवेदन दि. ८ ऑगस्ट रोजी मानवत तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्यां  मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मानवत तालुका  व्हाईस आँफ मिडिया पञकार संघ मानवत च्या वतीने करण्यात आली आहे.
पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदिप महाजन यांना स्थानीक आमदार किशोर पाटील यांनी बातमी का लावली म्हणून शिवीगाळ करत धमकी दिली. समाजमाध्यमांवर तशी त्यांची ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे. सदर आँडिओ क्लिप आपलीच असल्याचे आ. पाटील यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मान्य ही केले आहे. त्यानंतर महाजन यांना भर चौकात काही गुंडांनी बेदम मारहाण केली.त्यात महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत. सदर मारहाण ही आ. किशोर पाटील यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप पत्रकार महाजन यांनी केला आहे. या घटनेमुळे राज्यातील पत्रकारात दहशत निर्माण झाली आहे. पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मानवत व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. या घटनेमुळे पत्रकार व त्यांच्या कुटूंबात भितीचे वातावरण पसरले असून सदर घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर व्हाइस आँफ मिडिया चे मानवत तालुकाध्यक्ष  कचरुलाला बारहाते, सत्यशील धबडगे, अलिम पटेल,किशन बारहाते,श्याम झाडगावकर, इरफान बागवान, विलास बारहाते, रमेश यादव,हफिज बागवान,सचिन मगर,रियाज शेख यांच्यां स्वाक्षरी  आहेत.

Tuesday, August 8, 2023

आमदार बाजोरिया यांची डॉ. अंकुश लाड यांच्या निवांसस्थानी भेट

आमदार  बाजोरिया यांची डॉ. अंकुश लाड यांच्या निवांसस्थानी भेट 

[] आमदार बिजोरीया यांनी युवानेते डॉ अंकुश लाड यांच्यां विकासकामाचे केले कौतुक  []
मानवत / प्रतिनीधी 
दिनांक  ०६ ऑगस्ट रोजी  मानवत शहरा मध्ये युवानेते डॉ अंकुश लाड यांच्या कार्यालयात शिवसेनेचे नेते आ . गोपीकिशनजी बिजोरीया व  आमदार विप्लव बाजोरिया या पिता पुत्रांनी  सदिच्छा भेट दिली असता डॉ.अंकुश लाड यांच्यावतीने त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले.या  वेळेस  बोलताना आमदार बिप्लव बाजोरिया म्हणाले की  मानवत शहराचा विकास पाहुन अगदी माझे मन भारावून  गेले आहे  अंकुश भाऊ तुमचे कौतुक करायला माझ्या कडे शब्द कमी पडत आहेत  अशा मौलिक  शब्दात त्यांनी डॉ.अंकुश लाड यांचे कौतुक केले तुमच्या मानवत शहरातील कोणताही  प्रश्न  असो  की , मानवत पाथरी सोनपेठ परळी वैजनाथ रेल्वे महामार्गा चा पाठपुरावा करून आपल्या मानवत शहरातील विकास कामांसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी  दिले.  या वेळी  मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकजराव  आंबेगावकर , नारायण राव भिसे, विष्णूपंत निर्वल ,प्रकाशजी  पोरवाल , सुरेशजी काबरा , कृष्णासेठ बाकळे, यशसेठ कत्रुवार, ज्येष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक के डी वर्मा   व मानवत पालिकेचे सर्व नगरसेवक , व्यापारी  उपस्थित होते .