Saturday, April 27, 2024

मानवत शहरांमध्ये २६ बुथवर ५७% मतदान

मानवत शहरांमध्ये २६ बुथवर  ५७% मतदान 

[]नव मतदारांसह महिला व जेष्ठा मध्ये दिसून आला  मतदानाचा उत्साह []
मानवत / मुस्तखीम बेलदार 

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक २६ मार्च शुक्रवारी रोजी मानवत शहरांमध्ये एकूण २६ बुथवर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती नव मतदारांसह महिला व जेष्ठामध्ये मतदानाचा  ऊत्साह दिसून आला
मानवत शहरात ३०४६८ मतदार असुन 
पुरुष १५३६३ तर महिला मतदार १५१०५ 
आहे शहरातील २६ बुथवर १७४३६ मतदान झाले यात पुरुष ९३३६ व ८१०० महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला 
 मानवत शहरांमध्ये २६ बुथवर   एकुण ५७% मतदान झाले आहे .
मानवत नगर परिषद च्या वतीने दिव्यांग, वयोवृद्ध नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर ठेवण्यात आल्या होत्या.
मतदान केंद्रावर मतदाराच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या मतदान शांततेत पार पडला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मानवत पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात  आला होता  मानवत शहरासह तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.महाविकास आघाडिचे संजय जाधव व महायुतीचे महादेव जानकर याच्यांत मुख्य लढत झाल्याचे निवडणुकित दिसुन आले भावी खासदाराचे भवितव्य मतपेटित बंद झाले असुन निकाल ४ जुन रोजी जाहिर होणार आहे याकडे आता पुर्ण परभणी जिल्हयाचे लक्ष लागले आहे.

Wednesday, April 24, 2024

मानवत येथे रमजान ईद ऊत्साहात साजरी

मानवत येथे रमजान ईद ऊत्साहात साजरी

मानवत / मुस्तखीम बेलदार 

बुधवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यावर दि. ११  एप्रिल रोजी शहरातील उक्कलगाव रोड येथील मोठी ईदगाह येथे सार्वजनिक ईद ची नमाज सकाळी साडेआठ वाजता अदा करुन ईद ऊल फिञ अर्थात रमजान ईद मोठ्या ऊत्साहात मुस्लीम बांधवांनी साजरी केली.

या वेळी खुदबा हाफेज अय्याज यांनी  दिला 
हाफेज हाजी मोहम्मद लतिफ यांनी सार्वजनिक नमाज पठण केली. सर्व मुस्लिम बांधवांनी एक मेकांना गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

भारत देशामध्ये सामाजिक सलोखा व भाईचारा कायम राहावा, सोशल मीडियाचा वापर योग्य करावा कोणाच्याही भावना दुखवणारी पोस्ट टाकू नये, त्याचबरोबर आपण एक दुसऱ्या चा धर्माचा आदर करावा असा संदेश धर्मगुरूंनी मौलाना असलम खान इशाती यांनी दिला .
मौलाना मुजाहिद यांनी मानवत नगर परिषद व पोलीस प्रशासन यांचे आभार व्यक्त केले.ईदगाह मैदानावर नागरिकांसाठी आझाद पाणी सप्लायर यांच्यावतीने मोफत जारचे पाणी उपलब्ध केले होते. नमाज नंतर सामूहिक प्रार्थना दुवा करण्यात आली.
पोलीस प्रशासन व राजकीय पुढारीना  जमाते इस्लामी हिंद च्या वतीने  दिव्य कुराण मराठी अनुवाद भेट म्हणुन देऊन  शुभेच्छा देण्यात आले
यावेळी पो.नि.दिपक दंतुलवार ,आनंद मामा भदर्गे ,दिपक बारहाते,रुषीकेष बारहाते, पवन बारहाते,फकिरा सोनवने, श्रीकांत देशमुख ,विक्रम दहे ,भारत पवार आदीनी ईदगाह मैदानात उपस्थीत राहुन मुस्लिम बांधवाना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

मानवत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था

 मानवत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर व रॅम्पची  व्यवस्था 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मानवत शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रभागात मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली असून मतदानाची टक्केवारी वाढावी व समाजातील सर्व स्तरांमधील मतदारांना मतदान करता यावे याकरिता मानवत नगर परिषद प्रशासनाच्या वतीने दिव्यांग मतदारांना प्रशासनाच्या वतीने व्हील चेअर व रॅम्प ची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदान करण्यापासून कोणीही वंचित राहू नये हा यामागचा उद्देश आहे. ही व्यवस्था शहरातील सर्व मतदान केंद्रावरती करण्यात आलेली आहे जेणेकरून मतदान करणे सोयीचे व सुखकर होईल. दिव्यांग असलेल्या व्यक्तींनी या सोयीचा लाभ घ्यावा व आपल्या मतदानाचा हक्क बजवावा तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान रुपी आपले योगदान द्यावे असे आवाहन श्रीमती. कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांच्या वतीने करण्यात आले आहे. सोबत नगर परिषदेचे श्री. सय्यद अन्वर  शहर अभियंता, श्री भगवानराव शिंदे, कार्यालयीन अधिक्षक, श्री.संतोष उन्हाळे, कर निरीक्षक, श्री. मुंजासा खोडवे, लेखापाल, श्री. महेश कदम, अंतर्गत लेखापरीक्षक, श्री शतानिक जोशी, विद्युत अभियंता,श्री संतोष खरात, संगणक अभियंता,श्री. मुंजाभाऊ गवारे, स्वच्छता निरीक्षक,श्री.भारत पवार, श्री.राजेश शर्मा,श्री. संजय रुद्रवार,श्री. सुनील कीर्तने, मुक्कादाम, श्री दीपक भदर्गे, श्री. जावेद मीर व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी काटेकोरपणे निवडणुकांचे कामकाज पाहत आहेत.