Saturday, September 7, 2019

जिल्हयातील बोगस नोदणीकृत बांधकामगारांवर कारवाई होणार - कामगार अधिकारि आर.जी.रुमाले
विशेष प्रतिनीधी /  मुस्तखीम बेलदार
दि.७: परभणी जिल्हयातील बोगस बांधकामकामगार यांनी जी बोगस नोदणी केली आहे ती स्वता तात्काळ रद्द करुन घ्यावी अन्यथा बोगस कामगारांचा शोध मोहिम घेऊन  कारवाई करण्यात येईल असे आवाहान पाथरी डेली  शी बोलताना परभणी जिल्हा कामगार अधिकारि श्री. आर.जी.रुमाले यांनी केले आहे.
परभणी जिल्हयात जवळपास ४०००० नोदित बांधकामकामगार असुन महाराष्ट्र राज्य ईमारत व ईतर बाधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने नोदणीकृत बाधकाम कामगाराना मंडळाच्या वतीने २९ योजना राबवुन आर्थीक मदत दिली जाते पण चुकिच्या माहितीमुळे नागरीकांनी बांधकामकामगार म्हणुन नोदणी केल्याचे निदर्शनास येत आहे यामुळे अशा बोगस नोदित बांधकामकामगारांचा कार्यालयाकडुन शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे यामुळे ज्या बोगस बांधकामकामगार यांनी नकळत  नोदणी केली आहे ती नोदणी स्वत  रद्द करुन घ्यावी अन्यथा कामगार कार्यालयाकडुन  होणाऱ्या शासकिय कारवाईस सामोरे जावे लागेल असे आवाहान परभणी जिल्हा कामगार अधिकारि श्री .आर. जी.रुमाले यांनी केले आहे.