Sunday, October 29, 2023

मानवत येथे फिरत्या इंडोस्कोपी रुग्णालयातून १५ रुग्णावर उपचार

फिरत्या इंडोस्कोपी रुग्णालयातून १५ रुग्णावर उपचार 
[] नांदेडच्या गॅलक्सि हेल्थकेयर फाऊंडेशनचा उपक्रम []
मानवत / मुस्तखीम बेलदार 
   फिरते इंडोस्कोपी रुग्णालय आपल्या दारी या योजनेअंतर्गत गॅलक्सि हेल्थकेयर फाऊंडेशन नांदेड व मानवत तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने रविवारी दि. २९ आँकटोबंर रोजी  आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात एकूण १५ रुग्णांची अल्पदरात इंडोस्कोपी करून उपचार करण्यात आले . 
  मानवत   शहरातील नगरपालिका कार्यालयात झालेल्या या शिबिराचे उद्धाटन युवा नेते व डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते करण्यात आले . शिबिरात डॉ नितीन जोशी व डॉ संदीप दरबस्तवार यांनी रुग्णांची तपासणी केली . कार्यक्रमाचे संचलन डॉ शरयू खेकाळे , प्रास्ताविक डॉ सोनल पातेकर यांनी तर आभार डॉ प्रिया राठी यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ सचिन कदम, सचिव डॉ सुशील नाकोड , डॉ विजयकुमार कहेकर , डॉ रामकीशन एक्कर , डॉ सचिन चिद्रवार , डॉ नामदेव  हेंडगे , डॉ अक्षय खडसे यांनी प्रयत्न केले .
   

Monday, October 23, 2023

खासदार संजय जाधव यांचा मानवत येथील शिवसैनिकाच्या वतीने भव्य सत्कार.

खासदार संजय  जाधव यांचा मानवत येथील शिवसैनिकाच्या वतीने भव्य सत्कार 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांची नुकतीच  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते पदी निवड करण्यात आली त्या निमित्ताने मानवत चे माजी शिवसेना शहर प्रमुख अनिल जाधव यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी शिवसैनिकाच्या वतीने खासदार साहेबांच्या त्यांच्या परभणी येथील  निवासस्थानी सत्कार करण्यात आला  यावेळी अनिल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करत मानवत शहरातील अडचणीचे प्रश्न खासदार साहेबांसमोर मांडले.खासदार साहेबांनी तात्काळ दखल घेत काही प्रश्न मार्गी लावले व नवरात्र उत्सव मिरवणुकीचा मार्ग मोकळा केला. खासदार साहेबांनी नंतर सर्वांना मार्गदर्शन केले.
नंतर साहेबांना फेटा , शाल , पुष्पहार , गुच्छ श्रीफळ व फटाक्याची अतिशबाजी सह भव्य दिव्य सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात  शिवसैनिक उपस्थित होते.

Sunday, October 22, 2023

मानवत येथे मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन संपन्न.


मानवत येथे मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन संपन्न 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
  मुस्लीम समाजाच्या सामाजिक व राजकीय समस्यांवर चर्चा करण्यासाठी मानवत शहरात दि.२२ ऑक्टोबर २०२३ रविवार रोजी ११ वाजता शिपाई फंक्शन हॉल येथे मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती मानवत यांच्या वतीने तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण कसे वाढविता येईल, आरक्षणाच्या मागणीसाठी शासनावर कशाप्रकारे दबाव वाढविता येईल याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.या तालुकास्तरीय बैठकी मध्ये तालुका व जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विचारवंतांनी सहभाग नोंदविला .
या तालुकास्तरीय बैठकी मध्ये रफिक सर, नितीन सावंत सर, वहीद पटेल, महेमुद शेख सर, अनंता मामा भदर्गे, माजी नगरसेवक सय्यद जमिल,हबीब भडके, नियामत खान, रिजवान बागवान याच्यांसह मानवत तालुक्यातील  युवा, शिक्षक, वकील, डॉक्टर, नगर सेवक, पत्रकार, सरपंच उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोबीन कुरेशी  यांनी केले तर आभार प्रदर्शन असद खान यांनी केले.
 या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी  मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी  परिश्रम घेतले.

Saturday, October 21, 2023

डॉ.अंकुश लाड मित्र मंडळाच्या वतीने मानवत येथे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन.

डॉ.अंकुश लाड मित्र मंडळाच्या वतीने मानवत येथे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन 

मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत शहरात रावण दहन करण्याची परंपरा गेल्या ५ वर्षांपासून  डॉ अंकुश लाड मित्र मंडळ जपण्याचे काम करीत असून येथील नागरिकांचाहि ऊत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे.
मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयच्या प्रांगणातील भव्य  मैदानावर रावण दहन कार्यक्रम होणार असुन  त्याची जय्यत तयारी सुरू आहे.
नवरात्र उत्सवात दसऱ्याच्या दिवशी मानवतकरांसाठी हा आकर्षणाचा विषय ठरत असतो. यात अबाल वृद्ध यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यातच या वर्षी मेघनाद व कुंभकर्ण यांच्या प्रतिकृती सोबत हा रावन दहण होणार आहे या  वर्षी चे रावणदहन चे मुख्य आकर्षण ५१ फूट रावनाच्या प्रतिकृतीसोबत मेघनाद व कुंभकर्ण यांच्या देखील प्रतिकृती चे दहन होणार असून या वेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशी रामलीला होणार आहे तसेच भावगीत व भक्ती गीत सादर करणारे गायन संच सोबत पुणे येथील  आकर्षक आतिषबाजी चा देखावा सादर करण्यात येणार .
या रावणाचे दहन महामंडलेश्वर श्री श्री १००८ ह भ प मनिषानंदजी  महाराज यांच्या हस्ते होणार आहे. 
मानवत शहरातील  नागरिकांनी शहरातील नेताजी सुभाष विद्यालयाच्या पाठीमागील रामलीला मैदानावरिल  रावणदहन कार्यक्रमास उपस्थत राहण्याचे  आव्हान युवानेते डॉ. अंकुश लाड यांनी केले आहे.

Tuesday, October 17, 2023

मराठा आरक्षण मिळत नाहि तो पर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी
[] मानवत तालुक्यातील सावळी येथील सकल मराठा समाजाचा निर्णय []                       मानवत / मुस्तखीम बेलदार 
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मानवत तालुक्यातील सावळी येथे राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे या संदर्भात मानवत तहसीलदारांना देखील माहिती देण्यात आली आहे दरम्यान गावबंदी संदर्भात सावळी पाटीवर पोस्टर देखील लावण्यात आले आहे                                 मानवत तालुक्यातील सावळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जोपर्यंत मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे तोपर्यंत त्या लढ्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सावळी येथील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वच राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्याचा धाडशी निर्णय घेण्यात आला आहे यासाठी सावळी पाठीवर राजकीय पुढार्‍यांना गावबंदी असल्याचे बॅनर देखील लावण्यात आले आहे या बॅनरला कोणाकडून काही हानी झाली किंबहुना दगड मारणे, पोस्टर फाडणे अशा प्रकारचे कृत्य झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी गावात पुढाऱ्यांना बोलवणाऱ्या व्यक्तीची राहील अशी माहिती तहसील कार्यालयाला सावळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे या वेळी  मयूर काळे, शंकर काळे, संजय काळे, हनुमान काळे, ज्ञानोबा काळे, सोनू काळे, आकाश काळे, कृष्णा काळे, भरत काळे, पुरुषोत्तम काळे, केशव काळे, अमोल काळे, अरुण काळे यांच्यासह सावळी येथील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Monday, October 16, 2023

मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती मानवत याच्यां वतीने बैठकिचे आयोजन

 मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती मानवत  याच्यां वतीने बैठकिचे आयोजन

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने मुस्लिम आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण या गंभीर विषयावर चर्चा करुन आरक्षण संबधी पुढील रणणीती ठरविण्यासाठी तालुका मानवत जि.परभणी  येथे तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन २२ आँकटोबंर रविवार रोजी सकाळी ११ वाजता सिपाई फंक्शन हॉल मानवत येथे  करण्यात आले आहे. 
मानवत तालुक्यातील मुस्लीम समाजातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते आजी माजी सरपंच,उपसरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ,डॉक्टर, वकील,व्यापारी ,पञकार व सर्व नागरिकांनी या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहान मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती मानवत तालुका याच्यां वतीने करण्यात आले आहे.

Saturday, October 14, 2023

राष्ट्रीय मागासवर्ग आयोग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सुनावणीस उपस्थीत राहण्याचे राज बेलदार संघटनाचे आवाहान

राष्ट्रीय मागासवर्ग आयोग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सुनावणीस उपस्थीत राहण्याचे राज बेलदार संघटनाचे आवाहान
परभणी /प्रतिनीधी 

महाराष्ट्रातील  लोध, लोधा, लोधी, बडगुजर, वीरशैव लिंगायत, सलमानी, सैन, किराड, भोयर पवार, सूर्यवंशी गुर्जर, बेलदार, झाडे, डोंगरी व कलवार या जाती समूहाचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे निवेदने प्राप्त झालेली आहेत. सदर निवेदनाच्या अनुषंगाने मा. आयोगाने दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे दुपारी १२.०० वाजता सुनावणी आयोजित केली आहे. तरी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे निवेदने सादर केलेल्या जाती संघटनाच्या  सदस्यांनी कागदपत्रे व पुराव्यासहित सुनावणीस उपस्थित राहायचे आहे या संबधी राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि हे बेलदार समाजाची बाजु आयोगासमोर मांडणार असुन  ज्यांना सोबत यायचे आहे त्यांनी ९०११६३३७०४ या क्रंमाकावर संपर्क साधावे व मोठ्या संख्येने बेलदार समाजबांधवानी यावेळी उपस्थीत राहण्याचे आवाहान समाज बांधवाना राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि ,राज्य संघटक मुस्तखीम बेलदार यांनी केले आहे