Wednesday, January 24, 2018

लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमींवर संघटना बळकटीसाठी तयारीला लागा-बबनराव लोणीकर

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे - बबनराव लोणीकर

केंद्र व राज्य सरकारने शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबविलेल्या असताना विरोधी पक्ष हल्लाबोल सारखे कोणताही ठोस मुद्दा नसलेली आंदोलने करून जनतेची दिशाभूल करत आहेत. भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमींवर संघटना बळकटीसाठी तयारीला लागावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

परभणी येथील वरद मंगल कार्यालयात समाधान शिबिराच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोजित पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार मोहन फड, माजी आ. विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, बालाजी देसाई, आनंद भरोसे, मेघनाताई बोर्डीकर, डॉ. प्रफुल्ल पाटील, राहुलभैय्या लोणीकर, गणेश दादा रोकडे, श्यामसुंदर मुंढे, खंडेराव आघाव, डॉ. विद्याताई पाटील, डॉ. मीना परतणे, संजय साडेगावकर, मंगलताई मुग्दलकर, अरविंद थोरात, राधाजी शेळके, अशोकराव डहाळे, गणेशराव काजळे, नसरीन पठाण, शिवहारी खिस्ते आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
ना. लोणीकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे परभणी व जालना जिल्ह्यात रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबई किंवा नागपूरला ५ तासात पोहचता येणार आहे.  त्याचा फायदा शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य जनतेला होणार आहे. शेगाव ते पंढरपूर हा वारकरी बांधवांच्या सोयीसाठीच्या रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या रस्त्याबद्दल वारकरी बांधवांमधुन समाधान व्यक्त होत असताना परतूरमधील विरोधी पक्षांच्या काही मोजक्या मंडळींना मात्र ते सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनी विरोध केला. अशा विरोध करणाऱ्या राजकीय मंडळींच्या घरावर दिंडी मोर्चे काढावेत, असेही ना. लोणीकर म्हणाले.
कार्यकत्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींपर्यंत पोहोचवावा,असे आवाहन करून ना. लोणीकर म्हणाले की, समाधान शिबिरामध्ये सरकारी वरील जनतेचे विविध प्रश्न सोडविले जाणार आहेत. त्यामुळे या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घ्यावे असे आवाहन ना. लोणीकर यांनी केले. दि. २६ जानेवारी रोजी परभणी जिल्ह्यात ४० ठिकाणी तिरंगा यात्रा निघणार आहे. त्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही ना. लोणीकर यांनी केले. यावेळी आमदार मोहन फड, माजी आ. गव्हाणे, जिल्हाध्यक्ष चाटे आदींची भाषणे झाली. यावेळी सुमारे दीड हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment