Tuesday, March 20, 2018

पञकारांवरील खोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा पञकार संघ मानवतच्या वतीने आंदोलन - सत्यशिल धबडगे


पञकारावरील खोटे गुन्हे मागे घ्या;मानवत पञकार संघाची मागणी.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२०:  परभणी येथील पञकारावर खोटे गुन्हे दाखल करुन चौथ्या स्तंभावर आघात करण्याचा प्रयत्न होत असल्या प्रकरणी मानवत पञकार संघाच्या वतीने काळ्याफिती लावुन आज दि.२० मार्चरोजी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पञकारावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
इयत्ता दहावीच्या विज्ञान तञज्ञान विषयाची प्रश्नपञीका व्हाईरल झाली व अनेक मोबाईलवर  प्रश्नपञीका फिरल्या  प्रकरणाची संबंधीत पेपर सुटल्या नंतर पेपर परताळून पाहिले आसता तंतोतंत निघाली या सदर्भात माध्यमिक शिक्षणधिकारी यांच्याशी संवाद  साधला त्यानंतर त्यांची रितसर प्रतिक्रियासह दि.१४ मार्च रोजी दैनिक लोकमत व दैनिक पुण्यनगरी या वृत्तमानपञात  बातमी प्रसिद्धी झाली.
तथापि या बाबतीत शहानिशा करून  जिल्हा शिक्षणधिकारी यांना माहिती देवून ही जिल्हा शिक्षण विभाग परभणी यांनी नवामोढा पोलिस स्टेशन परभणी येथे दैनिक लोकमत जिल्हाप्रतिनिधी व दैनिक पुण्यनगरी जिल्हाप्रतिनिधी यांच्या  विरूध्द कलम ५ (१) , ५ (२) म वि गैर कायदा १९८२ व कलम ७२ नुसार शहानिशा न केल्या बातमी छापल्या बदल गुन्हा दाखल   केला . हा प्रकार  म्हणजे चाललेला गैरप्रकार माध्यमाने उघडकीस आनुनये  म्हणून हे  कारस्थान  रचल्याचे  दिसत आहे. वास्तविक पहाता  संबंधित दैनिकांच्या जिल्हाप्रतिनिधीनी रितसर शहानिशा करूनच पेपर व्हाईरल चे वृत्त प्रसिध्द केले असताना चक्क बातमी  का छापली म्हणून  त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करणे म्हणजे लोकशाही च्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्या सारखे आहे परभणी जिल्हात दहावी व बारावी परीक्षेत  कॉपी चा सुळसुळाट आहे तर अनेक परिक्षा केंद्रावर गैरप्रकार होत आहेत प्रश्नपञीका  मोबाईल व्हाईरल होत आहेत. कालपरावा वर्धा येथे पेपरफुटी प्रकरणी संशियत आरोपी म्हणून परभणी येथिल आरोपी वर गुन्हा दाखल झाला आहे  हे सर्व होत आसताना  प्रसारमाध्यमानी डोळाझाक काम करावे आमचे गैर कृत्य उघडकीस आनुनये म्हणुन  शिक्षण विभागाच्या अधिकाराना वाटत आहे वरील प्रकरणी दैनिक लोकमत दैनिक पुण्यनगरी यांच्या पञकारांवर गुन्हे दाखल केले आहेत हे गुन्हे मागे घेण्यात यावेत व तसेच कॉपी प्रकरणी डोळाझाक करणाऱ्या शिक्षणधिऱ्या विरूद्ध कारवाई करण्यात यावी असे निवेदन मानवत  तहसिलदार नखुल वाघुंडे यांना मानवत तालुका पञकार संघाच्या वतिने देण्यात आले .यावेळी मानवत तालुका पञकार संघाचे तालुका अध्यक्ष सत्यशिल धबडगे , मा.ता.पञकार माजी.अध्यक्ष कचरूलाला बारहाते , पञकार संघाचे सचिव प्रा.गोविंद गोलाईत ,पञकार संघाचे उपध्यक्ष मुस्तकिम बेलदार, भैय्यासाहेब गायकवाड , विलास बारहाते ,डॉ.सचिन चिद्रवार ,शामभाऊ झाडगावकर , हफिस बागवान , अलिम खान ,ईरफान बागवान ,राजु पठाडे  उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment