Friday, August 10, 2018

दिल्ली येथे समाजकंटकानी संविधानाचे दहन केल्याच्या निषेधार्थ मानवत येथे आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्ताचे आंदोलन.

दिल्ली येथील घटनेचा मानवत येथील आंबेडकरी चळवळीच्या वतीने  निषेध.

मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.१०: देशाची राजधानी दिल्ली येथील जंतर मंतर येथे  काहि समाजकंटकानी भारतीय संविधानाचे दहन केल्याचे निषेधार्थ मानवत येथे शिव,फुले शाहु आंबेडकरी चळवळीच्या वतीने निषेध करुन तहसिलदार मानवत मार्फत मा.राष्टृपती  यांना आज दि.१० अॉगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,दि.९ अॉगस्ट रोजी जंतर मंतर दिल्लीयेथे भारताचे संविधानाचे दहन काहि मनुवादी व सनातन वादी विचारसरणीच्या केले आहे राजधानी असणाऱ्या दिल्लीत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहि असणाऱ्या स्वतंत्र्य सार्वभौम देशाच्या राज्यघटनेची प्रत देशद्रोहीनी जाळली आहे तसेच एस.सी.,एस.टि,ओबीसी मुर्दाबाद व संविधान निर्माते मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या या बाबतचे वृत्त कोणत्याहि प्रसारमाध्यमांनी दाखवले नाही हे सर्व प्रकार घडत असताना पोलीसमाञ बघ्याची भुमीका घेत होते भारतीय राज्यघटनेची आपमान करणाऱ्यावर लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करावी अन्यथा १५ अॉगस्ट पासुन लोकशाहि मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी मोठ्याप्रमाणात समस्त शिव फुले शाहु आंबेडकर चळवळी चे कार्यकर्ते उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment