Tuesday, June 2, 2020

आमदार बाबाजानी दुर्राणीसह मुस्लीम बांधवावरील गुन्हे मागे घेण्याची समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांची मागणी.

आ.बाबाजानी दुर्राणीसह मुस्लीम बांधवावरील गुन्हे मागे घेण्याची समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांची मागणी.

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि,२: पाथरी येथे सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी  यांच्यासह १२५ जणांवर पाथरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे  प्रशासनाने केलेल्या या  कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक नाराजी  व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवर पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे या मागणीचे निवेदन समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांच्यावतीने दि. २ जुन  रोजी मानवत तहसिलदार डि डि फुफाटे यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, पाथरी येथे सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी ,तरबेज खान,तारेख खान यांच्यासह १२५ मुस्लीम बांधवावर   पाथरी पोलीस स्टेशन येथे सामुहिक रित्या नमाज पठण केल्या बद्दल  तसेच संचारबंदि  जमाव बंदि आदेशाचे उल्लंघन केल्या बद्दल  गुन्हा दाखल झाला आहे हे दुर्दैवी असुन आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पुर्ण लॉकडाऊन च्या काळात गोरगरीबांना मोठ्याप्रमाणात मदत केली असुन त्यांनी केलेल्या  वेळोवेळी आवाहानामुळे पाथरी शहरासह तालुक्यातील नागरीकांनी लॉकडाऊन चे कठोर पालन केले आहे तसेच ईदची नमाज पठण करताना त्यांनी शारीरिक अंतराचे महत्वपुर्ण पालन केले आहे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक नाराजी  व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ मुस्लीम बांधवावरील  पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे असे नमुद केले आहे.यावेळी दशरथ शिंदे पाटिल ,युवानेते आसद खान , शेख ईसाक भाई आदी उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment