Thursday, April 29, 2021

युवा नेते डाॅ.अकूंश लाड यांच्या प्रयत्नाने व विज वितरण कंपनीच्या सहकार्याने घरकूल लाभार्थ्यांचा प्रश्न सूटला.

युवा नेते डाॅ.अकूंश लाड यांच्या प्रयत्नाने व विज वितरण कंपनीच्या सहकार्याने घरकूल लाभार्थ्यांचा प्रश्न सूटला.

मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ मधिल जिजाऊ नगर मोदकेश्वर मंदिर परिसरातील हमालवाडी वसाहती मधील वास्तव्याला असलेल्या  येथील रेखा देविदास कांबळे प्लाट नंबर  ( ७ ) आणि सुनिता संजय राठोड प्लाट नंबर  ( ६ ) यांच्या घरावरून विद्यूत वाहिणी लाईन ची तार गेली असल्याने त्यांच्या घरकुला चे बांधकाम दोन वर्षा पासून रखडले होते. या संबंधीची माहीती मुरलीधर ठोंबरे यांनी मानवत नगर परिषदेचे शिल्पकार , युवा नेते डॉ. अंकुश भाऊ लाड यांच्याशी संपर्क साधून या विषयी संपूर्ण माहीती दिली तसेच या भागातील नागरीकांची अडचन, समस्या त्यांना सांगीतली  तसेच घरकूल धारक लाभार्थी यांच्या घरावरून लाईन ची तार गेली असल्याने त्यांच्या घरकुलाचे बांधकाम दोन वर्षा पासून रखडले आहे. याची दखल घेऊन  युवा नेते डॉ. अकूंश लाड  यांनी  नगर परिषदेचा विद्यूत विभाग व विज वितरन कंपनीशी चर्चा करून या भागातील नागरीकांचा प्रश्न मांडला व विज वितरन कंपनीच्या सहकार्यांने या भागातून लाभार्थ्यांच्या घरावरून गेलेले विज वितरन कंपनीचे तार काढून घेऊन लाभार्थ्या सह या भागातील नागरीकांचा अनेक दिवसाचा प्रश्न मार्गी लावला . 
त्यामूळे या भागातील दोन वर्षां पासून रखडलेले घरकुल चे बांधकाम आता सुरू होईल. व हक्काचा निवारा मिळेल अशी आशा या भागातील नागरीकातून पल्लवित झाल्या आहेत.
मानवत नगर परिषदेचे शिल्पकार  युवा नेते डाॅ. अकूंश लाड यांनी अवघ्या दोन दिवसात घरावरून लाईन ची तार काढून सहकार्य केल्या बद्दल   विकास पुरूष डॉ. अंकुश  लाड यांच्या सहकार्याने काम  मार्गी लागले त्या बद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे  तालुका अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांनी डॉ. अंकुश  लाड  यांचे आभार  मानले केले.

No comments:

Post a Comment