मानवत येथे १०८ महिलांना शिलाई मशीन, तर १०८ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
[]उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम[]
मानवत / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव व आमदार सईद भैया खान यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१६ नोव्हेंबर सोमवार रोजी माऊली मंगल कार्यालय,मानवत येथे १०८ महिलांना शिलाई मशीन व १०८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले.या सर्व साहित्याचे वाटप शिवसेना नगरसेवक तथा शिवसेना गटनेते ॲड.विक्रमसिंह दहे, नगरसेवक अहद राज, पंचायत समिती सदस्य गोविंद नाईक,मा.नगरसेवक बळीराम चव्हाण,नगरसेवक अनंत मामा भदर्गे, नगरसेवक दिपक बारहाते, मा.जिल्हा परिषद सदस्य गंगाधर पितळे, मा. उपसभापती शिवाजीराव हिंगे,ऋषी नाना मांडे,ॲड.संदीप दहे, आसेफ खान, परवेज शेख, बाबासाहेब भदर्गे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.शहरप्रमुख अनिल जाधव यांनी केले. प्रस्ताविक मा.तालुकाप्रमुख माणिकराव काळे यांनी केले तर शिवसेना गटनेते ॲड. विक्रमसिंह दहे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. तालुकाप्रमुख माणिकराव काळे,मा.शहरप्रमुख अनिल जाधव, सरपंच अक्रूर मगर, सरपंच केशवराव अवचार,बाळासाहेब पिपंळे,सरपंच पिंटू मांडे, सरपंच बबलू राजे,विराज मांडे, मुंजाभाऊ सुरवसे,विजय यादव,योगेश मगर,गोविंद यादव,नयन शिंदे,वसंत जोगदंड,परमेश्वर काकडे,अंकुश खटे,प्रताप फंड,दिगंबर खवास,बि.जे. भदर्गे आसाराम मगर इत्यादींनी परिश्रम घेतले.