Wednesday, September 6, 2023

ईटाळी येथील विद्यार्थीसाठी बससेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण

ईटाळी येथील विद्यार्थीसाठी बससेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी  आमरण उपोषणास सुरुवात
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत तालुक्यातील ईटाळी येथील विद्यार्थीना शिक्षणासाठी मानवत येथे येण्या जाण्यासाठी बससेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी व युवकांनी  दि.५ सप्टेंबर रोजी पासुन मानवत तहसिल कार्यालय येथे आमरण  उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. 
निवेदनात नमुद आहे की, इटाळी  येथील गावातील पाच ते सहा मुली मानवत येथे शिक्षणासाठी येत आहेत या मुलीचे आई-वडील कारखान्याला जातात अशावेळी मुलीच्या शिक्षणासाठी वाहनांसाठी पैसे देण्याची अडचण निर्माण होत आहे गेल्या अनेक वर्षापासून हे कुटुंब या समस्यांना  तोंड देत आहेत यासाठी अनेक अर्ज एस टि  महामंडळाकडे केले आहेत तरी देखील यावरती कोणती कारवाई झाली नाही त्यामुळे भारतीय संविधानानुसार मुलीचे शिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाचे आहे तेव्हा आपण लवकरात लवकर बस सुविधा सुरू करण्यात यावी यासाठी  सर्व कुटुंबाकडून  आमरण साखळी उपोषणास आपल्या कार्यालया समोर  बसत आहे .
 यावेळी मेघराज गवारे ,महेश गायकवाड, मारुती खंदारे ,बाबासाहेब गायकवाड, महादेव गायकवाड ,सखुबाई खंदारे ,मुंजाजी खंदारे यांच्यांसह विद्यार्थी व विद्यार्थीनी व पालक  उपोषणास बसले आहे. 

No comments:

Post a Comment