Thursday, November 9, 2023

डॉ.अंकुश लाड याच्यां प्रयत्नामुळे २५ वर्षापासून चा प्रलंबित पाणी प्रश्न मिटला

 युवानेते डॉ.अंकुश लाड याच्यां प्रयत्नामुळे २५ वर्षापासून चा प्रलंबित पाणी प्रश्न मिटला

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन द्वारे संपूर्ण शहरात पाणी उच्च दाबाने पुरवठा होत होता परंतु जुने मानवत असलेल्या काही परिसरात मात्र उच्च दाबाने पाणी मिळत नसल्याने गेल्या २५ वर्षापासून त्या ठिकाणच्या नागरिकांचा पाणी प्रश्न गंभीर बनला होता मानवत नगरपालिकेचे युवा नेते डॉ.अंकुश लाड यांनी या प्रश्नाकडे लक्ष देत तात्काळ हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन त्याचे काम पूर्णत्वाकडे नेले असून आता २५ वर्षापासून चा प्रलंबित पाणी प्रश्न कायमचा सुटला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, मानवत शहरात जुने मानवत म्हणून ओळख असलेले विठ्ठल मंदिर परिसर, चंदनेश्वर गल्ली ,खंडोबा टेकडी परिसर ,जुने दत्त मंदिर परिसर ,कडतन गल्ली परिसर ,बिडी कारखाना परिसर ,माळी गल्ली परिसर ,झारे गल्ली परिसर ,बौद्ध नगर ,सिद्धेश्वर नगर, चौमठ विहीर परिसर ,आदिशक्ती चौक या सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा उच्च दाबाने होत नसल्याने या ठिकाणच्या नागरिकांना गंभीर पाणी समस्येचा सामना करावा लागत होता या ठिकाणच्या नागरिकांनी गेल्या पंचवीस वर्षापासून नगरपालिकेकडे गाऱ्हाणे मांडत पाणी प्रश्न सोडवावा यासाठी निवेदने , आंदोलने केले होते परंतु या ठिकाणचा प्रश्न सोडवायचा जरी म्हटला तरी तो साधारणपणे सोडवता येत नव्हता कारण हा संपूर्ण परिसर भौगोलिक दृष्ट्या चढ असलेल्या भागात असल्याकारणाने पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन त्या ठिकाणी उच्च दाबाने पाणीपुरवठा करू शकत नव्हत्या याचा मार्ग काढणे अत्यंत किचकट होते परंतु  युवा नेते डॉ. अंकुश लाड यांनी या प्रकरणाचा मार्ग काढायचाच असे ठरवल्याने त्यांनी मुख्याधिकारी कोमल सावरे , अभियंता सय्यद अन्वर व पाणीपुरवठा अभियंता विनय आडसकर यांच्यासोबत बैठक घेऊन हा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा केली आणि चर्चांती सध्या मानवत शहरात जी नवीन पाईपलाईन टाकली आहे त्या पाईपलाईन ला आणखी एक समांतर पाईपलाईन जोडून जर या परिसरात नवीन पाईपलाईन टाकली तर हा पाणी प्रश्न बऱ्यापैकी मिटू शकतो असे या चर्चेतून निघाल्यानंतर तात्काळ या कामास सुरुवात झाली नुकत्याच झालेल्या नव्या पाईपलाईनला समांतर पाईपलाईन मुख्य रस्त्यावरील सांगली बँक समोर असलेल्या चौकातून खाली जुन्या मानवत कडे खोलपर्यंत नवीन खोदकाम करून टाकण्यात आली आणि या जुन्या मानवत परिसरातला लोकांचा पाणी प्रश्न कायमचा निकाली  लागला फार दिवसानंतर उच्च दाबाने पाणीपुरवठा होऊ लागल्याने या ठिकाणच्या लोकांनी सुटकेचा विश्वास  सोडला या परिसरातील लोकांनी युवा नेते डॉ. अंकुश लाड यांना बोलवुन  आभार मानुन त्यांचा सत्कार केला .

No comments:

Post a Comment