Monday, February 26, 2024

जलशुद्धीकरण परिसर मधील महादेव मंदिराचा जीर्णोद्वार कार्यक्रमाचा युवानेते डॉ.अंकुश लाड याच्यां हस्ते श्री गणेशा

 जलशुद्धीकरण परिसर मधील महादेव मंदिराचा जीर्णोद्वार कार्यक्रमाचा युवानेते डॉ.अंकुश लाड  याच्यां हस्ते श्री गणेशा

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत शहरातील जलशुद्धीकरण  प्रकल्प अंतर्गत  असलेल्या परिसरात  महादेव मंदिराचा  जीर्णोद्धार व्हावा व त्या ठिकाणी सुंदर असे महादेवाचे मंदिर आणि सभागृह असावे अशी परिसरात राहणाऱ्या नागरिकांची विशेष करून महिलांची मागणी होती या मागणीचा विचार करून युवा नेते डॉ. अंकुश लाड यांनी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जलशुद्धीकरण  प्रकल्पात असलेल्या महादेव मंदिराच्या कामाचा श्री गणेशा केला.

मानवत शहरात पाथरी रोडवर असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत परिसरात गेल्या ३० ते ४० वर्षापासून महादेवाची मूर्ती त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी प्रतिष्ठापना करून ठेवलेली आहे.  या मूर्तीला परिसरातील नागरिक व विशेष करून महिला पूजन करण्यासाठी नित्यनियमाने जातात.  त्या ठिकाणची स्वच्छता मंदिराचे पावित्र्य जपण्याचे काम परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी व महिलांनी केले आहे.  याचमुळे या ठिकाणच्या मंदिराला परिसरातील नागरिकांची विशेष अशी नाळ जोडलेली आहे.  यातूनच त्या ठिकाणी चांगले मंदिर बांधून समाज मंदिर बांधावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांची व महिलांची होती.  त्यांनी डॉ. अंकुश लाड यांच्याकडे आपण सर्व गावातील मंदिरे व समाज मंदिर फार मोठ्या प्रमाणात बांधली आहेत जीर्णोद्वार केला आहे.  त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत  असलेल्या परिसरातील महादेवाच्या मूर्तीला छान असे मंदिर बांधून त्या ठिकाणी देखील सभागृह बांधावे या मागणीचा रेटा लावला होता.  या मागणीचा विचार करून २६ फेब्रुवारी  रोजी अखेर या कामाचा श्री गणेशा करण्यात आला यावेळी परिसरातील महिलांसह फार मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.  केवळ मंदिराचा जिर्णोद्वारच नव्हे तर जलशुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत परिसरातील रस्ते , सुशोभीकरण , सभाग्रह व मंदिर या सर्व कामाचा आढावा घेत ही सर्व कामे पूर्णत्वास नेण्याचा मानस यावेळी डॉ. अंकुश लाड यांनी व्यक्त केला.या वेळी डॉ अंकुश लाड यांनी  रुद्र देवाचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. परिसरातील रस्ता, या ठिकाणचे सभागृह तसेच इतर कामांचे भूमिपूजनही याप्रसंगी केले. या कार्यक्रमास परिसरातील  अ‍ॅड. कांचन राठोड, धिरज राठोड, दिगंबर रोकडे, मदन रोकडे, विजय राठोड़, सुनिल दलाल, हणमंतराव ब्रम्हपूरकर, योगेश राठोड, अमित आहेर, बाळू गायकवाड, रवी कच्छवे , सुरज भाकरे, हर्षद खरात,भोला  यादव, पवन सेलूकर, बाळू गायकवाड, गणेश बाराहाते, शर्माजी यांची उपस्थिती होती. या कामाच्या शुभारंभाने   परिसरातील नागरिक व महिलांनी डॉ अंकुश लाड यांचे  विशेष असे आभार मानले.

No comments:

Post a Comment