Wednesday, August 12, 2020

मानवत येथील पान टपरी व्यवसाय सुरु करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी . [] पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन []

मानवत येथील पान टपरी व्यवसाय सुरु करण्याची
परवानगी द्या .
[] पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने तहसिलदारांना  निवेदन []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१२: कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे लागु झालेल्या  लॉकडाऊनमुळे मागील पाच महिण्यापासुन मानवत येथील पान टपरी व्यवसाय बंद असल्यामुळे पान टपरी व्यवसायीकांवर व त्यांच्या परीवारावर उपासमारीची वेळ आली असुन यामुळे पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांना दि.१२ अॉगस्ट रोजी पान मसाला व पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात नमुद आहे की, मानवत येथील पान मसाला व पान टपरी व्यवसायीकांचे लॉकडाऊन पासुन आज पर्यत पान टपरी बंद आहे व्यवसाय बंद झाल्यामुळे कुटुबांवर उपासामारीची वेळ आली आहे आरोग्यखर्च ,घरगुती खर्च करण्यासाठी हतबल झाले आहे त्या सर्व बाबीमुळे आमच्या कुटुबांवर उपासामारीचा फटका बसत आहे यामुळे पान टपरी व्यवसायीकांना आर्थिक मदत द्यावी किंवा ईतर कोणत्याहि प्रकारची कामे करण्यासाठी सुविधा पुरवुन द्यावी अन्यथा आम्हास आमचे पान टपरी व्यवसाय सुरु करण्याचे आदेशीत करावे नसता आपल्या कार्यालयाच्या समोर शासन नियमाप्रमाणे आमरण उपोषण करण्यात येईल परीणामी आपल्यावर ह्याची जबाबदारी राहिल असे नमुद केले आहे.
निवेदनावर अजमत खान, नंदुभाऊ राजे, रफिक बागवान , शफिक तांबोळी , जावेद बागवान ,अ. अजमत, रफिक तांबोळी ,मुखीद कुरेशी ,मतीन बागवान ,हरी ठोंबरे , अजीम तांबोळी ,कृष्णा मेहेञे आदीच्या स्वाक्षरी आहेत.

No comments:

Post a Comment