Thursday, January 25, 2024

सर्वेक्षणाच्या कॉलम मध्ये बौध्द उल्लेख करण्याची मानवत येथील बौध्द समाज बांधवाची मागणी

सर्वेक्षणाच्या कॉलम मध्ये बौध्द असा उल्लेख करण्याची मानवत येथील बौध्द समाज बांधवाची मागणी
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी पासुन महाराष्ट्र शासनाच्या वतीने  सुरु असुन या सर्वेक्षणामध्ये बौध्द जातीचा उल्लेख येत नसल्यामुळे हा सर्वे  बौध्दांवर अन्याय करणारा आहे सदरील आदेश रद्द करुन सुधारीत आदेश काढण्यात यावा या मागणीचे निवेदन दि.२५ जानेवारी रोजी मानवत शहरातील बौध्द समाज बांधवाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसिलदार रंजित सिंह कोळेकर यांच्यां मार्फत पाठविण्यात आले आहे.
निवेदनात नमुद केले आहे की,मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्रात दिनांक २३ जानेवारी पासून सुरु झाले असून सदरील प्रगणक यांच्या मोबाईल अँपमध्ये हिंन्दु महार असा जातीचा कॉलम येत असून सदरील कॉलम हा चुकीचा व बौध्दांवर अन्याय करणारा आहे. तसेच  दिनांक २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग आयोगाने अनुसुचीत जातीच्या कॉलम मध्ये नवबौध्दांचा व बौध्दांचा धर्मातरापुर्वीची जातीची नोंद करावी असे आदेश दिले आहेत हा आदेश आमच्यावर अन्याय करणारा आहे करीता सदरील आदेश रद्द करुन सुधारीत आदेश काढण्यात यावे असे न झाल्यास आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलने करावी लागतील याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील  मराठा आरक्षणच्या सर्वेक्षणाच्या कॉलम मध्ये बौध्द असा उल्लेख करण्यास वरिष्ठांना कळवावे असे निवेदनात  नमुद केले आहे.
निवेदनावर आनंद मामा भदर्गे , जनार्दन कीर्तने , छगन भदर्गे , शैलेश वडमारे , संपत पंडित , दीपक ठेंगे, रवी पंडित , राहुल भदर्गे, राजू भैय्या खरात , सत्यशील धबडगे ,फकीरा सोनवणे  ,गौतम जमदाडे , बाबासाहेब सोनटक्के यांच्यांसह 
 बौध्द समाज बांधवाच्यां स्वाक्षरी निवेदनावर आहे.

No comments:

Post a Comment