Wednesday, January 17, 2024

मानवत शहरातील बहुप्रतीक्षित मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे उदघाटन डॉ.अंकुश लाड याच्यां हस्ते संपन्न

मानवत शहरातील बहुप्रतीक्षित मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे उदघाटन डॉ.अंकुश लाड याच्यां हस्ते संपन्न 

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे उदघाटन युवानेते विकासपुरुष  डॉ.अंकुश लाड याच्यां शुभ हस्ते दि.१७ जानेवारी रोजी करण्यात आले. अनेक दिवसांपासूनचा प्रश्न मिटल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मानवत शहरातील शासकीय विश्रामगृह ते महाराणा प्रताप चौक हा अडीच कि. मी. लांबीचा एकमेव मुख्य रस्ता असून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण  करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. कपडा मार्केट, भाजी मार्केट असून यासह  महापुरुषांच्या जयंती मिरवणूक,गणेश मिरवणूक या मार्गाने होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला होता. त्यामुळे वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच धुळीचा त्रासही मोठ्या प्रमाणावर होत होता.नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन डॉ.अंकुश लाड यांनी तात्काळ पुढाकार घेत डांबरीकरणासाठी  निधी मंजुर करून आणला. सर्व प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रिया पार पडून बुधवार दि. १७ जानेवारी रोजी प्रत्यक्ष कामाचे उदघाटन करण्यात आले. हे काम कॅट आय  या आधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. यामुळे धूळीची समस्या भेडसावणार नाही.

या वेळी विजयकुमारजी कत्रुवार, जयकुमारजी काला, प्रकाश शेठ पोरवाल, श्रीकिशनजी सारडा, संजयजी लड्डा, अश्रोबा कुऱ्हाडे पाटील , ज्ञानेश्वर मोरे,सुरेश शेठ कडतन,गणेश मोरे पाटिल, बाबुराव हाळनोर, मुंजाभाऊ तरटे, डॉ योगेश तोडकरी, शिवाजी पाटील ,गणेश कुमावत ,राजकुमार खरात, किरण बारहाते, दत्ता चौधरी,मोहन लाड, बालाजी कुऱ्हाडे, शफिक भाई बागवान, नागनाथ कुऱ्हाडे, नगरा अभियंता सय्यद अन्वर  ,बळीराम दहे, ओम भाऊ चव्हाण,पंकज लाहोटी,विजय कीर्तनकार, बाबा कच्छवे ,योगेश जाधव ,डॉ विष्णू काकडे, सूर्यकांत कडतन, आप्पा भिसे, विठ्ठलराव पवार ,संजय नाईक , सचिन मगर याच्यांसह  शहरातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment