Friday, August 15, 2025

डॉ.जगदीश शिंदे यांच्या "किंग्स मिसळ" हॉटेलचा आ. राजेश दादा विटेकर यांच्या हस्ते शुभारंभ

डॉ.जगदीश शिंदे यांच्या "किंग्स मिसळ" हॉटेलचा आ. राजेश दादा विटेकर यांच्या हस्ते शुभारंभ
मानवत  /  मुस्तखीम बेलदार

मानवत येथे ज्येष्ठ समाजसेवक डॉ.जगदीश शिंदे यांच्या "किंग्स मिसळ" या हॉटेलचा शुभारंभ पाथरी विधानसभा चे लोकप्रिय आमदार राजेश दादा विटेकर यांच्या शुभहस्ते दिनांक १५  ऑगस्ट रोजी संपन्न झाला  यावेळी आमदार राजेश दादा विटेकर यांनी बोलताना डॉ. जगदीश शिंदे यांना नव्या व्यवसायिक वाटचालीसाठी  मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच उत्तम चव, स्वच्छता आणि ग्राहकाभिमुख सेवा या ब्रीदवाक्यासह हे हॉटेल नक्कीच खाद्यप्रेमींच्या मनात स्थान मिळवेल, याची खात्री आहे असे आमदार राजेश दादा विटेकर म्हणाले.
याप्रसंगी मानवत नगरीचे युवानेते डॉ. अंकुश  भाऊ लाड, सभापती पंकजभैय्या आंबेगावकर, उपसभापती नारायण भिसे, संचालक ज्ञानेश्वर मोरे, सुरज काकडे, अंबादास तूपसमुद्रे, गोपाळ सुरवसे, डॉ. सचिन कदम, आकाश राय ,संतोष लाडाने, अभिषेक आळसपुरे, सत्यशील धबडगे, स्वप्निल शिंदे उपस्थित होते.



No comments:

Post a Comment