साथ सोबत निवासी अस्थी दिव्यांग विद्यालयात गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत येथील साथ सोबत निवासी अस्थी दिव्यांग विद्यालयात गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे चेअरमन श्री. इमरान अलीशा खान यांनी भूषवले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक गौरी सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साजिद सर यांनी केले.
"हर घर तिरंगा" अभियानांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शाळेत रंगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. सोफिया मॅडम तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment