Thursday, April 29, 2021
युवा नेते डाॅ.अकूंश लाड यांच्या प्रयत्नाने व विज वितरण कंपनीच्या सहकार्याने घरकूल लाभार्थ्यांचा प्रश्न सूटला.
Tuesday, April 27, 2021
मानवत येथील अर्शिन नजातुल्ला खान यांचा पहिला रोजा
Monday, April 26, 2021
संचारबंदिचे ऊल्लघंन करणाऱ्यावर पोलीस उपनिरिक्षक नागनाथ तुकडे यांची कारवाई
Sunday, April 25, 2021
अनील जाधव यांच्या पुढाकारातुन मानवत शिवसेना मदत केंद्राच्या वतीने कोव्हिड रूग्णांना पोषक आहार वाटप
Friday, April 23, 2021
शिक्षणसेवकांना कोव्हिड १९ च्या कामात विमा सुरक्षा कवच देण्याची शिक्षणसेवकांची मागणी.
औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीसांना जेवन व पाणी बॉटलचे वाटप
Sunday, April 18, 2021
अधिस्वीकृतीधारक पत्रकाराप्रमाणे इतर पत्रकारांनाही वृत्त संकलनाची संचारबंदीत सूट द्या - किशन बारहाते
अधिस्वीकृती धारक पत्रकाराप्रमाणे इतर पत्रकारांनाही वृत्त संकलनासाठी संचारबंदीत सूट द्या - किशन बारहाते
Friday, April 16, 2021
परभणी येथील शेख शाहेद याचा पहिला रोजा संपन्न
परभणी येथील शेख शाहेद याचा पहिला रोजा संपन्न .
Monday, April 12, 2021
मानवत येथे लाईफ लाईन हॉस्पिटलचे उदघाटन मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद ईसाक यांच्या हस्ते संपन्न
Sunday, April 11, 2021
राज बेलदार समाजाने कोविड लसीकरण करुन घ्यावे - सय्यद अबरार ईलाहि
Saturday, April 10, 2021
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती घरातच साजरी करा - प्रा .विठ्ठल तळेकर
Wednesday, February 24, 2021
सर्दि खोकला ताप आल्यास आर टि पी सी आर तपासणी करा - डॉ. विठ्ठल काळे
Sunday, November 29, 2020
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतिश चव्हाण यांना मोठ्या मताधिंक्यांने निवडुन द्या - प्रेरणा ताई वरपुडकर
Wednesday, November 18, 2020
मानवत येथील डॉ. नेत्रदीप दगडू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांग तरुणाला तीन चाकी सायकलचे वाटप
Saturday, November 14, 2020
जळगाव येथील अमानुष घटनेचा मानवत येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघांच्या वतीने निषेध
Sunday, November 1, 2020
पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मानवत येथे नेञरोग तपासणी शिबीर,
Tuesday, October 27, 2020
पदविधरांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करणार - आ. सतिशभाऊ चव्हाण.
Friday, October 23, 2020
मानवत येथे शिष्यवृत्ती खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाची टाळाटाळ []राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यातर्फे तहसीलदारांना निवेदन []
Tuesday, October 20, 2020
मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर
मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर.
Thursday, September 24, 2020
बेलदार रत्न ईजि.सय्यद अहेमद साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त कोरोना योध्दा सन्मानपञाचे वाटप.
Sunday, September 20, 2020
संजय नाईक यांनी वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वृक्षलागवड साठी ३५५५ रु. वृक्षवंल्ली फाउंडेशन ला केली मदत
Monday, September 7, 2020
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या वतीने विविध मागण्या साठी काळ्या फिती लावून आंदोलन.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या वतीने विविध मागण्या साठी काळ्या फिती लावून आंदोलन.
Sunday, September 6, 2020
भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी गुलाब शेख यांची निवड.
Saturday, August 29, 2020
गणेश विसर्जन करताना नियमावलीचे पालन करा - मानवत पोलीस निरीक्षक उमेश पाटिल यांचे आवाहान.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२९: जिल्हा अधिकारी साहेब परभणी व पोलीस अधीक्षक साहेब परभणी यांनी कोरोना संसर्गजन्य आजार परभणी जिल्ह्यात जास्त प्रमाणात प्रसार होत असल्यामुळे सर्व गणेश मंडळाचे विसर्जन मिरवणुका यापूर्वीच रद्द केले आहेत .तरी प्रत्येकाने आपापल्या गणेश मंडळाची आरती करून विसर्जन करिता नगरपरिषद मानवत यांचे ट्रॅक्टर प्रत्येक गल्लीत व वार्डत येणार आहे.त्याच ट्रॅक्टर मध्ये गणेश मुर्ती ठेवावे कोणीही स्वतः गणेश मूर्तीचे विसर्जन करणार नाही याची नोंद मानवत शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणपती यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर सदस्यांनी घ्यावी असे आवाहान मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटिल यांनी केले आहे.
Friday, August 21, 2020
मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन [] कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी []
[] कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२१ : केंद्राने काढलेल्या नेमणुकीचा आदेश मागे घ्यावा व बाजार समिती कर्मचाऱ्यांना कर्नाटक राज्याप्रमाणे शासकीय सेवेत घ्यावे या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या कर्मचाऱ्यांनी २१ ऑगस्ट रोजी बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवत आंदोलन केले.
केंद्र सरकारने ५ जून रोजी अध्यादेश काढून बाजार समित्यांच्या आवराबाहेरील शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार नियमन मुक्त करून बाजार शुल्क रद्द केले आहे.बाजार शुल्क रद्द केल्यामुळे बाजार समितीचे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. यामुळे कर्मचारी वर्गाच्या वेतनावर परिणाम होणार आहे. तसेच बाजार समितीच्या आवारात बाहेर शेतमालाची खरेदी विक्री झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. बाजार समितीला बाजार शुलकातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा देखरेख, वीज पाणी, गोडाऊन, शेड, वजन काटे, आदि खर्च भागविणे अवघड होणार आहे. यामुळे केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश मागे घेऊन राज्यातील बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सचिव बालासाहेब कदम, सहाय्यक सचिव शिवनारायण सारडा, संजय होगे,शांता गवारे, रंगनाथ अब्दल, राम पांचाळ, राम राऊत, कैलास किरवले, दत्तात्रय चोखट, नंदू कच्छवे, मिलिंद राक्षे, सत्यशील धबडगे,विनोद सोळंके, विजय रणेर, बाळू कदम,सागर कडतन, रमेश मारेवाड, कैलास करडले, मारोती साठे, रेखा पवार, श्रीकांत वाघमारे,विकास काळे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
Sunday, August 16, 2020
औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी व रोटी बँक च्या वतीने काढा वाटप.
Wednesday, August 12, 2020
मानवत येथे महामंडलेश्वर मनिषानंद पूरीजी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण. मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१२: मानवत शहरामध्ये दि.१२ अॉगस्ट बुधवार रोजी श्री.खंडोबा मंदिर परिसरात जवळपास १०० झाडे लावून ते पुर्ण झाडे वाचवण्याचा श्री.खंडोबा मंदिर मित्र मंडळाच्या सदस्याने हा मनात संकल्प घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला
१००८ महामंडलेश्वर मनिषानंद पूरीजी महाराज व
ह.भ.प.श्री.१००८ स्वामी शिवेंन्द्र चैतन्य महाराज यांच्या वृ शुभहस्ते पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन तहसिलदार डि.डि.फुफाटे,
पोलीस निरीक्षक उमेश पाटील , मुख्याधिकारी जयवंत सोनवने उपस्थीत होते.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन अनिल जाधव,नरेश गौड,दिनेश देशमुख,ॲड.सुनिल जाधव,बालाजी दहे,आशोक नितनवरे,विलास देशमुख,बंडू तुरे,आप्पा भिसे व खंडोबा मंदिर मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांच्यावतीने करण्यात आले होते.
मानवत येथील पान टपरी व्यवसाय सुरु करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी . [] पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन []
परवानगी द्या .
[] पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१२: कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे लागु झालेल्या लॉकडाऊनमुळे मागील पाच महिण्यापासुन मानवत येथील पान टपरी व्यवसाय बंद असल्यामुळे पान टपरी व्यवसायीकांवर व त्यांच्या परीवारावर उपासमारीची वेळ आली असुन यामुळे पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांना दि.१२ अॉगस्ट रोजी पान मसाला व पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात नमुद आहे की, मानवत येथील पान मसाला व पान टपरी व्यवसायीकांचे लॉकडाऊन पासुन आज पर्यत पान टपरी बंद आहे व्यवसाय बंद झाल्यामुळे कुटुबांवर उपासामारीची वेळ आली आहे आरोग्यखर्च ,घरगुती खर्च करण्यासाठी हतबल झाले आहे त्या सर्व बाबीमुळे आमच्या कुटुबांवर उपासामारीचा फटका बसत आहे यामुळे पान टपरी व्यवसायीकांना आर्थिक मदत द्यावी किंवा ईतर कोणत्याहि प्रकारची कामे करण्यासाठी सुविधा पुरवुन द्यावी अन्यथा आम्हास आमचे पान टपरी व्यवसाय सुरु करण्याचे आदेशीत करावे नसता आपल्या कार्यालयाच्या समोर शासन नियमाप्रमाणे आमरण उपोषण करण्यात येईल परीणामी आपल्यावर ह्याची जबाबदारी राहिल असे नमुद केले आहे.
निवेदनावर अजमत खान, नंदुभाऊ राजे, रफिक बागवान , शफिक तांबोळी , जावेद बागवान ,अ. अजमत, रफिक तांबोळी ,मुखीद कुरेशी ,मतीन बागवान ,हरी ठोंबरे , अजीम तांबोळी ,कृष्णा मेहेञे आदीच्या स्वाक्षरी आहेत.
Wednesday, July 29, 2020
मानवत येथील खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेचे घवघवीत यश. [] निशात पाकिजा ९०% घेऊन ऊर्दु माध्यमातून तालुक्यातुन प्रथम []
[] निशात पाकिजा याने ९०% घेऊन ऊर्दु माध्यमातून तालुक्यातुन प्रथम []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२९: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकाल आज दि.२९ जुलैरोजी बुधवारी जाहीर झाला आहे यात
मानवत येथील भारत रत्न खान अब्दुल गफ्फार खान उर्दू विद्यालयातुन तसेच मानवत तालुक्यातुन उर्दू माध्यमातून प्रथम येण्याचा मान सय्यद निशात पाकिजा सय्यद मुस्तखीम या विद्यार्थिनी ने ९०% मार्क घेऊन मिळविला आहे तसेच मो.साद बारी कुरेशी याने ८१% द्वितीय ,सानीया शेख रफिक ७८%, सायमा अ. रशीद कुरेशी ७८% तृत्तीय , शगुफ्ता खानम असद खान यांनी चतुर्थ क्रमांक पटकविला आहे. या यशाबद्दल भारत रत्न खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेचे अध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी साहेब, सचीव तारेख दुर्राणी साहेब ,मुख्यध्यापक शेख मुखतार सर, मुस्ताक सर,रहमान सर,जुबेर सर,जावेद सर, मुजीब सर,मोईन सर,सिद्दिकि सर, ईनामदार सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Wednesday, June 10, 2020
फेसबुकच्या माध्यमातून जातीवाचक पोस्ट करणाऱ्या समाजकंटकावर कायदेशिर कारवाई करण्याची मानवत रिपब्लीकन सेनाची मागणी.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१०:फेसबुकवर जातीवाचक अश्लील पोस्ट प्रसारीत केल्याबद्दल समाजकंटकास अटक करुन कायदेशिर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन सेना शाखा मानवतच्या वतीने तहसिलदार साहेब मानवत यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब व मा.गृहमंत्री साहेब यांना दि.१० जुन रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमुद केले आहे की,प्रफुल्ल संजय साळवे या समाजकंटकाने फेसबुकच्या माध्यमातून दोन दिवसापुर्वी मो.नं. ९११२१२१०९५ या क्रंमाकावरुन जातीवादी पोस्ट प्रसारीत केली असुन त्यामध्ये बौध्द समाजाच्या स्ञीयाविषयी अश्लील भाषेत टिका केली आहे सदर ईसम हिगोली येथील रहिवासी आहे त्याच्या फेसबुक अकाऊट वरुन दिसत आहे या प्रकरणातील सदरील समाजकंटकास लवकरात लवकर अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आले यावा अन्यथा लोकशाहि मार्गाने रिपब्लीकन सेना मानवतच्या वतीने तिव्र निषेध करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष दिपक ठेंगे ,युवा ता.अध्यक्ष रवीभाऊ पंडित , युवानेते नागसेन भदर्गे ,मिलिंद तुपसमुद्रे,विजय खरात ,किरण पंडीत,बाबा ढवळे,शुंभम पचागें आदी उपस्थीत होते.
Wednesday, June 3, 2020
मानवत तालुक्यातील कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल इंग्रजी शाळेच्या प्राचार्यपदी डॉ. बिंदू श्रीवास्तव यांची नियुक्ती.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.३: मानवत तालुक्यातील कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली या इंग्रजी शाळेत डॉ. बिंदू श्रीवास्तव यांची प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती भावनाताई बोर्डीकर यांनी दिली आहे.
भावनाताई बोर्डीकर संचालित ब्रह्मा व्हॅली आयसीएसई ही इंग्रजी माध्यमातील शाळा मानवत तालुक्यातील कोल्हा येथे मागील दोन वर्षापासून यशस्वीपणे कार्यरत असून शैक्षणिक वर्ष २०२० ते २१ या वर्षी ब्रह्मा व्हॅली आयसीएसई या इंग्रजी शाळेचे ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल स्कूल असे नामकरण करण्यात आले असल्याची माहिती भावनाताई बोर्डीकर यांनी दिली आहे तसेच या शैक्षणिक वर्षापासून डॉ. बिंदू श्रीवास्तव या ऊच्य विद्या विभूषित असुन त्यांनी एम.ए. बी.एड. एम.एड. पी.एच.डी. चे शिक्षक पुर्ण झाले असून त्यांची कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी शाळेत प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली असून तसेच यावर्षी या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बरोबर संलग्नता केली आहे आणि त्यांचा अभ्यासक्रम अवलबविण्यात येणार आहे तसेच सीबीएसई बोर्ड सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली असून
सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल स्कुल या इंग्रजी शाळेत संपर्क करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे अहवान भावनाताई बोर्डीकर यांनी केले आहे.
Tuesday, June 2, 2020
आमदार बाबाजानी दुर्राणीसह मुस्लीम बांधवावरील गुन्हे मागे घेण्याची समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांची मागणी.
Friday, May 29, 2020
आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवरील गुन्हे माघे घ्या - मानवत राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांचे मानवत तहसिलदार मार्फत गृहमंत्रीना निवेदन
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२९: पाथरी येथे सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी ,तरबेज खान,तारेख खान यांच्यासह १२५ जणांवर पाथरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक असंतोष व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवर पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे या मागणीचे निवेदन राष्ट्वादि कॉग्रेस पार्टि मानवत चे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यावतीने दि.२९ मे रोजी मानवत तहसिलदार डि डि फुफाटे यांच्या मार्फत मा. गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी ,तरबेज खान,तारेख खान यांच्यासह १२५ जणांवर पाथरी पोलीस स्टेशन येथे सामुहिक रित्या नमाज पठण केल्या बद्दल तसेच संचारबंदि जमाव बंदि आदेशाचे उल्लंघन केल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आहे हे दुर्दैवी असुन आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पुर्ण लॉकडाऊन च्या काळात गोरगरीबांना मोठ्याप्रमाणात मदत केली असुन त्यांनी केलेल्या वेळोवेळी आवाहानामुळे पाथरी शहरासह तालुक्यातील नागरीकांनी लॉकडाऊन चे कठोर पालन केले आहे तसेच ईदची नमाज पठण करताना त्यांनी शारीरिक अंतराचे महत्वपुर्ण पालन केले आहे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक असंतोष व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवर पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे असे निवेदनात नमुद केले आहे.निवेदनावर राष्ट्वादि कॉग्रेस पार्टि मानवत चे शहराध्यक्ष शेख जुबेर,बळीराम माने,शेख तन्वीर ,अर्जुन वाघमारे,खमर राज यांच्या स्वाक्षरी आहे.
Sunday, May 24, 2020
मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांचे आवाहान .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२४: आज दि. २४ मे रोजी चंन्द्र दर्शन झाले असुन उद्या दि.२५ मे रोजी ईद ऊल फिञ अर्थात रमजान ईद देशभरात साजरी होणार आसुन कोरोना कोव्हीड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारने ३१ मे पर्यत लॉकडाऊन वाढवला यामुळे मानवत येथील मुस्लिम समाज बांधवानी नमाजसाठी मस्जिद मध्ये व ईदगाह येथे न जाता घरातच नमाज पठण करुन आपले विविध धार्मिक कार्य पार पाडुन ईद साजरी करावी असे परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांनी केले आहे.
१४०० वर्षानंतर कदाचीत पहिलीच हि वेळ असेल जेव्हा मुस्लिम समाजात रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये न जाता घरातच नमाज पठण करत विविध धार्मिक कार्यसह उपवास ठेवत आहे व पुढिल येणाऱ्या रमजान ईद हि घरातच राहुन उत्साहात साजरी करावी तसेच कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन हात मिळविने व गळाभेट टाळावी जेने करुन आपले कोरोना पासुन संरक्षण होईल तसेच देशासह जगभरातुन कोरोना नष्ट व्हावा यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करावी असे आवाहान परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांनी करुन शहरातील जनतेस रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - युवानेते डॉ.अंकुश लाड
सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन
सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन
Wednesday, May 20, 2020
मानवत येथील शहजिन शकिल बेलदार हिचा पहिला रोजा संपन्न.
मानवत / प्रतिनीधी
दि.२१: मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु असून याचे औचित्य साधून मानवत शहरातील राजगल्ली येथील रहिवासी सय्यद शहजिन शकिल बेलदार वय ९ वर्ष या मुलीने पवित्र रमजान महिन्यात दि. २० मे रोजी उपवास ठेऊन पवित्र रमजान महिन्यात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला व आपले कर्तव्य पार पाडले यावेळी त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
यासाठी त्याचे वडिल शकिल बेलदार ,आजोबा अखील बेलदार ,एकबाल राज,मोबीन बेलदार ,मुस्तखीम बेलदार यांनी शहजिन बेलदार याचे कौतुक करुन त्यास शुभेच्छा दिल्या आहे.
Monday, May 18, 2020
लोकडाऊन काळातील नागरीकांचे वीजबिल माफ करा - परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव युवानेते वसीम भैय्या कुरेशी यांची मागणी
[] मानवत तहसिलदारांना युवक काँग्रेसची मागणी []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि,१८: सध्या कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे देशभरात चौथ्या टप्प्यात हि लॉकडाऊन सरकार कडुन वाढविण्यात आला आहे यामुळे गोरगरीब मजुर व मध्यमवर्गीय नागरीकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे यामुळे शासनाने लॉकडाऊन काळातील वीजबील नागरीकांचे माफ करावे अशा मागणीचे निवेदन परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दि.१८ मे रोजी मानवत तहसिलदार डि डि फुफाटे यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, कोरोना मुळे लॉकडाऊनची परिस्थिती उदभवल्या मुळे गोर गरीब, मजदूर, हमाल मध्यम वर्गीय लोकांवर उदरनिर्वाह चे मोठं संकट निर्माण झाले आहे त्यामुळे सरकारने लोकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे असे म्हटले आहे निवेदनावर परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव युवानेते वसीम भैय्या कुरेशी ,काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष इलियास पठाण, सय्यद आरेफ, महेबूब मंसुरी, अफरोज लाला,अरशद मिलन ,सय्यद मोईन, मोहम्मद शाह, दुर्गेश कुमावत आदीच्या स्वाक्षरी आहेत.
Sunday, May 17, 2020
मानवत येथून तीस उत्तर प्रदेश येथील परप्रातीय मजुर एस टि बस ने रवाना.
[]औरंगाबाद येथुन रेल्वेने उत्तर प्रदेशला पाठविणार []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि. १७: लॉकडाऊन मुळे प्रत्येक जिल्ह्यात इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत मजुरांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिल्यानंतर आता मजूर आपल्याला आपल्या गावी परतु लागले आहे प्रशासनाच्यावतीने एसटी बसची सोय केली जात आहे मानवत तालुक्यात उतरप्रदेश येथून आलेल्या ३० मजुर आलेले होते या मजुरांना जाण्यासाठी तालुका प्रशासनाने माननीय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी बसची सोय करून दि.१६ मे रोजी सकाळी त्यांना मानवत येथून औरंगाबाद येथे पाठविण्यात आले गेल्या खूप दिवसापासून देशभरात लाँकडाउन सुरू आहे या मुळे प्रत्येकी तालुक्यात जिल्हास्तरावर इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत या मजुरांचे हाल होत असल्याने सदरील मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी शासनाने दिली आरोग्य तपासणी करून मजुरांना त्यांच्या गावी पाठवले जात आहेत त्यांची प्रवासाची सोय महामंडळाच्यावतीने केली जात असून मानवत येथे तीस मजूर अडकून पडले होते या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी माननीय तहसीलदार डी.डी. फुपाटे साहेब ,नायब तहसीलदार नकुल वाघुंडे साहेब, न.पा.चे. मुख्य अधिकारी उमेश ढाकणे साहेब, मानवत बस स्थानकाचे प्रमुख जाधव साहेब, गोपनीय शाखेचे नारायण ठमके यांनी मजुरांसाठी बसची व्यवस्था केली होती डॉ.ललित कोकरे. वैद्यकीय अधिकारी,श्री.सुनिल खरात.औषध निर्माण अधिकारी.ग्रा.रु. यांनी डॉ.नरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांची मानवत बसस्थानक येथे थरमल तपासणी करुन मजुराना सकाळी बसमध्ये बसवुन मानवत बसस्थानकावरुन औरंगाबाद येथे पाठवून दिले आहे औरंगाबाद येथुन विशेष रेल्वेने हे मजुर उत्तर प्रदेशला रवाना होणार आहे.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक,तलाठी अरविंद चव्हाण ,अरुण मानेकर,हाफिज बागवान आदी उपस्थीत होते.
Thursday, May 14, 2020
आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांच्या हस्ते हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन .
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
दि.१४: परभणी येथे खरेदी विक्री संघात शासकीय नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष तथा पाथरी विधानसभाचे आमदार सुरेशरावजी वरपूडकर साहेब यांच्या हस्ते दि. १३ मे रोजी करण्यात आले.
शेतकऱ्यांनी केलेल्या ऑनलाइन नोंदणी नुसार ही खरेदी करण्यात येणार असून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एस एम एस द्वारे आमंत्रित करण्यात येणार आहे.
Wednesday, May 13, 2020
मानवत येथे परमपूज्य श्री .श्री .रविशंकर जी याच्यां जन्म दिवसानिमित्त रक्तदान शिबिर.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत येथील वाघेश्वर उद्यान येथे सोशल डिस्टनस चे पालन करुन १३ मे रोजी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी परमपूज्य श्री श्री रविशंकर जी गुरुजी याच्यां जन्म दिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करुन जन्मदिवस साजरा करण्यात आला या रक्तदान शिबीरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले पाथरी विधानसभाचे माजी आ.मोहनराव फड,युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते रक्तदानाचे प्रमाणपञ देण्यात आले.यावेळी शरद भैय्या ,भास्कर भैय्या,अंकुश भैय्या,नंदू भैय्या तामादे, थोरे भाऊ ,तिवारी काका व सर्व गुरुप्रेमी उपस्थीत होते.
मानवत येथील गोरगरीब व मध्यमवर्गीयांना अन्नधान्य उपलब्ध करा- राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष शेख जुबेर
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: कोरोना कोव्हीड १९ या आजारामुळे देशभरात लॉकडाऊन लागु करण्यात आला असुन यात मानवत येथील गोरगरीब व मध्यमवर्गीय नागरीकांचे फार हाल होत असुन ज्या नागरीकांकडे कोणत्याही प्रकारचे राशनकार्ड नाहित अशा नागरीकांना अन्नधान्य उपलब्ध करुन द्यावे अशा मागणीचे निवेदन मा. अन्नधान्य पुरवठा मंञी महाराष्ट्र राज्य यांना तहसिलदार डि डि फुफाटे यांच्या मार्फत दि.११ मे रोजी मानवत राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांनी दिले आहे.
निवेदनात नमुद केले आहे की, कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे केन्द्रसरकारने १७ मे पर्यत लॉकडाऊन केले आहे तसेच मागील दिड महिण्यापासुन लॉकडाऊन सुरु असल्यामुळे शहरातील रोज मजुरी करुन आपली उपजीविका चालविणारे तसेच मध्यमवर्गीय नागरीकांवर उपासमारीची वेळ आली आहे कारण हाताला काम नसल्यामुळे पैसे नाहित यामुळे घर कसे चालवावे हा प्रश्न त्यांना पडला आहे यामुळे शासनाने ज्या नागरीकांकडे राशनकार्ड नाहित अशा लोकांना अन्नधान्य पुरवठा करावा जेने करुन बुखबळीमुळे कोणीहि उपाशी मरणार नाहि यासाठी लवकरात लवकर ज्या नागरिकाकडे राशनकार्ड नाहि अशा लोकांकडून अर्ज घेऊन त्यांना राशन वितरित करावे असे नमुद करण्यात आले आहे.निवेदनावर शेख जुबेर
शेख साबेर शहराध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस , तन्वीर खान,अर्जुन वाघमारे,सलीम पठाण आदीच्या स्वाक्षरी आहेत.
मानवत येथील हरिविठ्ठल स्वस्त औषधी कडून पोलिसांना सँनिटाइजर चे वाटप
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत येथील पोलीस प्रशासनाला त्यांच्या कामांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सँनिटाइजर चा वापर करण्यासाठी पॉकेट सँनिटाइजर चे वाटप शहरातील केंद्र सरकारच्या जेनेरिक मेडिसिन संकल्पनेतून असलेले हरिविठ्ठल स्वस्त औषधी सेवा यांच्याकडून जेवढे कर्मचारी तेवढे सनीटाझर चे वाटप करण्यात आले यावेळी मानवत नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे हरिविठ्ठल स्वस्त औषधी चे संचालक राणा संजय नाईक यांच्या हस्ते हे सँनिटाइजर पोलीस प्रशासनाला पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी मानवत नगरपालिकेचे नगरसेवक विनोद रहाटे यांच्यासह पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार साहेब, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांची उपस्थित होती यावेळी ब्रँडेड कंपनीचे म्हणजे हिंदुस्तान यूनिलिव्हर या कंपनी चे लाईफबॉय हे पॉकेट सँनिटाइजर पोलिसांना देण्यात आले त्याबद्दल पोलीस प्रशासनाने आभार व्यक्त केले.
Saturday, September 7, 2019
जिल्हयातील बोगस नोदणीकृत बांधकामगारांवर कारवाई होणार - कामगार अधिकारि आर.जी.रुमाले
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
दि.७: परभणी जिल्हयातील बोगस बांधकामकामगार यांनी जी बोगस नोदणी केली आहे ती स्वता तात्काळ रद्द करुन घ्यावी अन्यथा बोगस कामगारांचा शोध मोहिम घेऊन कारवाई करण्यात येईल असे आवाहान पाथरी डेली शी बोलताना परभणी जिल्हा कामगार अधिकारि श्री. आर.जी.रुमाले यांनी केले आहे.
परभणी जिल्हयात जवळपास ४०००० नोदित बांधकामकामगार असुन महाराष्ट्र राज्य ईमारत व ईतर बाधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने नोदणीकृत बाधकाम कामगाराना मंडळाच्या वतीने २९ योजना राबवुन आर्थीक मदत दिली जाते पण चुकिच्या माहितीमुळे नागरीकांनी बांधकामकामगार म्हणुन नोदणी केल्याचे निदर्शनास येत आहे यामुळे अशा बोगस नोदित बांधकामकामगारांचा कार्यालयाकडुन शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे यामुळे ज्या बोगस बांधकामकामगार यांनी नकळत नोदणी केली आहे ती नोदणी स्वत रद्द करुन घ्यावी अन्यथा कामगार कार्यालयाकडुन होणाऱ्या शासकिय कारवाईस सामोरे जावे लागेल असे आवाहान परभणी जिल्हा कामगार अधिकारि श्री .आर. जी.रुमाले यांनी केले आहे.
Sunday, December 2, 2018
बेताल वकतव्य करणाऱ्या मांजलगाव येथील डी वाय एस पी भाग्यश्री नवटक्के यांना बंडतर्फ करण्याची मागणी.
बेताल वकतव्य करणाऱ्या मांजलगाव येथील डी वाय एस पी भाग्यश्री नवटक्के यांना बंडतर्फ करण्याची मागणी.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२: मांजलगाव येथील डीवायएसपी भाग्यश्री नवटक्के या महिला अधिकाऱ्याने केलेल्या बेताल वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वञ व्हायरल होत आसुन याचा गांभीर्याने विचार करून या महिला अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून कर्ततव्यात कसूर केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात यावे या मागणीचे निवेदन दिनांक ०१ डिसेंबर रोजी मानवत येथील समस्त फुले-शाहू-आंबेडकर वादि नागरिकांच्या वतीने तहसीलदार मानवत मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ,सदरील महिला पोलीस अधिकाऱ्याने दलितांना हातपाय बांधून मारते आणि आजपर्यत २१ दलितांना फोडून काढले आहे व ऍट्रॉसिटीचा राग काढते आणि खोट्या केसमध्ये दलितांना अडकविते तसेच सवर्ण समाजाची बाजू घेऊन गोरगरीब जनतेस वेठीस धरते असे बेताल वक्तव्य महिला पोलीस अधिकाऱ्यांनी करणे म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम या महिला अधिकारी करीत आहेत अशा पद्धतीने आपल्या पदाचा गैरवापर करून दलित समाजातील लोकांवर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत अन्याय अत्याचार होत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे दाद मागायची सदरील बेताल वक्तव्य व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे या महिला पोलीस अधिकार्याने दलितांवरील तपासणी केलेल्या सर्व गुन्हे ची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर बंडतर्फ करण्यात यावे तसेच ज्या २१ दलितांना या महिला पोलीस अधिकाऱ्याने फोडून काढले आहेत तसेच त्यांच्यावर अन्याय केलेला आहे व खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे त्वरित परत घेण्यात येऊन झालेल्या त्रास पोटी त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनात दिला आहे निवेदनावर ॲड.मिलिंद तुपसमुद्रे ,कार्तिक मजमुने, आनंद पंचांगे, सागर गाडे, अमोल मगर, किरण पंडित, विनोद लोखंडे ,सावन जोंधळे, विजय धबडगे, गौतम जमदाडे अयुब भाई, आशिष घुगे, शुभम पंचांगे, विकी नवरे आदिच्या स्वाक्षरी आहेत.

















































