Tuesday, August 19, 2025

दर्गा रोड प्रभाग क्रमांक ११ मध्ये सय्यद अबरार ईलाही राज यांच्या उमेदवारीची जोरदार शक्यता 

परभणी महानगरपालिका प्रभाग क्र. ११ मध्ये नव्या नेतृत्वाची चाहूल

[] सय्यद अबरार ईलाही राज यांच्या उमेदवारीची जोरदार शक्यता []

परभणी (प्रतिनिधी) – परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी राज बेलदार समाज सेवा मंडळाचे राज्य अध्यक्ष सय्यद अबरार ईलाही राज हे उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत. प्रभागातील नागरिक आणि विशेषतः राज बेलदार समाज बांधवांनी सय्यद अबरार ईलाही राज यांनी निवडणूक लढवावी यासाठी ठाम आग्रह धरला आहे.

सदर प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून, रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, लाईट्स आदी विकासकामे फारशी न झाल्याने सामान्य नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर, लोकांमध्ये एक नवा पर्याय म्हणून सय्यद अबरार ईलाही राज यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.

जनतेचा विश्वास, बदलाची अपेक्षा

सय्यद अबरार ईलाही राज हे समाजकारणात सक्रिय असून, राज बेलदार समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले गेले असून, ते एक अनुभवी, प्रामाणिक आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

स्थानिक नागरिकांचा विश्वास आहे की, "सय्यद अबरार ईलाही राज जर निवडून आले, तर प्रभागात खऱ्या अर्थाने विकासकामांना चालना मिळेल, समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळेल, आणि भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभाराची सुरुवात होईल."

समर्थकांचा उत्साह, प्रचाराला सुरुवात

सध्या प्रभागात सय्यद अबरार ईलाही राज यांच्या समर्थनार्थ चर्चा, बैठका आणि संपर्क मोहिमा सुरू झाल्या आहेत. युवक वर्ग,  आणि ज्येष्ठ नागरिक यांचाही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे समर्थक म्हणतात, "या वेळी आपल्याला बदल हवा आहे, आणि तो बदल सय्यद अबरार ईलाही राज यांच्या माध्यमातून निश्चितच घडेल."
प्रभागातील राजकीय समीकरणे हळूहळू स्पष्ट होत असून, सय्यद अबरार ईलाही राज यांच्या उमेदवारीने निवडणुकीत नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No comments:

Post a Comment