Wednesday, March 27, 2024

मानवत शहरातील नागरिकांना मुलभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठि भाडेवाढ आवश्यक - मुख्याधिकारी कोमल सावरे

मानवत शहरातील नागरिकांना मुलभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठि भाडेवाढ आवश्यक - मुख्याधिकारी कोमल सावरे
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत नगर परिषदेने, नगर परिषदेच्या जागेवर मेनरोड व मार्केट या ठिकाणी व्यावसायीकांकरीता विविध योजने अंतर्गत नगर परिषदेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने साल सन १९८३-८४ पासुन टप्याटप्याने शॉपींग सेंटरचे बांधकाम हाती घेवुन आज मित्तीस एकूण ८७ गाळे हे व्यवसाय धारकांना किरायावर दिलेले आहे यात भाडेवाढ नगरपरिषद च्या वतीने करण्यात आली आहे.
नगर परिषद मानवत अंतर्गत शासनाने नगर परिषदेला ठरवुन दिलेल्या नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ करणे बंधनकारक केलेले आहे. त्यामध्ये शासनाकडुन मंजूर होणारे अनुदानात व पंधरावा वित्त आयोग यांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे व शहरात मुलभुत सोय सुविधा पुरविणे च्या दृष्टीकोणातुन भाडे वाढ करणे अत्यंत गरजेचे होते. शहरातील वाढती लोकसंख्या व वस्त्यांचा विचार करता मानवत नगर परिषदेवर स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर अनुषंगीक बाबी पुरविणे गरजेचे आहे. परंतू उत्पन्नाचा स्त्रोत पहाता या सर्व बाबीचा नगर परिषदेवर आर्थिक ताण वाढत आहे. तसेच शासनाने वारंवार दिलेल्या सुचनेचे पालन करणेसाठी नगर परिषदेने शहरात मालमत्ता कर रिव्हीजन चे काम हाती घेतलेले आहे. सदरील काम सध्या पूर्णत्वाकडे आहे. त्यामध्ये शहरातील व्यापा-यांसाठी गाळेधारक व जमिन किरायाधारक यांना मुबलक व त्यांचावर बोजा होणार नाही या दृष्टीकोणातुन नगर परिषदेने नगर रचना व मुल्य निर्धारण विभाग यांनी नेमुन दिलेल्या भाडेवाढ करणेच्या नियमाप्रमाणे प्रति वर्षी भाडे वाढ करणे गरजेचे आहे. त्यानुसार यापुर्वी नगर परिषदेने यापुर्वी निश्चित केलेली शॉपींग किराया व जमिन किराया मध्ये वाढ करणेसाठी शहरातील इतर बाजारपेठेतील दुकानांचा किराया लक्षात घेता कोणत्याही व्यापा-यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेवुन सदरील किराया वाढ निश्चित केलेली आहे. ज्यामध्ये शासनाने ठरवुन दिलेल्या करयोग्य मुल्य दरापेक्षा कमी प्रमाणात भाडेवाढ केलेली आहे.
नगर परिषदेने शॉपींग सेंटर व जमिन किराया मध्ये केलेल्या भाडेवाढीमुळे नगर परिषदेच्या काही प्रमाणात उत्त्पन्नात वाढ होत असल्याकारणाने स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, मुलभुत सोय सुविधा पुरविणे व इतर अनुषंगीक बाबी पूर्ण करणे सुलभ होईल असे प्रसिद्धी पञिकेद्वारे मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी जनतेस कळविले आहे.



No comments:

Post a Comment