Saturday, March 30, 2024

उष्माघातापासून नागरीकांनी स्वताचा बचाव करावा - डॉ. हमीद खान

उष्माघातापासून नागरीकांनी स्वताचा बचाव करावा - डॉ. हमीद खान
मानवत / मुस्तखीम बेलदार 

सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन ऊन वाढले आहे यासाठि नागरीकांनी स्वताची काळजी घेऊन उष्माघात  टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे असे आवाहान मानवत ग्रामीण रुग्णालयाचे  डॉ. हमीद खान यांनी केले आहे.

घराबाहेर पडण्यापूर्वी भरपुर पाणी प्यावे 
,सुती, सैल आणि आरामदायी कपडे घाला,भरपूर ताजे अन्न खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडा,उन्हात बाहेर जाताना डोके झाका. टोपी/कपडा/छत्रीचा वापर करा,पाणी, ताक, ओ.आर.एस पाण्याचे द्रावण किंवा लस्सी, लिंबूपाणी, आंबा पन्हे इत्यादी पेय घ्यावे तसेच रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडू नये,उन्हात अधिक वेळ राहू नका,तिखट मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नका नेहमी पाणी सोबत ठेवा. शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका
ताप आल्यास थंड पाण्याची पटटी ठेवा. कूलर किंवा एअर कंडिशनर्समधून थेट उन्हात बाहेर पडू नका उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे असे आवाहान मानवत ग्रामीण रुग्णालयाचे  डॉ. हमीद खान यांनी नागरीकांना  केले आहे

No comments:

Post a Comment