Wednesday, August 30, 2023

कोल्हा येथील पशु वैद्यकिय दवाखान्यास कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी देण्याची शेतकऱ्यांची मागणी

कोल्हा येथील पशु वैद्यकिय दवाखान्यास  कायमस्वरुपी पशुधन विकास वैद्यकिय अधिकारी देण्याची शेतकऱ्यांची मागणी 

मानवत / मुस्तखीम बेलदार 

 मानवत तालुक्यातील कोल्हा येथील पशु वैद्यकिय दवाखाना  येथे कायमस्वरुपी पशुधन विकास वैद्यकिय अधिकारी असणे आवश्यक आहे कारण की, कोल्हा पशु वैद्यकिय दवाखाना श्रेणी-१ अंतर्गत १६ गावांचा समावेश आहे. परंतु मागील तीन महिन्या पासुन तेथे वैद्यकिय अधिकारी नाही. सध्या पशुवैद्यकिय अधिकारी असणे अत्यंत गरज आहे कारण की, महाराष्ट्रामध्ये जनावरांना लंपी हा आजार जास्त प्रमाणात झाला आहे व होत आहे तसाच  कोल्हा तसेच इतर १६ गावात १५०पेक्षा जास्त जनावरांना लंपी हा आजार झाला व त्यापैकी अंदाजे १०जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. लंपी आजारावर मात करण्यासाठी दवाखान्यात मुबलक औषध साठा पण नाही.
मागील तीन महिण्यांपासून पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-१ कोल्हा येथे पशुधन विकास वैद्यकिय अधिकारी नसल्यामुळे जनावरांना उपाचाराची सोय होत नसल्यामुळे त्यांचा बळी जात आहे व तसेच जनावरांना खाजगी मेडीकलवर औषध घेण्याकरीता खुप खर्च करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच सध्या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला तसेच लंपी या आजारामुळे शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडत आहेत यामुळे शेतकरी चिंतेत आहे अर्जाचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन गांभीर्याने नोंद घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा व तात्काळ पशु वैद्यकिय दवाखाना श्रेणी-१ कोल्हा येथे पशुधन विकास वैद्यकिय अधिकारी यांची तात्काळ कायमस्वरुपी व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवाच्या वतीने  मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व जिल्हा पशुवर्धन अधिकारी परभणी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर शेतकरी बांधवाच्या स्वाक्षरी आहेत.

No comments:

Post a Comment