Friday, August 18, 2023

मानवत पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार पोलीस स्टेशनमध्ये थेट सायकलवरुन दाखल

 मानवत  पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार  पोलीस स्टेशनमध्ये थेट  सायकलवरुन दाखल 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
 
पूर्वी एक काळ असा होता ज्याच्याकडे सायकल असेल तो श्रीमंत समजला जायचा. तेव्हा आपल्याकडे वाहतुकीचे उत्तम साधन सायकल असायचे. लोक त्यांच्या घरी ऑफिस, मार्केट, शैक्षणिक संस्था किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी सायकल वापरायचे. मात्र दिवसेंदिवस सायकलचा वापर फारच कमी होऊ लागला आहे.लोक आता मोटरसायकल, डिझेल पेट्रोलवर चालणारी वाहने वापरू लागले आहेत.
त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे.
आरोग्य आणि वाढते प्रदूषण पाहता प्रत्येकाच्या जीवनात तंदुरुस्त आरोग्यासाठी तरी सायकलचे महत्त्व असावे, याचा विचार करून  मानवत ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपक दंतुलवार हे  सकाळपासून नेहमीच सायकलचा वापर करत असतात परंतु त्यांनी आज पासुन पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी आपल्या घरा पासून ते पोलीस स्टेशन पर्यंत 
रोज सायकलवर येण्याचा  निर्धार  केला असुन पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार  पोलीस स्टेशनमध्ये थेट गणवेशात सायकलीवर दाखल झाले 
 तसेच पो स्टे चे अधिकारी व अंमलदार यांना देखील सायंकाळी सायकल पेट्रोलींग करण्यास प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले व याचा वापर गणेशोत्सव,शारदात्सोव या सारख्या सणा सुदीच्या काळात करणार असल्याचे प्रतिपादन केले.

No comments:

Post a Comment