Tuesday, August 29, 2023

लोक शाहीर साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांची जयंती हटकरवाडि येथे ऊत्साहात साजरी

लोक शाहीर साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांची जयंती हटकरवाडि येथे ऊत्साहात साजरी .
मानवत / मुस्तखीम बेलदार 
२९ऑगस्ट २०२३ रोजी मानवत तालुक्यातील मौजे हटकरवाडी  येथे लोक शाहीर साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांची जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास आणाभाऊ साठे यांचे नातू श्री .सचिन साठे, माजी आमदार मोहनभाऊ फड , शिव व्याख्याते नृसिंह सदगे, विद्याभूषण चव्हाण, रवी चव्हाण आदी व्यासपिठावर उपस्थीत होते.
या वेळी उपस्थीत मान्यवराचे हस्ते लोक शाहीर साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांच्यां प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन ढोल ताशे च्या गजरात भव्य मिरवणूक काढुन अभिवादन करण्यात आले.यावेळी शिव व्याख्याते नृसिंह सदगे  यांनी आपले विचार मांडले.
तसेच माजी आमदार मोहनभाऊ  फड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महापूरूषाच्या जयंती साजरी करत असताना  त्याचे विचार, त्यांचे आचरण प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जिवनात  आणावे. समाजातील अनिष्ठ  परंपरा झुंगारून पुरोगामी विचार आत्मसात करावे अपल्या पाल्यांना उच्च, शिक्षित करून  शिक्षणा विषयी आवड निर्माण करावी. या सोबतच जयंती दिनी रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिवीर स्वच्छता राबवावी असे ते म्हणाले.
अध्यक्षिय समारोपात  मा. सचिन साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती कमीटी अध्यक्ष भेगाद साठे अशोक साठे, अंकुश साठे ,  बाबासाहेब जोरवर, गोविंद नाईक प्रसिद्ध जोरवर, जागोबा जोरवर, गोविंद साठे विठ्ठल साठे, इंद्रायनी मित्र मंडळ अन्वर भैय्या शेख, शेख गुलाब यांच्यासह गावकरी मंडळीनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार  तुकाराम पकाले यांनी मानले.या वेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment