Sunday, August 13, 2023

ओबीसी समन्वय समिती व भारतीय पिछडा ओबीसी शोषित संगठन मराठवाडा विभाग याच्या वतीने विविध मागण्यासाठी प्रचंड धरणे आंदोलन.

ओबीसी समन्वय समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे विविध मागण्यासाठी प्रचंड धरने आंदोलन

औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार 

ओबीसी समन्वय समिती व भारतीय पिछडा ओबीसी शोषित संगठन मराठवाडा विभाग
याच्या वतीने विविध मागण्यासाठी  प्रचंड धरणे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे दि.१३ आँगस्ट रोजी करण्यात आले.

ओबीसी विजे एनटि एस बी सी 
च्या मागण्यांसाठी दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर धरणे आंदोलन करुन यात  मंडल आयोगांच्या संपुर्ण शिफारशींची अंमलबजावणी करा, ओबीसींची जात निहाय जनगणना करा,ओबीसी विजे एनटि एस बी सी  कर्मचाऱ्यांना प्रमोशन मध्ये आरक्षण द्या, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वस्तीगृहे व २१६०० विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना लागु करा,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रा.घेऊन सर्व ठिकाणी ५०% आरक्षण लागु करा तसेच  नॉन क्रिमिलेयरची असंविधानिक अट रद्द करा या विविध  मागण्या शासनाद्वारी मांडल्या.
यावेळी एस जी माचनवार ,प्रा.सुदाम चिंचाणे ,डॉ.कालिदास भांगे,डॉ.देवराज दराडे,डॉ.लक्ष्मण शिंदे,निशांत पवार,प्रा.वसंत हारकळ,जनार्धन कापुरे,सुशीलाताई मोराळे,सुरेश आगलावे,विष्णु वखरे,नागनाथ गोरे,प्रा.विश्वनाथ कोक्कर ,विधीतज्ञ महादेव आंधळे,सरस्वती ताई हारकळ,प्राचार्य ग.ह. राठोड ,मुस्तखीम बेलदार ,अंबादास रगडे,विजय महाजन,डॉ.ज्ञानदेव घुगे, यांच्यांसह मोठ्यासंख्येने ओबीसी कार्यकर्ते उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment